Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • भावनेचं रूप घेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर... बटन पंचायत समितीच्या मतदानाचा दिवस. सुसाबाईच्या खोपटासमोर मोटारसायकल थांबली. ये सुसा मावशे, चल की मताला. गाडीवर न्हीतू. बस...
  July 9, 12:05 AM
 • समाज आणि व्यवस्थेच्या पातळीवर टोकाचा सूड, द्वेष आणि तिरस्काराचे दर्शन घडवणाऱ्या घटना दर दिवशी घडत आहेत आणि समाज या घटना निबर होऊन पेप्सी आणि कोकच्या घोटासह सहज गिळूनही टाकतो आहे... गुन्हा नसतानाही एखाद्याला अमानुषपणे शिक्षा दिली जातेय, आणि गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्यांना जनावरासमान वागणूक दिली जातेय... गेल्या आठवड्यात मुंबईतल्या भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्ये नामक महिला कैद्याला व्यवस्थेच्या झुंडीने केलेली मारहाण आणि त्यात तिचा झालेला मृत्यू केवळ तुरुंगरूपी छळछावण्या उजेडात...
  July 2, 07:13 AM
 • मनुष्यप्राणी या उल्लेखात प्राणी शब्दाचं असणं दुर्लक्षिता येत नाही. किंबहुना सुप्त स्वरूपात का होईना, पण हिंसा प्रत्येकाच्या मनात घर करून असते, हेच हा शब्द वारंवार अधोरेखित करत असतो. मात्र, व्यक्ती-संस्थांचे संस्कार, प्रभाव आणि दबाब या हिंसेवर वेळोवेळी नियंत्रण ठेवत असतात. पण हेच प्रभाव आणि सामाजिक-धार्मिक दबाव हिंसेला पोषक ठरू लागले, तर वैयक्तिक स्तरावर हिंसेला प्रोत्साहन मिळतेच, परंतु सामूहिक स्तरावरचा झुंडीच्या रूपातला बाहेर पडणारा हिंस्रपणाही टोक गाठतो... झुंडशाही मुख्यत: जात,...
  July 2, 12:05 AM
 • नजरेपलीकडच्या जगाची आपल्याला अभावानेच जाणीव असते. म्हणूनच हॉटेलात गेल्यावर खाण्यापिण्यात मग्न असणारे आपण किचन आणि किचनपलीकडच्या विश्वात काय खळबळ माजत असते, किती ताणतणाव असतात, आणि किती मानापमानाचे प्रसंग घडतात, याबाबत अनभिज्ञच असतो... क्रांती चौकातून जिकडं रस्ता फुटंल तिकडं चाललो होतो. रस्त्याच्या दोन्ही कडंला असलेल्या पाट्या वाचत होतो. कुठं एखादी हॉटेलची पाटी दिसती का, म्हणून बघत होतो. थोडं पुढं गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या एलोरा हॉटेलच्या पाटीवर माझं लक्ष गेलं. हॉटेल तसं...
  July 2, 12:05 AM
 • रिंगण हा आम्हा मित्रांचा आपली मुळं शोधण्याचा प्रयत्न, असे आम्ही मानतो. ग्लोबलायझेशनमध्ये हरवलेली आमची पिढीच हा शोध घेत असावी. प्रत्येक रिंगणाबरोबर आपल्या सगळ्यांच्याच रिंगणाचा जमेल तितका परीघ वाढायला हवा, यासाठी आम्ही थोडंसं धडपडतो. असाच परीघ वाढत राहिला, तर आकाशाएवढं होता येतं... आम्ही काही मित्र गेली पाच वर्षं रिंगण नावाचा वार्षिक अंक काढतो. तहान लागली की विहीर खोदायची. अंक प्रकाशनाची तारीख जवळ आली की, जाहिराती शोधायच्या. खर्चाची जुळवाजुळव करायची. रिंगणला मदत देण्याचं आवाहन...
  July 2, 12:05 AM
 • परिवर्तनाचा विशुद्ध हेतू नजरेपुढे ठेवून सुरू झालेले लोकलढे सामान्य माणसाच्या जगण्यात क्रांतिकारी बदल घडवून आणतात, त्यांना आत्मसन्मानाचे जगणे बहाल करतात. पाणी परिषदेच्या माध्यमातून कधीकाळी दिग्गजांनी उभारलेल्या चळवळीने उभ्या महाराष्ट्राला नेमका हाच संदेश दिला... एक हायस्कूलमध्ये शिकत होतो, तेव्हाची गोष्ट. आमच्या गावातील स्वातंत्र्यसैनिक तुकाराम दादा गायकवाड हे सकाळी गावातील सगळ्या घरात फिरून पाणी परिषदेला चला असं सांगत होते. ही पाणी परिषद आटपाडीला होती. जायला ट्रक होता. मी आणि...
  July 2, 12:05 AM
 • एका बाजूला आर्थिक सुबत्तेची भरजरी स्वप्नं आहेत, बुलेट ट्रेन आणि स्मार्ट शहरांचे आराखडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड असंतोष आहे, अविश्वास आणि मनाची अस्थिरता आहे. दररोज एका पाठोपाठ एक प्रश्नांची वादळे आदळताहेत आणि त्या आवर्तात माणूस जत्रेतल्या कागदी भिंगरीसारखा भिरभिरतोय... जाणिवेबरोबर मन आणि विचार करण्याचे सामर्थ्य लाभलेल्या माणसाने देव आणि धर्माची संकल्पना रुजवली. अप्रतिम प्रार्थनास्थळं, देवळं बांधली. उच्च-नीच असे भेद तयार केले. मात्र त्या संकल्पनांनी आणि भेदाभेदांनीच त्याला...
  July 2, 12:05 AM
 • प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर मुखवटा आहे. प्रत्येकामध्येच जातवर्चस्वाची भावना घर करून आहे, आणि प्रत्येकालाच जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचं मोल अधिक आहे. अशा मुखवटाधारी, जातश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या स्वार्थपरायण समाजाला लेखक-दिग्दर्शकाने धाडसाने फटकारे मारले आहेत. हेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे वैशिष्ट्यही ठरले आहे... भारतीय माणसाच्या कणाकणांत जातीचे विष भिनले आहे. जातीचा वापर करून प्रत्येक जण दुसऱ्यावर कुरघोडी करू लागला आहे. सोशल बेवसाइट्स जातिवाचक शिव्याशापांनी भरून वाहात आहेत. टिपेला...
  July 2, 12:05 AM
 • चित्रपटनिर्मिती हा जितका सृजनाचा खेळ आहे, तितकाच चलाखीचाही मामला आहे. इंदू सरकारची निर्मिती करताना दिग्दर्शक मधुर भांडारकरने आपलं हिंदुत्वप्रेम मोठ्या खुबीने झाकलं आहेच; पण डाव्या विचारसरणीच्या व्यक्तिरेखा, कम्युनिझमचा लाल रंग आणि आणीबाणीतली जॉर्ज फर्नांडिसांची साखळदंडातली प्रतिमा योजून तटस्थतेचा आवही आणला आहे. गंमत म्हणजे, बंदीचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपला कधी नव्हे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उमाळे आले आहेत... मधुर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार सिनेमाच्या...
  July 2, 12:05 AM
 • वैसे, आपले नरेंद्रभाई एकदम सत्याग्रही आहेत बापू... सत्याग्रह म्हणजे, सत्यासाठी प्रेमाद्वारे धरलेला आग्रह. सत्याग्रह म्हणजे स्वत: निराग्रही राहून फक्त सत्याचा धरलेला आग्रह. असं केल्याने स्वत:ची आत्मशुद्धी होईल आणि समोरच्याचे म्हणजे दलित आणि मुस्लिमांना मारणाऱ्या हिंसक झुंडींचे विचारपरिवर्तन होईल, अशी नरेंद्रभाईंची अढळ श्रद्धा आहे, बापू... शेवटी संघाचे संस्कार असले म्हणून काय झालं, पाणी तर गुजरातचं आहे ना बापू... अरे बापू, कौन से चक्की का आटा खा के आया था तू? और कौन से चक्की का आटा खा के गया...
  July 2, 12:05 AM
 • पहिल्या आणीबाणीला ४२ वर्षे झाली. तिच्या आठवणी आता पुसट होत चालल्या आहेत. तरीही भाजप त्या जागवू पाहात आहे. पण त्याच वेळी दुसरीकडे खुद्द भाजप राजवटीत अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. नरेंद्र मोदी यांची वाटचाल थेट इंदिरा गांधी यांच्या पद्धतीने चालू आहे, असेही अनेकांचे ठाम म्हणणे आहे... स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आणीबाणी हे एक काळे पान आहे. या काळात संसद स्थगित करण्यात आली. विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. इंदिरा गांधी यांना विरोध करणारे ते ते सरकारचे व देशाचे...
  June 25, 12:03 AM
 • स्त्री गर्भ धारण करते,पुरुष नाही, या एकाच गोष्टीचा पुरुषांनी आजवर प्रचंड गैरफायदा घेतलेला आहे. त्याच्याच बळावर पुरुषांनी एकेकाळची मातृसत्ता उलथवून पितृसत्ताक पद्धती आणली. पण ती कायम टिकेल, याची आता शाश्वती नाही. पुरुषांना आपल्या पौरुषत्वाचा नको तितका अभिमान असतो. बोलीभाषेत त्याला शब्द आहे मर्दानगी. मर्द को दर्द नहीं होता असली भंकस पुरुष अनेकदा करतात. त्यात आपण स्त्रियांपेक्षा वरचढ आहोत, असा भाव असतोच; शिवाय इतर पुरुषांपेक्षाही आपल्यातच जास्त पुरुषत्व आहे, असा माजही त्यात मिसळलेला...
  June 25, 12:03 AM
 • काश्मीर म्हणजे दहशतवादी हल्ले, फुटीरवाद्यांच्या हिंसक कारवाया. काश्मीर म्हणजे स्थानिकांचा लष्कराशी होत असलेला संघर्ष, आणि काश्मीर म्हणजे नंदनवनात वाहणारे रक्ताचे पाट... या बदनाम ओळखीला मागे टाकत आता काश्मिरी युवकांमध्ये बॉडीबिल्डिंगचे वेड पसरू लागले आहे... दहशतवादाच्या आगीत होरपळलेला काश्मिरी समाज यातून आशावादी पहाटेचे स्वप्न पाहू लागला आहे... सतत अस्थिर आणि अशांत असलेल्या काश्मीरमध्ये दगड हातात घेऊन रस्त्यांवर उतरलेले युवक, त्यांचा लष्करासोबतचा हिंसक संघर्ष हे नेहमीचेच...
  June 25, 12:03 AM
 • बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच आई वारली.बाळाच्या पित्याने नैराश्यातून आत्महत्या केली. बाळ लौकिकार्थाने अनाथ झाले. त्या छोट्या जिवाचं असं आपल्या डोळ्यांसमोर निराधार होणं,बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना निखशिखांत हादरवून गेलं. एक दिवस बाळाचे आजोबा डॉक्टरांना भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, यापुढे बाळाच्या तब्येतीची जबाबदारी माझी. डॉक्टरांचे हे बोल ऐकून दुष्काळग्रस्त आजोबांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाले, पैशांची अडचण नाही. ते मी कसेही...
  June 25, 12:02 AM
 • फेसबुकवर साडे तेरा लाखांची पोच. हा एका पोस्टचा अवघ्या सात दिवसांतला प्रवास. तोही बिनपैशात. हा अनुभव थक्क करणारा. डॉ. अमोल अन्नदातेंच्या फेसबुक पेजवरून ही पोस्ट व्हायरल झाली. व्हायरल हा शब्द का वापरला जातो, ते या पोस्टमुळे कळलं. असं काय होतं या पोस्टमध्ये? अमोल अन्नदाते सेलेब्रिटी नाहीत, सिनेस्टार नाहीत, क्रिकेटपटू नाहीत, राजकीय नेते नाहीत. तरीही एका डॉक्टरच्या पोस्टला इतकी पोच मिळावी? या पोस्टमधून लोकांना दिसला, एक संवेदनशील डॉक्टर. या पोस्टमधून लोकांना दिसले, एक व्यथित तरीही...
  June 25, 12:01 AM
 • भावनेचं रूपघेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर... एक मोठा वाडा. दरवाजाशी एक खोलीवजा दुकान. फोटो फ्रेमचं. गजबजलेलं, चकाकणारं, अस्ताव्यस्त, तरीही सुखावणारं. हनुमान,...
  June 25, 12:01 AM
 • महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त बारा जागांवर साहित्य, कला, विज्ञान, सहकार, संस्कृती या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती होणे, हे घटनेतील तरतुदींनुसार आवश्यक होते. परंतु राज्याच्या निर्मितीनंतर याबाबत इतकी चालढकल झालेली आहे की, या बारा जागा म्हणजे आपल्या मर्जीतील नेत्यांची खोगीरभरती करण्याची ठिकाणे, असा समज राजकीय पक्षांनी करून घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे...
  June 25, 12:00 AM
 • जसे शरीर आपल्याला येऊ घातलेल्या आजार-विकाराचे संकेत देत असते, तसेच वर्तमान आपल्याला भविष्यातल्या धोक्यांचे इशारे देत असते. असेच जागतिक आणि देशपातळीवरचे भविष्यातले संभाव्य धोके राजहंस प्रकाशनाचे प्रस्तुत पुस्तक आपल्याला समजावून सांगते... वाचनाचा किडा ज्याला डसलेला असतो, त्याला रोज नवे काहीतरी वाचायला हवेच असते. या शोधात अनेक पुस्तके घेतली जातात. कष्ट करून पैदा केली जातात. आजकाल नेटवर शोधाशोध चालू असते. पेपरमधून येणाऱ्या पुस्तकांची नोंद घेतली जात असतेच. हे शोधताना भाषिक आग्रह...
  June 25, 12:00 AM
 • करून सवरून नामानिराळे राहण्याच्या कलेतून राजकारण बहरत जाते. आजचे सरकार आणि या सरकारची पितृसंघटना या कलेत विलक्षण पारंगत आहे. त्यातूनच हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टरपंथी संघटनांना राज्यघटना पायदळी तुडवण्यास मूक संमती दिली जात आहे. आणीबाणीसदृश परिस्थिती लादणारेच आणीबाणीविरोधी दिन पाळण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत... बरेच लोक जिच्याकडे त्यात काय एवढे म्हणून दुर्लक्ष करतील, अशी एक घटना नुकतीच घडून गेली. खरे तर एक प्रकारचा जाहीर गुन्हाच घडवला गेला आणि त्याकडे दुर्लक्षच केले...
  June 25, 12:00 AM
 • विस्मृतीत गेलेला बिकिनी किलर चार्ल्स शोभराज गेल्या आठवड्यात अचानक बातम्यांमध्ये चमकला. पाठोपाठ त्याच्याशी निगडित कथा-दंतकथांना नव्याने उजाळा दिला गेला. त्याचे तुरुंगातून सफाईने पळून जाण्याचे किस्से चघळले गेले, त्याला अत्यंत चतुराईने जेरबंद करणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंची कर्तबगारी नव्याने सांगितली गेली. अर्थात, सत्तर-ऐंशीच्या दशकात पोलिसांना गुंगारा देत पसार होण्याचं कसब राखून असलेला शोभराज आता वृद्धत्वाकडे झुकलाय. काठमांडूमधल्या सुंधारा सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची...
  June 18, 10:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED