Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • मॅचो हीरोंचा भरणा असलेल्या बॉलीवूडला सत्ताधारी व्यवस्थेने सहज खिशात घातलं आहे. मराठी चित्रसृष्टी तळ्यात-मळ्यात करतेय. पण तिकडे दक्षिणेत पडद्यावरचा खलनायक, पण वास्तवातला नायक शोभणाऱ्या प्रकाश राजने प्रश्न विचारू न देणाऱ्या सत्तेला मोठ्या हिमतीने शिंगावर घेतलंय... म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात... कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या ख्यातनाम गीतातील या ओळी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या गीताला स्वर दिला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होणाऱ्या सार्वजनिक...
  May 13, 02:00 AM
 • रशियन राज्यक्रांतीला झालेली १०० वर्षे, दास कॅपिटल या मार्क्सच्या ग्रंथांची १५०वी वर्षपूर्ती आणि कार्ल मार्क्सचा २००वा जन्मदिवस. खरं तर या तिन्ही औचित्याप्रसंगी समाजवादी राज्यव्यवस्था, तिची आजच्या काळात आणि भारतात उपयोगिता आदींची चर्चा व्हायला हवी होती. मात्र, या तिन्ही निमित्तांचा वापर झाला तो फक्त स्मरणरंजनांसाठी, भांडवलशाही व तिला लगडून येणाऱ्या राजकीय-सांस्कृतिक सत्तांना लाखोली वाहण्यासाठी... जनतेचं अंतिम कल्याण समाजवादी व्यवस्थेत आहे, असा ज्यांचा दावा आहे, त्या डाव्यांनी...
  May 13, 02:00 AM
 • मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा भक्त पुंडलिक आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा राजा हरिश्चंद्र या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. त्यानंतर मागील १०५ वर्षांत भारतीय चित्रपट इतका विस्तारला की, आजमितीला भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट बनवणारा आणि चित्रपट पाहणारा देश बनला आहे. परंतु, व्यामिश्र संस्कृतीचा देश असल्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पनादेखील तशीच व्यापक आणि गुंतागुंतीची ठरली आहे.. नॅशनल सिनेमा ही संकल्पना फिल्म स्टडिजमध्ये तुलनेने अगदी अलिकडची....
  May 13, 02:00 AM
 • जो स्वप्न पाहतो, त्या दिशेचा विचार करतो आणि प्रयत्नांती ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, तो खरा आविष्कारी.थिंक महाराष्ट्रला शोध अाहे तो अशा कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा तरुण त्या गटात मोडतो. तो जसा आदेश देतो, यंत्र त्यानुसार कार्य करते... त्याला रोज सकाळी लवकर उठायचा जाम कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे तर भाग असे. मग हा...
  May 6, 07:24 AM
 • नैतिकता ही तत्त्वज्ञानाची एक उपशाखा. तिचा उद्गाता सॉक्रेटिस. माणसाने कसं जगायला हवं, माणसाचं जगणं कसं अर्थपूर्ण होऊ शकतं, याचा त्याने आयुष्यभर शोध घेतला. दाहक, प्रखर सत्याला भिडण्याची धमक त्याने दाखवली. मग, तो कसा लुप्त होईल या पृथ्वीतलावरून...? रंगमंच संपूर्ण उजेडात येतो,या वेळी रंगमंचावर फक्त सॉक्रेटिस. मी कसं बोलतो,यापेक्षा मी किती सत्य बोलतो,यालाच महत्व असायला हवं. ज्या माणसाला थोडंसुद्धा चांगलं करायचं आहे, तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतोःमी करतोय ते चांगलं का वाईट? त्यानं...
  May 6, 03:14 AM
 • वा स्तवाला भिडू पाहणारा अाणि अापल्या अस्तित्वाबद्दल चिंतन करायला लावणारा ज्ञानेश्वर मुळे यांचा सकाळ... जी हाेत नाही हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अधिक खाेलात घेऊन जात चिंतनशील बनवते. सातत्यानं बदलणारे जीवन प्रवाह, हिंसा, राजकारण, समाज, देश, धर्माबद्दलच्या मानवी जाणीवांबद्दल अगदी साेप्या शब्दात त्यांनी या कवितेद्वारे भाष्य केले अाहे. जगणं सुसह्य करण्याच्या नादात अापण कुठेतरी हरवत चालल्याची खंत त्यांनी त्यांच्या काेणाशी तरी जाेडलं जाण्याच्या...
  May 6, 02:48 AM
 • अन्यायाविरोधात रस्त्यात उतरलेली अनवाणी धूळ भरलेली अन् परिस्थितीच्या फुफाट्याने टरारून फोड आलेली पावलं असतात, हस्तक्षेप. धमकवणाऱ्या सत्ताधीशांच्या विरोधात नाराजीचा साधा नोंदवलेला निषेधही असतोच, हस्तक्षेप. हस्तक्षेप असतो, रस्त्याच्या कडेनं निमूट रडत जाणाऱ्या निराधार मुलाची, आपुलकीने केलेली चौकशी. हा हस्तक्षेप केलाय, वीरा राठोड यांनी. त्या हस्तक्षेपाला दिलेली ही दाद... खंडप्राय पसरलेला आहे,आपला अवाढव्य देश. ज्यांनी अशिया अन् युरोपच्या सांस्कृतिक अन् अध्यात्मिक जीवनावर प्रभाव...
  May 6, 02:20 AM
 • परिस्थितीच्या माऱ्याने माणसं खचत असतील कदाचित, पण माणुसकी? ती उत्तुंगच होत जाते. जिच्याबद्दल माझ्या मनात एक प्रकारची श्रद्धा आणि करुणा होती, त्या दूर देशातल्या रेश्मानं मला माणुसकीचा खरा अर्थ सांगितला होता... मध्यरात्र उलटली होती. दुधाळ चांदण्यांनी आभाळ व्यापलेलं होतं. ती चांदणी लगडलेली आभाळाची चादर जमिनीला टेकू पाहत होती. पण मला आनंद वाटत नव्हता. राहून राहून डोळ्यासमोर रेश्माच येत होती. जीव दमला, शिणला तरी खोलीवर जावंसं वाटत नव्हतं. मनातली विचारांची वावटळ थांबता थांबत नव्हती. शेवटी...
  May 6, 02:08 AM
 • पाचवीला पुजलेल्या दुष्काळात प्रसादच्या डोळ्यांत महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न तरळलं. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्याने गाव सोडलं. स्वप्न बहरू लागलं आणि एका क्षणी सरावादरम्यान अपघात झाला. संघर्षाचा काळ दाटूून आला... सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात फिरताना मराठवाड्यातून आलेल्या कोणत्याही माणसाला आपल्याच प्रदेशात आलोय असं वाटायला लावणारी दुष्काळी परिस्थिती आहे. बघावं तिकडं उजाड माळ. याच उजाड तालुक्यातील जांब गाव. अर्थात,गाव दुष्काळी असूनही या गावातल्या लोकांनी रांगडे...
  May 6, 01:51 AM
 • अमीर-उमराव, राजे-महाराजे यांनी आकारास आणलेली व्यवस्था उद्ध्वस्त करून नव्या जगाची श्रमकेंद्री मांडणी करणारा कार्ल मार्क्स हा अद्वितीय प्रज्ञावंत होता. त्याच्या प्रज्ञेने जगाची दिशा बदलली. धर्म-पंथांच्या आधी त्याने मानवी श्रमाची किंमत जोखली. पण म्हणून तो धर्म किंवा परमेश्वरविरोधी होता? लोकशाहीविरोधी होता? ५ मे रोजी द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना मार्क्सच्या विचारांचा सम्यक वेध घेणारा हा लेख... ल्या सहस्रकातील सर्वात महान बुद्धिमान माणूस कोण? यासाठी १९९९ मध्ये बी.बी.सी....
  May 6, 01:41 AM
 • आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले. परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेला रोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का? ते कळलेले नाही. तसा आजवरचा अनुभव नाही. त्याचाच हा लेखाजोखा... यंदाचा १ मे सर्वार्थाने वेगळा होता. एकीकडे जगातील कामगारांना एक होण्याचे आवाहन करणाऱ्या कार्ल मार्क्सच्या विचारांचा त्याच्या...
  May 5, 11:23 PM
 • उद्या (सोमवार ३० एप्रिल २०१८) बुद्धपौर्णिमा. मानवी प्रज्ञा, शील आणि करुणेच्या शांत-शितल प्रकाशाचे मागणे मागणाऱ्या गौतम बुद्धाच्या शिकवणीचे जाणीवपूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस. शब्द असो, चित्र असो वा शिल्प, बघणाऱ्याला सत्याच्या नजीक घेऊन जाणारा बुद्ध दरवेळी नव्याने उमजतो. जेव्हा तो उमगतो, माणसाने माणूस होण्याच्या दिशेचे ते एक पाऊल असते... गौतम नावाचा तू आमच्यासारखाच हाडामांसाचा माणूस होता सिद्धार्थ नावाचा, ह्या मातीवरील तू पहिला सर्वज्ञ ज्ञानी महापुरुष ह्या मातीवरील तू पहिला डोळस...
  April 29, 09:44 AM
 • शासनकर्त्यांना प्रतिमा उंचावण्याचा भारी सोस. या नादापायी केंद्रापासून राज्यापर्यंत ठोकून देतो ऐसा जे की अव्याहत सुरू. म्हणजे, समस्त जनता आपल्या प्रेमात पडलीय असं समजून खुद्द पंतप्रधान आठवडाभरात साडेआठ लाख शौचालये बांधल्याची बेधडक घोषणा करतात, त्यांचे पट्टसाथी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र दिन हाकेच्या अंतरावर असताना आपले राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करतात. आता, त्यांचा इरादा नेक आहे, सार्वजनिक आरोग्याची कळकळही समजून घेण्यासारखी आहे, पण वर्तणुकीत सहजासहजी न...
  April 29, 09:30 AM
 • आसपासचं वातावरण नुसतंच राजकीय नव्ह,े तर जहरी राजकीय बनलं आहे. या वातावरणाचा ताबा ठिकठिकाणच्या झुंडींकडे गेला आहे. कडव्या राष्ट्रवादाचा जयजयकार करणाऱ्या या झुंडींचं वर्तन दहशत निर्माण करणारं असलं तरीही यातून जनता निडर होत जाणार आहे... धाय मोकलून रडले मी अख्खं घर रडलं गदगदून वस्तूंनाही फुटला पाझर हुंदके आवरेनात म्हणून भिंतीत तोंड खुपसलं अ-वस्तूंनी माझ्या लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी कवितेतल्या या ओळी. परवापासून मला पुन्हा पुन्हा आठवत आहेत. कल्याणला एका वैयक्तिक कामासाठी गेले असताना...
  April 29, 09:23 AM
 • तेलगू साहित्यामध्ये ज्या प्रकारे दलित साहित्य किंवा स्त्रीवादी साहित्याचे स्वागत झाले, त्या तुलनेत मुस्लिम साहित्याचे स्वागत झाले नाही. अपवाद, युसूफबाबा ऊर्फ स्कायबाबा यांचा. त्यांच्या साहित्याने खऱ्या अर्थाने सेक्युलर समाजनिर्मितीचा आवाज बुलंद केला... स्कायबाबा या थोड्याशा विचित्र वाटणाऱ्या टोपणनावाने लिहिणारे युसूफ बाबा हे समकालीन तेलगू साहित्यातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. पेशाने पत्रकार असलेले स्कायबाबा हे कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये कवितेच्या माध्यमातून...
  April 29, 09:20 AM
 • जागतिक सिनेमात नाव कमावलेले माजिद माजिदी. त्यांना आकर्षण बॉलीवूडचं नव्हे, तर बॉलीवूडचा सांभाळ करणाऱ्या व्यामिश्र, ऊर्जाप्रवाही मुंबईचं. सिनेमाच्या निमित्ताने याच मुंबईत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आणि शोध घेतला स्वत:चा, मुंबईचा आणि मानवी भावभावनांचा... त्याचीच उकल करणारा हा मुलाखतवजा लेख... Whats there beyond the clouds? HOPE माजिद माजिदी आणि माझ्यातला थेट संवाद इथंच संपला. यानंतर दुभाषीच्या मदतीनं गप्पा सुरू झाल्या. बियाँड द क्लाऊड या नवीन सिनेमात काय आहे, याचं नेमकं उत्तर त्यांनी दिलं, ते असं आशा आहे...
  April 29, 09:07 AM
 • माणसाचं मन रूढी-परंपरांत रुळते. साहजिकच या परंपरांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो, पुराणकाळापासून आजवर या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिल्पकलेने, त्यातही मंदिरांवरील शिल्पकलेने केले. त्याच प्रभावाचे हे निरूपण... ही प्रसंग असे असतात की, त्यांचे प्रतिसाद किंवा पडसाद आपल्या जीवनावर उमटतात. हेच शिल्पांतून जेव्हा प्रत्ययास येते तेव्हा मौज वाटते. प्राचीनांनी मूर्ती घडवल्या, त्यांची उपासना होऊ लागली. त्या मूर्ती देवादिकांच्या असतात. त्यांचा उद्देश, त्यांच्यापासून...
  April 29, 09:04 AM
 • आधी कठुआ आणि उन्नावमधल्या बलात्कारपीडितेचा धर्म शोधला गेला, मग ज्यानं त्यानं आपली भूमिका ठरवली आणि मीडिया-सोशल मीडियावर सुरू झाला सामाजिक विधिनिषेधशून्यतेचा नागडा वाघडा तमाशा, कांगावेखोर हिंदुत्ववादी आणि हितसंबंधींचा हेतू सफल करणारा... कठुआ आणि उन्नावच्या बलात्कारांनी आपल्यापैकी अनेकांच्या आत दडलेल्या उद्रेकीपणाचं भीषण दर्शन घडवलंय. उन्नाव नावापुरतंच, खरं तर मला कठुआच म्हणायचंय. खरं तर या दोन्ही घटनांबद्दल एक सामायिक आवाज निषेधाचाच आहे. मग, याच निषेधाचा, आक्रोशाचा दबाव...
  April 29, 09:00 AM
 • श्वासच्या यशानंतर आशय-विषयाच्या अंगाने प्रयोगशीलता जपणारा मराठी सिनेमा मनोरंजनाच्या चौकटीत लैंगिकतेचं दर्शन-प्रदर्शन करण्यात कायमच सोवळेपण जपत आला. मात्र नुकत्याच प्रदर्शित शिकारी नावाच्या सिनेमाने हा सोवळेपणा झटकल्याचे दिसत आहे. मात्र, प्रश्न हा आहे की, मराठी प्रेक्षक आपल्याच भाषेत बोल्ड दृश्ये पचवण्याइतका पुरेसा प्रौढ झालाय का? तीन आठवड्यांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात खळबळ माजवणारी एक घटना घडली. दिग्दर्शक विजू माने यांच्या शिकारी सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि एकच...
  April 22, 07:11 AM
 • डोंबारी-कोल्हाटी समाजात जन्मलेल्या-वाढलेल्या शैला यादवला शिक्षणाच्या वाटेवर दूरवर दिसणारा मुक्तीचा प्रकाश सतत खुणावत राहिला आहे. शैलाने उभ्या केलेल्या मुलांच्या शिक्षणाच्या, रोजगाराच्या किंवा समाज परिवर्तनाच्या प्रत्येक कामामागे शिक्षणाने दिलेली प्रेरणा आजही कायम आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉमला असलेल्या परिवर्तनशील मंडळींचा शोधाच्या वाटेवरचा हा महत्वाचा टप्पा आहे... जन्मत: पायाशी घट्ट बांधून आलेला भटका उपेक्षितपणा दूर सारून डोंबारी कोल्हाटी समाजातील शैला यादव हिने...
  April 22, 01:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED