Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • संस्कृतीरक्षणाच्या कृतीला चेहरामूल्य देऊन जोडीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी उपसंघटना जन्माला घालून धर्म रक्षणाचे आऊटसोर्सिंग केल्याने देवभोळ्या, अडाणी जनतेला संघाच्या राजकारणाचा आजवर जराही वास आला नाही. अनेक सुशिक्षित, उच्चविद्याविभूषितांना तर तो अजूनही येत नाही. तो तसा येत नाही, त्यामुळेच संघ कधीही राजकारण करत नाही हे संघ धुरिणांचे म्हणणे अगदी सहज खपून जाते. प्रणव मुखर्जींना संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला आमंत्रण देण्याची कृती एका वर्गात अशीच खपून गेली आहे... राष्ट्रीय...
  June 10, 02:00 AM
 • बाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द हा आजूबाजूच्या कोलाहली अनुभवातून आकाराला आलेला आहे. थेट शोषित वर्गाशीच बांधिलकी ठेवणारी त्यांची ही कविता आपल्या नजरेपल्याडचे एक काळेकुट्ट विश्व आपल्यासमोर उभे करताना दिसत आहे... गेल्या दोन दशकांत कवितेच्या माध्यमातून आदिवासी जगताचे ताणेबाणे भारतीय साहित्यात नोंदविणाऱ्या नामांकित कवयित्री म्हणजे, निर्मला पुतुल. अन्यायाने दबून गेलेल्या बाईचा प्रागतिक...
  June 10, 02:00 AM
 • कीर्तीच्या शिखरावर जेव्हा हा कोंबडा होता तेव्हा त्याला कन्नड चित्रपटात रोल मिळण्यापासून ते हजारो रुपयांपर्यतच्या ऑफर आल्या होत्या. आता कोंबड्याचं वलय संपलं, लोकांनी पाठ फिरवली पण हौसाबाई आणि लक्ष्मण मोहिते यांचा मात्र कोंबड्यावर तोच जीव आहे जो पूर्वी होता. त्याचं प्रेम कमी झालेल नाही आणि होणार नाही. कारण त्या कोंबड्याला ते स्वतःच्या कुटुंबातील मानतात... सांगली जिल्ह्यातलं आळसंद गाव तसं चर्चेत येण्याचं काहीही कारण नव्हतं. महाराष्ट्रात जशी इतर गावं आहेत तसंच हे एक गाव. पण दोन...
  June 10, 02:00 AM
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात रमाईंचा तर त्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या उत्तरार्धात माईंचा सहभाग तितकाच मोलाचा होता. या दोघीही बाबासाहेबांच्या सहचारिणी. पण जो सर्वोच्च सन्मान रमाईंच्या वाट्याला भरभरून आला त्यापासून माईसाहेब मात्र अखेरपर्यंत विन्मुख राहिल्या... नुकतंच सोलापूर येथे रमाई चळवळीचं सातवं साहित्य संमेलन पार पडलं. माझी आई - हिरा पवार ही या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होती. आंबेडकरी साहित्य चळवळीत महत्वाचं योगदान दिलेल्या महिलांची निवड या...
  June 10, 02:00 AM
 • प्रदीप आवटे यांची या अनाम शहरात असं शीर्षक धारण करुन कविता दाखल झाली आहे. जिला स्वत:ची भाषा आहे. तिच्या विचारांचं व्याकरण आहे. ती झाडासारखी आपल्या मुळ्या मातीत घट्ट रोवून आहे... दर काळ एका चांगल्या कवितेची आस बाळगून असतो. किंबहुना, तो पोटतिडकीने सशक्त कवितेची मागणी करत असतो. ती त्याची निकड बनते. मात्र काळाची ही निकड सर्वांनाच कळते, असे नाही. काळाची निकड आणि तुमच्या आतली कळ एक झाली पाहिजे. तसं झालं तर चांगल्या कवितेचा जन्म होतो. नाहीतर मग मागणी तसा पुरवठा होऊन, आपल्या आसपास प्रचंड ढीग साचत...
  June 10, 02:00 AM
 • प्राचीन भारतीय शिल्पकारांना आपल्या सौंदर्याने, देहसौष्ठवाने, कमनीयतेने वेड लावणाऱ्या काही अप्सरा, काही नायिका आहेत, असे दिसते. त्यामुळे अशा काही यौवनांची शिल्पे अनेक ठिकाणी तेही पुन:पुन्हा शिल्पीत झाल्याचे आढळते. अशापैकी एक आहे, शुकसारिका. ही पुनवल्लभा, पत्रलेखिका आणि दर्पणा या सुरसुंदरी प्रमाणेच ठायी ठायी मंदिरावर आपणास आढळते... क्षिणी विविधा: कार्या: करे च शुकसारिका:। एषा कन्या सविख्याता विहिता शुकसारिका।। एका हाती वा हातावर पोपट असलेली सुंदरी म्हणजे, शुकसारिका! भारतदेशातील अनेक...
  June 10, 02:00 AM
 • एकीकडे आत्मप्रेमात आकंठ बुडालेला, स्वत: सोडून सगळं जग कचरा समजणारा अमेरिकेचा हेकेखोर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तर दुसरीकडे क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन छद्मीपणे हसत सुटलेला बालिश चेहऱ्याचा पण, माथेफिरू भासावा असा उ. कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन. दोघांमध्ये सध्या माइंड गेम चाललेला आहे. जग श्वास रोखून या दोन चक्रमादित्यांच्या १२ जून रोजी सिंगापूर इथे होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीकडे डोळे लावून आहे. यात सगळ्यात मोठी धास्ती आहे ती अमेरिकेला. कारण उ.कोरिया आणि त्याचा ढगळ अवतारातला...
  June 3, 01:00 AM
 • आज गावा-शहरांत इंटरनॅशनल शाळा दिसतात, पण एक्स्परिमेंटल म्हणजेच प्रयोगशील शाळा आढळत नाहीत. आज गाव-शहरांत घोकंपट्टीला प्राधान्य देणाऱ्या शाळा दिसतात. पण विद्यार्थ्यांच्या कृती आणि विचारांना चालना देणाऱ्या शाळा शोधून सापडत नाहीत. या शैक्षणिक गदारोळात सचिन जोशी मात्र विद्यार्थ्यांना जीवनानुभव देणारी खरीखुरी शाळा साकारतात... मैत्रेयीचे सर ना, तिच्याबरोबर खेळतात! पाचवीतली श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव...
  June 3, 01:00 AM
 • इथून पुढे लेडीज बारमध्ये नोकरी करायची नाही. हा निश्चय मी मनात पक्का केला होता. या हॉटेलमध्ये एक दीड वर्षे काम केल्यानं, जगातल्या कित्येक नैतिक-अनैतिक गोष्टी मला कळल्या होत्या. जगानं ज्यांच्याकडं पाहून नाकं मुरडली, त्यांच्या आयुष्याचा पाढा पाठ झाला होता. दुःखानं काठोकाठ भरलेल्या डोहातल्या बारबालांकडं पाहून मी डोळ्यांवर कातडं ओढलं आणि स्वतःला त्यातून बाहेर काढलं. पण काही काळापुरतंच... एकीकडं मधुबन हॉटेलातली नवी नोकरी सुरु होती; आणि दुसरीकडं मी विवेकानंद कॉलेजला एम.ए. मराठीसाठी...
  June 3, 01:00 AM
 • नातवंडांचा सांभाळ ही आजी आजोबांची जबाबदारी नाही, असा निर्णय नुकताच पुण्याच्या कुटुंब न्यायालयाने दिला आहे. मात्र, न्यायालयाच्या या निकालानंतर आणखी एका गोष्टीची जाहीर चर्चा होणे आवश्यक आहे. ती तशी झाली नाही, तर निकाल लागला तरी बालसंगोपनाचा तिढा कायमच राहील... नातवंडांचा सांभाळ ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, असा निर्णय नुकताच पुण्याच्या कुटुंब न्यायालयाने दिला आहे. सासू- सासरे मुलांना सांभाळत नाहीत, त्यामुळे आपल्याला मुलांना नाइलाजाने पाळणाघरात ठेवावे लागते, अशा आशयाची याचिका एका...
  June 3, 01:00 AM
 • कौमार्य चाचणीसाठी मुलीवर आणि तिच्या आई-बापांवर दबाव टाकला जातो. वर्चस्वाची नशा भिनलेली पुरुषसत्ता टाकलेल्या मुलीला टोचत-भोसकत राहते आणि रक्तबंबाळ झालेली मुलगी आश्रिताचं जीणं वाट्याला आलेल्या समाजातल्या तरुणाचा नाहक बळी देते. भारतात अनुभवास येणारं हे वास्तव गॅब्रिएल गार्शिया मार्केजच्या कादंबरीत प्रतिबिंबित होतं, तेव्हा सुडाचं वैश्विक वर्तुळ पूर्ण झालेलं असतं... श्रेष्ठ कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्शिया मार्केजच्या बहुतांश कथा अन् कादंबऱ्याची कथानकं मोकांदो नावाच्या काल्पनिक...
  June 3, 01:00 AM
 • जगण्याच्या प्रवासात काही पुस्तके अशी भेटतात की, त्याने तुमचे विखंडित झालेले मन सांधले जाते. त्यातली माणसे तुमच्या मनोविश्वाचा भाग होऊन जातात. वैचारिक भूमिकांना, रक्तामासांच्या माणसांचे रूप देऊन त्यात प्राणतत्व फुंकणारा निर्माता स्वतः चळवळीतला असेल, तर तो त्यापासून एक कलात्मक अंतर राखीत असतो. स्वतःचे जगणे ओलांडत मानव्य आपल्या पात्रांमधून, अगदी नैसर्गिकपणे अभिव्यक्त करीत असतो... गोरा कुंभार, जसा आपण घडवत असलेल्या मडक्याशी एक-तान झालेला असतो, तसाच कलावंत हा आपल्या विषय-वस्तूशी एक-तान...
  June 3, 01:00 AM
 • आपण खरोखरीच कोऱ्या नजरेने हे जग पाहू शकतो का? तर मुळीच नाही. पाहण्याच्या क्रियेत अनेकानेक सामाजिक-सांस्कृतिक-व्यक्तिगत गोष्टी मिसळलेल्या असतात. पाहण्याच्या क्रियेत आपण कोरे असत नाही. असू शकत नाही... असे म्हटले जाते की, The Innocent Eye is Blind, The Virgin Mind is Empty. आणि ते खरेही आहे. अज्ञानी लोकांबद्दल संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात - मोराच्या अंगी आसोसे । पिसे आहाती डोळसे ।। परी एकली दिठी नसे । तैसे ते गा ।। मोराच्या सुंदर पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, पण दृष्टी नसते, तसेच अज्ञ जनांबाबत म्हणता येईल. डोळे असणे...
  June 3, 01:00 AM
 • ती प्रत्यक्षात दिसते, एवढीशी, पण पडद्यावर जेव्हा अवरते, तेव्हा लार्जर दॅन लाइफ होऊन जाते. या ज्या दोन टोकाच्या अवस्था आहेत, दोन अवस्थांमधला जो अवकाश आहे, त्यात आलिया भट्ट नावाच्या अभिनेत्रीच्या असण्याचं सगळं सार सामावलेलं आहे. अर्थातच आलिया आजच्या गुणवान पण बेधडक, बेपर्वा, अलिप्त आणि अगोचर पिढीची प्रतिनिधी आहे. तिचं चुकणं, त्यातून सावरणं, धडपडणं, यश मिळवणं, त्या यशाचा अर्थ लावणं आजच्या पिढीशी जवळचं नातं सांगणारं आहे. म्हणूनच तिचा आजवरचा प्रगल्भ होण्याकडे सुरू झालेला प्रवास समजून घेणं...
  May 27, 01:00 AM
 • जो उपद्व्यापी त्याला फिल्मी भाषेत सुलेमानी किडा म्हणतात. तसा अभ्यासात जो हुशार त्याला पुस्तकी किडा असं आपण म्हणतो. पण किडा जिनियसही असतो, हे जगभरातल्या ४० ते ५० चित्रपट महोत्सवात दाखवलेला गेलेल्या, अर्थातच भारतात गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटनच्या दिग्दर्शकाची झेप पाहिली की पटते. तेही दोनशे टक्के! अमित मसूरकरचा आधीचा सिनेमा सुलेमानी किडा. आणि दुसऱ्याच सिनेमांत थेट ऑस्करच्या स्पर्धेत हा न्यूटन घेऊन उभा. तरीही त्याची माध्यमांना दखल नाही. तो मराठी आहे, हा निव्वळ योगायोग,...
  May 27, 01:00 AM
 • विचारांत प्रगल्भता असूनही कुठे तरी रितेपणाची बाेच तिला अाहे. याच रितेपणाचा ती सतत अर्थ लावत असते. माणसं वाचत असते, वेळ अाली तर बंडखाेरी करते अाणि जे याेग्य अाहे, त्याच पारड्यात वजन टाकते. रंग, वर्ण, जात, धर्म यासह शाेषण, स्त्री-पुरुष भेद यावर ठामपणे व्यक्त होत राहते. तिने साकारलेल्या छाेट्या-छाेट्या भूमिकाही तिच्या समृद्ध जगण्याची छटा सहज दाखवून जातात. तिचे सिनेमा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजतात. तिच्या जगण्यात अभिनय महत्त्वाचा ठरताेच. पण त्याही पलीकडचं जगणं तिच्यालेखी मोलाचं असतं....
  May 27, 01:00 AM
 • डोंगराएवढं काम करायचं, पण लोकांनी टाकलेल्या कौतुकाच्या जाळ्यात अडकायचं नाही, आपला स्वभाव सोडायचा नाही, तडजोड करायची नाही, हे सारं साधायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यातही अभिनयाच्या क्षेत्रात बंद्या रुपयासारखा खणखणीत असलेल्या एखाद्या नटासाठी तर हे आव्हानच असते. पण जवळपास तीसहून अधिक वर्षे अमराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मकरंद देशपांडे यांना हे लीलया साधले आहे. त्यामागे रंगभूमीशी असलेली अतूट निष्ठा हे कारण आहेच, पण माणूस नावाची प्रचंड मोठी गुंतवळ समजून घेण्याची त्यांची आसही खूप मोठी आहे.......
  May 27, 01:00 AM
 • काही व्यक्तिमत्त्वं नेहमीच वडिलधारी भासतात. म्हणजे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, दिसण्या-असण्यात एकप्रकारची प्रगल्भता झळकत असते. त्यांनी काहीही केलं तरीही हे प्रगल्भतेचं वलय काही हटत नाही. वैविध्यपूर्ण भूमिका जगणारा पंकज त्रिपाठी हा अभिनेता या वर्गात मोडतो. तो जी भूमिका साकरतो, त्यात अस्सल प्रगल्भता झळकते. हे सारं दैवी नसतं, तर परिस्थितीच्या माऱ्यातून आकारास आलेलं असतं. माणसाने माणूस होण्याची प्रक्रिया साधीसरळ नसते, महत्प्रयासाने साध्य होत असते. वलयाआडचा पंकज त्रिपाठी नेमकं याचंच...
  May 27, 01:00 AM
 • दर रविवारी रसिक पुरवणी प्रकाशित झाली की एक घटना न चुकता घडते. आडवळणावरच्या गावाचे अशोक सोनार नावाचे चोखंदळ वाचक सगळी पुरवणी लक्षपूर्वक वाचून काढतात. काय भावलं, काय खटकलं याची मनोमन नोंद करतात आणि न कंटाळता प्रत्येक सदर लेखकाला प्रतिसादाचा फोन करतात. त्यांचं हे प्रतिसाद देणं, गेली सात वर्षे अव्याहत सुरू आहे. त्यांनी आजवर प्रकाशित झालेली प्रत्येक रसिक पुरवणी जपून ठेवली आहे... दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत मुलुख माती सदर लिहायला लागल्यापासून अनेक वाचकांचे फोन येतात. त्यात एका रविवारी...
  May 27, 01:00 AM
 • म. गांधींची हत्या ही भारताच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना. या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवला गेला. तेव्हापासून आजतागायत सावरकरांचे नाव गांधीहत्येशी जोडले गेले. परिणामी, सावरकरांचे कर्तृत्व या घटनेने डागाळत राहिले. सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? सावरकरांचा खरोखरच गांधीहत्येत सहभाग होता का?...
  May 27, 01:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED