Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • अकिरा कुरोसावांचा प्रत्येक चित्रपट हे एक जीवनभाष्य आहे. याच जीवनभाष्यातली एक ओळ कुरोसावा मादादायोमध्ये चितारून जातात. आपापल्या खजिना शोधासाठी प्रेरणा देऊन जातात... उत्फुल्लपणे आयुष्य जगणारे सत्त्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त प्राध्यापक ह्याकेन उचिदा विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीहून प्रकृती अस्वस्थ होऊन परतलेत. जमिनीवरच टाकलेल्या गादीवर शांतपणे झोपलेत. बाजूला नाइट लॅम्प, पुस्तके आहेत. त्यांना घरी सोडायला आलेले, एकेकाळचे...
  May 20, 02:12 AM
 • आताचा काळ हा, अपेक्षाभंगाचा काळ आहे. सत्ताधारी व्यवस्थेच्या सत्शील समर्थकांच्या आणि विरोधकांच्या सैरभैर समर्थकांच्याही! जाती-धर्माच्या सीमारेषांची नव्याने आखणी होण्याचीसुद्धा हीच घातक वेळ आहे. हिंसा जितकी प्रत्यक्षात दिसतेय, त्याहीपेक्षा अधिक ती मनामनांत दडून आहे. समाज म्हणून आपण सर्रास मुखवटे घालून वावरण्यात तरबेज झालो आहोत आणि राजकीय संस्कृतीने तळ गाठलेला आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनाचा उभा-आडवा छेद घेणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकरांची (१९ मे २०१८) दशकस्मृती पाळताना त्यांच्या...
  May 20, 02:00 AM
 • उदारमतवाद्यांनी जोरदार किल्ला लढवूनही कर्नाटकच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारलेले नाही. प्रचारादरम्यान इतिहासाशी संबंधित धादांत असत्य सांगूनही मोदींची लोकप्रियता घटलेली नाही. हे मोदींच्या आक्रमक प्रचारतंत्राचे यश आहे की, उदारमतवाद्यांच्या हुकत चाललेल्या लढाईचा परिणाम? नरेंद्र मोदी सरकारच्या सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक धोरणांसंबंधी तीव्र टीका करणारा वर्ग गेली चार वर्षे सक्रीय आहे. रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर या वर्गाने मोहीम हाती घेतली. सुजाण नागरिकांना शरम...
  May 20, 02:00 AM
 • सुखी माणसं एकसारखीच असतात, पण प्रत्येक दु:खी माणसाचं दु:ख वेगळं असतं...बारबाला म्हणून औरंगाबादमध्ये खितपत पडलेल्या टिनाच्या वाट्याला आलेलं दु:खही असंच हादरवून टाकणारं होतं... र्धावर्धा वैशाख संपत आला होता. या महिन्यात लग्नाच्या तिथी खूपच दाट होत्या. गावात रोज पंगती उठायच्या. पण काही काम नसल्यानं गावात थांबूनही उपयोग नव्हता. आपला कामधंदा पाहणं गरजेचं होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी औरंगाबादची गाडी धरली. पण रेश्मा व सुमन मुंबईला गेल्यानं तिथं जाण्याची इच्छा होत नव्हती. लेडीज बारमधील नोकरी...
  May 20, 02:00 AM
 • प्रबोधनाच्या युगामधील वैचारिक घुसळणीतून अनेक नव्या संकल्पना शब्दांच्या माध्यमातून जन्माला आल्या. हक्क, स्वातंत्र्य, समता, अल्पसंख्याक, बहुसंख्याक आदी नवे शब्द घडवतच मानवी समाज विकसित झाला.इतिहासाच्या विविध टप्प्यांवर प्रचलित झालेले हेच वेगवेगळे शब्द आपल्या समाजाचा उभा- आडवा छेद दाखवतात. त्यामागची विचारसरणी स्पष्ट करतात... चांगले- वाईट, सुंदर- कुरूप असे शब्द निर्माण झाले, कारण हे काळे तरी आहे किंवा पांढरे तरी आहे, हे चांगले तरी आहे किंवा वाईट तरी आहे, असा विचार करणे सोपे असते. म्हणून...
  May 20, 02:00 AM
 • गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून धनगर समाजातील शिक्षित तरुण आपलं जगणं आत्मकथनातून, तर कधी कादंबरीतून मांडू लागले आहेत. त्यापैकी धनंजय धुरगुडे यांचे माझा धनगरवाडा हे धनगरी अन् एकूणच मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. एका कुटुबांचा नव्हे, तर मेंढरं राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधिक चरित्राचा हा अस्वस्थ करणारा पटही आहे... मेंढपाळ, मेंढरं, माळ हा मराठी साहित्यासाठी चित्रकला, संगीत आणि फोटोग्राफीसाठी दुरून डोंगर साजरेसारखा भुरळ घालणारा विषय. संशोधकांनाही तो वर्ज्य नाही....
  May 20, 02:00 AM
 • अकिरा कुरोसावांचा प्रत्येक चित्रपट हे एक जीवनभाष्य आहे. याच जीवनभाष्यातली एक ओळ कुरोसावा मादादायोमध्ये चितारून जातात. आपापल्या खजिना शोधासाठी प्रेरणा देऊन जातात... उत्फुल्लपणे आयुष्य जगणारे सत्त्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त प्राध्यापक ह्याकेन उचिदा विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीहून प्रकृती अस्वस्थ होऊन परतलेत. जमिनीवरच टाकलेल्या गादीवर शांतपणे झोपलेत. बाजूला नाइट लॅम्प, पुस्तके आहेत. त्यांना घरी सोडायला आलेले, एकेकाळचे...
  May 19, 11:20 PM
 • निबिड अरण्यातून वाट काढताना ढगांआडून अचानक चंद्र डोकवावा आणि त्याच्या शांत-शीतल प्रकाशाने सैरभैर मन सुखावून जावं, तसा क्लांत मनांवर सावली धरणारा सूर होता, दिवंगत अरुण दाते यांचा. मराठी भावगीतांनी दातेंना स्वतंत्र ओळख मिळवून दिली, पण त्याआधीचे अरुण दाते गझल गायकीत मनसोक्त मुशाफिरी करू पाहत होते. उर्दू भाषेशी त्यांची लोभस यारी होती. या त्यांच्या फारशा परिचित नसलेल्या गायनपैलूवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख... साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तरांच्या कोठीवर एक...
  May 13, 02:00 AM
 • नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा गेल्या चार वर्षांचा कार्यकाळ निवडणुकांचाच काळ ठरला. या काळात विधानसभा निवडणुका नजरेपुढे ठेवून हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान, टिपू सुलतान हे विषय सातत्याने चर्चेला आणले गेले.रामजन्मभूमीचा मुद्दा यात सर्वात कळीचा ठरत आला. नुकतीच पार पडलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूकही त्याला अपवाद नव्हती. मात्र, ज्याच्या नावे मशीद बांधली गेली, तो बाबर नेमका कोण होता, हेच कोणी धडपणे सांगितले नाही. कोणी समजूनही घेतले नाही. अशा वेळी ज्याचे...
  May 13, 02:00 AM
 • निरुपमा दत्त गेल्या तीन दशकांपासूनचे भारतीय पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यासोबतच त्यांचे पंजाबी साहित्यामध्ये कथा, कविता आणि अनुवादाच्या माध्यमातून लक्षवेधी योगदान राहिलेले आहे. कोणत्याही प्रकारचं दुय्यम जगणं नाकारत आत्मभानातून न्याय हक्कांशी झगडणारा विस्तृत साहित्यपट त्यांनी पंजाबी वाचकांसमोर ठेवला आहे... पंजाबी साहित्यातील कैक पिढ्यांचं उदरभरण करणाऱ्या अमृता प्रीतम यांच्या सहवासातून अधिकाधिक बंडखोर अभिव्यक्तीकडे वळत गेलेल्या निरुपमा दत्त यांच्या लेखनात...
  May 13, 02:00 AM
 • प्राचीन भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या एकापरीस एक अशा शिल्पाकृती आढळतात. कोठे त्या एकल नृत्य सादर करत असतात, तर कोठे समूह नृत्य, तर आणखी कोठे वाद्यवृंदासह. ते सादर करणाऱ्या नर्तिका सुडौल देहाच्या, देखण्या, अभिनयकुशल आणि चेतोहारी असतात, असाव्या लागतात, असे त्यांच्या शिल्पाकृती सांगतात... भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या शिल्पांनी फार मनोहारी भर घातली आहे, तिला समृद्ध केले आहे. एवढेच नव्हे, तर कालिदास, भवभूती, बाण यांसारख्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेच्या कवींना, साहित्यिकांना...
  May 13, 02:00 AM
 • मॅचो हीरोंचा भरणा असलेल्या बॉलीवूडला सत्ताधारी व्यवस्थेने सहज खिशात घातलं आहे. मराठी चित्रसृष्टी तळ्यात-मळ्यात करतेय. पण तिकडे दक्षिणेत पडद्यावरचा खलनायक, पण वास्तवातला नायक शोभणाऱ्या प्रकाश राजने प्रश्न विचारू न देणाऱ्या सत्तेला मोठ्या हिमतीने शिंगावर घेतलंय... म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात... कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या ख्यातनाम गीतातील या ओळी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या गीताला स्वर दिला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होणाऱ्या सार्वजनिक...
  May 13, 02:00 AM
 • रशियन राज्यक्रांतीला झालेली १०० वर्षे, दास कॅपिटल या मार्क्सच्या ग्रंथांची १५०वी वर्षपूर्ती आणि कार्ल मार्क्सचा २००वा जन्मदिवस. खरं तर या तिन्ही औचित्याप्रसंगी समाजवादी राज्यव्यवस्था, तिची आजच्या काळात आणि भारतात उपयोगिता आदींची चर्चा व्हायला हवी होती. मात्र, या तिन्ही निमित्तांचा वापर झाला तो फक्त स्मरणरंजनांसाठी, भांडवलशाही व तिला लगडून येणाऱ्या राजकीय-सांस्कृतिक सत्तांना लाखोली वाहण्यासाठी... जनतेचं अंतिम कल्याण समाजवादी व्यवस्थेत आहे, असा ज्यांचा दावा आहे, त्या डाव्यांनी...
  May 13, 02:00 AM
 • मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा भक्त पुंडलिक आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा राजा हरिश्चंद्र या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. त्यानंतर मागील १०५ वर्षांत भारतीय चित्रपट इतका विस्तारला की, आजमितीला भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट बनवणारा आणि चित्रपट पाहणारा देश बनला आहे. परंतु, व्यामिश्र संस्कृतीचा देश असल्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पनादेखील तशीच व्यापक आणि गुंतागुंतीची ठरली आहे.. नॅशनल सिनेमा ही संकल्पना फिल्म स्टडिजमध्ये तुलनेने अगदी अलिकडची....
  May 13, 02:00 AM
 • जो स्वप्न पाहतो, त्या दिशेचा विचार करतो आणि प्रयत्नांती ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, तो खरा आविष्कारी.थिंक महाराष्ट्रला शोध अाहे तो अशा कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा तरुण त्या गटात मोडतो. तो जसा आदेश देतो, यंत्र त्यानुसार कार्य करते... त्याला रोज सकाळी लवकर उठायचा जाम कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे तर भाग असे. मग हा...
  May 6, 07:24 AM
 • नैतिकता ही तत्त्वज्ञानाची एक उपशाखा. तिचा उद्गाता सॉक्रेटिस. माणसाने कसं जगायला हवं, माणसाचं जगणं कसं अर्थपूर्ण होऊ शकतं, याचा त्याने आयुष्यभर शोध घेतला. दाहक, प्रखर सत्याला भिडण्याची धमक त्याने दाखवली. मग, तो कसा लुप्त होईल या पृथ्वीतलावरून...? रंगमंच संपूर्ण उजेडात येतो,या वेळी रंगमंचावर फक्त सॉक्रेटिस. मी कसं बोलतो,यापेक्षा मी किती सत्य बोलतो,यालाच महत्व असायला हवं. ज्या माणसाला थोडंसुद्धा चांगलं करायचं आहे, तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतोःमी करतोय ते चांगलं का वाईट? त्यानं...
  May 6, 03:14 AM
 • वा स्तवाला भिडू पाहणारा अाणि अापल्या अस्तित्वाबद्दल चिंतन करायला लावणारा ज्ञानेश्वर मुळे यांचा सकाळ... जी हाेत नाही हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अधिक खाेलात घेऊन जात चिंतनशील बनवते. सातत्यानं बदलणारे जीवन प्रवाह, हिंसा, राजकारण, समाज, देश, धर्माबद्दलच्या मानवी जाणीवांबद्दल अगदी साेप्या शब्दात त्यांनी या कवितेद्वारे भाष्य केले अाहे. जगणं सुसह्य करण्याच्या नादात अापण कुठेतरी हरवत चालल्याची खंत त्यांनी त्यांच्या काेणाशी तरी जाेडलं जाण्याच्या...
  May 6, 02:48 AM
 • अन्यायाविरोधात रस्त्यात उतरलेली अनवाणी धूळ भरलेली अन् परिस्थितीच्या फुफाट्याने टरारून फोड आलेली पावलं असतात, हस्तक्षेप. धमकवणाऱ्या सत्ताधीशांच्या विरोधात नाराजीचा साधा नोंदवलेला निषेधही असतोच, हस्तक्षेप. हस्तक्षेप असतो, रस्त्याच्या कडेनं निमूट रडत जाणाऱ्या निराधार मुलाची, आपुलकीने केलेली चौकशी. हा हस्तक्षेप केलाय, वीरा राठोड यांनी. त्या हस्तक्षेपाला दिलेली ही दाद... खंडप्राय पसरलेला आहे,आपला अवाढव्य देश. ज्यांनी अशिया अन् युरोपच्या सांस्कृतिक अन् अध्यात्मिक जीवनावर प्रभाव...
  May 6, 02:20 AM
 • परिस्थितीच्या माऱ्याने माणसं खचत असतील कदाचित, पण माणुसकी? ती उत्तुंगच होत जाते. जिच्याबद्दल माझ्या मनात एक प्रकारची श्रद्धा आणि करुणा होती, त्या दूर देशातल्या रेश्मानं मला माणुसकीचा खरा अर्थ सांगितला होता... मध्यरात्र उलटली होती. दुधाळ चांदण्यांनी आभाळ व्यापलेलं होतं. ती चांदणी लगडलेली आभाळाची चादर जमिनीला टेकू पाहत होती. पण मला आनंद वाटत नव्हता. राहून राहून डोळ्यासमोर रेश्माच येत होती. जीव दमला, शिणला तरी खोलीवर जावंसं वाटत नव्हतं. मनातली विचारांची वावटळ थांबता थांबत नव्हती. शेवटी...
  May 6, 02:08 AM
 • पाचवीला पुजलेल्या दुष्काळात प्रसादच्या डोळ्यांत महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न तरळलं. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्याने गाव सोडलं. स्वप्न बहरू लागलं आणि एका क्षणी सरावादरम्यान अपघात झाला. संघर्षाचा काळ दाटूून आला... सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात फिरताना मराठवाड्यातून आलेल्या कोणत्याही माणसाला आपल्याच प्रदेशात आलोय असं वाटायला लावणारी दुष्काळी परिस्थिती आहे. बघावं तिकडं उजाड माळ. याच उजाड तालुक्यातील जांब गाव. अर्थात,गाव दुष्काळी असूनही या गावातल्या लोकांनी रांगडे...
  May 6, 01:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED