जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra

Maharashtra

 • यावल-जळगाव हुन परत येत असताना शेळगाव बॅरेज जवळील पाण्यात बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचे नाव निलेश सुरेश निबाळकर ( वय19 रा.लहान मारोती देशमुख वाडा) यावल असे आहे. घटना बुधवारी सांयकाळी घडली. या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावल शहरातील लहान मारुती परिसरातील रहिवासी असलेले तीन तरुण बुधवारी दुचाकीवरून जळगावला आल होते. संध्याकाळी ते यावलला शेळगाव बॅरेज मार्गे परत येत असताना शेळगाव बॅरेजच्या जवळील साचलेल्या पाण्याच्या डोहामध्ये निलेश सुरेश...
  May 22, 07:33 PM
 • delete
  May 22, 06:24 PM
 • मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बीडमध्ये मोठे खिंडार पडले आहे. जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. त्यांच्या राजकीय प्रवासात ते आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निष्ठांवंत राहिले, परंतु बीड नगर पालिका...
  May 22, 06:19 PM
 • बीड- लोकसभेच्या मतमोजणीची तयारी झाली आहे. गुरुवारी(23मे) सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे विविध मतदारसंघांमध्ये अंतिम निकाल येण्यासाठी उशीर होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बीडचा निकाल सगळ्यात उशिरा लागणार असल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यामुळे चार ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. त्याची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीचा निकाल पाहण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे....
  May 22, 05:41 PM
 • जालना- जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यातील वलखेडामधील जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिवम धोत्रे(9) आणि शिवराज धोत्रे(7) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे आणि त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम करत होते. काल(21 मे) रवींद्र धोत्रे हे आपल्या दोन्ही मुलांसोबत दगडीच्या खाणीजवळ गेले होते. दुपारी रणरणतं ऊन असल्याने ते दोघेही दगडाच्या...
  May 22, 02:15 PM
 • जळगाव - अभ्यासासाठी वेळेत नोट्स न मिळाल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीने रॅट किल (उंदीर मारण्याचे औषध) खाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. शुभांगी सीताराम सोनवणे (वय २५, रा. साळशिंगी, ता. बोदवड) असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तरुणीने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आपण या कारणामुळे औषध खाल्ल्याचे कुटुंबीयांना सांगितले. शुभांगी ही साळशिंगी गावात एका शाळेत कंत्राटी पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचे काम करीत होती. तसेच एमएचे...
  May 22, 10:19 AM
 • पुणे - पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांची आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना १५ कोटी रुपयांची रक्कम घेताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारामतीतून नऊ मे रोजी अटक केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान आरोपींकडे कोणतीही वादग्रस्त व्हिडिओ क्लिप नसल्याचे निष्पन्न झाले असून क्लिप नसतानाही थेट एखाद्या मंत्र्यालाच खंडणी...
  May 22, 10:17 AM
 • बीड - दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. शिवणी (ता. बीड) येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेतला तर चिंचवण (ता. वडवणी) येथे विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. शिवणीतील शेतकरी हनुमान रघुनाथ सुर्वे (३०) यांच्याकडे ३ एकर जमीन असून त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेसह खासगी लोकांचे देणे होते. यंदा कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट निर्माण होताच दोन्ही हंगाम वाया गेले. दोन दिवसांपूर्वी ते पिंपळ टक्का (ता. वडवणी) येथे गेले होते....
  May 22, 10:10 AM
 • तुळजापूर - इतिहासात पहिल्यांदाच मंगळवारी (दि. २१) कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची हापूस आंब्यांची पूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी मातेचा पलंग पालखीचे मानकरी जितेंद्र भगत यांच्या वतीने करण्यात आलेल्या या पूजेसाठी तब्बल ११ हजार १११ रत्नागिरीचे हापूस आंबे वापरण्यात आले होते. या वेळी तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या पलंग पालखीचे मानकरी नगर येथील जितेंद्र भगत यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची हापूस आंब्यांची पूजा मांडण्यात आली होती. भगत...
  May 22, 10:04 AM
 • औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या १५५ उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सर्वच मतमाेजणी केंद्रांवर २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या वेळी सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात असून येथील निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची पहाटच उजाडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडणुकीत आठ मतदारसंघांतून तब्बल १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. औरंगाबाद...
  May 22, 09:54 AM
 • पुणे - तळेगाव एमआयडीसीजवळील रस्त्याच्या कडेला एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळला. मृतदेहाची अद्याप आेळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसत आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील इंदाेरी ते जांभाेळे गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी एमआयडीसी पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले...
  May 22, 09:40 AM
 • भुसावळ - जबलपूर येथून मुंबई येथे ४० लाख रुपयांची राेकड बॅगेमध्ये घेऊन जाताना इतर प्रवाशांनी बॅग उचलून नेल्याचे संबंधित प्रवाशाच्या लक्षात अाल्यावर येथील जीअारपी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अवघ्या पाच तासांत अनवधानाने शहरातील एका लग्नाच्या वऱ्हाडाने नेलेली बॅग पाेलिसांनी त्याच्या घरी जाऊन जप्त केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, ही राेकड हवालाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाेलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले, १७ मे...
  May 22, 09:38 AM
 • मुंबई - प्रत्येक अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येतात आणि एखाद्या हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे विरूनही जातात. आताही १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यासाठी काही नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपमधील वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून नव्या सरकारमध्येच नवे मंत्रिमंडळ पाहायला मिळेल, असे दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले. फडणवीस यांनी शिवसेनेला...
  May 22, 08:59 AM
 • गेवराई - परभणी-अहमदनगर महामार्गावर तिहेरी अपघातानंतर कारने पेट घेतल्याने एका गर्भवती महिलेसह ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सुदैवाने महिलेचा पती वाचला. हा अपघात कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील कोळगावजवळ मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. परभणी येथील ज्ञानेश्वर जाधव (४० ) हे पत्नी मनीषा (३५) व मुलगी लावण्या (९) यांना घेऊन परभणी येथून कारने नगरकडे एका लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. दुपारी गेवराई तालुक्यातील कोळगावजवळ कारला एका भरधाव जीपने धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ एका...
  May 22, 08:52 AM
 • वडवणी - उपळी येथील विवाह आटाेपून पाथरी तालुक्यातील रेणाखळी तांड्यावर दुचाकीवरून परतत असताना बीड-परळी राज्यमार्गावरील कुप्पा फाट्यानजीक ब्रम्हनाथ तांड्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात चिरडून पतीसह मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात या कुटुंबातील एक सहा वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला. वडवणी तालुक्यातील उपळी येथील विवाह समारंभासाठी पाथरी तालुक्यातुन रेणाखळी तांड्यावरील राठोड दांपत्य व दोन मुले असे कुटुंबीय मंगळवारी आले...
  May 22, 08:50 AM
 • पुणे- पुण्यामधील एक मोठी बर्गर चेन बर्गर किंगच्या आउटलेटमध्ये एका तरूणाला बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळला. त्या तरूणाने जेव्हा बर्गरचा एक घास खाल्ला, तेव्हा त्याचे तोंड रक्ताने भरले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मेडिकल रिपोर्टनंतर होईल कारवाई याप्रकरणी पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे इंस्पेक्टर दीपक लागड यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकाच्या तक्रारीवरून शनिवारी(18 मे) ला बर्गर...
  May 21, 04:31 PM
 • मुंबई : लोकसभा निवडणुका पार पडल्या असून निकालाअगोदरच भाजप-सेना सरकारने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेचे लक्ष समोर ठेवून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याअगोदर 2017 मध्ये देवेंद्र सरकारने कर्जमाफी केली होती. त्यानंतर आता परत एकदा विधानसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मोठा डाव खेळण्याची तयारी सरकारने केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे मुंबईत...
  May 21, 01:42 PM
 • वणी -सप्तशृंग गडावरून नवस फेडून नाशिककडे जाणारा भाविकांचा टेम्पो कृष्णगाव येथील गतिरोधकावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. त्याला नाशिककडे जाणाऱ्या कांद्याने भरलेल्या ट्रकने पाठीमागून जोडदार धडक दिली. त्यात आयशरमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. आशिष माणिकसिंग ठाकूर (२७, रा. त्र्यंबकेश्वर), सागर अशोक ठाकूर ( २२, रा. नाशिक), कुणाल कैलास ठाकूर(१९ नाशिक) आणि गणेश भगवती प्रसाद ठाकूर (३८, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. आयशरमधील भाविक हे...
  May 21, 10:15 AM
 • मुंबई -एक्झिट पोलच्या अंदाजावर आमचा विश्वास नाही, देशात अनुकूल सरकार येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी दिली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जागी विधानसभेचे नवे विराेधी पक्षनेते निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकमताने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवा नेता निवडण्यासाठी सोमवारी विधानभवनात...
  May 21, 10:14 AM
 • मुंबई - देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पाेलमध्ये एनडीएच बहुमताने सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ते एेकून सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या तरी यापेक्षाही जास्त जागा आपल्याला मिळू शकतील, असा त्यांचा दावा आहे. तर विराेधी पक्ष काँग्रेसला हे एक्झिट पाेल अजिबात मान्य नाहीत. देशात पुन्हा माेदींचेच सरकार येणार यात शंका नसून यात एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळू शकतील, असा दावा...
  May 21, 09:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात