Home >> Maharashtra

Maharashtra

 • नाशिक - येथील येवला-मनमाड महामार्गावर अनकाई बारी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये सगळेच अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांवरून अपघात किती गंभीर होता हे दिसून येते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनकाई बारी येथे येवला-मनमाड मार्गावर...
  12:18 PM
 • जळगाव-जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात तब्बल २४ मोबाइल व चार पाकिटे, एक मंगळसूत्र आणि रोख ३० हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. १५० पोलिसांच्या बंदोबस्तातही चाेरट्यांनी सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी दुपारी १ वाजेपासून रथाचौकातून रथ सुरू झाला. यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली. रथ आंबेडकरनगर, चौधरीवाडा, भोईटेगढी, तेलीगल्ली,...
  12:10 PM
 • बीड-जिल्हा परिषदेत अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २७९ शिक्षकांना शनिवारी सायंकाळी कार्यमुक्त केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, सोमवारी पालकमंत्री पंकजा मुंडेंनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ग्रामविकास विभागाच्या सचिवांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर कार्यमुक्तीच्या कार्यवाहीला सचिवांकडून स्थगिती देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत शासनाला कुठलाही लेखी आदेश मिळाले नाही. त्यामुळे कार्यवाही थांबवण्याचा प्रश्न नसल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे...
  12:06 PM
 • बीड-जिल्ह्यात दुसऱ्या शैक्षणिक सत्राची सुरुवात २५ नोव्हेंबरपासून होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर यंदा जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केले आहे. त्यांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून तालुकास्तरावरून प्रस्ताव मागवल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी दिली. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर इतर जिल्हा व राज्यांत ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. अनेकदा हे मजूर मुलांना गावी एकटे ठेवणे शक्य...
  12:00 PM
 • घनसावंगी-जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असतानाच नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सावकार,नातेवाईक आणि बँक कर्जाच्या विवंचनेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील बाबासाहेब परभत राऊत या शेतकऱ्याच्या घरी येऊन एकाने ९०० रुपयांसाठी तगादा लावला होता. मात्र हे पैसे कसे देणार या विवंचनेतून राऊत यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करत आपले जीवन संपवले. अवघ्या ९००...
  12:00 PM
 • मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या विरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखिका विनता नंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिकृतरित्या हा गुन्हा नोंदवण्यात आला. देश-विदेशात #MeToo कॅम्पेन अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणावर व्यक्त होत असताना विनता यांनी आपली आपबिती मांडली. गेल्या महिन्यात त्यांनी आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सर्वांसमोर मांडला होता. विनता नंदा आरोप लावल्यानंतर अनेक सहकलाकार आणि क्रू...
  11:33 AM
 • सिन्नर - पहाटे ४ च्या सुमारास पहिलवान रामदास (३९) फ्लाॅवरला पाणी भरण्यासाठी मळ्यात निघाले तेव्हा सुटीवर घरी अालेला सैन्यदलातील भाऊ विजय (३४) हाही मदतीला साेबत अाला. किर्रर्र अंधारात विजेरीच्या प्रकाशात त्यांचे काम सुरू झाले. १०० फुटांवर असलेल्या वाफ्याच्या टाेकाला पाणी पाेहाेचले की नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या विजयने वाफा भरल्याचे सांगितले तसे रामदासने फावड्याने बारे देऊन पाणी वळवले अाणि जरा वेळ बसावे म्हणून ताे खाली टेकला ताेच.. पाठीमागून गुरगुर अावाज अाणि दंडावर जाेरकस फटका बसला....
  10:15 AM
 • मुंबई- अधिवेशनादरम्यान बऱ्याचदा एखाद्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांची मिलीभगत असल्याच्या बाबी समोर येत असतात. मंगळवारी असाच प्रकार विधानसभेत पाहायला मिळाला. मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावरून सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेतील कामकाज रोखून धरत आरक्षणावर चर्चेची मागणी आक्रमकपणे लावून धरली. चौथ्या वेळी झालेल्या तहकुबीनंतर जेव्हा कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधकांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. पीठासीन अध्यक्षांनी दुष्काळावर विशेष चर्चेसाठीचा...
  10:07 AM
 • औरंगाबाद- २५ वर्षांपूर्वी अपघातामुळे कमरेतून अधू झाल्याने चालणे-फिरणे मुश्कील झाले, मात्र त्याचा बाऊ न करता निवृत्तीनंतर एका ७९ वर्षीय आजींनी परिसरातील लहान मुले, महिलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हरिपाठ वाचून दाखवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विमल मुकुंदराव क्षीरसागर असे या आजींचे नाव असून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ज्ञानदानाचे आपले कार्य या वयातही तेवढ्याच उत्साहाने सुरू ठेवले...
  09:52 AM
 • पुणे-मराठा समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी असली तरी ते सामाजिकदृष्ट्या अजिबात मागासलेले नाहीत. मात्र, मराठ्यांना आरक्षण द्यायचेच, हा निष्कर्ष आधीच काढून त्यानुसार आयोगाने अहवाल दिला. आयोगाची वैधता, कामकाज पद्धत, सर्वेक्षण व त्यांचे निष्कर्ष संशयास्पद आहेत. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना आम्ही घुसू देणार नाही, असा पवित्रा ओबीसींच्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी महासंघाने घेतला आहे. चार आयोगांनी मराठा...
  09:49 AM
 • मुंबई- मराठा, मुस्लिम, धनगर अारक्षणाच्या मागणीवरून अाक्रमक असलेल्या विराेधी पक्षांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कामकाज राेखून धरत फडणवीस सरकारला जाब विचारला. विधानसभेत राजदंड पळवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र मराठा अारक्षणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभिन्नता दिसून अाली. विखे पाटील म्हणतात, तातडीने अहवाल विधिमंडळामध्ये मांडा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे...
  09:49 AM
 • औरंगाबाद- गोळीबंद आवाजात जीवनावर परखड भाष्य करणारे लोकप्रिय कवी, अभिनेते पीयूष मिश्रा, पानिपतच्या लढाईला जिवंत करणारे विश्वास पाटील, भाषेवर अमोघ प्रभुत्व असलेले स्वानंद किरकिरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या कलांचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी दिव्य मराठी आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी (२५ नोव्हेंबर) रसिकांना लाभणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत हा महोत्सव रंगणार आहे. २५...
  09:35 AM
 • औरंगाबाद- दारणा धरणातून सोडलेले आणि केटीवेअरमध्ये अडवलेले पाणी जायकवाडीत सोडण्यास रविवारी रात्रीपासून सुरुवात झाली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडीत २.७१ दलघमी पाण्याची आवक झाली. केटीवेअरमधून अजूनही ७०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. निळवंडेचे पाणी जायकवाडीत दाखल झाले आहे. सध्या निळवंडेमधून सोडलेल्या विसर्गातून जायकवाडीत ७९४ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. गंगापूर, पालखेडचे थांबवलेले १.२० टीएमसी पाणी दारणा धरणातून सोडण्यात आले होते. मात्र नांदूर-मधमेश्वरसह खालच्या...
  09:34 AM
 • मुंबई-मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाची कोंडी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखून धरले. या गाेंधळामुळे धरल्याने सुरुवातीला चार वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले. आरक्षणासोबतच दुष्काळी मदतीची मागणीही विरोधकांनी लावून धरली आहे. या गोंधळादरम्यान अबू आझमी, अस्लम शेख, अमीन पटेल, आसिफ शेख, युसूफ पठाण, सतीश पाटील, अब्दुल सत्तार या विराेधी अामदारांनी तीनदा अध्यक्षांच्या आसनासमोरील राजदंड...
  09:24 AM
 • धुळे- भाजप महापालिका निवडणुकीचे सूत्र आपल्या हाती देत नसल्याच्या कारणावरून नाराज व पक्षाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ केल्याने बंडांचा झेंडा उगारणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी नाट्यमयरीत्या नवीन पक्षाची घोषणा केली. शिवाय, या पक्षाकडून धुळे महापालिका निवडणुकीत सर्व ७४ जागांवर उमेदवार उभे करून भाजपलाच खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अाता ही निवडणूक चांगलीच चुरशीची हाेणार अाहे. धुलष महापालिकेची निवडणूक अामदार गाेटेंच्या नेतृत्वाखाली लढली जाईल,...
  08:49 AM
 • मालेगाव-कंधाणे शिवारात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या बिबट्यावर विषप्रयाेग करण्यात अाल्याचे तपासात उघड झाले अाहे. वासरू मारल्यानंतर त्याचे मांस खाण्यासाठी बिबट्या येणार हे जाणून त्यावर विष टाकून बिबट्याला ठार करणाऱ्या संशयितास वनविभागाने अटक केली अाहे. विक्रम रामदास थाेरेकर त्याचे नाव असून, त्याला ३० नाेव्हेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडी ठाेठावली. धनदाईदेवी मंदिराजवळ नाल्यात शनिवारी मादी बिबट्या बेशुद्धावस्थेत अाढळली हाेती. वन कर्मचाऱ्यांनी नेट जाळीच्या सहाय्याने बिबट्याला...
  08:32 AM
 • पुणे- पत्नीस व मुलास मामेसासऱ्याने भेटू न दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पत्नी व इतर नातेवाइकांना पाठवला होता.सचिन दिनकर कुटे (३०, वडगाव बुद्रुक, रा.पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार मामेसासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कुटेचे सलूनचे दुकान आहे. दोघांत वाद झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. नंतर ती मामाकडे राहू लागली. सचिन हा पत्नी...
  08:26 AM
 • पुणे- वृद्ध आईचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढणाऱ्या व्यावसायिक मुलाला व सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. दैनंदिन गरजांसाठी पोटगीस्वरूपात आईला दरमहा १० हजार रुपये देण्याचे सांगत मुलाने व सुनेने इतरांमार्फत तसेच स्वतः वृद्ध आईला त्रास न देण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागातील हे कुटुंब आहे. वृद्ध महिलेला दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. वृद्ध महिलेने स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. पतीच्या निधनानंतर लहान मुलगा, पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने...
  08:10 AM
 • मुंबई -दूध किंवा इतर खाद्यपदार्थ व औषधांत भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. याबाबतचे सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत आवाजी बहुमताने मंजूर झाले. सन १८६० च्या भारतीय दंड संहितेच्या अधिनियम ४५ मधील कलम २७२ ते २७६ अन्वये खाद्यपदार्थ, पेय, औषधे आणि औषधासाठीच्या पदार्थांत भेसळीसाठी ६ महिने कैद व १ हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद होती. औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० यात याच गुन्ह्यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावासाची तरतूद आहे. परंतु कोर्टास...
  07:32 AM
 • वर्धा- वर्धा जिल्ह्यातील पुलगावजवळील सोनेगाव (आबाजी) येथील लष्कराच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या (सेंट्रल अॅम्युनेशन डेपो) विस्तीर्ण आवारात वापरात नसलेली स्फोटके नष्ट करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघातामुळे स्फोट होऊन त्यात खमारिया आयुध निर्माणीचा कर्मचारी आणि ५ मजुरांसह एकूण ६ जण मृत्युमुखी पडले, तर १० जण जखमी झाले. स्फोटके नष्ट करण्याच्या कामावर असलेल्या पथकाचा निष्काळजीपणा या स्फोटास कारणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेतील जखमींवर सावंगी मेघे येथील आचार्य...
  06:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED