जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra

Maharashtra

 • शिर्डी- साईबाबांवर अपार श्रद्धा असलेल्या अंबानी उद्योग समूहाच्या नीता अंबानी यांनी साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागास १ कोटी १७ लाख रुपयांचे साहित्य दान स्वरूपात दिले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ४५ लाख रुपयांचे बॅग स्कॅनर, ५ लाख रुपयांचे ५५ हँड डिटेक्टर आणि १५ लाख रुपयांच्या ७७ वॉकी टॉकी असे साहित्य खरेदी करून त्यांनी दान केले. या साहित्यापैकी काही येणे बाकी असल्याचे समजते. संस्थानच्या संरक्षण विभागास या साहित्याची आवश्यकता होती. गेल्या काही वर्षांपासून संस्थान या वस्तू...
  July 21, 07:44 AM
 • औरंगाबाद- गेल्या वर्षी ईस्टर संडेच्या दिवशी १,२५,००० पेक्षा जास्त पर्यटक व्हेनिसला आले होते. व्हेनिसमध्ये स्थानिक लोकांची संख्याच ५४ हजार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. हे तर एक उदाहरण आहे. जगातील अनेक देश पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त आहेत. युरोपच्या अनेक देशांत विदेशी पर्यटकांना विरोध होत आहे. त्यामुळेच वाढत्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे गेल्या वर्षी आॅक्सफर्ड डिक्शनरीत ओव्हर टुरिझम हा शब्द समाविष्ट करण्यात आला....
  July 21, 07:21 AM
 • औरंगाबाद- औरंगाबादकरांच्या पायाखालची जमीन लवकरच सरकणार आहे. शहरातील नौखंडा महाल, अहमदी बाग, हिमायत बाग आणि चंदन चबुतरा या मालमत्तांवर निझामाच्या आठव्या वंशजांनी दावा केला असून या जमिनी आठवे निझामशहा मीर मुकर्रम शाह बहादूर यांच्या तुर्कस्तानातील नात प्रिन्सेस आसरा यांनी परत मागितल्या आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना भेटून तक्रारही केली. यानंतर विभागीय आयुक्तांनी...
  July 21, 07:12 AM
 • औरंगाबाद-प्रलंबित मागण्यांसाठी आणि स्वहितासाठी अनेक संघटना आणि शिक्षक आंदोलन करतात. पण आम्हाला शिकवायला शिक्षक द्या, आम्हाला पण आफिसर बनू द्या, म्हणून शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी, त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पावित्रा घेत जि.प.च्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असुन त्यांच्या शाळेवर जि.प. प्रशासनाकडून दोन शिक्षक रूजू करण्यात आले आहे.जिल्हा परिषद प्रशाला कसाबखेडा(ता....
  July 20, 08:20 PM
 • शहादा- तालुक्यातील प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण आज(20 जुलै)सकाळी प्रकाशा शिवारातील भरत दशरथ पाटील यांच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला. प्रकाशा परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्या फिरत होता. अनेक लोकांनी त्याला पाहिल्यानंतर परिसरात लोक प्रचंड भीतीत वावरत होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनालाही सूचना देण्यात आली होती. पण आता परिसरात भरत पाटील यांच्या शेतात...
  July 20, 02:39 PM
 • मुंबई - मुंबईतील वसईच्या सातीवली भागात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने भर बाजारात एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. आरोपी आनंद सिंह वसईच्या भोईदा पाडात भाजपचा पदाधिकारी आहे. आनंद सिंहला आमच्या जमिनीवर कब्जा मिळवायचा आहे यामुळे त्याने आमच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले. महिलेच्या फिर्यादीवरून आनंद सिंह विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
  July 20, 01:26 PM
 • गेवराई- राष्ट्रीय महामार्ग-61 वर वाहतूक पोलिस कार्यालयाजवळील तळेवाडी फाटा येथे आज(20 जुलै) सकाळी व्यायाम करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तुकाराम विठ्ठल यमगर(वय17), अभिषेक भगवान जाधव(वय15) आणि सुनील प्रकाश थोटे(वय17) अशी मृतांची नावे आहेत. तिघे रोज प्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गावापासून दिड किमी अंतरावर असलेल्या गढी माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर गेले. यावेळी महामार्गाच्या बाजुला व्यायाम करताना अचानक गढी माजलगावकडे...
  July 20, 01:04 PM
 • मुंबई- मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये काल(19 जुलै)रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणांचे नाव अरुण गुप्ता तर तरुणीचे नाव प्रतिभा प्रसाद आहे. प्रतिभाची हत्या करुन अरुणने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिभा ही मुंबईच्या घाटकोपर...
  July 20, 01:04 PM
 • औरंगाबाद -हॉटेलमध्ये दिवसभर काम केल्यानंतर गुरुवारी रात्री १२.३० वाजता घराकडे निघालेल्या तरुणाला हडको कॉर्नर परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने अडवून मारहाण केली व तीन वेळा जय श्रीरामचा नाराही द्यायला लावला. तरुणाने आरडाओरड केल्याने ओळखीचा एक जण धावून आला व त्याने आरोपींच्या तावडीतून सोडवून तरुणाला घरी पाठवले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, इम्रान इस्माईल पटेल (२८, रा. मुजफ्फरनगर, जटवाडा रोड) हा कटकट गेट परिसरातील मदिना तहारी हाऊस या...
  July 20, 12:31 PM
 • औरंगाबाद -महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली असताना रस्ते कामांसह पाणीपुरवठा योजना, सातारा-देवळाई ड्रेनेजलाइन आदी कामांसाठी तीन हजार कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यासाठी त्यांचेे अभिनंदन करणारे २०० फलक शहरभर तीन महिने लावण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या फलकांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोटो असेल. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्तही कोणी होर्डिंग लावू नयेत, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनीच...
  July 20, 12:13 PM
 • मुंबई - काँग्रेस कार्यकारी अध्यक्षा आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करण्याचा आरोप करण्यात आला. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या आमदाराची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पोलिस आणि यशोमती यांच्या शाब्दिक वाद झाला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटकच्या आमदाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या यशोमती यशोमती ठाकूर आणि पोलिस यांच्यात शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला. यशोमती...
  July 20, 12:09 PM
 • परतवाडा - शहरात विवेक अग्रवाल यांच्या घरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच सातत्याने हाेणाऱ्या चोऱ्यांनी कळस गाठला आहे. दरम्यान गुरुवार, १८ जुलै राेजी येथील गुजरी बाजारात फोडलेल्या पाच दुकानांच्या घटनेतील एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त कैद झाला असून, चोरट्यांनी कारचा वापर केल्याचे समोर आले. एकाच रात्री झालेल्या पाच चोऱ्यांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्य तत्परतेवर शहरवासीयांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी आपली सलामी...
  July 20, 11:01 AM
 • पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर Ertiga कार व ट्रक यांची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कदम वकवस्तीजवळ हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर पार करून समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे...
  July 20, 10:54 AM
 • धुळे - शहरातील चाळीसगाव राेड परिसरातील प्रभागात स्वच्छता हाेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या भागातील गटारीही तुंबल्या हाेत्या. तसेच अस्वच्छता वाढली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी उपमहापाैर कल्याणी अंपळकर यांनी स्वत: हातात फावडी घेऊन गटारींची स्वच्छता केली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच ज्या कामाचा पगार मिळताे ते काम प्रामाणिकपणे करा, अशा शब्दात कर्मचाऱ्यांना सुनावले. शहरातील चाळीसगाव राेड, लाेकमान्य हाॅस्पिटलचा परिसर उपमहापाैर कल्याणी अंपळकर...
  July 20, 10:48 AM
 • जळगाव - शहरात चाेरट्यांची धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी भरदिवसा चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. आता तर चाेरट्यांची हिमंत वाढली असून त्यांनी सद्गुरुनगरातील प्लॉट क्रमांक १९ मध्ये राहणारे सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाचे दहा दिवसांपासून बंद असलेल्या घरात घरफाेडी केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. घरफोडीत अकरा तोळे सोने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम, महागडे घड्याळ, साड्याही चोरट्यांनी चोरुन नेल्या आहे. निवृत्त डीवायएसपी प्रकाश नामदेव मेढे...
  July 20, 10:20 AM
 • मुंबई -९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी चले जाव असा इशारा ब्रिटिशांना दिला होता. त्याच धर्तीवर आगामी ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम चले जाव असा नारा देत एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेतर्फे सोशल मीडियावर तसे संदेशही प्रसारित केले जाऊ लागले आहेत. तसेच जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर निवडणुकांवर राज ठाकरे बहिष्कार...
  July 20, 09:05 AM
 • धुळे -तो आला, त्याने पाहिले अन् जिंकून घेतले. सारे काही असाच प्रकार धुळ्यातील झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला. आदित्य संवाद कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्याला शिक्षणमंत्री व्हायला आवडेल. शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे सांगितले. युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना...
  July 20, 08:58 AM
 • पुणे -किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पतीने ९ वर्षांच्या मुलीसह पत्नीला डोंगरावर नेत डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सणसवाडी (ता. शिरूर) येथे घडली. खुनानंतर पत्नीच्याच साडीने गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली. ऊर्मिला संतोष बच्चेवार (सणसवाडी, मूळ चांडोळा, जि. नांदेड) असे पत्नीचे तर संतोष बच्चेवार असे पतीचे नाव आहे. दांपत्याची मुलगी कोमलने (९) पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. संतोष बच्चेवार यांनी एका महिलेला ३ लाख रुपये उसने व पत्नी...
  July 20, 08:50 AM
 • अमरावती -बदलीच्या मागणीसाठी अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसलेले नवरदेव निखिल तिखे यांना शुक्रवारी प्रशासनापुढे झुकावे लागले. कोणत्याही प्रकारची मागणी मान्य न करता उलट त्यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या मुख्य अभियंत्याने जाहीर करताच नवरदेव तिखे उपोषणस्थळ सोडून नियोजित लग्न सभामंडपात जाऊन बोहल्यावरच चढले. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केल्याचा वर्कर्स फेडरेशनचा दावा...
  July 20, 08:44 AM
 • पुणे -शेतकऱ्यांवरील संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कृत्रिम पावसाच्या प्रणालीवर १०० कोटी खर्च झाले तरी सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा निर्धार कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. कृषिमंत्री पुढे म्हणाले, कृत्रिम पावसाच्या प्रणालीत ४० ते ४५ टक्के यश मिळण्याची शक्यता असते. गारपिटीसारखे नैसर्गिक संकट टाळण्यासाठीही ही यंत्रणा कायमस्वरूपी राबणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे कृत्रिम पावसाची रडार यंत्रणा बसवली आहे. त्याद्वारे...
  July 20, 08:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात