Home >> Maharashtra

Maharashtra

 • मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात या महिन्यात 25 तारखेला उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेसने या दौऱ्यावर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्धव यांचा दौरा निरर्थक असल्याची टीका केली आहे. काय म्हणाले अशोक चव्हाण अशोक चव्हा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला काहीही अर्थ नाही. लोकांच्या...
  November 13, 03:17 PM
 • मुंबई - सगळीकडे सध्या नावांची चर्चा आहे. देशातील काही शहरांची नावे बदलली जात आहेत. तर काहींची नावे बदलण्याच्या मागण्यांनी जोर धरला आहे. अशातच नावाची आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राज्यात होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाच्या नावाची. या चर्चेचे कारण म्हणजे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची केलेली मागणी. शिवसेना नेते आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
  November 13, 02:58 PM
 • जळगाव-श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दिवाळीच्या पंचमीला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता १००८ खाद्यपदार्थांचा अन्नकूटचा प्रसाद चढवण्यात आला. देवस्थानात ही परंपरा मंदिर निर्मितीपासून म्हणजे सन १९८८ पासून सुरू आहे. यात सिद्धी व्यंकटेशाला मोसंबीद्वारे तर माता लक्ष्मीला ५० ते ६० हजार बांगड्यांद्वारे सजवण्यात आले होते. या वेळी मंदिरात सायंकाळी ५.३० वाजेपासूनच भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे दर वर्षी अन्नकूटचा कार्यक्रम घेण्यात येतो....
  November 13, 12:59 PM
 • जळगाव - दोन माथेफिरूंनी दुचाकीसह दुमजली घरावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना द्रौपदीनगरात रविवारी मध्यरात्री घडली. या घरात १४ दिवसांच्या बालकासह पाच जण झोपले असतानाही हा प्रयत्न झाल्याने कुटुंबीय हादरले. सुदैवाने धुरामुळे वेळीच जाग अाल्याने सर्वांचे प्राण वाचले असून ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. द्रौपदीनगरातील सुनंदा जालम चौधरी यांच्या घरी हा प्रकार घडला. रविवारी रात्री चौधरी कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री १२.१० ते १ वाजेदरम्यान विना...
  November 13, 12:51 PM
 • नगर- महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारासह चार जणांनाच उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा जास्त जण आढळून आल्यास उमेदवारावर आचासंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी सोमवारी दिले. महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवडणूकविषयक कामकाजाबाबत...
  November 13, 12:45 PM
 • पातूर- हैदराबादकडे नेण्यात येत असलेले ५८ उंट साेमवारी संध्याकाळी पातूर जवळ पकडण्यात अाले. हे उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगली हाेती. याप्रकरणी गाैरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीत त्यांना उंटासोबत असलेल्या व्यक्तींनी उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितल्याचे नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी दाेघांची चाैकशी केली. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी वक्ताराम तानाजी वय ४० रा. रेवाडे, राजस्थान, भंवरलाल बिजर वय ५० रा....
  November 13, 12:40 PM
 • अमरावती- कंपनीच्या ट्रकमधून सोयाबीनचे पोते चोरताना दिसल्यामुळे एका व्यक्तीने चोरट्यांना हटकले. यावेळी तिघापैकी एकाने हटकणाऱ्या व्यक्तीला वीट मारून जखमी केले व सोयाबिीनचे पोते लंपास केले. या प्रकरणी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी रविवारी (दि. ११) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दाद्या ऊर्फ अविनाश विनोद रणधीर (२१), स्वप्नील लक्ष्मण भेंडारकर (२५) आणि शैलेश नामदेव गणवीर (२३, तिघेही रा. मिलचाळ, नवीवस्ती बडनेरा) असे पोलिसांनी अटक...
  November 13, 12:34 PM
 • मुंबई- अरबी समुद्रात राजभवनाजवळ उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठीच्या नियोजित स्थळी स्मारकाचा भार पेलवेल असा कठीण पाया नाही, असा दावा करत या स्मारकाचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी आपली मुंबई या संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त व्हाइस अॅडमिरल आय. सी. राव यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोमवारी याबाबतचे पत्र पाठवले. पत्रात म्हटले आहे की, एल अँड टी कंपनीने स्मारकस्थळी मे २०१८ मध्ये १०० मीटर...
  November 13, 12:29 PM
 • अमरावती- शहरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने एका युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून मागील सव्वा वर्षांपासून वारंवार तिचे शारिरीक शोषण केले. युवतीने त्याला लग्नासाठी गळ घातली तर त्याने लग्नाला नकार देऊन पीडित युवतीला मारहाण केली तसेच मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मला टाईमपास करायचा, असे म्हणून विश्वासघात केल्याची तक्रार पीडितेने रविवारी (दि. ११) रात्री फ्रेजरपुरा पोलिसात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील दादाराव घुटके (२४, रा....
  November 13, 12:14 PM
 • औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची कचरा कोंडी फोडण्यासाठी कचरा समस्या सोडवण्यात निपुण असलेल्या डॉ. निपुण विनायक यांना मनपात आयुक्त म्हणून नियुक्त केले. मात्र, याच आयुक्तांकडून शिवसेनेचे आदेश पाळण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेच्या कामांना होकार देणारे मनपा आयुक्त भाजपच्या मागण्या धुडकावून लावत असल्याचे गाऱ्हाणे या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडले. विशेष म्हणजे शहराच्या...
  November 13, 12:06 PM
 • औरंगाबाद- सुधाकरनगर पोलिस वसाहतीमधील ४ जवानांसह शहरात गेल्या २४ तासांत एकूण ७ ठिकाणी घरफोडी करण्यात आली. दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सुधाकरनगरसह पुंडलिकनगर, वानखेडेनगरातही घरफोड्या केल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सातारा परिसरातील सुधाकरनगरात बीट पुस्तिकेवर पोलिसांची साधी स्वाक्षरीदेखील नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांची गस्तही बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा परिसरात रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान मोपेड दुचाकीवर...
  November 13, 11:59 AM
 • नागपूर- दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केलेला गडचिरोलीचा अजित रॉय हा नक्षलवाद्यांना काडतुसांचा पुरवठा करायचा. नक्षलवाद्यांच्या एका बड्या नेत्याशीही त्याचे घनिष्ठ संबंध होते, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानातील सूत्रांनी दिली. लवकरच गडचिरोली पोलिसांचे पथकही दिल्ली जाऊन अजित रॉयची चौकशी करणार आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक अरुण शेलार यांनी सोमवारी दिली. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूरच्या अजित रॉय (वय ४८) याला नक्षलवाद्यांशी संशय असल्याच्या...
  November 13, 11:53 AM
 • पुणे-माजी महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर अाराेप असलेल्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी भूखंड प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना क्लीन चिट दिली असली तरी ती राज्य सरकारच्या अंगलट येण्याची चिन्हे अाहेत. या भूखंड खरेदीत काहीही गैर नसल्याचा निष्कर्ष काढणाऱ्या एसीबीच्या अहवालाविराेधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेची सुनावणी सध्या पुणे काेर्टात सुरू आहे. अापण सादर केलेले सरकारी कागदपत्रांचेच खडसेंचे...
  November 13, 10:49 AM
 • पुणे- काेरेगाव भीमा येथे एक जानेवारी राेजी दाेन गटांत दंगल हाेऊन माेठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी परिसरात २८ डिसेंबर २०१७ राेजी वादग्रस्त मजकूर असलेला बाेर्ड लावण्यावरून वाद झाला हाेता. याप्रकरणी वढू गावातील ४९ जणांविराेधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल हाेऊन सहा जणांना अटक झाली. अटक करण्यात अालेल्यांपैकी शरद काळूराम दाभाडे याने चुकीच्या पद्धतीने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्याचे सांगत काेरेगाव भीमा चाैकशी...
  November 13, 10:23 AM
 • मनमाड - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, स्वातंत्र्यसेनानी, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, कामगार व खंडकरी शेतकऱ्यांचे लढाऊ नेतृत्व कॉ. माधवराव बयाजी गायकवाड (बाबूजी) यांचे ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वातंत्र्यसेनानी कुसुमताई व मानसकन्या अॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. कॉ. गायकवाड यांची अंत्ययात्रा मंगळवारी शिवाजीनगर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत...
  November 13, 10:18 AM
 • पुणे-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढवण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठीही सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात याबाबत अर्ज दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने सनातनचा साधक डॉ....
  November 13, 10:09 AM
 • पुणे- सन २०१७- १८ च्या हंगामातील किफायती आणि किमान ऊस दराची (एफआरपी) खोटी आकडेवारी सादर केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे उपनेते तथा अामदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड (सोनारी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) या साखर कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करण्यात आला आहे. कायद्याने शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असलेली एफआरपी अदा न करताच या कारखान्याने साखर आयुक्तालयाची फसवणूक करून गाळप परवाना मिळवल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू...
  November 13, 09:15 AM
 • बीड-दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बीडमध्ये होते. बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाषणही केले. एरवी दुष्काळावरून सरकारला धारेवर धरणारे धनंजय मुंडे स्वत:च्या जिल्ह्यातील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्नांचे निवेदन देत काही मिनिटांतच बाहेर पडले. केवळ बैठकांवर बैठका आपणास मान्य नसून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले . मुंडेंनी काही दिवसापूर्वीच परळीतील गावांचा दौरा केला.होता....
  November 13, 09:09 AM
 • बदनापूर - कमी पावसामुळे या हंगामात पिकांची वाढ खुंटून उत्पन्न घटले. मात्र एका शेतकऱ्याने कपाशीबरोबरच गांजाची झाडे लावली. परंतु कपाशीपेक्षा गांजाची झाडेच जास्त वाढल्याने ती पोलिसांच्या नजरेत भरली आणि बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दादासाहेब भूजंग या शेतकऱ्याने दाेन एकर शेतात गांजाची ६१ झाडे लावली होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीअाय रामेश्वर खनाळ, पंढरीनाथ बोलकर, चैनसिंग घुसिंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी...
  November 13, 09:03 AM
 • धुळे-धुळ्याचा अागामी महापाैर मीच असेन अशी घाेषणा करणारे अनिल गाेटे यांनी १९ नाेव्हेंबर राेजी भाजपच्या अामदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक अामदार असूनही महापालिका निवडणुकीची सूत्रे अापल्याकडे दिली जात नसल्याने व मंत्री गिरीश महाजन, जयप्रकाश रावल व सुभाष भामरे यांच्या अडवणुकीच्या धाेरणाला कंटाळून त्यांनी भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अाहे;. धुळे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रचंड रणकंदन सुरू झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब...
  November 13, 08:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED