जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra

Maharashtra

 • शिरूर - दहीवंडीच्या ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी मंगळवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दहीवंडी गावाला भेट दिली. १९९२ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी दहीवंडीला दिलेल्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच गावाला भेट दिल्याने महिलांनी आनंदात मुंडेंना ५ ग्रॅमची साेन्याची अंगठी भेट देत त्यांचे स्वागत केले. तुमचा धनंजय हे प्रेम कधी विसरणार नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार...
  May 15, 11:00 AM
 • आष्टी - शहरातील नगर-बीड रोडवरील महेश पेट्रोल पंपाजवळ सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महामार्गावर गस्त करणारी आष्टी पोलिसांची जीप आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. लहुरी (ता. केज) गावातील बाळासाहेब देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री डोंबिवलीवरून आपल्या मूळगावी लहुरी येथे नातेवाइकांसोबत कारने (एमएच ०१ बीके ९२४९) जात होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास आष्टी शहरातील महेश पेट्रोल पंपासमोर पोलिस जीप आणि त्यांच्या कारची...
  May 15, 10:54 AM
 • नाशिक - दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रोजगार हमीअंतर्गत तातडीने जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या २८ कामांना मान्यता दिल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सरपंचांशी संवाद साधत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अस्वली गावातील मजूर त्यांचे कोरे जॉबकार्ड दाखवत होते. या गावातून १०० जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामाची मागणी नोंदवूूनही गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली नसल्याच्या तक्रारी सांगत होते. विशेष म्हणजे, २४ जानेवारीच्या बैठकीत रोहयो...
  May 15, 10:36 AM
 • नंदुरबार | सिंचनाचा अभाव, आदिवासी भागांतील प्रचंड वृक्षतोड, खडतर मार्गामुळे वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नंदुरबारच्या ६ तालुक्यांना पाणीप्रश्नाने ग्रासले आहे. शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव तालुके यात सर्वाधिक होरपळून निघत आहेत. दुर्गम रस्त्यांमुळे नंदुरबारमध्ये दोन आदिवासी पाड्यांवर केवळ एकच टँकर सुरू आहे. वैयक्तिक बोअर व हातपंपांच्या माध्यमातून येथील नागरिक तहान भागवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ५३ किलोमीटरचा प्रवास करून नर्मदा वाहते. याचा फारसा फायदा येथील आदिवासी...
  May 15, 10:34 AM
 • सिन्नर - केवळ शाळेतील विद्यार्थ्यांना भूतदयेचे धडे न देता स्वत:ही पशु-पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय करण्यासाठी सिन्नर येथील वाजे विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा शेतकरी ज्ञानदेव नवले यांनी पुढाकार घेतला आहे. शेतातील कणीस भरलेली हिरवीगार १५ गुंठे ज्वारी त्यांनी पाखरांसाठी खुली केली आहे. विशेष म्हणजे शेतातील विहिरीजवळील दगडी कुंडात पाखरांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे. हजारो रुपये किमतीच्या चाऱ्यावर पाणी सोडत त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे. दाणा-पाण्याअभावी पक्ष्यांचे...
  May 15, 10:30 AM
 • पुणे - आंतरजातीय मुलाशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्याच्याशी परस्पर प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची जन्मदात्या आईनेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती मधील प्रगतीनगर येथे घडल्याचे मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास उघडकीस आली आहे. ऋतुजा हरिदास बाेभाटे (वय १९ ) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी ऋतुजाची आई संजीवनी हरिदास बाेभाटे(३५) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा हिची आई गृहिणी असून तिचे वडील हरिदास बाेभाटे हे पीडीसीसी बँकेत शिपाई...
  May 15, 09:47 AM
 • मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस जोरात सुरू होती. परंतु आत्ताच भाजपमध्ये जाऊन काही काम करता येणार नसल्याने अधिवेनशनानंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किंवा लागू झाल्यावर राधाकृष्ण विखे -पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत मुलगा सुजय याच्यासाठी शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी राधाकृष्ण विखेपाटील...
  May 15, 09:38 AM
 • जाफराबाद | भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जाफराबाद - चिखली रस्त्यावरील सोनगिरी पाटीजवळ घडली. सचिन भगवान शेळके (२०), अमोल माधवराव बकाल (२२), समाधान रामू चौंडकर (सर्व रा. कोळेगाव, ता. जाफराबाद) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सचिन व अमोल हे दोघे जागीच ठार झाले, तर उपचारासाठी नेत असताना समाधानचा मृत्यू झाला. हे तिघेजण आधार कार्डाच्या दुरुस्तीसाठी...
  May 15, 08:56 AM
 • नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप असलेले कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांची बदली नंदुरबारला करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कारवाईची मागणी केली होती. १ मे रोजी झालेल्या या घटनेत १५ जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आदल्या रात्री नक्षलवाद्यांनी दादापूर येथे २७ वाहनांची जाळपोळ केली. या घटनास्थळावर पोलिस पथक पोहोचत असताना मार्गातच भूसुरुंग...
  May 15, 08:51 AM
 • मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१९-२० वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंबंधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी) आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी आनंद रायते यांच्या सहीने मंगळवारी मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत विशेष आर्थिक मागास वर्ग (एसईबीसी) आरक्षण लागू करता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला...
  May 15, 08:50 AM
 • नागपूर - आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही आठ भाऊ, त्यांची १६ मुले, त्यांची बायका-मुले आणि सोळा भावांची मुले, सुना, नातवंडे असे एकूण साधारणत: ४४ ते ४५ जणांचे कुटुंब एकत्र राहते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. नागपुरातील व्यापारी व उद्योजक रमेश मंत्री यांचे कुटुंब आजही एकत्र राहते. नागपुरातील शिवाजीनगर परिसरातील मंत्री निवास सदैव गजबजलेले असते. नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव हे मंत्री कुटुंबीयांचे मूळ गाव. शेती हा पारंपरिक व्यवसाय. श्रीकिसन मंत्री यांना माणकलाल व...
  May 15, 08:43 AM
 • चंद्रपूर- आंतरजातीय विवाह किंवा प्रेमप्रकरणांमधून हत्या होण्याचे प्रमाण सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. बारामतीमध्ये आज आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरातून अजून एक अशीच घटना समोर आली आहे. मुलीचे वडील आणि भावाने मिळून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण करत ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. घटना चंद्रपूरातील घुग्गुस येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. योगेश जाधव(23) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेतील आरोपींनी हत्या केल्यावर...
  May 14, 04:56 PM
 • बारामती- जन्मदात्या आईने मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि हत्येची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात हा प्रकार घडला. ऋतुजा हरीदास बोभाटे(वय19) असे मुलीचे नाव आहे. ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता, पण मुलगा तिला सोबत घेऊन जायला येत नव्हता. त्यामुळे मुलीने नवऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आईनेही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा...
  May 14, 03:06 PM
 • पुणे- मागील काही दिवसांपासून कुख्यात गुंडांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नागपूर आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एका गुन्हेगारानेही टीक टॉक व्हिडीओ तयार केला आहे. दीपक आबा दाखले असे या गुंडाचे नाव असून वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने परिसरात दहशत पसरवण्यासाठी टीक टॉकवरून व्हिडीओ तयार केला. यात त्याने वाढीव दिसतंय राव या लावणीवर व्हिडीओ तयार केला आहे. विशेष म्हणजे या...
  May 14, 12:11 PM
 • मुंबई - महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुद्ध आरोप करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना रितेश देशमुखने सडेतोड उत्तर दिले आहे. माझे वडील कधीही मला रोल मिळवून देण्यासाठी कुणाला बोलले नाहीत असे रितेशने स्पष्ट केले. मुंबई हल्ल्यांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपला मुलगा रितेश देशमुखला चित्रपटात रोल मिळवून देण्यात मशगूल होते असा आरोप गोयल यांनी केला होता. रितेशने गोयल यांचे नाव न घेता त्यांना सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. माजी...
  May 14, 10:50 AM
 • पैठण - पैठण तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांची तहान भागवणाऱ्या आपेगाव, हिरडपुरी या दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी साेमवारी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या गेटच्या पायथ्याशी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी धरणावर जाण्यापासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना रोखले असल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. रात्री काय तो निर्णय घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. सायंकाळी ६...
  May 14, 10:17 AM
 • पुणे -दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीच्या प्रेमप्रकरणाची चाैकशी करणाऱ्या पत्नीचा बेदम मारहाण करून खून केल्याची घटना पुण्यातील घोडेगाव परिसरात साेमवारी उघडकीस आली. सानिका संदीप करवंदे (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.याप्रकरणी पाेलिसांनी संदीप करवंदे (३३) याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सानिकाची आई रेऊबाई गंगाबाई तिटकारे यांनी घाेडेगाव पाेलिस ठाण्यात जावयाविराेधात फिर्याद दिली आहे. सानिका व संदीप यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले...
  May 14, 10:07 AM
 • जळगाव -आम्ही आता हरलो, असे समजून रोज थोडाथोडा मृत्यू पीत आहोत. किडनीचा आजार जडून केव्हा मरण येईल सांगता येत नाही, असे म्हणून हताश झालेले गुलाबवाडीतील (ता. रावेर) शेतकरी नंदलाल राठोड यांनी गावाला ८ वर्षांपासून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याची माहिती देत आपबीती सांगितली. सातपुड्यातील पालपासून ५ किमीवरील गुलाबवाडीत पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलमधून दूषित व अतिक्षारयुक्त पाण्याने किडनी विकाराने ६ वर्षांत १० मृत्यू, तर ७० रुग्ण बाधित आहेत. ३ रुग्ण गंभीर आहेत. ४९० लोकसंख्येच्या गावात २०११...
  May 14, 09:40 AM
 • सोलापूर - शासनाने मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या, पण शेळ्या-मेंढ्यांसारख्या छोट्या जनावरांसाठी काेणतीही उपाययोजना केलेली नाही. सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने शेळ्या मेंढ्यांसाठी छावणी सुरू केली आहे. राज्यातील हा पहिला प्रयाेग आहे. सांगाेला तालुक्यात लाेकर उत्पादन माेठ्या प्रमाणात आहे. शेतीपूरक व्यावसायिकांची गरज आेळखून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून हा प्रयाेग सुरू आहे. हिरव्या चाऱ्यासाठी तेथेच हायड्रोपोनिक चारानिर्मिती...
  May 14, 09:30 AM
 • हिंगोली -वसमत तालुक्यातील दोन गर्भवती महिलांना सिझेरियन ऑपरेशन करावे लागण्याची शक्यता असल्याचे सांगून त्यांची प्रसूती न करता त्यांना थेट नांदेडला सोमवारी रेफर करण्यात आले. परंतु रुग्णालयापासून पाच किमीच्या अंतरावर जाताच दोन्ही गर्भवती महिलांची रुग्णवाहिकेतच नॉर्मल प्रसूती झाल्याने वसमत येथील महिला रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वसमत येथील महिला रुग्णालयात आरोग्य सुविधा मिळतील या उद्देशाने तालुकाभरातून महिला रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात....
  May 14, 09:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात