Home >> Maharashtra

Maharashtra

 • कोल्हापूर- शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनानंतर खवरे यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. खवरे गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, काल बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शशिकांत खवरे यांनी कार्यकर्त्यांसह भररस्त्यावर डबलबार बंदूक आणि पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला. सरपंच यांनी केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात...
  November 8, 12:26 PM
 • पुणे- सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉलमध्ये एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्येाचा प्रयत्न केला. प्रदीप शेंडगे आणि कांचन शेंडगे असे या दाम्पत्याचे नाव आहे. बुधवारी (7 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनानंतर रात्री अकरा वाजता दोघांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या जोडप्याला सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. प्रदीप आणि कांचनमध्ये वाद सुरु असल्याचे समजते. आधी कांचन हिने कॅनॉलमध्ये उडी घेतली. त्यापाठोपाठ प्रदीपने उडी घेतली. दोघे कॅनॉलमध्ये एका झाडाला धरुन असल्याचे...
  November 8, 12:15 PM
 • परळी- येथील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमुख मार्गावर प्रदूषण होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी राख वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. रात्रीच्या वेळी राख उचलण्यास व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दाऊतपूर, वडगाव येथील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करता येणार असून वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी लागणार आहे. राखेच्या...
  November 8, 11:58 AM
 • धुळे-शहरात सायंकाळी सहा ते साडेअाठ वाजेच्या सुमारास मुहूर्त साधत घराेघरी लक्ष्मीपूजन झाले. त्याचवेळी फटाक्यांची एकच बरसात झाली. लाखाे अाकाशकंदिलांच्या सान्निध्यात फटाक्यांची अातषबाजी झाल्याने शहर प्रकाशाने उजळून निघाले. दहा वाजेच्या अात शहरभरात फटाक्यांची अातषबाजी झाली. दरम्यान भाऊबीजेसाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून, एसटी बसेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही फुल्ल झाल्या होत्या. दीपावली पर्वात लक्ष्मीपूजनाला शहरात सायंकाळी आग्रा रोडवरील दुकान, शोरूम, सोन्या-चांदीच्या...
  November 8, 11:52 AM
 • जळगाव- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील हवा व ध्वनी प्रदूषण तपासणीसाठी पाच ठिकाणी स्वयंचलित मशिन लावले अाहेत. यात १५ दिवस हवेची तर तीन दिवस ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाणार अाहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवसांत फटाक्यांची अातषबाजी कमी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याची भर भरून काढण्यात अाली. दिवाळी म्हटली की दिवे, फराळ अाणि फटाक्यांची अातषबाजी हे समिकरण ठरलेले अाहे. वसुबारसपासून सुरू झालेल्या दीपाेत्सवात...
  November 8, 11:38 AM
 • नगर- महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या घडामोडींना गती आली आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी मुंबईत १४ नोव्हेंबरला बैठक होत आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपतील युतीची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. महापालिकेच्या शहरातील १७ प्रभागांत ६८ नगरसेवक निवडून देण्यासाठी ९ डिसेंबरला नगरकर कौल देणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, आम आदमी...
  November 8, 11:27 AM
 • सोलापूर- सैराटच्या माध्यमाने मराठी चित्रपट सृष्टीवर आपली वेगळी छाप पाडणाऱ्या रिंकू राजगुरू म्हणजेच रसिकांच्या आर्चीकडून यंदाच्या व्हॅलेंटाइन डेला एक नवा कोरा करकरीत चित्रपट भेट मिळणार आहे. नवतेज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली आहे. उदाहरणार्थ निर्मित, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रिंगण चित्रपट शिल्पकार दिग्दर्शक मकरंद माने यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला कागर हा सोलापूरच्याच मातीत बनविलेला आहे, हे आणखीन एक विशेष असणार आहे. अनोखी स्टोरी...
  November 8, 11:23 AM
 • सोलापूर- गेल्या अनेक वर्षापासून रायगडावर वास्तव्यास असलेल्या धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी दिवाळी साजरी केली. त्यांना फराळ आणि त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. इंग्रजांनी जेव्हा रायगडावर तोफांचा भडिमार करून रायगड बेचिराख करण्याचा प्रयत्न केला. नंतर रायगड ताब्यात घेतला आणि इंग्रजांनी गडावर जमेल तेवढी लूट केली. यानंतर काही धनगर समाज बांधव रायगडावर वास्तव्यास गेले. अलिखित पहारेकरी म्हणून या धनगर समाज बांधवांनी रायगडाची पहारेकरी...
  November 8, 11:17 AM
 • वाळूज- ट्रकच्या (एमएच ४३ यू ६५७०) धडकेने भाचीला घेऊन दुचाकीवरून (एमएच २० बीबी १६५२) निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. दीपक पूनमचंद महेर (१८, रा. बेंडेवाडी, ता. वैजापूर) असे त्यांचे नाव आहे. भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन (५, रा. जोगेश्वरी) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसीवाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत.खोजेवाडी फाट्याजवळ अपघात; घाटीत...
  November 8, 11:06 AM
 • मुंबई- यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीला मारण्याची गरज नव्हती. बेशुद्ध करून तिचे संगोपन करता आले असते. मात्र आपण जे करतो ते सर्व योग्यच असा या सरकारचा भ्रम असून या सरकारला सत्तेचा माज आलाय, अशा कठोर शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी फडणवीस सरकारवर तोफ डागली. त्यांच्या तडाख्यातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील सुटले नाहीत. फक्त वाघाचे पुतळे उभारून वाघांची संख्या वाढणार नाही. त्यासाठी काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुनगंटीवार यांना लगावला. अवनी वाघिणीच्या वादग्रस्त...
  November 8, 10:46 AM
 • मुंबई- पर्यावरण रक्षणासाठी फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचे निर्बंध सर्वाेच्च न्यायालयाने घालून दिले अाहेत. मात्र या अादेशाचे सर्रास उल्लंघन करुन फटाके उडवल्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील पीपीएल कॉलनीत कानठळ्या बसतील अशा आवाजाचे फटाके फोडल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तींविराेधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या...
  November 8, 10:43 AM
 • हिंगोली-मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसद येथे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे कळमनुरी येथे ती बसस्थानकाजवळील लमानदेव मंदिराजवळील सभा मंडपाला या बसने धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील २२ प्रवासी बालंबाल बचावले. हिंगोली-नांदेड महामार्गावरून एम. एच. ४० एन. ८५६७ या क्रमांकाची पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती. मात्र, कळमनुरी शहरापासून काही अंतरावर बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला....
  November 8, 10:27 AM
 • शिर्डी-साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे लक्ष्मीपूजन बुधवारी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या वेळी साईबाबांच्या मूर्तीवर दोन कोटींची आभूषणे घालण्यात आली.यात हिरेजडित रत्नमुकुटाचाही समावेश होता. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता-अग्रवाल यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीपूजन झाले. धूपारतीनंतर दर्शन सुरू झाले. या वेळी देश-विदेशातील लाखो भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेत दीपोत्सवही उत्साहात साजरा केला. दिवाळीला चारही दिवस पहाटे सुगंधी उटणे लावून समाधीस व...
  November 8, 08:21 AM
 • परभणी- शहरातील मेहराजनगर भागात किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलगी ही तिच्या अत्याकडे गेली होती. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान सदर मुलगी सेवक नगरातील किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली असता याच...
  November 8, 07:57 AM
 • लातूर-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये. स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी यासाठी सर्वच पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ऐन दिवाळीत लातूर लोकसभा विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जातीमधील काही विचारवंतांनी पुढाकार घेतला आहे. सर्वसाधारणपणे एखादा मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव झाला की तेथील मातब्बर नेते स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार तेथून उभा करतात आणि त्याला निवडून...
  November 8, 07:44 AM
 • नांदेड- हल्ली संकेतस्थळावरून लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र या संकेतस्थळावरूनही फसवणूक होऊ शकते हे देगलूर येथील एका महिलेच्या अनुभवावरून उघडकीला आले. एका संकेतस्थळावरून एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मूळ नायजेरियाचा रहिवासी असलेला आणि सध्या दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या थियोफिलस मारो याचे एका मॅट्रिमोनियल...
  November 8, 07:25 AM
 • परभणी- पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर प्रत्येकी ३ महिन्यांच्या गोपाळ रामकिशन सकनूर, राम निळे या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर विद्या भकाणे, लखण निळे या बालकांवर अंबेजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोकडेवाडीतील आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी बुधवारी सकाळी काही बालकांचे लसीकरण केले. सकाळी ११ वाजता गोपाळचा मृत्यू झाला. व्यंकटेश श्यामराव निळे यांची जुळी मुले राम-लखण व दत्तराव रावजी भकाणे यांची मुलगी विद्या या तीन बालकांनाही...
  November 8, 07:15 AM
 • मुंबई- मुंबई शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक विशेष सत्रात झालेल्या प्रचंड खरेदीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक २४५.७७ अंकांनी उसळून ३५,२३७.६८ वर बंद झाला. या माध्यमातून मुहूर्ताची दमदार खरेदी होत संवत २०७५ चा प्रारंभ झाला. दीपावलीच्या दिवशी सायंकाळी मुंबई शेअर बाजारात एक तासाचे विशेष सत्र असते. या पारंपरिक सत्रात मुहूर्ताच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडतात. बुधवारीही सत्राच्या प्रारंभी सेन्सेक्स ३५,३१० अंकांवर उघडला. यानंतर गुंतवणूकदारांनी सर्वच...
  November 8, 06:51 AM
 • दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियाच्या ट्रकने चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाला चिरडून मारले. विदर्भातील तीन जिल्ह्यांत दारूबंदी आहे. वर्धा, गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरात एप्रिल २०१५ पासून दारूबंदीला सुरुवात झाली. बेकायदेशीर दारू व्यवसायातील विविध प्रकारचे वाढते गुन्हे हा चंद्रपूर जिल्ह्याला नवीन प्रकार नाही. कारण बंदी सुरू झाल्यापासून दारू माफियांचा दारू उद्योग वरचेवर फोफावतच आहे. तो इतका जबरदस्त वाढलाय की, ते आता कोणालाच बधत नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी...
  November 8, 06:44 AM
 • मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज ठाकरे यांनीआपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. राज यांनी लक्ष्मीपूजन या शीर्षकाखाली व्यंगचित्र रेखाटून ते फेसबूकपेजवर पोस्ट केले आहे. लक्ष्मीपूजन...बाबांनो गेल्या साडेचार वर्षांत तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो- लाखो- कोटींमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले!, अशा शब्दांत भाजप नेत्यांनी देशातील जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनावरून टोला...
  November 7, 05:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED