जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra

Maharashtra

 • औरंगाबाद -सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या जमिनीतील जलस्रोतही आटत चालले आहेत. राज्यातील ३५३ पैकी २९७ तालुक्यांतील भूजल पातळी एक मीटरपेक्षा अधिक खाली गेली आहे. २६४२ गावांमध्ये हे प्रमाण तर ३ मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्चच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात भूजल पातळीचा मागील ५ वर्षांच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास आहे. यातील आकडेवारी धक्कादायक आहे. अनेक ठिकाणी शेकडो फुटांवरही पाणी लागत नसल्याचे चित्र...
  May 16, 09:05 AM
 • लोहारा -शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात करण्यात आलेल्या मारहाणीत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री घडली. लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (५०) हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची सासरवाडी म्हणजेच कास्ती (बुुद्रुक) शिवारात मनोहर हरिपंत राकेलकर यांची पाच एकर ११ गुंठे शेतजमीन खरेदी केली. याच शेतात...
  May 16, 08:40 AM
 • हिंगोली -गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या देशी दारू विक्री होत असल्याची तक्रार पोलिस व औंढा नागनाथ तालुका प्रशासनाला करूही प्रशासन काहीही कारवाई करीत नसल्यामुळे संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी सात वाजता औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे चहाच्या टपरीतून सुमारे १०० दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या वेळी संतप्त महिलांनी चहा हॉटेल चालकालाही पोलिसांच्या हवाली केले. सदर दारू विक्रेत्याला महिलांनी अनेक वेळा विनंती करूनही त्याने दारू विक्री न थांबल्यामुळे महिलांनी बुधवारी सकाळी ७...
  May 16, 08:35 AM
 • बदनापूर -शेजारचे गावाला गेल्यामुळे आई, वडील, भाऊ, बहीण हे सर्व जण शेजारच्या घरात झोपायला गेल्यानंतर घरात एकटाच असलेल्या तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष हनुमान कुरधने (२३) असे मृताचे नाव आहे. खून करून मारेकऱ्याने दरवाजा उघडा ठेवून पळ काढला. दरम्यान, २५ सप्टेंबर २०१८ रोजी हा तरुण गावातील एका घराच्या ओट्यावर झोपलेला असताना डोक्यात दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता....
  May 16, 08:30 AM
 • पैठण -पैठण तालुक्यात दरवर्षी दुष्काळ असो किंवा नसाे, उन्हाळ्यात टँकर सुरु राहणारच ही परिस्थिती अाहे. यंदा तर टँकरच्या खेपांचा आकडा अडीचशे पार करून गेला असून अनेक गावांना टँकरचेही पाणी मिळत नाही ही परिस्थिती निम्म्या तालुक्यातील गावांची झाली अाहे. मात्र जायकवाडी धरणाच्या लगत अर्धा किमी अंतरावरील अनेक गावांनाही जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी मिळत नाही.एवढेच काय जायकवाडी धरणाच्या भिंतीलगत वसाहतीला देखील धरणाचे शुध्द पाणी मिळत नसल्याने पैठणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून धरणाच्या लगतचे...
  May 16, 08:22 AM
 • ठाणे- ठाण्याततील 30 ते 35 भंगार गोडाऊनला आग लागल्याची घटना आज घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ठाण्यातील शीळ डायघर भागातील डोसिया कम्पाऊंडर येथे घडली. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमनदलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही. दुपारी आग शीळ डायघर भागात लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि गोडाऊन आहेत. येथे छोटे-मोठे व्यापारी आपली काम करतात. तसेच इथे केमिकल आणि कापडाचेही गोडाऊन मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग इतकी...
  May 15, 08:07 PM
 • सोलापूर- सोलापूरमध्य़े आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सोलापूरमध्ये एका मुलाने माझे लग्न का लावून देत नाहीत असे म्हणत, जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागमणी विजय कायत असे दुर्देवी मातेचे नाव असून, आरोपी मोहित विजय कायतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील कायत कुटुंब माळवाडीत स्थायिक झाले होते, आरोपी मोहितला अमली पदार्थांचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो उपचारासाठी सोलापूरला...
  May 15, 06:58 PM
 • मुंबई- लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. याबाबत चर्चाही राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, या संदर्भातील सर्व निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला...
  May 15, 05:22 PM
 • मुंबई- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यापूर्वीचा भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे विधान अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमल हासन यांचा निषेध केला आहे. शरद पोंक्षेंनी फेसबूकवरील पोस्ट मधून कमल हासन यांच्यावर जबरी टिका केली आहे. काय म्हणाले शरद पोंक्षें- दहशतवादाला धर्म नसतो. अगदीच...
  May 15, 03:26 PM
 • पुणे- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने धडक मारल्याने यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर सकाळी 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला. मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. यामध्ये तीनही महिलांची जागीच प्राणज्योत मावळली. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेतल आहेत. सकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास या तीन महिला रोजप्रमाणे फिरायला गेल्या होत्या. चालत असताना अचानक एका...
  May 15, 02:57 PM
 • ठाणे- एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे कौमार्य चाचणीमुळे बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. कौमार्य चाचणीसाठी विरोध केल्यामुळे कुटुंबावर बहिष्कार घातलाच, पण कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या अंत्ययात्रेवरही बहिष्कार घातल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथच्या विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव...
  May 15, 02:07 PM
 • ठाणे- चार्जिंगला लावलेल्या फोनचा फोट झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अॅपल आयफोनचा चार्जिंगदरम्यान स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली. अमित भंडारी असे या जखमी तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे. अंबरनाथमधील कोहोजगाव या ठिकाणी राहणाऱ्या अमितने गेल्यावर्षी अॅपल कंपनीचा आयफोन-6 हा स्मार्टफोन खरेदी केला होता. रविवारी (12 मे) त्याच्या फोनची बॅटरी कमी असल्याने त्याने घरात फोन चार्जिंगला लावला. चार्जिंगला...
  May 15, 01:43 PM
 • शिरूर - दहीवंडीच्या ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी मंगळवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दहीवंडी गावाला भेट दिली. १९९२ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी दहीवंडीला दिलेल्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच गावाला भेट दिल्याने महिलांनी आनंदात मुंडेंना ५ ग्रॅमची साेन्याची अंगठी भेट देत त्यांचे स्वागत केले. तुमचा धनंजय हे प्रेम कधी विसरणार नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार...
  May 15, 11:00 AM
 • आष्टी - शहरातील नगर-बीड रोडवरील महेश पेट्रोल पंपाजवळ सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महामार्गावर गस्त करणारी आष्टी पोलिसांची जीप आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. लहुरी (ता. केज) गावातील बाळासाहेब देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री डोंबिवलीवरून आपल्या मूळगावी लहुरी येथे नातेवाइकांसोबत कारने (एमएच ०१ बीके ९२४९) जात होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास आष्टी शहरातील महेश पेट्रोल पंपासमोर पोलिस जीप आणि त्यांच्या कारची...
  May 15, 10:54 AM
 • नाशिक - दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रोजगार हमीअंतर्गत तातडीने जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या २८ कामांना मान्यता दिल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सरपंचांशी संवाद साधत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अस्वली गावातील मजूर त्यांचे कोरे जॉबकार्ड दाखवत होते. या गावातून १०० जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामाची मागणी नोंदवूूनही गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली नसल्याच्या तक्रारी सांगत होते. विशेष म्हणजे, २४ जानेवारीच्या बैठकीत रोहयो...
  May 15, 10:36 AM
 • नंदुरबार | सिंचनाचा अभाव, आदिवासी भागांतील प्रचंड वृक्षतोड, खडतर मार्गामुळे वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नंदुरबारच्या ६ तालुक्यांना पाणीप्रश्नाने ग्रासले आहे. शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव तालुके यात सर्वाधिक होरपळून निघत आहेत. दुर्गम रस्त्यांमुळे नंदुरबारमध्ये दोन आदिवासी पाड्यांवर केवळ एकच टँकर सुरू आहे. वैयक्तिक बोअर व हातपंपांच्या माध्यमातून येथील नागरिक तहान भागवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ५३ किलोमीटरचा प्रवास करून नर्मदा वाहते. याचा फारसा फायदा येथील आदिवासी...
  May 15, 10:34 AM
 • सिन्नर - केवळ शाळेतील विद्यार्थ्यांना भूतदयेचे धडे न देता स्वत:ही पशु-पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय करण्यासाठी सिन्नर येथील वाजे विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा शेतकरी ज्ञानदेव नवले यांनी पुढाकार घेतला आहे. शेतातील कणीस भरलेली हिरवीगार १५ गुंठे ज्वारी त्यांनी पाखरांसाठी खुली केली आहे. विशेष म्हणजे शेतातील विहिरीजवळील दगडी कुंडात पाखरांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे. हजारो रुपये किमतीच्या चाऱ्यावर पाणी सोडत त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला आहे. दाणा-पाण्याअभावी पक्ष्यांचे...
  May 15, 10:30 AM
 • पुणे - आंतरजातीय मुलाशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्याच्याशी परस्पर प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची जन्मदात्या आईनेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती मधील प्रगतीनगर येथे घडल्याचे मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास उघडकीस आली आहे. ऋतुजा हरिदास बाेभाटे (वय १९ ) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी ऋतुजाची आई संजीवनी हरिदास बाेभाटे(३५) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ऋतुजा हिची आई गृहिणी असून तिचे वडील हरिदास बाेभाटे हे पीडीसीसी बँकेत शिपाई...
  May 15, 09:47 AM
 • मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस जोरात सुरू होती. परंतु आत्ताच भाजपमध्ये जाऊन काही काम करता येणार नसल्याने अधिवेनशनानंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किंवा लागू झाल्यावर राधाकृष्ण विखे -पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत मुलगा सुजय याच्यासाठी शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी राधाकृष्ण विखेपाटील...
  May 15, 09:38 AM
 • जाफराबाद | भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जाफराबाद - चिखली रस्त्यावरील सोनगिरी पाटीजवळ घडली. सचिन भगवान शेळके (२०), अमोल माधवराव बकाल (२२), समाधान रामू चौंडकर (सर्व रा. कोळेगाव, ता. जाफराबाद) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सचिन व अमोल हे दोघे जागीच ठार झाले, तर उपचारासाठी नेत असताना समाधानचा मृत्यू झाला. हे तिघेजण आधार कार्डाच्या दुरुस्तीसाठी...
  May 15, 08:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात