Home >> Maharashtra

Maharashtra

 • औरंगाबाद - सुनावणीच्या वेळी न्यायालयात गैरहजर राहणार्या तपास अधिकार्यांची यापुढे काही खैर नाही. अशा कामचुकारांची थेट विभागीय चौकशी करून शिक्षा देण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी जारी केले आहेत. तपास अधिकार्यांच्या गैरहजेरीचा फायदा आरोपींना होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली होती. त्यामुळे पोलिस महासंचालकांना हे आदेश जारी करावे लागले.न्यायालयात जेव्हा एखादे प्रकरण सुनावणीला येते त्यावेळी प्रकरणाचा तपास करणारे पोलिस...
  May 30, 03:28 AM
 • औरंगाबाद - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विर्शामगृहातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या समस्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर निघत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे क्षेत्रीय कामे करणारे तांत्रिक पद असून, कामाच्या स्वरूपानुसार वेतनक्षेणी मिळावी, अशी मागणी केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात खालच्या स्तरावरील कामे करताना सर्वांची सोय करणारा वर्गच आज हक्कांपासून वंचित असल्याची ओरड केली जात आहे. विर्शामगृहांवर येणारे अतिथी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व...
  May 30, 03:24 AM
 • औरंगाबाद - कटकटगेट, नेहरूनगर, बाबर कॉलनी, न्यू एसटी कॉलनी, रोशनगेट, किराडपुरा, शरीफ कॉलनी या भागांमधील सुमारे पन्नास हजार रहिवाशांना महिनाभरापासून अक्षरश: काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागते आहे. या लोकांना थेट गटाराचे घाणमिर्शित पाणी मिळत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्याचा परिणाम म्हणजे गॅस्ट्रोचे सुमारे 50 रुग्ण शहराच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 500 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती असूनही कोणतेही...
  May 30, 03:22 AM
 • औरंगाबाद - विद्यार्थ्यांसाठी नवनवीन प्रयोग करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन कॅटलॉगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ही सुविधा मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळ बचतीसह त्यांना अतिशय जुने व दुर्मिळ ग्रंथ संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.विद्यापीठाचा प्रशस्त आणि निसर्गरम्य परिसर संपूर्ण मराठवाड्यात परिचित आहे. त्यासोबतच येथील प्रशस्त ग्रंथालयानेही नावलौकिक मिळविले आहे. ऑनलाइन कॅटलॉगची सुविधा...
  May 30, 02:56 AM
 • औरंगाबाद - अचानक व्होल्टेज वाढल्याने सातारा परिसरातील दीडशे घरांतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांत शॉर्टसर्किट होऊन टीव्ही, फ्रीज, पंखे व अन्य उपकरणे जळाली. हे नुकसान दीड ते दोन लाख रुपयांहून अधिक आहे. यात छत्रपतीनगर, ओमनगरी, ऊर्जानगरी आदी भागांचा समावेश आहे. याबाबत मात्र जीटीएल कंपनीने काहीच घडले नाही, अशा अविभार्वात हात वर केले आहेत.बीड बाय पास भागातील उर्जानगरी, ओमनगरी परिसरात रहाणार्या अनेक घरांमध्ये शुक्रवारी दूपारी चार वाजता वीज प्रवाह अचानक वाढला. या हाय होल्टेजने टीव्ही, फ्रिज...
  May 30, 02:28 AM
 • औरंगाबाद - लग्नसराईमध्ये महागडे दागिने वापरण्याऐवजी सोन्यासारखी झळाळी आणि आकर्षक लूक असलेल्या इमेटिशन ज्वेलरीच्या खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढत आहे.गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने घालून जाणे परवडत नाही. सोन्याचे दागिने घालून रस्त्याने पायी जाताना महिलांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते; पण इमिटेशन ज्वेलरीमुळे फारशी काळजी वाटत नाही. तसेच कमी किंमत असल्यामुळे गहाळ झाल्यास काही वाटत नाही. शिवाय सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही सुरेख नक्षीकाम इमिटेशनवर दिसून येते. या सगळय़ा...
  May 30, 02:22 AM
 • औरंगाबाद - ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांच्या परिचारिकांना त्यांच्या निवासस्थानासह दवाखान्यांचेही वीजबिले भरावी लागत आहे. त्यामुळे परिचारिकांना वीजबिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक, सेविकांचे वेतन तीन महिन्यांच्या विलंबाने होत आहे. या सर्वांचा परिणाम परिचारिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आरोग्य कर्मचार्यांच्या समस्यांकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत असल्याने परिचारिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तालुक्यात 50 प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर 289...
  May 30, 02:17 AM
 • औरंगाबाद- शहर पोलिसांना लवकरच नवी घरे मिळणार आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात असलेली निझामकालीन पोलिस वसाहतीतील 217 घरे पाडून 577 नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. येत्या दोन महिन्यांत 30 घरे पाडून तेथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सध्याची पोलिसांची वसाहत तब्बल 70 वर्षे जुनी आहे. त्यातील बहुसंख्य घरे मोडकळीस आली आहेत. त्याचबरोबर अनेक इतर अडचणीही आहेत. अनेक घरांमध्ये ड्रेनेज, पाणी तसेच वीज व्यवस्थेच्या अडचणी आहेत. पोलिस...
  May 30, 02:12 AM
 • औरंगाबाद - विमानतळाचे अत्याधुनिकीकरण झाल्यानंतर प्रवाशांकरिता अनेक सोयी उपलब्ध होणार होत्या. बर्याच काळापासून त्याचा निर्णय झाला नव्हता. आता लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी सात प्रकारच्या नवीन सुविधा देणार आहोत, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली अहे.विमानतळामधील स्वागतकक्षात खास प्रवाशांसाठी हर्बल आयुर्वेदिक कॉस्मेटिक प्रॉडक्ट शॉप सुरू करण्यात येणर आहे. तसेच प्रतीक्षागृहामध्ये 7.5 स्क्वेअर मीटरचे हे दुकान सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेल...
  May 30, 02:07 AM
 • औरंगाबाद - औरंगाबादचे नवीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांना 28 मे रोजी बाबा पेट्रोल पंपाजवळील त्यांच्या घरापासून पोलिस आयुक्तालयात पोहोचण्यासाठी तब्बल वीस मिनिटे लागली. आयुक्तालयात पोहोचल्यावर त्यांनी वाहतूक यंत्रणेतील अडचणी शोधण्यासाठी दहा दिवस लागतील, असे सांगितले. त्यांच्या शोध मोहिमेत काय निष्पन्न होणार हे तर येणारा काळच सांगेल, पण लाल दिव्याच्या गाडीत फिरणार्या पोलिस आयुक्तांना जर एवढी अडचण येत असेल तर सामान्य नागरिकांचे किती हाल होत असतील, याचा अंदाज येतो. म्हणूनच दिव्य मराठीने...
  May 30, 02:02 AM
 • औरंगाबाद - दीड हजार लोकांचे दोनशे कोटी रुपये लुटणार्या टोळीचा मुख्य सूत्रधार सागर जाधव पोलिसांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. तथापि, पोलिस जाधवच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरले आहेत. उलट या प्रकरणात अडकलेल्या विशाल साळवेच्या कुटुंबाचा पोलिसांनी छळ चालविला आहे.दीड वर्षापूर्वी रेनॉल्ड्स कंपनीच्या टोळीने 25 टक्के व्याजाचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला होता. दिव्य मराठीने संबंधित घोटाळा उजेडात आणल्यानंतर संबंधित गुंतवणूकदार आता सतर्क झाले आहेत. पोलिसांनी चालविलेल्या छाळाबद्दल...
  May 30, 01:43 AM
 • ओळखलंत मला ? अहो, मी तुमच्या शहराची खाम नदी. कित्येक शतकांपासून या शहरातून वाहतेय मी. पण आज माझ्याकडे कुणी लक्षच देत नाही. नद्यांच्या काठावर जगभर संस्कृती विकसित झाल्या. इथे फक्त शहर वाढलं, पण माझा तर गळाच आवळला गेला.खाम नदीचा उगमऔरंगाबादच्या उत्तरेस असलेल्या डोंगरातून जटवाडा गाव आणि हसरूल नदी यांच्यानजिक खाम नदीचा उगम आहे. उत्तर-दक्षिण वाहणारी ही नदी साठ कि.मी.चा प्रवास करुन गोदावरीला मिळते.काठावरची गावेऔरंगाबाद शहराच्या दक्षिणेला असलेली बनेवाडी, वाळूज, रांजणगाव शेणपुंजी या...
  May 30, 01:40 AM
 • फुप्फुसाला छिद्र असल्याने तिला कोणीही दत्तक घेत नव्हते. आजारी मुलीला दत्तक घेऊन आपल्या घरी बला कोण नेणार, या भावनेतून जो तो तिला नाकारत होता. मात्र एक दिवस या चिमुकलीचे भाग्य फळफळले आणि दीड वर्षाच्या या मुलीला विदेशी मायबाप मिळाले.तनिष्का असे तिचे नाव.स्वता अँडॉप्टेड असलेल्या इंग्लंडमधील एका दाम्पत्याने तनिष्काला येथील साकार अनाथालयातून तिला आठ दिवसांपूर्वीच दत्तक घेतले. आई अनिवासी भारतीय तर पिता ब्रिटीश. पाच वर्षापूर्वी त्यांनी अलिषा नामक भारतीय मुलीला दत्तक घेतले. तिलाही असाच...
  May 30, 01:32 AM
 • देवळाई - खरं म्हटलं तर ती घटना कधी आठवूच नये, असं वाटत राहतं. तरीही ती पुन्हा-पुन्हा डोळ्यासमोर येते. हृदयावर घाव घालत राहते. 20 जून 2006 हा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बजाज कंपनीत कामाला गेलो होतो. दुपारी चार वाजेची वेळ होती. मला माझ्या एका सहकार्याने सांगितले की, तुम्हाला लवकर घरी जायला पाहिजे. मी का?असं विचारलं तर त्यानं मला नेमकं काय झालं ते सांगितलं नाही. पण काहीतरी दुर्घटना घडल्याचं माझ्या लक्षात आलं. बसमधून मी शिवाजीनगरच्या रेल्वे फाटकापाशी पोहोचलो तर...
  May 30, 01:22 AM
 • महाराष्ट्रात किमान डझनभर 'मोठी' मानली जाणारी दैनिके आहेत; शिवाय लहान-मोठी शेकडो वर्तमानपत्रे आणि नियतकालिके. मग आणखी एक दैनिक कशाला? असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकेल. रोज २४ तास,१ पेक्षा जास्त चॅनल्स बहुसंख्य लोकांच्या टेलिव्हिजनवरून अक्षरश: धबधब्यासारखे कोसळत असतात. देशातील १२१ कोटी लोकांकडे, एकत्र मिळून सुमारे ६ कोटी मोबाइल फोन्स आहेत आणि लोक त्यावर दिवसाकाठी चार-दोन तास बोलत असतात, एसएमएस करीत असतात. इतकेच काय, त्याच हॅण्डसेटच्या माध्यमातून बातम्या मिळवीत असतात, ई-मेल करीत असतात;...
  May 29, 04:21 PM
 • औरंगाबाद - औरंगाबादचे उद्योगचक्र आता पूर्ण वेगात फिरू लागले असून येत्या वर्षात मराठवाड्यात तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक येऊ घातली आहे. या गुंतवणुकीमुळे किमान 5 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. बजाज ऑटोच्या वाळूज प्रकल्पात सप्टेंबर 2012 पासून चारचाकी वाहनांच्या निर्मितीचे काम सुरू होणार आहे. त्याशिवाय शेंद्रा, वाळूज आणि पैठण येथील औद्योगिक वसाहतींत नवे उद्योग येत आहेत. सद्य:स्थितीत औद्योगिक वसाहतींत जागाच शिल्लक नसल्याने एमआयडीसीपुढे संकट उभे राहिले आहे. औरंगाबादच्या पाचही औद्योगिक...
  May 29, 01:28 PM
 • चित्रपटांची उडाली विकेटआयपीएल स्पर्धेमुळे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, चित्रपटगृहांचा व्यवसाय घसरलातुषार बोडखे। औरंगाबादगेल्या दीड महिन्यापासूसन सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा काल संपली. पण आयपीएल फिव्हरमुळे चित्रपटसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. क्रिकेटचा धसका घेतलेल्या निर्मात्यांनी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित केलेच नाहीत.घरबसल्या क्रिकेटचा आनंद मिळत असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे तिकीट खिडकीवर शुकशुकाट पसरला होता. चित्रपट की क्रिकेट या...
  May 29, 12:44 PM
 • चंद्रकांत शिंदे मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केला आहे. तो लवकरच राज्य आणि केंद्र सरकारकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी टर्मिनस असे बदलण्याचा हा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 10 जून रोजी मागासवर्गीय हक्क परिषद आयोजित केली आहे. त्यात नामांतरावा हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप-रिपाईं या महाराष्ट्रात येऊ घातलेल्या नव्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर...
  May 29, 12:41 PM
 • औरंगाबाद - शहरातील दीड हजार लोकांना पैशाचे आमिष दाखवून रेनॉल्डस कंपनीच्या टोळीने दोनशे कोटींना लुटले. या संदर्भात दिव्य मराठीने प्रकरणाच्या तळाशी जात चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. तक्रार नोंदवून नऊ महिने उलटून गेले तरी टोळीचा सूत्रधार सागर जाधव फरार आहे. पोलिस मूग गिळून गप्प आहेत. उलट तक्रारकत्र्यांना धमकावणे, टाळणे सुरू आहे. रेनॉल्ड््समध्ये दोन पोलिस अधिका:यांच्या कुटुंबांनी यात ३५ लाख रुपये गुंतवल्याची माहिती पुढे आली आहे. दीड वर्षापूर्वी रेनॉल्ड्स कंपनीचे...
  May 29, 12:29 PM
 • दैनिक भास्कर समुहातील पहिले मराठी वृत्तपत्र दैनिक दिव्य मराठी मोठ्या दिमाखात रविवारी औरंगाबादेत दाखल झाला. वाचकांनी या अंकाचे उत्साहाने स्वागत केले. या अंकातील काही पाने देश-विदेशातील ऑनलाईन वाचकांसाठी देत आहोत. लवकरच अंकाचा ई-पेपरही इंटरनेटविश्वात दाखल होतोय.
  May 29, 11:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED