Home >> Maharashtra

Maharashtra

 • कृष्णा तिडके । जालना जिल्ह्यातील ८७२ ग्रामपंचायत सदस्यांनी अजूनही शौचालये बांधलेली नाहीत. त्यामुळे या सदस्यांवर आता लवकरच अपात्रतेची कु:हाड कोसळणार आहे. जालना जिल्ह्यात एकूण ७ ग्रामपंचायती आहेत. यातील १३५ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम अभियानात गाव स्वच्छ आणि पाणंदमुक्त करून पुरस्कार पटकावले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचे मेळावे, कार्यशाळा आणि मार्गदर्शनपर शिबिर घेतले. या उपक्रमात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावातील लोकांना शौचालय...
  May 29, 09:57 AM
 • भरत जाधव औरंगाबाद- शहरातील दीड हजार लोकांना पैशाचे आमिष दाखवून रेनॉल्डस कंपनीच्या टोळीने दोनशे कोटींनी लुटले. या संदर्भात दिव्य मराठीने प्रकरणाच्या तळाशी जात चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. तक्रार नोंदवून नऊ महिने उलटून गेले तरी टोळीचा सूत्रधार सागर जाधव फरार आहे. पोलिस मूग गिळून गप्प आहेत. उलट तक्रारकर्त्याना धमकावणे, टाळणे सुरू आहे. रेनॉल्ड्समध्ये दोन पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबांनी यात ३५ लाख रुपये गुंतवल्याची माहिती पुढे आली आहे.दीड वर्षापूर्वी रेनॉल्ड्स...
  May 29, 09:20 AM
 • औरंगाबाद - साडेतीन वर्षांची चिमुकली कोंबड्यांच्या मागे धावली आणि काही कळायच्या आत घराजवळील खोल गटारातील गाळात रुतून बसली. ना तिला कुणाला हाक देता आली ना कुणी देवदूत धावून आला. पायाखालील गाळ अधिकच गर्तेत ढकलत होता.....नाकातोंडात घाणपाणी आणि सभोवताल वेढलेल्या गाळात या चिमुकलीचा गुदमरून करून अंत झाला. सादिया फैय्याज पठाण असे या दुर्दैवी बालिकेचे नाव. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता ब्रिजवाडी या वस्तीत घडली. तिच कुटुंबीय धाय मोकलून रडू लागले. संपूर्ण वस्ती या बालिकेच्या अकाली जाण्याने...
  May 29, 02:37 AM
 • नांदेड - आपल्या नववधूला मांडवपरतणीहून घेऊन येण्यासाठी निघालेल्या नवरदेवाचे रस्त्यात गुंगीचे औषध देऊन अपहरण केले. या तरुणाने समयसूचकता बाळगून स्वत: ची सुटका करून घेतली. ही घटना महाराष्ट्र- आंध्र प्रदेश सीमेवरील बिद्राळी येथे घडली. प्रवीण गंगाराम मुधोळकर (25) रा. येताळा, ता. धर्माबाद यांचे लग्र १४ मे रोजी झाले होते. त्याची पत्नी मांडवपरतणीला म्हणून माहेरी मुधोळ (आंध्र प्रदेश) येथे गेली होती. तिला परत आणण्यासाठी प्रवीण मुधोळकर दि. २६ मे रोजी येताळा येथून निघाला. सीमेवरील बिद्राळी येथे...
  May 29, 02:31 AM
 • उस्मानाबाद - स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे, अशी तक्रार काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद इकबाल हुसेन यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शहरातील रेशन दुकानांना निकृष्ट धान्य पुरवठा केला जात आहे. गव्हामध्ये काचेचे तुकडे, खडे आढळून येत आहेत. खुल्या बाजारात धान्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी...
  May 29, 02:29 AM
 • परभणी - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी रात्री कोषागार कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करून अडीच लाखांचा एेवज लंपास केला. वसमतरोडवरील दत्तधाम मंदिराजवळ असलेल्या कोषागार कॉलनीत राहणारे बालासाहेब जोशी कुटुंबीयासह झोपले असताना चोरट्यांनी पाठीमागील दाराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दागिने व रोख रक्कम घेतल्यानंतर अंगावरील दागिने काढत असताना जोशी यांच्या पत्नीला जाग आली. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी हातात असलेला एेवज घेऊन पळ काढला. मागील दोन...
  May 29, 02:18 AM
 • बीड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यासाठी याच पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी गोंधळ घातला ! पदाधिका-यांकडून प्रशासनावर कसलाच दबाव येत नसल्याचे पाहून आमदार धस यांनी शनिवारी (ता.२८) समुपदेशनाने बदल्या सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी शासन निर्णयावर बोट ठेवत असल्याचे पाहून आ. धस यांनी प्रक्रियेतील लॅपटॉप आणि दप्तर पळविले. या प्रकरणामुळे शिक्षकांनी जल्लोष केला, तर हिरमुसलेल्या प्रशासनास...
  May 29, 02:12 AM
 • नांदेड - कॉपीमुक्त परीक्षेचा पॅटर्न राबविण्यास नांदेड येथे सुरुवात करण्यात आली. याची सुरुवात जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी केली. हा पॅटर्न यशस्वी झाला असून, याचा उचित परिणाम बारावी परीक्षेच्या निकालात दिसून आला. यामुळे नांदेडच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली आहे. 'कॉपी करा अन् पास व्हाट ही पद्धत नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली होती. यात शिक्षण संस्थाचालक, अधिकारी व पुढारी यांचे हितसंबंध गुंतले होते. ग्रामीण भागात तर शैक्षणिक गुणवत्तेशी काहीच देणेघेणे नव्हते....
  May 29, 02:09 AM
 • मुंबई - ठाण्यातील चिरागनगर परिसरात राहणा-या शीतल या चौदा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी वसंत विहार सोसायटीत घडली. शीतल ही विक्रम जसरा यांच्या घरी कामासाठी आली असता ही घटना घडली. शीतलची आई वसंत विहार सोसायटीत मोलकरणीचे काम करते. शनिवारी काही कारणामुळे आईला कामावर जाणे शक्य नसल्याने शीतल घरकामासाठी जसरा यांच्या घरी गेली होती. जसरा यांची पत्नी गावी गेल्यामुळे जसरा हे एकटेच घरी होते. काही वेळानंतर इमारतीच्या पाय:यावर शीतल पडलेली लोकांना आढळली. नंतर...
  May 29, 02:03 AM
 • मुंबई - बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे कमलेश महादेव भिवगडे या विद्यार्थ्याची शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील टिळक वॉर्डातील कमलेश भिवगडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या वर्गात शिकत होता. कमलेशला ४२ टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला. परंतु, त्याच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नसल्याने तो निराश झाला होता. शनिवारी सकाळपासून तो वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीतून बाहेर आला नाही. मात्र, त्याच्या आईने त्याकडे लक्ष दिले नाही. दुपारी वडिलांनी कमलेश खोलीत काय करत आहे, ते...
  May 29, 02:00 AM
 • नागपूर - स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील गाणी ही ऑस्कर पुरस्काराच्या योग्यतेची नव्हती. तसेच ऑस्कर आजकाल विकत घेतले जाते, असे मी एेकले आहे, अशी टीका प्रख्यात संगीतकार इस्माईल दरबार यांनी ए. आर. रेहमान यांचे नाव न घेता केली. दरम्यान, दरबार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासाठी त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे
  May 29, 01:57 AM
 • मुंबई - तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख यांनी नियमांना बगल देउन आदर्शच्या इमारतीला परवानगी दिली, असे नगरविकास खात्याने म्हटले आहे. द्विसदस्यीय आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खात्याने वरील आरोप केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या ३ मार्च २६ ला दिलेल्या आदेशानुसार बेस्टच्या २६६८.६८ चौरस मीटर भूखंडाचे निवासी भूखंडात रुपांतर करण्यात आले. हा भूखंड मिळाल्याने आदर्श सोसायटीचा एफएसआय वाढला. तसेच प्रकाश पेठे मार्गाची रुंदीही...
  May 29, 01:52 AM
 • नागपूर - संकुचित आणि क्षेत्रीय राजकारण करण्यापेक्षा एखादा वैश्विक विचार असलेला पक्ष आपल्याला आवडतो, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई स्मिता ठाकरे यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्या काँग्रेसमध्ये जाणार, अशी चर्चा जोरात होती. शुक्रवारी त्यांनी नागपुरात नितीन गडकरींची भेट घेऊन राष्ट्रीय पक्षाला पसंती दिली असल्याने त्या भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा अटकळही राजकीय वर्तुळात बांधल्या जात आहेत.
  May 29, 01:46 AM
 • पुणे - पोलिसी खाक्या दाखवला की अट्टल गुन्हेगारही पोपटासारखे बोलू लागतात, हे सर्वश्रुत आहे. एका प्रकरणात असेच अमानुष मारहाणीचे प्रकरण पुण्याच्या विश्रामबागवाडा पोलिस स्टेशनमध्ये घडल्याचे एका क्लिपिंगवरून जगजाहीर झाले होते. हे प्रकरण आता पोलिसांवर चांगलेच शेकले असून, एका पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्यात विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना बोलते करण्यासाठी पोलिसी खाक्या...
  May 29, 01:43 AM
 • पुणे - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही उमटू लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी गडकरी समर्थकाची वर्णी लागल्याने नाराज झालेल्या मुंडेंनी शनिवारी (ता. 28) पुण्यात आयोजित शिवशक्ती- भीमशक्तीच्या मेळाव्याकडे मुंडेंनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे. मुंडे- ठाकरे वादाला पुण्यात आता नव्याने सुरुवात झाली ती पुणे...
  May 29, 01:41 AM
 • मुंबई - लता मंगेशकर आणि आशा भोसले या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज भगिनींमधील कथित 'शीतयुद्धा'बद्दल अनेक वाद-प्रवाद जन्माला आले. त्यांच्यातली सुप्त स्पर्धा चर्चेचा विषयही ठरली. मात्र, या सर्व वाद-प्रवादांना तात्पुरता पूर्णविराम देणारी एक घटना चित्रपटसृष्टीत घडू पाहत आहे. आशा भोसले यांच्या अभिनयाचा पहिला प्रयत्न असलेल्या 'माई' चित्रपटाचे शीर्षक गीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर स्वत: गाणार आहेत. सुभाष डावर आणि नितीन शंकर निर्मित आणि महेश कोडियाल दिग्दर्शित 'माई' या हिंदी चित्रपटात आशा...
  May 29, 01:37 AM
 • मुंबई - सांताक्रुझ पूर्व गोळीबार रोड येथील गणेशकृपा झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत संमती न दिलेल्या रहिवाशंच्या झोपड्या पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेले आठ दिवस उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने शनिवारी (ता. 28) मान्य केल्या. त्यानंतर पाटकर यांनी उपोषण मागे घेतले. गणेशकृपा झोपडपट्टी प्रकल्पाची चौकशी करावी आणि शहरात सुरू असेलल्या अन्य १५ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचीही...
  May 28, 07:37 PM
 • महाड - शहरापासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या शिरगाव गावाच्या हद्दीतील शेतामध्ये अनोळखी महिलेची हत्या करण्यात आली असल्याची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले असून पोलीस तपास करीत आहेत. शिरगावच्या हद्दींत असलेल्या एका शिवारामध्ये महिलेला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या डोक्यांत दगड मारून तिला ठार मारण्यात आले.
  May 28, 06:59 PM
 • दैनिक भास्कर समुहाच्या मराठीतील दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राचे लोकार्पण शनिवारी औरंगाबादमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. औरंगाबादमधील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून दैनिक दिव्य मराठीचे स्वागत केले.
  May 28, 06:41 PM
 • सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटन पायाभूत सुविधा प्राधान्याने निर्माण केल्या जातील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. येत्या दीड वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते चौपदरीकरणासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आरोंदा येथे हाऊसबोटमधून सफर केली. त्यानंतर शिरोडा-वेळागर येथील वादग्रस्त सव्र्हे नं. ३९, मोचेमाड, नवाबाग वेंगुर्ले या ठिकाणी भेटी...
  May 28, 05:37 PM
 
जाहिरात

RECOMMENDED