जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Ahmednagar

Ahmednagar News

 • अभिनेत्री असले तरी २०१४ मध्ये माझ्यासमोर आम आदमी पार्टीने चक्क लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला मी नकार देत होते, पण नंतर मी ठामपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मी खूप नवीन होते, पण राजकारण काय असते, ते मी नगरकरांकडूनच शिकले. आता मी शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीची प्रदेशाध्यक्ष आहे. मी २०१४ मध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच आम आदमी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मला लोकांनीच या निवडणुकीत उतरवले होते. त्या वेळी डोक्यावर परिधान केलेली आम आदमी...
  February 22, 11:40 AM
 • शिर्डी- राज्यातील ५ ते ६ लोकसभा मतदार संघाबाबात कोणतेही अंतिम निर्णय झालेले नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांबाबत कोणतीही अंतिम यादी तयार झालेली नाही. केंद्रीय समितीच याबाबत अंतिम निर्णय करणार असल्याने तर्कवितर्कातून पुढे येत असलेल्या नावांना कोणताही आधार नाही. जाहीर झालेल्या नावातही बदल होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या काही...
  February 20, 08:31 AM
 • पुणतांबे/नगर- गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन दडपण्यासाठी कृषिकन्यांची रक्तातील साखर कमी झाल्याने प्रकृती खालावत असल्याचे कारण देऊन दोन मुलींना शुक्रवारी मध्यरात्री नगर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, पोलिस आणि महसूल विभागाने आंदोलन मोडित काढण्यासाठी बळाचा वापर करून कृषिकन्यांना उचलून नेऊन आंदोलन दडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या निषेधार्थ गाव दुपारपर्यंत बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला....
  February 10, 09:32 AM
 • सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे २०११ मध्ये उपोषणाच्या राजकारणाचे सुपरस्टार ठरले होते. त्यांचे आंदोलन पाहून गांधीजी आणि जेपींच्या आंदोलनांची आठवण आली. पण आठ वर्षांत सर्व बदलले आहे. अण्णा तेच आहेत, पण सोबतचे लोक आता गायब आहेत. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव आता पूर्वीसारखा नाही. २०१४ मध्ये काँग्रेसविरोधी पक्ष एकवटले होते. या वेळी अनेक पक्षांनी अंतर राखले.-अनिरुद्ध देवचक्के २०१९ : जुने सहकारी केजरीवाल यांचा चकार शब्दही नाही उपोषण : ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी स्थान : राळेगणसिद्धी...
  February 10, 07:54 AM
 • पुणतांबा (जि. नगर) - चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या पुणतांब्यातील शेतकरी कन्यांपैकी शुभांगी जाधवची प्रकृती गुरुवारी खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, तिला नगरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी राहत्याच्या तहसीलदारांनी मनधरणी केली. मात्र, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याचा निर्धार व्यक्त तिने व्यक्त केला. किसान क्रांतीच्या देता की जाता? या आंदोलनाला शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव यांनी पाठिंबा देऊन...
  February 8, 08:41 AM
 • नगर - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरज ऊर्फ अप्पा बबन माने (जयभवानी चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आई-वडिलांसह काष्टी येथे रहात होती. सकाळी ८ च्या सुमारास ती कॉलेजला पायी जात असे. जय भवानी चौकात सुरज दररोज तिचा पाठलाग करायचा, तिला उद्देशून बाेलायचा. २८ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी साडेसात वाजता मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली होती. त्यावेळी...
  February 7, 11:59 AM
 • नगर - आम्ही विकासाच्या मुद्यावर वर बसलेल्यांना पाठिंबा दिला आहे, पण सामान्यांचे प्रश्न सुटणार नसतील, तर तुमच्या खुर्च्या मोडून तुमच्याच गळ्यात घालू. अधिकाऱ्यांना वाटत असेल, आम्ही वरच्यांना पाठिंबा दिला ते पाहतील, पण तुम्ही उरी पिक्चर पाहिला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस खाली व वर सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला दिला. दरम्यान, कचऱ्यासह विविध प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर...
  February 7, 11:56 AM
 • नगर - गेल्या महिनाभरापासून शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या हजारो दुचाकी चालकांकडून लाखो रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. मात्र, ही हेल्मेट सक्ती चुकीची असल्याचे माहिती अधिकारातून पुढे अाले आहे. महापालिका हद्दीत हेल्मेट सक्ती करता येत नसल्याचे उत्तर पुणे येथील वाहतूक नियंत्रण शाखेने माहिती अधिकारात दिले आहे. दरम्यान, हेल्मेट सक्ती ही दुचाकीचालकांच्या भल्यासाठीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली....
  February 6, 11:00 AM
 • नगर - विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. शेंडी बायपास चौकात ही कारवाई करण्यात आली. साडेसोळा लाखांची विदेशी दारू घेऊन हा टेम्पो औरंगाबादच्या दिशेने निघाला होता. पोलिसांनी वेळीच हा टेम्पो दारूसह ताब्यात घेतला. टेम्पोचालक भगवान बन्सी बडे (४०, राहणार भिलवडे, तालुका पाथर्डी) याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, एक पांढऱ्या टेम्पोतून (एमएच २०, बीएस ११५८)...
  February 6, 10:59 AM
 • नगर - ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून मंगळवारी महापालिकेत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यात खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांना खडे बोल सुनावले. जाधव यांनी काळे फासण्याचा इशारा पठारे यांना दिला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध फरकांपोटी उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. सचिन जाधव यांनी उपायुक्तांच्या दालनात जाऊन थकीत बिलांबाबत चर्चा केली. दरम्यान, बाहेर बसलेले पेन्शनर घोषणाबाजी करत आत आले....
  February 6, 10:57 AM
 • पारनेर - निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही, असा गेले ६ दिवस निर्धार करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मंगळवारी आश्वासनांवरच उपोषण सोडले. लोकायुक्त, लोकपाल नेमणूक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी झालेली समाधानकारक चर्चा व लेखी अाश्वासनाचे कारण देत अण्णांनी सातव्या दिवशी हे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री व सिंह यांनी अण्णांशी सुमारे ५ तास बंदद्वार चर्चा केली. या सर्व मागण्यांवर...
  February 6, 07:52 AM
 • नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महिलांनी बांगड्यांचा आहेर दिला. अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील ग्रामस्थांनी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अॅड. श्याम अासावा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. जिल्हाधिकारी खाली...
  February 5, 11:05 AM
 • शनिशिंगणापूर - सत्तर वर्षे सोगांड्यांनी जनतेला दारू, मटणाचे अामिष दाखवून सत्ता हस्तगत करत सर्वसामान्यांचे प्रपंच उद््ध्वस्त करण्याचे पाप केले. मागील साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, जलसिंचन, उज्ज्वला गॅस, सौभाग्य, घरकुल, शौचालय योजना, तसेच कर्जमाफी देऊन सर्वसामान्यांचे जीवन आम्ही उंचावले. हाच विकासाचा धागा धरून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेवासे मतदारसंघाचे पालकत्व मी स्वीकारत आहे. पुढील आमदार जय हरीच असेल, असे...
  February 5, 11:02 AM
 • नगर - शहरातील गाळेधारकांच्या प्रश्नांवर जुलैमध्ये विशेष सभा बोलावली होती, तथापि गाळेधारकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रेडीरेकनरनुसार सर्वेक्षण करून प्रतिचौरस मीटर दर निश्चित करण्यात आले आहे. प्रचलित जुन्या दराच्या तुलनेत रेडीरेकनरनुसार चौपट भाडेवाढीचा बोजा गाळेधारकांवर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. यावर तोडगा काढण्याचे आव्हान महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसमोर तसेच प्रशासनासमोर आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कलम ७९ ड मधील तरतुदीनुसार मोबदला घेऊन महापालिकेच्या...
  February 5, 11:00 AM
 • पारनेर - लाेकपालच्या मागणीसाठी तेव्हा विराेधी बाकावर असलेल्या लाेकांनी अांदाेलने केली, मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी साेमवारी उपाेषणाच्या सहाव्या दिवशी माेदी-फडणवीस सरकारवर टीका केली. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरून बोलत होते. मात्र, आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असा समाचारही त्यांनी घेतला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साेमवारी अण्णांची भेट...
  February 5, 07:46 AM
 • नगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लूटमार करणारी आणखी एक टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली. या टोळीने गुजरात राज्यातील एका महिलेला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लूटमार केली होती. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पिंट्या भास्कर काळे (३५, रा. कोरेगांव, ता. श्रीगोंदे), सुनील भास्कर काळे (५०, रा. कोरेगांव, ता. श्रीगोंदे), मंगेश संजय चव्हाण (२१, रा. गुंडेगाव, ता. नगर) व वाल्मीक संजय चव्हाण (१८, रा. गुंडेगाव, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुजरात राज्यातील महिला...
  February 4, 01:02 PM
 • नगर : लाखो भाविकांची मांदियाळी होणाऱ्या गंगासागर मेळाव्यात अनेकदा नातेवाइकांची चुकामुक होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून बेपत्ता झालेले राजाराम बोनगीर हे तब्बल २१ वर्षांनी या मेळाव्यात गवसले. विमनस्क अवस्थेतील अापल्या वृद्ध पित्याला पाहून दोन्ही मुले त्यांच्या गळ्यात पडून रडली. हॅम रेडिओ क्लबच्या पश्चिम बंगाल राज्यातील सागर जिल्ह्यातील व नगरच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही गाठभेट होऊ शकली. गंगासागर येथे पवित्र स्नानाकरिता लाखो भाविक येतात. मोठ्या गर्दीमुळे कायदा व...
  February 4, 12:54 PM
 • पारनेर - लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू अाहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, अाता केवळ अाश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत उपाेषण मागे घेणार नाही, असे अण्णांनी महाजन यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे ते अाल्यापावली परत गेले. साेमवारी पुन्हा महाजन व अण्णांची...
  February 4, 07:58 AM
 • अहमदनगर- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणचा आज चौथा दिवस आहे. अण्णांची प्रकृती खालावली असून त्याचे वजन साडे तीन किलोने घडले आहे. या दरम्यान, अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या जीवाला बरेवाईट झाल्यास जनता नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरेल, असे वक्तव्य अण्णांनी केले आहे. अण्णा म्हणाले, 1 जानेवारीला अण्णांनी मोदींना पाठवलेले पत्र पंतप्रधानांना मिळाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना तसेच दुसर्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. परंतु,...
  February 2, 02:14 PM
 • नगर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून, तर नऊ महिन्यांपर्यंतचे ऑनलाइन पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन केले. हलगीच्या निनादात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. पूर्वसूचना देऊन आंदोलन करण्यात आले असताना जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक संतापले. दुपारी तीनपर्यंत आंदोलन चालू होते. अखेर ग्रामपंचायत विभागाचे दळवी यांनी ऑनलाइन थकीत पगार ७...
  February 2, 11:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात