Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • पिंजर/ हातगाव- बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर जवळील महागाव मारखेड आणि मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरजवळील महागाव मारखेड येथे दोन चुलत भावांचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची घटना रविवारी २४ जूनला घडली पिंजर पासून तीन कि.मी.वर महागाव मारखेड या गावाला लागूनच गतवर्षी पाणी जिरवण्याच्या दृष्टिने तलाव खोदला, रविवारी येथील रणजित रमेश राठोड २८ व त्याचा चुलत भाऊ चेतन विलास राठोड ११ हे काठावर उभे होते त्या दरम्यान चेतन...
  12:01 PM
 • अकोला- प्लास्टिक बंदीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महापालिकेतर्फे शहरातील चारही झाेनमध्ये केवळ पाच ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात अाली. २४ जून राेजी पाच व्यावसायिकांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड आकारण्यात अाला. त्यामुळे मोहिमेचा असा फज्जा उडू नये, यासाठी वरिष्ठांनी पुढाकार घेणे किती गरजेचे अाहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. पूर्व झाेनमध्ये मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठानमध्ये धाव घेताच तेथील व्यावसायिकाने स्वत:हून प्लास्टिक पिशव्या, ग्लास अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले;...
  11:54 AM
 • बुलडाणा- पीक कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे व त्याची साथ देणारा शिपाई मनोज चव्हाण यांना अकोला सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर यांनी निलंबित केले. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेत शेतकरी त्याच्या पत्नीसह पीक कर्जाच्या मागणीसाठी गेला असता येथील शाखाधिकारी राजेश हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीस शरीरसुखाची मागणी केली होती. यासंदर्भात पीडित...
  09:11 AM
 • मलकापूर - पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकरी महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक व्यवस्थापकास चोप देण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेले होते. परंतु, आज २३ जून शनिवारी बँकेला सुटी असल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकाची तोडफोड करून बँकेच्या इमारतीला काळे फासून त्या निंदनीय घटनेचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांनी बँकेच्या इमारतीवर चढाई करून प्रचंड घोषणाबाजी करत बँक मॅनेजर राजेश हिवसे याला अटक करण्याची मागणी केली....
  June 24, 11:52 AM
 • अकोला - जून महिन्याच्या पहिल्या आणि पाचव्या दिवशी झालेल्या मान्सूनपूर्व तसेच ८ जूननंतरच्या वादळी मान्सूनमुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना फटका बसला. अकोला, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यात ६८८ घरांची पडझड झाली तर अकोला तालुक्यातील सोमठाण्यात एक गोठा भुईसपाट झाला. या पडझडीमुळे १३ गावांच्या ६२५ कुटुंबांतील अडीच हजार नागरिक बाधित झाले असून २९४ हेक्टरमधील फळ पिकांचेही नुकसान झाले आहेत. बाधित झालेल्या नागरिकांपैकी पाच जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान...
  June 24, 11:50 AM
 • अकाेला -गतवर्षी जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत अातापर्यंत अाठ महिन्यात १ लाख १६ हजार ५४९ शेतकऱ्यांचे ४८९ काेटी १९ लाख ७३ हजार रुपयांचे कर्जमाफ करण्यात अाले अाहे. अद्यापही गतवर्षीच्याच २१ हजार ४५१ शेतकरी प्रतीक्षेत असून, अर्ज निकाली काढण्याची संथ गती लक्षात घेता राज्य शासनाने सन २००१ ते २००९पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी हाेईल आणि प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळेल, असा सवाल शेतकऱ्यांमधून...
  June 24, 11:49 AM
 • अकोला - सराफा सावकारांना ज्या कार्य क्षेत्रासाठी परवाना दिला आहे. त्या कार्यक्षेत्रातीलच शेतकऱ्यांना कर्ज देणे आवश्यक होते. मात्र सराफा सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना सोने चांदीच्या दागिन्यावर कर्ज दिले. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या निकष व अटीत बसत नसल्याने कर्जमाफी पासून वंचित राहत आहे. म्हणून परवान्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सराफा सावकारांविरुद्ध उपनिबंधक सहकारी संस्थेने कारवाईचा बडगा उगारला असून, अशा ५८ सावकारांविरुद्ध कार्य क्षेत्राबाहेर...
  June 24, 11:45 AM
 • अकोला - अकोल्याहून बार्शीटाकळीसाठी होणाऱ्या विद्युत वाहिनीवर शनिवारी विजा पडल्या. परिणामी बार्शीटाकळीसह तालुक्याला होणारा वीजपुरवठा खंडीत झाल्याने बार्शीटाकळी तालुक्यावर अंधारात राहण्याचे संकट ओढवले. महावितरणचे कर्मचारी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम करीत आहेत. एमआयडीसीत १३२ केव्हीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून बार्शीटाकळी तालुक्यासाठी विद्युतपुरवठा करण्यात येतो. अकोल्यातून बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी, पिंजर व धाबा या उपकेंद्रात ३३ केव्हीच्या विद्युत...
  June 24, 11:45 AM
 • बुलढाणा- जिल्ह्यातील मलकापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी एका महिलेशी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. ही घटना कानावर पडताच,जिल्हाधिकारी डॉ. डांगे यांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क करून तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले.या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले...
  June 23, 09:47 PM
 • यवतमाळ- वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्यासमोर कर्जाचा डोंगर आणि दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने स्वतःला शेतात पेट्रोलने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली. शंकर बापूराव देऊळकर (वय-40) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून चार एकर शेतजमीवर शंकर कुटुंबाचा गाडा चालवीत होता. महागाईच्या काळात कुटूंबाच्या गरजा वाढल्याने मागील वर्षी पासून त्याने मकत्याने शेती करण्यास सुरुवात केली. मात्र मागील वर्षी बोंड अळीचा प्रकोप...
  June 23, 06:36 PM
 • वाशिम- लग्न करण्यास नकार दिल्याने एका 18 वर्षीय तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 19 जूनला सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना पीडित तरुणीचा मृत्यू झाला. अनसिंग पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी येथील आरोपी रवी भगवान भालेराव (21) याने गावातील १८ वर्षीय मुलीला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत, आरोपीने मुलीच्या घरात प्रवेश केला. परंतु, मला माझ्या आई-वडिलांच्या संमतीने लग्न करावयाचे आहे, असे...
  June 23, 05:36 PM
 • वाशिम- पोटच्या मुलाने शेतजमिनीसाठी वयोवृद्ध आईला ट्रॅक्टरसमोर फेकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मालेगाव (जि.वाशिम) तालुक्यातील मुंगळा येथे 21 जूनला ही धक्कादायक घटना घडली. दोन कुटुंबात जमिनीवरून झालेल्या वादातून पोटच्या मुलाने हे कृत्य केले आहे. मिळालेली माहिती अशी की, मुंगळा येथील राऊत आणि दळवी कुटुंबात शेत जमिनीवरून वाद सुरु होता. न्यायदंडाधिकारीने निर्णय राऊत कुटुंबाच्या बाजुने दिला. राऊत कुटुंबिय शेतात काम करत असताना...
  June 23, 05:06 PM
 • अकोला- १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा कारभार पाहणाऱ्या महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे तर रिक्त आहेतच. परंतु महापालिका आस्थापनेवरील ८०० पदे रिक्त असल्याने कोणत्या विभागाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर सोपवावी? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. या सर्व प्रकारामुळे महापालिकेचे कामकाज कोलमडले आहे. महापालिका अस्तित्वात येऊन १९ वर्ष होत आली आहेत. महापालिकेचा आकृतिबंध मंजुर असला तरी बिंदु नामावली अद्याप मंजुर नाही. त्यामुळे पदोन्नती आणि सरळ सेवा भरती गेल्या अनेक वर्षापासून...
  June 23, 11:28 AM
 • अकोला- राजेश्वराच्या नगरीत दोन दिवसांचा मुक्काम करुन श्री गजानन महाराजांची पालखी शनिवारी पहाटे पुढच्या मुक्कामासाठी येथून रवाना होईल. गुरुवार, शुक्रवार दोन दिवस पालखीचा अकोल्यात मुक्काम होता. शहर तसेच परिसरातील भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दोन्ही दिवस संतश्रेष्ठांच्या वास्तवाने शहर दुमदुमले. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता बाजोरिया विद्यालयातून पालखी निघाली. मुख्य डाकघर, धिंग्रा चौक, टॉवर, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाईन, नेहरू पार्क चौक, इन्कमटॅक्स चौक, आदर्श कॉलनी येथे पोहोचली....
  June 23, 11:25 AM
 • महेश्वर(खरगोन) - भय्यू महाराज यांची अस्थिकलश यात्रा विदर्भात काढण्यात येणार आहे. याशिवाय ऋषी संकुल आश्रम खामगाव येथे नवरात्री, दत्त जयंती, गुरू पौर्णिमा आदी कार्यक्रमांत येणाऱ्या अनुयायांची संख्या पाहता सूर्योदय आश्रमात समाधी बांधण्याची इच्छा या आश्रमाचे प्रमुख एन.टी. देशमुख यांनी महाराजांची कन्या कुहू व पत्नी आयुषी यांच्याजवळ व्यक्त केली आहे. भय्यू महाराज ७ जून रोजी खामगाव आश्रमात आले होते. संपूर्ण विदर्भातून अस्थिकलश यात्रा काढली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान भय्यू...
  June 23, 08:24 AM
 • जून महिन्याच्या सुरुवातीपासून दरवर्षी शेतीच्या नव्या हंगामाला सुरुवात होते. या वर्षीही ती झाली आहे. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. तेथे पेरण्यांची लगबग सुरू आहे, तर काही भागात उशिरा पावसाचे आगमन झाले तेथे आता पेरण्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी मात्र पीक कर्ज पदरात पाडून घेण्याच्या कामात व्यग्र राहिला. त्याची या कामातील व्यग्रता अजूनही संपलेली नाही. पीक कर्जाच्या संदर्भात शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, असे स्पष्ट आदेश दिलेले...
  June 23, 07:46 AM
 • अकोला- नणंदेचा फोन आला असता भावजयीने विचारले कुणाचा नंबर आहे, त्यावरून तू माझ्या बहिणीला असे विचारलेच कसे, यावरून संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. अशा किरकोळ कारणावरून तिला घराबाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे. विजेन्द्र रज्जु यादव रा. यवतमाळ यांचा विवाह अकोला येथील महिलेसोबत १२ मे २०१३ रोजी झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. मात्र पती विजेंद्र व त्याचे नातेवाईक विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने विवाहितेने पोलिसांत धाव घेतली व तक्रार दिली. काटेपूर्णा...
  June 22, 11:05 AM
 • अकोला- कोशियारी समितीच्या शिफारसी नाकारून देशभरातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणाऱ्या सरकारच्या विरोधात इपीएस पेन्शनधारक पुन्हा आक्रमक झाले असून आगामी ५ जुलै रोजी राज्यभर जिल्हा कचेरीवर मोर्चे काढले जाणार आहेत. सरकारविरोधी मोर्चाचा निर्णय पुण्याच्या श्रमिक भवनात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. कॉ. उदय भट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला विविध संघटनांचे पुढारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी श्रममंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी झालेल्या चर्चेची मांडणी केली...
  June 22, 11:01 AM
 • अकोला- महापालिकेतील नगरसेवकांना मंजूर झालेल्या निधीतून तब्बल १५ महिन्यानंतर विकास कामांना प्रारंभ करता आला. महापालिकेला एप्रिल २०१७ मध्ये नगरोत्थान आणि दलितेतर वस्ती विकास निधी असे दोन्ही मिळून पावणे नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. मार्च महिन्यात भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. तर एप्रिल महिन्यात महापालिकेला नगरोत्थान आणि दलितेतर वस्ती विकास निधी मंजूर झाला. या निधीतून सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे घेण्यात...
  June 22, 10:57 AM
 • अकोला- अट्टल चेनस्नॅचर राम उर्फ सुनील मधुकर गावंडे याला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी)ने गुरुवारी ताब्यात घेतले. सिटी कोतवालीच्या हद्दीतील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा आरोपीने कबूल केल्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखा शहरासह जिल्ह्यात घडलेल्या मंगळसूत्र चोरी व सोनसाखळी गुन्ह्यांचा तपासाच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करणार आहेत. आरोपी राम गावंडे याने महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याने ज्या सराफांना चोरीचे सोने विकले त्याचेही नाव उघड केले. त्यानंतर...
  June 22, 10:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED