Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला-साडेचार वर्षापूर्वी बाखराबाद येथे दोन एकर शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोषी वडील व दोन मुलांच्या शिक्षेवर पुन्हा मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद करण्यात आला. तर आरोपी पक्षाच्या वकिलांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे. आरोपी...
  12:38 PM
 • पातूर-अनैतिक संबंधातून प्रौढ प्रियकराने युवतीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली तर प्रौढ प्रियकराचा मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना पातूर पासून दहा किलोमीटर अंतरावरील विवरा येथे घडली. विवरा येथील करिष्मा ऊर्फ भुरी शेख हसन (वय २० वर्ष) हिला बोथा काझी येथील नियामत खा (वय-५० वर्ष) हे त्यांच्या मुलासाठी मागणी घालायला काही महिन्यांपूर्वी आले होते. परंतु करीष्माच्या आई वडिलांनी नकार दिला. यामुळे नियामत खा संतप्त होवून तेथून...
  November 20, 01:09 PM
 • अकाेला -शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण- गटबाजी साेमवारी शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य वितरण वितरणासारख्या संवेदनशील कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाट्यावर अाली. कार्यक्रमापासून डावलण्यात अाल्याचा अाराेप करीत आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांनी कार्यक्रम सुरु असतानाच युवा सेना पदाधिकाऱ्यांशी स्वत:च्या निवासस्थानी चर्चा केली. त्यांच्यासह शिवसेना, युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमानंतर संपर्क प्रमुख खा. अरविंद...
  November 20, 01:04 PM
 • बुलडाणा- डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी झपाट्याने पसरली की ती विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. ट्रक क्षणात जळून खाक झाला. ही घटना खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
  November 19, 09:24 PM
 • धामणगाव रेल्वे (अमरावती)- अवैध वाळूचा ट्रक परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदाराच्या वाहनावर घातल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. धामणगावचे तहसीलदार अभिजित नाईक यांच्याकडे नुकताच चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. शासकीय कामानिमित्त ते सोमवारी त्यांच्या शासकीय वाहनाने चांदूर रेल्वे येथे जात होते. सातेफळजवळ एक ट्रक...
  November 19, 09:12 PM
 • अकोला - दुष्काळसदृश स्थितीची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून पाचही तालुक्यातील ५२ हजार ८०० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. ही सवलत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या गाव-खेड्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. हे सर्व विद्यार्थी जुलै २०१८ चे चालू शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून दरमहा...
  November 19, 11:37 AM
 • अकोला - चौघांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी तिघा बापलेकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश(तिसरे) न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी विचारले, की या आरोपामध्ये फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेविषयी तुम्हाला काही बोलायचे आहे का? त्यावर आरोपी वडिलांनी हात जोडले तर दोन्ही भावांनी स्व हस्ताक्षरातील एक चिठ्ठी न्यायाधीशांना दिली. दोन्ही पक्षांचा शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याची पुढील तारीख २० नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. याच दिवशी आरोपींना शिक्षा...
  November 18, 12:12 PM
 • अकाेला - अाज दीर्घकाळ राज्य करणे शक्य नसून, जनता सातत्याने पर्याय शाेधते. चंचलतेचे मूळ याच प्रक्रियेत अाहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अामदार जयंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. त्यानंतर तेथे उपस्थित नेत्यांमध्ये राजकीय वक्तव्याची जुगलबंदीच रंगली. निमित्त हाेते मराठा भूषण माजी अामदार (कै.) डाॅ. कुसुमताई काेरपे स्मृती शिल्प अनावरण साेहळ्याचे. लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विविध राजकीय पक्षांत मंथन सुरु असतानाच एका व्यासपीठावर भाजप, राष्ट्रवादी व कांॅग्रेसचे...
  November 18, 12:10 PM
 • बुलढाणा- सख्खा चुलत भाऊ पक्का वैरी निघाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात घडली आहे. भानापूर परिसरातील एका शेतकर्याच्या शेतातील विहिरीत त्याच्या चुलत भावाने विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विहिरीतील पाणी वापरण्याआधी हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परिसरात दुष्काळ असताना विहिरीतील पाणी विषारी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारोती राजगुरू यांची भानापूर शिवारात शेती आहे. राजगुरु हे आपल्या...
  November 17, 03:32 PM
 • अकाेला- बाखराबाद येथील एका परिवारातील चाैघांच्या सामूहिक हत्याकांडात शिक्षेवर शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी हाेणार अाहे. याप्रकरणी न्यायालयाने १४ नाेव्हेंबर राेजी अाराेपी तिघा बापलेकांना दाेषी ठरवले हाेते. उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ राेजी २ एकर शेत जमिनीच्या वादातून चार नातेवाइकांचे हत्याकांड घडले हाेते. विश्वनाथ माळी, वनमाला माळी, याेगेश माळी व राजेश माळी हे मृत्युमुखी पडले हाेते. याप्रकरणी त्यांचेच नातेवाईक असलेले आरोपी...
  November 17, 12:17 PM
 • अकोला-प्लास्टिकच्या वापरावर बंदी असतानाही घडी पुस्तिकेला प्लास्टिकचे वेष्टन लावणाऱ्या कृषी आणि आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुखांना सभेमध्येच दंड ठोठावण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील बैठकीत ही घटना घडली. प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून सरकारी कार्यालयात झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही यंत्रणांच्या प्रभारी प्रमुखांना भान राखण्याचा सल्ला या वेळी दिला....
  November 17, 12:12 PM
 • बुलडाणा- एका शेतकरी महिलेने स्वत:च सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्राभांगोजी या गावात14 नोव्हेंबरला रात्री ही घटना घडली आहे. आशाबाई दिलीप इंगळे असे मृत महिलेचे नाव आहे. आशाबाई यांनी गायीच्या गोठ्यात लाकडे रचून त्यावर पांघरुण टाकून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे आशाबाई यांनी जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. शेजारच्यांनी वाचविण्याचा केला प्रयत्न.. पण, आशाबाई इंगळे 14 नोव्हेंबरच्या रात्री गोठ्यात...
  November 16, 02:48 PM
 • पावसाळा संपण्याआधीच राज्यात दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागली. पावसाला खंडाने सुरुवात झाल्यामुळे पीक हंगामाचे काय होणार याची चिंता आधीपासूनच व्यक्त केली जात होती. अवेळी आलेल्या पावसाने पुन्हा पिकांना मोठा फटका दिला. आणि दुष्काळी वातावरणात राज्यात दुष्काळ जाहीर करावा आणि त्याचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी मागणी सुरू झाली. गेल्या काही वर्षांत कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाचा अपवाद होता. गेल्यावर्षी चांगला पाऊसकाळ झाला. पण पीक पेरणीचे नियोजन...
  November 16, 06:30 AM
 • अकोला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज या वर्षी फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. कितीही दबाब आणला तरी एकही अर्ज अाॅफलाइन स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिले. अकाेल्यातील विकासकामांचा अाढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साेमवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. परंतु गतवर्षी हे पोर्टल काही तांत्रिक कारणामुळे...
  November 15, 08:20 AM
 • अकाेला- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग अायाेगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महिनाअखेरपर्यंत वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्दा मार्गी लावला जाईल, अशी मािहती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. अकोला जिल्ह्यातील विविधकामांचा अाढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर यावर भाष्य केले. अारक्षणासह इतर मागण्यांसाठी काही दिवसांपासून अांदाेलने सुरू अाहेत. यात...
  November 15, 07:39 AM
 • अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान घेतलेल्या बैठकीत विविध विकास कामांसह प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची अद्यापही पूर्तता झालेली नसताना आज पुन्हा आढावा बैठीकीसाठी येत आहेत. अकोल्यात प्रश्न खुप आहेत. समस्या सुटण्याची गती कमी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी...
  November 14, 11:08 AM
 • पातूर- हैदराबादकडे नेण्यात येत असलेले ५८ उंट साेमवारी संध्याकाळी पातूर जवळ पकडण्यात अाले. हे उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगली हाेती. याप्रकरणी गाैरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीत त्यांना उंटासोबत असलेल्या व्यक्तींनी उंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितल्याचे नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी दाेघांची चाैकशी केली. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी वक्ताराम तानाजी वय ४० रा. रेवाडे, राजस्थान, भंवरलाल बिजर वय ५० रा....
  November 13, 12:40 PM
 • अकोट-नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अट्टल चोराला अटक करण्यात आली. शनिवारी १० नोव्हेंबरला सकाळी एक चोरटा अकोट शहरातील नया प्रेस भागातील विजेंद्र रामराव काकडे यांच्या घरात शिरला. आवाजामुळे घरात झोपलेल्या दोन तरुणी जाग्या झाल्या. त्यांनी आरडाओरड केली असता चोर पळायला लागला, परंतु त्यांनी पाठलाग केल्याने चोर नाली मध्ये पडला, त्या दोघी त्याच्यावर तुटून पडल्या, त्यांनी त्याची कॉलर व हात पकडली. त्यांच्या आवाजाने विजेंद्र काकडे धावून आले, त्यांनी पोलिस स्टेशनला फोन केला. अवघ्या पाच...
  November 12, 12:12 PM
 • यवतमाळ- टी-1 अवनी वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर राजकीय रान पेटले आहे. वाघिणीच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेल्या तिच्या 10 महिन्यांच्या दोन बछड्यांच्या पंजाचे ठसे चिखली-आरमुरडी या गावाच्या परिसरात गुरुवारी आढळून आले. वन विभागाच्या वतीने या बछड्यांना शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून बछड्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात या बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती विविध ठिकाणावरुन प्राप्त होत आहे. त्यातच चिखली आरमुरडी परिसरात या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. त्याची...
  November 9, 02:11 PM
 • मूर्तिजापूर- बडनेरा येथून बार्शीटाकळी येथे अवैधरीत्या गोवंश गाडीत डांबून नेण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु असताना बडनेरा कडून अकोल्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केेली असता गाडीत ६ बैल दिसले. ही कारवाई मंगळवारी ६ नोव्हेंबरला केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस सूत्रांनुसार शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे...
  November 7, 10:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED