Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • मोताळा - मोताळाते बुलडाणा मार्गावरील खडकी फाट्यापासून जवळच एका नाल्यात पळसाच्या झुडपात एक पाच ते सहा दिवसांची चिमुरडी मुलगी 5 डिसेंबर रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली. बुलडाणा मार्गावर खडकी फाटा असून फाट्यापासून काही अंतरावर आत खडकी हे गाव आहे. खडकी फाट्यावरून गावाकडे पायी जाणाऱ्या काही नागरिकांना काल डिसेंबरच्या सायंकाळी नाल्यामधून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. काही नागरिकांनी पाहणी केली असता नाल्यातील पळसाच्या झाडात प्लास्टीकच्या पिशवीत आणि कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत पाच...
  December 7, 10:57 AM
 • अकाेला- शेतकऱ्यांच्या अार्थिक उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले आंदोलन बुधवारी मागण्या मान्य झाल्यानंतर थांबवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्याची घाेषणा सिन्हा यांनी शेतकऱ्यांसमाेर केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व शेतमालाची खरेदी हाेणार असून व्यापाऱ्यांना माल विकलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाची रक्कम मिळण्याचा मार्गही माेकळा झाला अाहे. याशिवाय, कपाशीच्या नुकसानीपाेटी भरपाई...
  December 7, 09:09 AM
 • डोणगाव - येथून जवळच असलेल्या विश्वी येथील युवतीचे वाशीम जिल्ह्यातील राजुरा अढाव येथील युवकाशी लग्न ठरले होते. काही दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडा सुध्दा झाला होता. तसेच युवतीच्या वडिलांनी लग्न खर्च म्हणून युवकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले. परंतु आता वर पक्षाने अचानक लग्नाला नकार दिला. त्यामुळे युवतीने डोणगाव पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी उपवर युवकासह इतरांवर गुन्हा दाखल केले आहेत. विश्वी येथील युवतीचे राजुरा अढाव येथील जगदीश प्रकाश अढाव या युवकाशी लग्न ठरले होते....
  December 6, 01:10 PM
 • खामगाव - स्वत:च्या १४ वर्षे वयाच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बळजबरीने वर्षापासून सतत शारीरिक व लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास खामगाव न्यायालयाने आज डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहानपणीच आईचे छत्र हरवले, या घटनेच्या वर्षाआधीच आजी मरण पावली. त्यानंतर भावांनी तिचे पालन पोषण केले. या अल्पवयीन मुलीस स्वत:चा बाप मुकिंदा पुंडलिक इंगळे याने चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार करायला सुरुवात केली. दरम्यान अचानक मुलीच्या मोठ्या भावाने ही घटना बघितली. यावेळी त्या...
  December 6, 01:06 PM
 • मलकापूर - निष्काळजीपणे बस वळवत असताना ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मागील चाकाखाली चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 5 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नरवेल बसस्थानकावर घडली. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी बसच्या काच फोडल्या. मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील संजना गजानन लोणे वय ११ ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आज सकाळी धरणगाव येथील शाळेत जाण्यासाठी नरवेल बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. काही वेळानंतर एम.एच. २०/ डी/ ९३७८ या क्रमांकाची एसटी बस आली. यावेळी...
  December 6, 01:04 PM
 • अकाेला- शेतकऱ्यांच्या अार्थिक उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सुरू केलेले अांदाेलन मंगळवारीही सुरूच हाेते. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भारिप-बमंसचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब अांबेडकर यांनीही सिन्हा यांच्याशी मोबाइलवर चर्चा करून अांदाेलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतमालाची नाफेडने हमीभावाने खरेदी करावी, या मागणीवरून...
  December 6, 07:46 AM
 • जळगाव जामोद - शेतात टॉवर उभारून देतो तुमच्या मुलास टॉवरच्या फाउंडेशन उभारण्याची ठेकेदारी देतो, असे म्हणून फसवणाऱ्या जळगाव खान्देश जिल्ह्यातील फैजपूर येथील एका ठगास गजाआड करण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई आज डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील झाडेगाव येथील रहिवासी नंदकिशोर दिनकरराव देशमुख यांना २३ ते ३० ऑक्टाेबर या दरम्यान जळगाव खान्देश जिल्ह्यातील फैजपुर येथील चंद्रकांत तुकाराम पाटील याने शेतात टॉवर उभारून देतो टॉवरच्या...
  December 5, 12:31 PM
 • अकोला - कमी भावात सोने विकतो, असे म्हणून खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे. खरेदीदार पैसे घेऊन आल्यानंतर दोघांनी पैसे घ्यायचे आणि तेवढ्यात त्यांच्या टोळीतील दोघे पोलिस बनून यायचे आणि खरेदीदाराला पिटाळून लावायचे. अशा लुटारूंच्या चार जणांच्या टोळीला सोमवारी पहाटे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा लावून पकडले. पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. चार दिवसांपासून पोलिसांचे पथक...
  December 5, 12:29 PM
 • अकाेला- संपूर्ण शेतामालाची हमी भावाने खरेदी करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना शेतकऱ्यांसह पोलिसांनी साेमवारी संध्याकाळी अकोल्यात ताब्यात घेतले. शेतकरी जागर मंचातर्फे िजल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढणाऱ्यांना पोलिस मुख्यालयात स्थानबद्ध करण्यात अाले. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास मंचच्या िनवडक प्रतिनिधींशी िजल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कक्षात चर्चा केली. मंचतर्फे एकूण सात...
  December 5, 02:14 AM
 • धामणगाव बढे -अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या रोहिणखेड येथील बीएएमएस डॉक्टर दांपत्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून डॉक्टर क्षीरसागर यास अटक करण्यात आली होती. दरम्यान आज डिसेंबर रोजी या डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. असाच अवैध गर्भपात करण्याचा प्रकार नुकताच काही दिवसांपूर्वी लोणार शहरातही घडला होता. त्या प्रकरणात डॉक्टरसह कुमारिकेच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक सुद्धा झाली आहे. आणि आता हा प्रकार घडला आहे....
  December 4, 12:27 PM
 • अकाेला- दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी लष्करी जवानांनी पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच अाता देशातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी साेमवारपासून अकाेल्यात सर्जिकल स्ट्राइक करण्यात येईल, अशी घाेषणा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी कापूस- साेयाबीन- धान परिषदेत (कासाेधा) केली. साेमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून उपोषणही करण्यात येणार अाहे. सत्तेवर अाल्यानंतर भाजपने अर्थात अाम्हीच अाधी दिलेले वचन पाळले नसल्याची...
  December 4, 05:22 AM
 • खामगाव -उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर पालिकेतर्फे कारवाईचा बडगा उगारल्या गेल्यानंतरही त्याला जुमानता आज अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत आहे. तर काही महाभाग पालिकेचा निधी घेऊनही उघड्यावर शौचास जात असल्याने विदारक अवस्था असून गुड मॉर्निंग पथक देखील गायब झाले आहे. यामुळे शहर हगणदारीमुक्ती अडचणी निर्माण होत आहे. अशा स्थितीत सुज्ञ नागरिकांकडून असे केल्या जात असल्याने शहराच्या दृष्टीने एक अभिशापच म्हणावा लागेल. येथील नगरपालिकेतर्फे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर चाप बसावा, शहराला...
  December 3, 11:52 AM
 • बुलडाणा -मागील काही दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्याने शहरासह परिसरात बोचऱ्या थंडीने सुरूवात केली आहे. या थंडीचा सर्वात फटका लहान मुले वयोवृद्धांना बसत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लहान थोर मंडळीनी मफलर, स्वेटर, रुमाल आदींचा सहारा घेतला आहे. तर काही जण शेकोट्या पेटून थंडी पासून बचाव करीत आहेत. तरीही अचानक वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे. बुलडाणा शहर हे संपूर्ण राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या...
  December 3, 11:48 AM
 • अमरावती- अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे (एचव्हीपीएम) मल्लखांबपटू २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभात चित्तथरारक कवायती सादर करणार अाहेत. या दृष्टीने २०१८ पासून एचव्हीपीएम येथेच सरावाला सुरुवात होईल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय खेळाचे आॅलिम्पिकच्या उद्््घाटन समारंभात प्रदर्शन होईल. या संदर्भात भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष डाॅ. रमेश इंडोलिया, एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी सांगितले,...
  December 3, 03:15 AM
 • चिखली- भरधाव जाणाऱ्या कंटनेरने समाेर असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एक महिला तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चिखली -जालना महामार्गावरील मुरादपूर फाट्याजवळ घडली. विशेष म्हणजे, या अपघातात दुचाकीस्वारासह दोन मुले बालंबाल बचावली. अंत्री खेडेकर येथील रहिवासी अमोल बाबुराव मोरे हे आपल्या एच.एच. २८/ अे.डब्ल्यू/ ५६१४ या क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी पूनम, सहा महिन्याचा मुलगा सम्राट भावाच्या...
  December 2, 07:46 AM
 • आर्णी (यवतमाळ)- पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी देशातील जनतेला मोठी मोठी स्वप्न दाखवून 2014 साली एक हाती सत्ता काबीज केली होती. माञ साडे तीन वर्षाचा कार्यकाळ उलटला तरी देखील जनतेच्या खात्यात पंधरा लाख रूपये जमा झाले नाही,त्यामुळे याची आठवण करून देण्यासाठी आर्णी येथील 25 वर्षीय एका युवकाने चक्क दाभडी ते वडनगर(गुजरात) असा सायकलने प्रवास आज(ता.1 डिसेंबर) दुपारी साडे चार वाजेदरम्यान सुरू केला. अवधुत देविदास गायकवाड (वय- 25, रा.अशोक लेआऊट आर्णी) असे दाभडी ते वडनगर सायकलने प्रवास...
  December 2, 07:28 AM
 • अकोला- चिमुकल्यांनी साकारलेली विविध संत-महात्म्यांची वेशभूषा आणि मंत्रमुग्ध करणारे काव्य आणि पोवाड्यांच्या निनादात पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनास अकोल्यात प्रारंभ झाला. यानिमित्ताने वाशीम रोड येथील प्रभात किड्स परिसरातील साने गुरुजी साहित्यनगरीत शुक्रवारी अनेक दिग्गजांची मांदियाळी भरली. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शंकर कऱ्हाडे असून प्रा. ललिता काळपांडे या स्वागताध्यक्ष आहेत. अभिनेत्री मेघना एरंडे यांची उद््घाटनास विशेष उपस्थिती होती. बाल साहित्य हे मराठी साहित्याची...
  December 2, 02:00 AM
 • बुलडाणा/अकोला-नांदुरा तालुक्यातील ​मेंढळी या गावात एका 27 वर्षीय युवकाला जाळून ठार मारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याचे प्रथमदर्शनी पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. नांदुरा तालुक्यातील बोराखे​डी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या मेंढळी या गावात अमोल मधुकर झाबरे याला त्याच्या मामांच्या गावाशेजारील शेतात जाळण्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. अमोल झाबरे या युवकाचे गावातील एका युवतीसोबत 2 वर्षांपासून...
  December 1, 09:17 AM
 • सिंदखेडराजा- वीस लाख रुपयांत दोन किलो सोने देतो म्हणत एका व्यक्तीस आठ लाख रुपयांनी लुटल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन फाट्यानजीक घडली. याप्रकरणी पोलिसांनी तासाभरात घटनेतील चार आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतले. मराठवाड्यातील कोळेगाव ता. जाफ्राबाद जि. जालना येथील निवृत्ती उर्फ बंडू प्रल्हाद शेळके वय ३६ यांची सासरवाडी चांगेफळ ही आहे. चांगेफळ येथीलच शिवशंकर सखाराम शिंदे वय ४३ याने निवृत्ती शेळके यांना २० लाख रुपयांत दोन किलो सोने देण्याचे...
  November 30, 06:17 AM
 • रायपूर -येथील शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आज २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शाळेत कुठल्याही सभागृहाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागले. उन्हाचा फटका बसल्याने पाचवी ते नववी मधील १३ मुली मुले अशा १५ विद्यार्थ्यांना भोवळ येणे डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यापैकी अस्वस्थ सहा विद्यार्थ्यांना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तर नऊ मुलींवर डॉ. काटकर यांच्या दवाखान्यात उपचार सुरू...
  November 28, 12:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED