जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • मुर्तिजापूर- अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमारेषेपासून ५० फूट अंतरावर कुरुम पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या करूम रेल्वे स्टेशन जवळील दाढी मोरी जवळ एक मोटार सायकल घसरल्याने मोटरसायकलवरील पतीसोबत आधार कार्ड बनवण्याकरता जात असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान घडली. अमरावती जिल्ह्यातील फुलआमला येथील अनंता तुकाराम मुंढे वय २५ हे पत्नी सौ. दुर्गा आणि पाच महिन्याचा मुलगा यांच्यासह मोटरसायकल क्रमांक एम एच २७-बी.एच.७११२ ने कुरुम येथे...
  February 1, 11:12 AM
 • अकोला- अकोल्याच्या विकासाशी उद्योग वृद्धीला नेहमी जोडले जाते. अशावेळी शासकीय धोरणही पोषक नसल्याने उद्योगांची वाढ खुंटली आहे. उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी नवीन उद्योजकांना गेली पाच महिने वीजजोडणी मिळत नसल्याचे सत्य समोर आले आहे. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करुन देखील काहीही उपयोग झालेला नाही. अकोला आैद्योगिक वसाहतीचा विस्तार ५ फेज पर्यंत झालेला आहे. परंतु जड उद्योग एकही नसल्याने रोजगार निर्माण होण्यात अडचणी येताहेत. त्यातच विद्युत प्राधिकरणाच्या नवीन...
  February 1, 11:05 AM
 • चिखली- तालुक्यातील कोलारा येथे गावातील उपवर युवक युवतींचे एकाच दिवशी व एकाच ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावण्याची जुनी परंपरा आहे. एक गाव एक लग्नतिथी साठी राज्यात आदर्श ठरलेल्या कोलारा गावाने यावर्षी देखील आपली परंपरा कायम राखण्याचा निर्धार केला असून या आदर्श विवाह सोहळ्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. गावातील सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनाबाबतची पहिली बैठक २७ जानेवारी रोजी पार पडली. गावातील सर्व लग्न एकाच मंडपाखाली लावून विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्चाला फाटा...
  January 31, 11:41 AM
 • अकोला- महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी परीक्षा घेतल्या नंतर परीक्षेत नापास झाल्याने महिनाभरात २९ कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. यात ८ मानसेवी, १८ कंत्राटी तसेच ३ सेवा निवृत्ती नंतर महापालिकेत मानसेवी म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. तसेच पदोन्नतीही झालेली नाही. त्यामुळे कुली, चपराशी या पदावर नियुक्त असलेल्या मात्र शिक्षित कर्मचाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या कामाचा गाडा चालावा, यासाठी १८ ते २०...
  January 31, 11:38 AM
 • अकोला- करबुडव्या शिकवणी वर्गांना धडा शिकवण्यासाठी आता वस्तू व सेवाकर विभागाने म्हणजेच जीएसटीने कारवाया सुरु केल्या केल्या आहेत. या कारवायांमुळे काही शिकवणी वर्ग संचालकांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश शिकवणी संचालकांनी जीएसटी न भरण्यासाठी पळवाटा काढून विद्यार्थी संख्या लपाछपीचा खेळ सुरु केल्याची माहिती आहे, आता जीएसटीचे अधिकारी शिकवणी वर्ग सुरु असताना विद्यार्थी संख्या मोजून प्रत्यक्ष तपासणी करतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी शहरातील काही बड्या शिकवणी वर्गावर आयकर...
  January 31, 11:32 AM
 • देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी मराठवाड्यात नेण्याचा घाट रचण्यात आला आहे. या योजनेचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यास दिल्यास देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यावर जल संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे ही योजना रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज २९ जानेवारी रोजी शहरासह देऊळगाव महीत सर्व पक्षीयांच्या वतीने बंद पाळण्यात आला. खडकपूर्णा धरणातून मराठवाड्यातील ९२ गावाची पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत झाल्यास सिंदखेडराजा मतदार संघातील जनतेसमोर मोठे...
  January 30, 12:44 PM
 • खामगाव : स्वातंत्र्य पूर्व काळात देशात स्वातंत्र्याची चळवळ राबवत असताना येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयास महात्मा गांधी यांनी २८ डिसेंबर १९३३ रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी चरख्याचे उद्घाटन केले होते. टिळक राष्ट्रीय विद्यालय हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र असल्याने अनेक स्वातंत्र्य वीरांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयात भेट देऊन वास्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांनी येथे चरख्याचे उद्घाटन करून संस्थेविषयी स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय दिल्याचे...
  January 30, 12:41 PM
 • अकोला : महावितरणच्या अकोला शहर उपविभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायण शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराकडून सौर ऊर्जा कंपनीने दिलेल्या कामाची परवानगी मिळवून देण्यासाठी त्याने पंचासमक्ष लाच स्वीकारली. या कारवाईवरून महावितरणचे अधिकारी किती खालच्या पातळीवर उतरलेत, हे समोर आले आहे. सुरेखा नामक व्यावसायिकाने सौर ऊर्जेचे...
  January 30, 12:31 PM
 • अकोला : महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या झाली. देशाच्या विविध भागांतील नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. अकोल्यापासून १८ किमी अंतरावरील वाघाेली गावात पूर्णा नदीच्या पात्रामध्येही १२ फेब्रुवारी १९४८ रोजी अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. या वेळी केळीवेळीचे अॅड. रामसिंह राजपूत यांच्यासह परिसरातील मंडळी उपस्थित होती. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी अकोला ते गांधीग्राम पायी यात्रा काढून बापूंना आदरांजली वाहण्यात येते. तिथे...
  January 30, 08:36 AM
 • अकोला- महापालिकेचा बेताल कारभार सुधारण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून, सोमवार आयुक्तांनी थेट विविध विभागामध्ये सकाळी धाव घेत झाडाझडती घेतली. या वेळी गैरहजर आढळलेल्या ५१ कर्मचाऱ्यांची एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सर्व अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयात भेटतातच असे...
  January 29, 11:57 AM
 • अकोला- शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल तसेच मतदानाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन व निसर्ग कट्टा मार्फत पक्षी निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये राखी मनेष, हप्पू , सुमग, गायबगळा व काळा शराटी या पाच पक्ष्यांना अकोला शहरातून उमेदवारी देण्यात आली होती. जिल्ह्यातील ७० शाळांमधील एकूण १७८८५ विद्यार्थ्यांनी मतदान करून पुढील ५ वर्षासाठी अकोला शहर पक्षी म्हणून गायबगळा या पक्षींची निवड करण्यात आली आहे. यासाठी शहरपक्षी...
  January 29, 11:49 AM
 • delete
  January 28, 11:59 AM
 • अकोला- जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ८१ कोटी ५५ लाख ५४ हजार ५६० रुपयांची मदत घोषित झाली असून मार्चअखेर पूर्वी ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. जिरायती शेती करणाऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेतच ही रक्कम दिली वितरित होणार असून कमीत कमी मदत एक हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही, याचीही काळजी घेण्यास यंत्रणेला...
  January 28, 11:59 AM
 • बोरगावमंजू- दुचाकींचा कट मारल्यावरून झालेल्या हाणामारीत अज्ञात आरोपींनी तिघांना राष्ट्रीय महामार्गावरील बनारसी ढाब्यासमोर चाकूने तिघांना भोसकून घटनास्थळावरून पसार झाले.ही घटना शनिवारी २६ जानेवारीला रात्री घडली. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीवरून फिर्यादी हे दुचाकीने जाताना अज्ञात आरोपींनी कट मारून गेले, असता फिर्यादी हे त्यास कट का मारला म्हणून विचारण्यास गेले असता बनारसी ढाब्यासमोर त्यांच्यात बाचाबाची झाली असता मागून आलेल्या आरोपीच्या मित्रांनी चाकू काढून...
  January 28, 11:34 AM
 • अमरावती- नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर एका २२ वर्षीय युवकाने आठ दिवसांपूर्वी अत्याचार केला. दरम्यान, युवकाला लग्नासाठी विचारणा केली तर त्याने साफ नकार दिला. युवकाच्या नकारामुळे युवतीने विष प्राशन केले. युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी युवकाविरुद्ध गुरूवारी (दि. २४) बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय नंदूपंत तायडे (२२) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. १८ जानेवारीला दुपारी युवतीच्या घरात कोणीही नसताना अक्षयने घरात...
  January 27, 11:45 AM
 • बुलडाणा- दूषित पाणी पुरवठयामुळे डायरियाची साथ लागल्याच्या अनेक घटना घडतात.अशा प्रसंगीच शासनस्तरावर पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येते. तरीही जिल्हास्तरावर ऑक्टोबर २०१८ ते १९ जानेवारी २०१९ पर्यंत वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणेने ४,३२७ पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली असता पाच उप विभाग व एक जिल्हा प्रयोगशाळेच्या तपासणी नमुन्यात तब्बल १,९१४ पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य निघाले आहेत. याची माहिती स्वच्छता व पाणी पुरवठा यंत्रणेला देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीकडे लक्ष...
  January 26, 12:29 PM
 • अकोला- राजगुरू, भगतसिंग यांनी ज्याप्रमाणे लाहोर येथे जॉन साँडर्सचा वध केला त्याचप्रमाणे अकोल्यात राजगुरूंनी गव्हर्नर बटलरचा वध केला असता. बटलर ३० जुलै १९२९ रोजी दोन दिवसांच्या अकोला दौऱ्यावर आला होता. त्या वेळी त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. गावातील टिळक मार्गाने मिरवणूक जात असताना बाबूजी देशमुख वाचनालयाच्या गॅलरीत राजगुरू लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन उभे होते. मिरवणुकीत पोलिसांकडून सुरू असलेला अत्याचार पाहून ते संतापले होते. त्यामुळेच बटलरचा वध त्यांना करता आला असता, मात्र तसा आदेश...
  January 26, 10:08 AM
 • देऊळगावमही- चिखली जालना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका किराणा दुकानात चोरट्यांनी चोरी करून रोख रकमेसह किराणा माल लंपास केल्याची घटना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरात घडली. दुकानात चोरी करणारे चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे मागील दोन वर्षात चोरट्यांनी हेच दुकान चार वेळा फोडले आहे. चिखली ते जालना राष्ट्रीय महामार्गावर विजय शिंगणे यांच्या मालकीचे संदीप किराणा दुकान आहे. काल मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा...
  January 25, 11:48 AM
 • अकोट- प्रतिबंधित वन क्षेत्रात मंगळवारी आदिवासींसमवेत संवादासाठी गेलेल्या वन, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे सुरू असून, प्रतिबंधित वनक्षेत्रातून आदिवासींनी काढता पाय घेतल्याचे बुधवारी दिसले, अशी माहिती अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. सुनील लिमये यांनी दिली. सोमवारी १४ जानेवारीला वन विभागात अवैधपणे मुक्काम ठोकलेल्या आदिवासींशी चर्चेसाठी जंगलात गेलेले वन अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी सशस्त्र...
  January 24, 11:58 AM
 • मलकापूर- पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोर असलेल्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात तेवीस वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना आज २३ जानेवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव जवळ घडली. मलकापूर शहरातील आदर्श नगरातील रहिवासी पवन उर्फ शुभम अनंत कोलते वय २३ हा बेंझो केमिकल कंपनीत कार्यरत होता. काल रात्रपाळी आटोपून तो एम.एच. २८/ एएक्स/ ५१३९ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होता. धरणगाव येथील सोसायटी कार्यालयाजवळ येताच पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात...
  January 24, 11:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात