Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - सर्वोपचार रुग्णालयाने गांभीर्य दाखवत सोमवारी क्षयरोग वॉर्डातील सामान्य रुग्णांना दुसर्या खोलीत हलवले. रुग्णालयात क्षयरोग पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांवरही उपचार केले जात होते. या प्रकाराने सामान्य रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे वृत्त दिव्य मराठीने सोमवारी प्रकाशित केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने त्वरित कारवाई करत रुग्णांवर त्याच वॉर्डातील दुसर्या खोलीत उपचार करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरापासून...
  July 30, 11:50 AM
 • अकोला- चतुर्मासात आषाढी एकादशीपासून विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यात नागपंचमी, श्रावण सोमवार, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, महालक्ष्मी (गौरी) पूजन, श्राद्धपक्ष (सर्वपित्री अमावस्या), नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच दिवाळी पर्वाचा समावेश आहे. यादरम्यान लग्नसमारंभ होणार नाहीत; मात्र 13 नोव्हेंबरपासून लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. पंडित गदाधर शास्त्री यांनी सांगितले आषाढातील पाच दिवस, श्रावणाचे 30 दिवस, भाद्रपदचे 30 दिवस,...
  July 29, 10:25 AM
 • अकोला- शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात सिलिंडरची कृत्रिम टंचाई भासत आहे. पैसे देऊनही नागरिकांना दिवस दिवसभर सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर अवैधरीत्या सिलिंडरची विक्री होत असल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. यावर नियत्रंण ठेवणारा जिल्हा पुरवठा विभाग मात्र, याबाबत अनभिज्ञ आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन सिलिंडर बुकिंग सुरू झाल्यानंतर शहरात सिलिंडरसाठी नागरिकांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. आपले कामे बाजूला ठेवून...
  July 29, 10:20 AM
 • अकोला- प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना आता आरक्षित रेल्वेच्या डब्यात पाय ठेवता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने आता वेटिंगसंदर्भातील नियम बदलले आहेत. त्यानुसार नेहमी आरक्षण निश्चित करून प्रवास करणार्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. रेल्वेचा हा निर्णय अनेक प्रवाशांच्या मुळावर उठला असला तरी, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये कही खुशी कही गमचे वातावरण आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा आरक्षण निश्चित झाले नसले तरी वेटिंगवर उभे राहून जाऊ, असे म्हणून...
  July 29, 10:12 AM
 • अकोला- मान्सूनच्या आगमनामुळे फुलपाखरांच्या 70 प्रजातींचे निरीक्षण करण्याची संधी अकोलेकरांना उपलब्ध झाली आहे. क्रीमसन रोझ, कॉमन रोझ, डॅनाईड एगफ्लायसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींसह ग्रास येलो, कॉमन येलो, मॉटेल येलो, लाईम बटरफ्लाय, कॉमन क्रो यांचा यात समावेश असून, हिरवळीवर फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यावर बागडणारी फुलपाखरे सध्या सार्यांचे लक्ष वेधत आहेत. जगभरात अस्तित्वात 15 लाख सजीवांच्या प्रजातींपैकी आठ लाख प्रजाती केवळ किटकांच्या आहेत. फुलपाखरे आणि पतंगांच्या संख्या त्यात...
  July 29, 09:54 AM
 • अकोला- अकोला मध्यवर्ती बसस्थानक सध्या समस्यांचे आगार बनले आहे. बसस्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. समस्यांचे हे बसस्थानक कधी हायटेक होणार, या प्रतीक्षेत प्रवासी आहे. त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बसस्थानकावर मनोरंजनासाठी लावण्यात आलेला एलसीडी मागील काही दिवसांपासून बंद आहे. तसेच काही पंखे आणि पथदिवे देखील बंद आहेत. प्रवाशांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले तिकीट दर...
  July 29, 09:51 AM
 • अकोला- आठवडाभर बाहेरगावी जायचे आहे, पण डॉगीला कुठे ठेवायचे? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. पण, आता काळजी करायची गरज नाही. कारण अकोल्यात लवकरच डॉग होस्टेल सुरू होत आहे. शहरामध्ये बहुतांश नागरिकांकडे लेब्रेडॉल, जर्मनशेपर्ड, बॉक्सर, रॉट व्हीलर, पामोरेरियन, ग्रेड डेन, डॉबरमॅन अशा विविध जातीची कुत्रे पाळली जातात. कुत्रे पाळणे आणि त्याची काळजी घेण्यापेक्षा कठीण जर कुठले काम असेल, तर ते बाहेरगावी जाताना लाडक्या डॉगीला कुठे ठेवायचे याचे. श्वानप्रेमींना पडणार्या या प्रश्नाचे उत्तर पशू व...
  July 29, 09:46 AM
 • अकोला- मनपाला शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून सिग्नल व्यवस्था सुस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर अकोल्यातील सिग्नल व्यवस्था दुरुस्ती व देखभालीसाठी बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊ, असे सत्ताधार्यांनी स्पष्ट केले आहे. बीओटीमुळे होऊ शकतो शहराचा विकास असे वृत्त दिव्य मराठीने शनिवारी प्रकाशित केले होते. शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला 26 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यांतील 1 कोटी रुपयांचा खर्च शहरातील सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग आदींवर खर्च...
  July 29, 09:39 AM
 • अकोला-क्षयरोगाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच सामान्य रुग्णांवरही उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात होत आहे. त्यामुळे संसर्गजन्य असलेल्या या आजाराचा सामान्य रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे; मात्र या प्रकाराकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात असलेल्या सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या बाजूला क्षयरोग नियंत्रण वॉर्ड आहे. या ठिकाणी क्षयरोगाच्या सामान्य आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर...
  July 29, 09:32 AM
 • अकोला - अत्यंत रुबाबदार व एका डरकाळीनेही भल्याभल्यांची पाचावर धारण बसवणारा भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आज अस्तित्वासाठी झगडतो आहे. मागील शंभर वर्षांत जगभरातील 97 टक्के वाघ नाहीसे झाले असून, एक लाख वाघांपैकी केवळ 3,200 वाघ शिल्लक आहेत, तर देशात काही दशकांपूर्वी 40 हजारांवर असलेली त्याची संख्या आज केवळ 1,706 वर येऊन ठेपली आहे. भारतीय जंगलांचे वैभव म्हणून वाघांकडे पाहिले जाते. शक्तीचे वाहन असलेला वाघच मात्र आज अस्तित्वासाठी झगडत आहे. घनदाट जंगलांचा अभाव व अन्न न मिळणे, शिकार ही वाघांची संख्या कमी...
  July 28, 08:42 AM
 • अकोला - वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शहरातून होणार्या अवैध वाहतुकीला वेग आला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. प्रवासी केवळ सहा रुपये आणि थोडा वेळ वाचण्यासाठी अवैध वाहतुकीकडे वळत आहेत. शहरातून पातूर, बाळापूर, बार्शिटाकळी, अकोट, निंबाकडे काळी-पिवळी जीप धावतात. या जीपमधून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, ही वाहतूक अत्यंत धोकादायक असते. अनेक जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. त्यामुळे...
  July 27, 10:24 AM
 • अकोला - शहरातील एकूण तीन शासकीय वसतिगृहांपैकी दोन ठिकाणी कंत्राटी तर एका ठिकाणी खासगी चौकीदार नियुक्त आहे. त्यामुळे या वसतिगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या तीन वसतिगृहांमध्ये समाजकल्याण विभागाचे एक तर आदिवासी विभागाच्या दोन वसतिगृहांचा समावेश आहे. येथील शासकीय वसतिगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी चौकीदार नसल्याने मुलींची सुरक्षितता वार्यावर आली आहे. मागासवर्गीय मुला-मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याकरिता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल...
  July 27, 10:17 AM
 • अकोला - सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले असतील. रस्त्याने येणार्या-जाणार्यांची लगबग सुरू होती. दोन वर्षांची चिमुकली श्रेया घराच्या तिसर्या माळ्यावरील गच्चीवर खेळत होती. आई घरात कामे करण्यात व्यस्त. अचानक आवाज आला. धडाम ! पाठोपाठ र्शेयाची किंचाळी. आईच्या काळजाचा थरकाप उडाला. ती धावत बाहेर आली. गर्दी जमलेली. बघते, तर श्रेयाच. पण ती सुखरुप होती. आईच्या जिवात जीव आला. देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आहे. श्रेया त्याचं उदाहरण ठरली. विद्यानगरात दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना. या भागात प्रदीप ठाकरे...
  July 27, 10:15 AM
 • अकोला - शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली लागला, तरी वादग्रस्त जमिनीचा शिवणी विमानतळाच्या टेकऑफसाठी ब्रेक कायम आहे. या जमीन प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे मधुसूदन नंद यांनी त्या जमीन प्रकरणात योग्य मोबदला किंवा पर्यायी जागा मिळाल्यावरच मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली. दरम्यान या प्रकल्पासाठी लागणार्या 25.06...
  July 27, 10:14 AM
 • अकोला - खड्डे असलेले रस्ते, बंद पथदिवे, उजाड उद्याने, कचर्याच्या ढिगामुळे वाढलेली अस्वच्छता यामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांचा विषय काढला की, निधीचे कारण पुढे करण्यात येते. मात्र, बीओटी तत्त्वातूनही शहराचा कायापालट होऊ शकतो. शहर विकासाच्या दिशेने नेण्यासाठी बीओटीच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर अकोल्यातही बीओटी तत्त्वावर विकास प्रकल्प...
  July 27, 10:13 AM
 • अकोला - विनामीटरसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ऑटोरिक्षाचालकांवर शुक्रवारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 91 चालकांविरोधात कारवाई केली. ऑटोरिक्षाचालकांचा मनमानी कारभार आणि प्रवाशांच्या होत असलेल्या लुटीला दिव्य मराठीने वाचा फोडल्यानंतर पोलिसांनीही कडक कारवाई करत दबंगगिरी दाखवली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार अकोला शहरात दोन हजार 196 ऑटोरिक्षा आहेत. नोंदणीच्या वेळी (पासिंग करताना) ऑटोरिक्षांना मीटर लावले जातात. मात्र, प्रवाशांची वाहतूक करताना मीटर...
  July 27, 10:10 AM
 • अकोला - शहरातील गृहिंणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेल व भाजीपाल्याचे भाव घसरल्याने फोडणीचा तडका घराघरात आजपासून जोरदार बसेल. त्यामुळे घरातील सर्वांनाच खमंग भाजीची चव चाखता येणार आहे. खाद्यतेल व भाज्यांचे दर घसरल्याने हे सर्व शक्य होणार आहे. सर्वसामान्यांच्या जिभेवर ही चव किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष राहील. प्रचंड वाढलेल्या महागाईत खाद्यतेल प्रतिकिलो 20 रुपयांनी स्वस्त झाल्याने गृहिणी सुखावल्या असतानाच त्यांच्या आनंदात आणखी भर घातली तसेच भाजीपाल्याचे दर कमी...
  July 27, 10:08 AM
 • अकोला - महापालिका आयुक्तांनी शुक्रवार, 26 जुलैला दोन कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले. यामध्ये आरोग्य निरीक्षक मनोज सारवान, चौकीदार राजेश इंगळे यांचा समावेश आहे. कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात महापालिका आयुक्त कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या भागात आयुक्त आल्याचे पाहत महापालिका कर्मचारी राजेश इंगळे यांनी त्या भागातील महिलांना आयुक्तांना भेटण्यास प्रवृत्त केले. यामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आणणे, महापालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांना भडकावून एकत्र आणणे,...
  July 27, 10:07 AM
 • अकोला - येत्या 1 ऑगस्टपासून शासन आपल्या दारी ही राज्य शासनाची अभिनव योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. लोकाभिमुख प्रशासन अशी ओळख झाली पाहिजे, त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जिल्हय़ातील नागरिकांना, कर्मचार्याला आणि विद्यार्थी वर्गाला कोणतेही दाखले लागल्यास आता घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा...
  July 27, 10:06 AM
 • अकोला - खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार्या विविध वाणांचा आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून किमान दोन वर्षे अभ्यास केला जाणार आहे. त्यातून त्या वाणाची योग्य गुणवत्ता शेतक र्यांना समजणार आहे. सध्या राज्यात खरीप हंगामात जवळपास 20 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होते. त्यापैकी 50 ते 55 टक्के खासगी कंपन्यांच्या वाणांची विक्री होते. बियाण्यांची विक्री करताना खासगी कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध नसल्यामुळे अनेक कंपन्यांकडून शेतक र्यांची फसवणूक होत...
  July 27, 10:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED