Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - येत्या 1 ऑगस्टपासून शासन आपल्या दारी ही राज्य शासनाची अभिनव योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. लोकाभिमुख प्रशासन अशी ओळख झाली पाहिजे, त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जिल्हय़ातील नागरिकांना, कर्मचार्याला आणि विद्यार्थी वर्गाला कोणतेही दाखले लागल्यास आता घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा...
  July 27, 10:06 AM
 • अकोला - खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार्या विविध वाणांचा आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून किमान दोन वर्षे अभ्यास केला जाणार आहे. त्यातून त्या वाणाची योग्य गुणवत्ता शेतक र्यांना समजणार आहे. सध्या राज्यात खरीप हंगामात जवळपास 20 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होते. त्यापैकी 50 ते 55 टक्के खासगी कंपन्यांच्या वाणांची विक्री होते. बियाण्यांची विक्री करताना खासगी कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध नसल्यामुळे अनेक कंपन्यांकडून शेतक र्यांची फसवणूक होत...
  July 27, 10:04 AM
 • अमरावती- पुणे पोलिसांच्या हाती लागलेला अट्टल बँकफोड्या सुरेश उमकने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात राजूरवाडी सर्कलमधून 2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती; परंतु तो पराभूत झाला होता. शिवसेनेचा उमेदवार म्हणून तो रिंगणात होता. त्या वेळी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता. हा बँकफोड्या चेहर्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून कित्येक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने औरंगाबादेतही देवळाई भागात रो-हाऊस घेतले होते. काही काळ तो इथे होता. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच त्याने...
  July 27, 02:57 AM
 • अकोला - गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता 102 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध त्वरीत होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. वाहतुकीची सुविधा व आर्थिक अडचणीमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राष्ट्रीय...
  July 26, 11:51 AM
 • अकोला - पीक कर्ज फसवणूक प्रकरणातील एजंटांच्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या रडारवर आहे. या म्होरक्यासोबत त्याचा आणखी एक साथीदार असल्याने पोलिस या दोघांचाही शोध घेत आहेत. देना बँकेमार्फत वितरण करण्यात आलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. या तक्रारीची तहसील कार्यालयाने चौकशी केली. चौकशीअंती नायब तहसीलदार चरणदास कोवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र महादेव गुन्नाडे आणि कृषी अधिकारी...
  July 26, 11:46 AM
 • अकोला - शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणामध्ये 81 टक्के जलसाठा आहे. तरीही, पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त दिव्य मराठीने 24 जुलैला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शहर काँग्रेसतर्फे महापालिका जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांना 15 ऑगस्टपर्यंत नियमित पाणीपुरवठा न झाल्यास आयुक्तांच्या कक्षात ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा गुरुवारी देण्यात आला आहे. महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकल्यानंतर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल, असे अभिवचन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले...
  July 26, 11:41 AM
 • अकोला - शहरात सध्या मीटर शिवाय ऑटोरिक्षा धावत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष व ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना बसत आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारण्यात येत नसल्याने प्रवाशांचा खिसा रिकामा होत आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारल्यास प्रवाशांचे सरासरी 20 टक्के भाडे वाचू शकते. तसेच सुरक्षित प्रवासही होऊ शकतो. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या लेखी अकोला शहरात दोन हजार 196 ऑटोरिक्षा आहेत. नोंदणीच्या वेळी (पासिंग करताना) ऑटोरिक्षांना मीटर असे; मात्र प्रवाशांची वाहतूक...
  July 26, 11:35 AM
 • मुंबई/अकोला - शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी मुख्य अडथळा ठरत असलेल्या शरद सरोवराला दुसर्या जागेत स्थानांतरित करून शिवणी विमानतळाचा प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (25 जुलै)ला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. आमदार गोपीकिशन बाजोरिया व आमदार डॉ. रणजित पाटील यांनी 93 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाला विमानतळासाठी जमीन द्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट केले....
  July 26, 11:22 AM
 • अकोला - मोबाइल फोन कंपनीच्या टॉवरची बॅटरी चोरीचे इंदूर कनेक्शन उजेडात आले आहे. चोरीच्या बॅटरीमधील धातू इंदूर येथे विक्री करण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर येथील टोळीला अटक केली. या कंपनीचे टेक्निशियनच बॅटरी बाहेर काढून तशी टिप्स चोरट्यांना देत होते. सहा जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने अकोट रोडवर सोमवारी फिल्डिंग लावली. पोलिसांनी इम्रानअली शहजाद अली, रियाजउद्दीन कुतुबउद्दीन, मोहंमद शफी मोहंमद युनूस, शेख बबलू शेख इस्माईल,...
  July 25, 11:45 AM
 • अकोला - जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकार्यांना मर्यादेपेक्षा जास्त प्रवास भत्ता मंजूर केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या पदाधिकार्यांकडून 88 हजार 748 रुपये वसूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पदाधिकार्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. यासाठी आर्थिक मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, साबिया अंजुम, माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर, दामोदर जगताप, सभापती दुर्गाताई कांबे, केशवराव माळी...
  July 25, 11:38 AM
 • अकोला - वर्धा येथून काही अंतरावर असलेल्या सिंधी-तुळजापूरदरम्यान शुक्रवारी रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पूर्णत: बाधित झाली होती. गाड्यांना वेळेवर धावण्यास आणखी आठ दिवस लागणार असल्याची माहिती अकोला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. रेल्वे रुळाखालील माती गिट्टीचा भराव वाहून गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे काही गाड्या नरखेड मार्गे वळवण्यात आल्या होत्या. मात्र, सोमवारी रेल्वे कर्मचार्यांच्या अथक पर्शिमाने डाऊनची लाइन सुरू...
  July 25, 11:35 AM
 • अकोला - शहरातील पाइपलाइन, हातपंप, सबर्मसिबलपंप यावर महापालिकेचा जलप्रदाय विभाग वर्षाला सुमारे दोन कोटी खर्च करत आहे. या खर्चानंतरही शहरातील पाइपलाइनचे लिकेज कायम आहे. जलप्रदाय विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. या प्रकाराकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील 73 प्रभागांमध्ये 73 कत्रांटदार जलप्रदाय विभागांतर्गत कार्यरत आहेत. शहरातील पाच झोनमध्ये पाच अभियंत्यांचे नियंत्रण आहे. 28 हजार चौरस किलोमीटरमध्ये शहरात पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन व्यापलेली आहे. महिन्याला 15 लाख...
  July 25, 11:31 AM
 • अकोला - शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणामध्ये 81 टक्के जलसाठा आहे. मात्र, जलकुंभांची संख्या कमी असल्यामुळे अकोलेकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेचा जलप्रदाय विभाग प्रयत्न करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील महान प्रकल्पात प्रचंड वाढ झाली आहे. शहरात 13 जलकुंभ आहेत. यामध्ये जुने शहरात तीन, पूर्व झोनमध्ये तीन, उत्तर झोनमध्ये एक, दक्षिण झोनमध्ये तीन...
  July 25, 11:17 AM
 • अकोला - एकीकडे शहराला अतिक्रमणाचा विळखा बसत असताना दुसरीकडे मात्र मनपाला अतिक्रमणधारकांचा पुळका आला आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे महापालिकेच्या लेखी बाधित असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अतिक्रमण काढणार्या मनपाच्या अधिकार्यांनाच आयुक्तांनी नोटीस बजावली असून, त्यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अकोला शहरामध्ये मुख्यमार्गासह इतरही रस्त्यांनाही अतिक्रमण करणार्यांची संख्या कमी नाही. या अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होते. असाच रस्त्यावर...
  July 24, 11:28 AM
 • अकोला - गुटखाबंदीच्या निर्णयाला एक वर्षांची मुदतवाढ देताना राज्य सरकारने आता मावा, खर्रा, सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूवरही बंदी लागू केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे महिन्याकाठी शहरातील संत तुकाराम कर्करोग रुग्णालयात 25 रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला शहरासह पश्चिम विदर्भात खर्राची मोठी बाजारपेठ आहे. खर्राच्या माध्यमातून अकोल्यात कोट्यवधींचा उलाढाल होतो. नागरिकांवर तंबाखूजन्य पदार्थांमुळे दुष्परिणाम होऊ नये, म्हणून राज्यात गुटखाबंदी लागू...
  July 24, 11:22 AM
 • अकोला - बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाच्या नावाखाली देना बँक आणि शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, कृषी अधिकारी व शेतक र्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देना बँकेमार्फत वितरित केलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. तहसील कार्यालयाने या तक्रारीची चौकशी केली. नायब तहसीलदार चरणदास कोवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रवींद्र अमृतराव...
  July 24, 11:18 AM
 • अकोला - विदर्भातील जलसाठय़ांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमरावती विभागातील जवळपास सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात जवळपास 80 टक्के जलसाठा आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प प्रमाणात जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नागपूर विभागातील 366 प्रकल्पांमध्ये केवळ 24 टक्के जलसाठा होता. या प्रकल्पांमध्ये सध्या 65 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील 376 प्रकल्पांमध्ये मागील वर्षी 23 टक्के जलसाठा होता. यावर्षी हा जलसाठा...
  July 24, 11:13 AM
 • अकोला - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महान धरणाचे दहा, तर वान प्रकल्पाचे चार वक्रद्वार उघडली आहेत. जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील महसूलच्या अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणाचे दहा वक्रद्वार उघडण्यात आले. त्यामधून 230.598 घनमीटर प्रतिसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत...
  July 24, 10:56 AM
 • अकोला - शहरात धावणार्या या वाहनांच्या नियंत्रणासाठी शहरात केवळ 76 वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. वाहतूक शाखेत 73 पोलिस तैनात असले तरी यामध्ये 18 पोलिसांना प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणाव्यतिरिक्त काम करावे लागते. तसेच रोज 12 कर्मचार्यांची साप्ताहिक सुटी असते आणि 5 कर्मचारी रजेवर असतात. एवढेच नव्हे तर 5 कर्मचारी रोज विविध बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे केवळ 33 पोलिसच प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर असतात. परिणामी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहनांना नियंत्रित करता-करता...
  July 23, 12:03 PM
 • अकोला - शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट अमरावती येथील क्षितिज नागरी सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. मात्र, मागील अकरा महिन्यांपासून महापालिकेने या कंत्राटदाराला देयक न दिल्यामुळे मनपाकडे तब्बल दोन कोटी 25 लाख रुपयांचे देयक थकित आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलणार्या 70 कर्मचार्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 15 फेब्रुवारी 2010 पासून शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट क्षितिज या बेरोजगारांच्या संस्थेला देण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी संस्थेतर्फे 20 ट्रॅक्टर, एक जेसीबी,...
  July 23, 11:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED