जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेतील 64 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीची व्याप्ती वाढणार आहे. या घोटाळ्यात शाखा व्यवस्थापकांचे जबाब नोंदवल्यानंतर आणखी काही अधिकारी अडकणार आहेत. पोलिस या अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी करणार आहेत. अकोला अर्बन बँक फसवणूकप्रकरणी प्रथम तक्रार 4 जुलै रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात केली गेली. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच 64 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. पोलिस या तक्रारींची शहानिशा करून पुढील कारवाई...
  October 16, 02:52 PM
 • अकोला- भाजपचे दहा नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गुजरातकडे आज रवाना झाले. भाजपच्या लोकप्रतिनिधींची राष्ट्रीय कार्यशाळा गांधीनगर येथील महात्मा मंदिरात होणार आहे. या कार्यशाळेत गुजरात विकासाची माहिती देण्यात येणार असून, शहर विकासासाठी गुजरातने काय केले, याची माहिती हे नगरसेवक घेणार आहेत. खासदार संजय धोत्रे यांनी आज या कार्यशाळेत सहभागी होणार्या नगरसेवकांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवली. या वेळी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते. या...
  October 16, 02:46 PM
 • अकोला- महापालिका कर्मचार्यांचा संप आज अखेर मिटला. सोमवारी महागाई भत्ता रोख स्वरूपात देण्याच्या मुद्यावरून हा संप पुन्हा सुरू करण्यात आला होता. आज प्रशासनाने अखेर संपकरी कर्मचार्यांची मागणी मान्य करत रोख स्वरूपात 85 लाख रुपयांचा तीन महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिका प्रशासनाने रोख स्वरूपात तीन महिन्यांचा महागाई भत्ता देण्याची सोय केली आहे. पाचव्या वेतन आयोगाची थकित रक्कम द्या, सहावा वेतन आयोग तत्काळ लागू करा व गेल्या चार महिन्यांचा थकित पगार...
  October 16, 02:33 PM
 • अकोला- अंध विद्यार्थ्यांना समाजात वावरताना, शिकताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसरीकडे मुख्य परीक्षेच्या वेळी रायटर आणि परीक्षा केंद्रावर बसण्याच्या व्यवस्थेमुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यांना परीक्षेसाठी रायटरची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. नागरिकांनी अंध विद्यार्थ्यांबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. शाळेत शिकताना जशा समस्या येतात, त्यापेक्षाही जास्त समस्या त्यांना परीक्षा देताना येतात. परीक्षेसाठी दोन...
  October 15, 12:39 PM
 • अकोला- जेथे नसेल डोळा तेथील सूर्य काळा, दृष्टीशिवाय सृष्टी ज्ञानशिवाय शाळा या कवी (कै.) व्यंकटेश देशमुखांच्या काव्यओळी दृष्टीहीनांची व्यथा शब्दबद्ध करतात. त्याचा र्मम ओळखून अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केंद्राने नेत्रदानाविषयी जागृती करीत आज अकोलेकरांना नेत्रदानासाठी डोळस केले आहे. पूर्वी वर्षाला चार ते पाच या संख्येत होणारे नेत्रदान यंदाच्या वर्षी 300 वर पोहोचले आहे. संस्थेमार्फत आजवर 1100 नेत्रदात्यांकडून नेत्रदान झाले असून, 2200 दृष्टीहीनांना त्याचा लाभ मिळाला आहे. अकोला...
  October 15, 12:30 PM
 • अकोला- जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांचा दसरा-दिवाळी स्नेहमिलन मेळावा 20 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवनात सकाळी 11 वाजता आयोजित या मेळाव्याला अधिकारी, कर्मचार्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्यांची एकत्रितपणे आपसात भेट व्हावी, त्यांची सुख-दु:खे जाणून घेता यावीत, त्यांच्या जुन्या...
  October 15, 12:22 PM
 • अकोला- डॉ. मोहन धारियांच्या निधनाच्या वृत्तानंतर अकोलेकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पर्यावरण संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी अकोल्यात दिलेल्या भेटीचे, त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचे, त्यांच्या वक्तशीरपणाचे अकोलेकरांना यानिमित्ताने स्मरण झाले. वनराईचे प्रा. बबन कानकिरड यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, की डॉ. मोहन धारिया यांनी 10 जुलै 1986 ला वनराईची स्थापना करून पर्यावरण संवर्धनासाठी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. 1 जुलै 1987 मध्ये त्यांनी अकोल्यास भेट...
  October 15, 12:19 PM
 • अकोला- जय भीमच्या गर्जनेने सोमवारी 14 ऑक्टोबरला शहर दुमदुमले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात निघालेल्या मिरवणुकीने वातावरण उत्साहपूर्ण झाले. ढोल-ताशे, आखाड्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, तरुणाईचा जल्लोष मिरवणुकीत दिसून आला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेतर्फे गत 28 वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन होते. नागपुरातील दीक्षाभूमी येथे विजयादशमीच्या दिवशी देशातून बौद्ध बांधव येतात, तर दुसर्या दिवशी येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय...
  October 15, 12:15 PM
 • अकोला- मागासवर्गींयांच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने सरकारतर्फे माहिती पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. मात्र, या माहिती पुस्तिकांचे वितरण होणे आवश्यक असतानाही अनेक महिन्यांपासून समाजकल्याण विभागात या पुस्तिका धूळखात पडून आहेत. सरकारतर्फे राबवल्या जात असलेल्या सर्व योजनांची माहिती लाभार्थ्यांना असावी, या हेतूने सामाजिक न्याय विभाग वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने या माहिती पुस्तिकेचे राज्यातील...
  October 13, 12:29 PM
 • अकोला- शहरासह जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत सिलिंडरची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत आहे. पैसे मोजूनही नागरिकांना सिलिंडरसाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. ऑनलाइन बुकिंगनंतरही नागरिकांना सिलिंडरसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसापांसून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग प्रणाली सुरू झाल्यानंतरही सिलिंडरसाठी...
  October 13, 12:19 PM
 • अकोला- नवरात्रोत्सवात नऊ दिवस अनवाणी व्रत करणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. हे सर्व भाविक या दिवसांमध्ये दैनंदिन प्रवासात अनवाणी चालणेच पसंत करतात. त्याग करण्यासाठी नागरिक हे व्रत करतात. हा भाग भाविकांच्या श्रद्धेचा असला तरी, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पायांना इजा होण्याची शक्यताही आहे. मात्र, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण शहरातील भाविक नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी पायी जातात. त्यांच्यासाठी...
  October 13, 12:10 PM
 • अकोला- शहरात विजयादशमीनिमित्त रविवारी, 13 ऑक्टोबरला भारत विद्यालयाच्या मैदानात आणि संत तुकाराम चौकात रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रविवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे. संत तुकाराम चौकात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सायंकाळी सात वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते 51 फूट रावणाचे दहन करण्यात येणार आहे. हा पुतळा गाजरगवत व प्लास्टिकच्या पिशव्यांपासून बनवलेला आहे. प्लास्टिकच्या...
  October 13, 12:07 PM
 • अकोला - महापालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचारी वगळता इतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र सफाई कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनाचा तिढा अद्यापही कायम आहे. सात ऑक्टोबरपासून मनपा कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. शासकीय विर्शामगृहात प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, विरोधी पक्षनेते हरीश अलिमचंदानी, व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. 26 कोटींच्या विकास...
  October 12, 09:32 AM
 • अकोला - दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेत 64 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी काही गैरअर्जदारांची विचारपूस केली असून, संशयास्पद कर्ज प्रकरणातील दस्तऐवज पोलिस ताब्यात घेणार आहे. दि अकोला अर्बनच्या मुख्य शाखेत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश रामचंद्र राठी यांच्याशी संगनमत करून 1999 ते 2000 या वर्षात 17 गैरअर्जदारांनी 64 कोटी चार लाख रुपयाने बँकेची फसवणूक केल्याची तक्रार मुख्य...
  October 12, 09:30 AM
 • अकोला - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी (कै.) वा. रा. उर्फ अण्णासाहेब कोरपे यांच्या पूर्णाकृती प्रेरणाशिल्पाचा अनावरण सोहळा बँकेच्या आवारात 21 ऑक्टोबरला होणार आहे. या प्रसंगी कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून...
  October 12, 09:25 AM
 • अकोला - आपला प्रयास या संघटनेतर्फे शहर विकासास हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकार्यांनी 14 ऑक्टोबरला आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कधीकाळी स्वच्छ, सुंदर आणि उद्यानाचे शहर म्हणून अकोल्याची ख्याती होती. परंतु, सध्या शहर समस्यांचे माहेरघरच झाले आहे. सर्वत्र साचलेली घाण, कचरा, खड्डेमय रस्ते, वाढत्या धुळीमुळे होणारी रोगराई ही चिंतेची बाब आहे. ज्या शहरात आपण वाढलो, त्या शहराच्या विकासासाठी हातभार लावू शकतो. याची जाणीव ठेवून आपला प्रयास ही सामाजिक संघटना उभारली...
  October 12, 09:23 AM
 • अकोला - नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेला प्राप्त झालेल्या 26 कोटी रुपयांच्या निधीमधून कर्मचार्यांचे चार महिन्यांचे थकित वेतन व पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तसेच सहाव्या वेतन आयोगाची रक्कम देण्याचा ठराव गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळातच घेण्यात आला. ठरावाच्या सर्मथनार्थ शिवसेनेच्या नगरसेवकांकडून खुच्र्यांची तोडफोड करण्यात आली. या वेळी सभागृहातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमने-सामने आले होते. महापालिकेच्या कर्मचार्यांनी 7...
  October 11, 11:39 AM
 • अकोला - सध्या जिल्हा स्त्री रुग्णालय 300 खाटांचे असून, यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. पाच महिन्यांपूर्वी बेड वाढवण्याबाबत प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आला आहे. आरोग्य सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी लवकरच हा प्रo्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तसेच माता मृत्यू व बाल मृत्यू टाळण्यासाठी गरोदर मातांना सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचे आदेश आरोग्य सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय...
  October 11, 11:38 AM
 • अकोला - वजनमापांमध्ये फेरफार करून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आहे. वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत करण्यात येणारी वजन व मापांची पडताळणी आणि मुद्रांकन आता खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. व्यावसायिकांकडून ग्राहकांना विविध आमिष देत फसवणूक केली जात़े अनेकदा वजनामध्येदेखील ग्राहकांना लुबाडले जात़े वैधमापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांमार्फत या गैरकामांवर नियंत्रण ठेवले जात़े हे नियंत्रण अधिक पारदर्शक होण्याकरिता...
  October 11, 11:36 AM
 • वर्धा - वाढदिवसाच्या ऐन एका दिवसापूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाहण्याची वेळ आई-वडिलांवर आली. हिंगणघाट येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत चिमुकलीचे नाव रिया रवींद्र फुलझेले असे आहे. हिंगणघाटच्या महात्मा फुले वॉर्डात राहणारी दोन वर्षांची चिमुकली रिया फुलझेले बुधवारी (ता.9) दुपारी 4 वाजताच्या सुमारास खेळत असताना बेपत्ता झाली. बराच वेळ होऊनही रिया दिसत नसल्याने अज्ञाताने रियाला पळवल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास...
  October 11, 11:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात