Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- करिअर घडवतानाच विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव शास्त्रीनगरात आठ ऑगस्टला रात्री झालेल्या घटनेच्या निमित्ताने उजेडात आले आहे. क्षुल्लक कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्याला मारहाण केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. गौरव प्रकाश गावंडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दृष्टिक्षेप घटनेवर.. तीनही विद्यार्थ्यांमध्ये प्रभात ले-आऊट,...
  August 10, 11:57 AM
 • अकोला- राजकीय नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक ही एक परीक्षा असते. या परीक्षेला अद्याप वेळ आहे. त्यामुळे जिल्हय़ातील आजी-माजी आमदारांनी पदवी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी हे दोन्ही लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी एकाच खोलीत परीक्षा देतील. यासाठी त्यांनी येथील एका महाविद्यालयात मुक्त प्रवेश घेतला आहे. दरम्यान यातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला. जीवनभर माणूस शिकत असतो, अशी शिकवण आहे. नेते कधी कार्यकर्त्यांकडून तर कधी वरिष्ठ नेत्यांकडून शिकतात. आमदार होण्यासाठी...
  August 10, 11:57 AM
 • अकोला- भरदिवसा घडणार्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू केलेल्या सिटिझन पोलिसिंगच्या उपक्रमाला तडा देण्याचा प्रयत्न आठ ऑगस्टला रात्री करण्यात आला. माधवनगर आणि गुरुकुल कॉलनी परिसरातील सहा कारची तोडफोड करण्यात आली. या उपक्रमामुळे घरफोडी आणि चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड केली असावी, अशी शक्यता पोलिस आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. काय घडले आठ ऑगस्टच्या रात्री माधवनगरातील सागर...
  August 10, 11:46 AM
 • अकोला - डॉक्टरांना देव मानणारे अनेक जण आज समाजात आहेत. कठीणप्रसंगी दु:खाच्या वेदनेतून बाहेर काढणारे डॉक्टरच असतात. मात्र, रुग्ण दगावला की त्याच डॉक्टरला दोष देऊन नातेवाईक रान उठवतात. या प्रवृत्तीला अपवाद ठरणारा अनुभव गुरुवारी डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या खासगी रुग्णालयात आला. तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुलाच्या उपचाराचे पैसे डॉक्टरांना देण्यासाठी आलेल्या वडिलांकडून डॉक्टरांनीही पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, डॉक्टर आणि आपला मुलगा गमावलेल्या वडिलांनी ते पैसे कठीण...
  August 9, 09:39 AM
 • अकोला - घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानाचा प्रश्न दप्तर दिरंगाईत अडकला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आश्वासनांव्यतिरिक्त ठोस कारवाई या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून झाली नाही. 2008 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी र्शीकर परदेशी यांनी स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवासस्थाने बांधावी, असा निर्णय घेतला होता. तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांनी त्याला मान्यता दिली होती. रामदासपेठेतील महसूल विभागाच्या खुल्या जागेत स्वातंत्र्य...
  August 9, 09:37 AM
 • अकोला - सीलिंग कायद्याला आमचा विरोध आहे. याचा निषेध आम्ही करतो. येत्या 10 ऑगस्ट रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे अमरावती येथे पुढील रणनीती घोषित करतील. शेतीचे तुकडे कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका राहणार आहे, असे मत शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी येथे व्यक्त केले. येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. सीलिंग कायद्याचा फटका राज्यात विदर्भ व मराठवाडा या भागातील कोरडवाहू शेती करणार्या शेतकर्यांना बसणार आहे. शेतकरी...
  August 9, 09:35 AM
 • वर्धा - शेतातील काम आटोपून परतताना डोंगा उलटल्याने नदीत बुडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथे वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ घडली. डोंग्यात 30 ते 35 शेतमजूर प्रवास करत होते. हिंगणघाट येथील शेतमजूर कान्हापूर (बोरगाव) शिवारात शेतातील कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून सायंकाळी दोन जोडलेल्या डोंग्यांनी ते घरी परतत होते. वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ खडकाला धडकलेल्या डोंग्याचे दोन तुकडे होऊन सगळे मजूर नदीच्या...
  August 9, 09:34 AM
 • अकोला - जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे अकोला शहरासह जिल्ह्यातील एकाही जवानाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नोंद ठेवण्याचे काम नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम निवडणूक विभाग व गृह शाखेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील जवान देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. यामध्ये आर्मी, एसआरपी, सीआरपीएफ यासह अन्य विभागाचा समावेश आहे. काश्मीरमधील पूंछ भागात भारतीय लष्कराच्या...
  August 9, 09:33 AM
 • अकोला - मागील महिन्यात खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांचे एक पथक सुरत येथे गत तीन दिवसांपूर्वी गेले होते. या चोरीतील 70 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एक आरोपी अटकेत आहे. खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या केशवनगर येथील रहिवासी उंबरकार यांच्या घरी चार लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांनी दौलताबाद येथून शेख लियाकत शेख बाबू या आरोपीला अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे....
  August 9, 09:32 AM
 • अकोला - शहर व ग्रामीण भागातील अनेक बार मालकांना त्यांच्या बारचे नूतनीकरण झाल्याचे प्रमाणपत्र (लायसन्स) मिळाले नाही. लायसन्सशिवाय अनेक बार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. जिल्हय़ात एसएल थ्री या वर्गवारीत 111 बार आहे तर सीएल थ्री या वर्गवारीत 30 देशी दारूचे दुकान आहे. यांपैकी अनेक बारचालकांना त्यांचे लायसन्स मिळाले नाही. बार मालकांना 1 मार्च रोजी हे प्रमाणपत्र मिळण्याची गरज होती. दरवर्षी बार मालक एप्रिल महिन्यात शासकीय चलान या माध्यमातून नूतनीकरणासाठी आवश्यक लायसन्स फी सरकारला अदा...
  August 9, 09:27 AM
 • अकोला - अकोटफैल भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली जमा केलेला सुमारे 47 हजार रुपयांचा निधी महापालिकेत जमाच झाला नाही. या प्रकरणाची जलप्रदाय विभागाने चौकशी सुरू केली आहे. पाणीपट्टीच्या नावाखाली जमा झालेला हा निधी नेमका गेला कुठे ?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या प्रकरणातील निधीचा अपहार हा वसुलीकर्ता व कुली पदावर कार्यरत असलेल्या मारोती शेंडे यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर विभागाने चौकशीअंती ठेवला, अशी माहिती मिळाली आहे. नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली...
  August 9, 09:19 AM
 • अकोला- शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला असून, 7 ऑगस्टला तर एकाच दिवशी दोन क्रीडा स्पर्धांचे आयोजन असल्याने वातावरण क्रीडामय होते. वसंत देसाई क्रीडांगणावरील बहुउद्देशीय सभागृहात जिम्नॅस्टिक तर लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर वेटलिफ्टिंग स्पर्धा झाली. स्नेहा पचोरी, रूपेश पचोरी, सौरभ निंबाळकर, सैयद अत्ताउल्लाह, शैलेश मोहोळ, धीरज धानोकार यांनी दिवस गाजवला. सकाळी 11 वाजता वसंत देसाई क्रीडांगणावरील बहुउद्देशीय सभागृहात जिम्नॅस्टिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर...
  August 8, 12:18 PM
 • शहरातून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. यात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त बसेसचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. मदनलाल धिंग्रा चौकात तर फारच वाईट परिस्थिती असते. जर मोठय़ा शहरांच्या धर्तीवर अकोल्यातील बसस्थानकाचे विभाजन करून मार्गनिहाय बसस्थानक निर्माण केल्या गेले, तर वाहतूक समस्या निकाली लागेल सोबतच अकोल्याच्या विकासाला नवी दिशाही मिळेल.. अकोला- शहराचा विस्तार होत असून, येथील नागरिक विकासाची वाट पाहत आहे. वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणांनी...
  August 8, 11:37 AM
 • अकोला- तालुका विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात शहरी विभागात स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या महिता पांडेने तर ग्रामीण विभागात गाडगेबाबा विद्यालय, दहीगाव (गावंडे)च्या किरण गावंडेने बाजी मारली. त्यांची जिल्हास्तरावर वर्णी लागली आहे. पाणी हेच जीवन असून, आज पाणी मुबलक उपलब्ध असले तरी भविष्यासाठी पाण्याचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचा सूर उमटला. अकोला तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 6 ऑगस्टला प्राजक्ता कन्या विद्यालय, कौलखेड येथे झाला. या वेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी...
  August 7, 12:08 PM
 • अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील सुमारे 121 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे प्रशासकीय कामांना ब्रेक लागला आहे. महसूल विभागाचा भार आता प्रभारींच्या खाद्यांवर आहे. परिणामी, या रिक्त जागांमुळे काही प्रमाणात नागरिकांची महसूल विभागांतर्गत असलेली अनेक कामे रेंगाळली आहेत. मागील काही वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या पदासह अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक टंकलेखन, तलाठी, वाहन चालक...
  August 7, 11:46 AM
 • अकोला- अकोलेकरांचा सुरक्षित शहर प्रवासाचा तिढा सुटण्याची शक्यता नसून, बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने मनपा आयुक्तांना तिसरे पत्र दिले आहे. शहर बससेवेचा उपक्रम शिवसेना-भाजप युतीच्या काळात मनपाने 10 वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरू केला. मात्र, बहुतांश सिटी बसमधून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. बस उपक्रमासाठी मनपा, अकोला प्रवासी व मालवाहतूक सहकारी संस्थेमध्ये करार झाला आहे. बसेस होताहेत निकामी सध्या 23 पैकी 14...
  August 7, 11:43 AM
 • अकोला- शहराच्या महम्मद अली मार्गावरील निवासी विधिज्ञ महम्मद परवेज यांच्याकडे चांदीच्या डबीत छोटेसे कुराण आहे. हे परंपरेने चालत आलेले कुराण डोळ्यांनी वाचता येत असून, ते 50 ते 60 वर्षांपूर्वीचे असावे, असे ते सांगतात. त्यांच्याकडे अलिफी कुराण व फोटोच्या एका फ्रेममध्ये कुराणही पाहावयास मिळते. अँड. परवेज यांना या कुराणाविषयी फारशी माहिती नसली तरी, त्यांच्या अम्मीला त्यांच्या मोठय़ा वडिलांकडून ते मिळाल्याचे ते सांगतात. हे छोटेशे कुराण छापील स्वरूपाचे असल्याने प्राचीन नसावे. मात्र, आपल्या...
  August 6, 11:35 AM
 • अकोला- शहरात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस चांगलाच गाजला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रिपाइंच्या दोन गटांची वेगवेगळी आंदोलने केली. युवक आघाडीचा रास्ता रोको पाच ऑगस्ट रोजी रिपाइंच्या (आठवले गट) युवक आघाडीने रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात पश्चिम विदर्भाचे मुख्य संघटक अशोक नागदेवे, कार्याध्यक्ष सुनील अवचार, युवक आघाडीचे महानगराध्यक्ष गोपाल...
  August 6, 11:30 AM
 • अकोला- मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी निलंबित असलेल्या कर्मचार्यांच्या वेतनाचा पैसा शासनाने द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली. निलंबित माजी आयुक्त जी. एन. कुर्वे हे जुलै महिन्यात निवृत्त झाले. तसेच उपायुक्त उमेश कोठीकर हे एका प्रकरणात निलंबित असून, त्यांना 75 टक्के पगार द्यावा लागत आहे. या दोघांवर सुमारे 60 हजार रुपयांचा मासिक खर्च गेल्या महिन्यापर्यंत होता. निलंबन काळात या दोघांवर वेतनापोटी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे हे पैसे राज्य शासनाने द्यावे, अशी मागणी...
  August 6, 11:26 AM
 • अकोला- शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी आठ कोटी रुपये महापालिकेकडून खर्च करण्यात येतो. मात्र, असे असतानाही नागरिकांना चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणात पाणी असल्यामुळे रोज पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, अभियंता व कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे रोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. रोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 16 कोटी रुपयांची गरज आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या सात लाखांवर आहे. पण, महापालिकेच्या लेखी साडेचार लाख नागरिकांना...
  August 6, 11:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED