Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • मलकापूर - शहरातील हनुमान चौकानजीक असलेल्या आर. नटवर अँन्ड कंपनीच्या कुरिअर सर्व्हिसच्या कार्यालयातून चाकूच्या धाकावर 16 लाखांची रोकड लुटणार्या चौघांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मलकापूर शहरातीलच शुभम प्रकाश नवले (रा. शास्त्रीनगर), मनोज सुभाष करांडे (रा. माता महाकाली नगर), प्रदीप सुरेश जैन (शास्त्रीनगर) आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या चौघांनी मलकापूर...
  August 21, 09:46 AM
 • गेल्या 16 वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर साधना वाचक मंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने विदर्भ दोर्यावर असताना बुलडाण्यात आले होते. विदर्भातील पन्नालाल सुराना यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. दाभोळकरांच्या हस्ते या मंडळाचे उद्घाटन झाले तेव्हा एकाच वेळी 300 रुपये भरून 40 जण वर्गणीदार झाले होते. बुलडाण्यात त्यावेळी सुरू असलेल्या ग्रंथ भिशी उपक्रमाबद्दलही त्यांना प्रेम वाटले. बुलडाण्यात आल्यावर ते प्रामुख्याने माझ्याकडे तथा बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन...
  August 21, 09:44 AM
 • खामगाव - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतंर्गत राज्यात अनेक गावांना पुरस्कार मिळाले. परंतु पुरस्काराच्या रकमेवरून अनेक ठिकाणी तंटा उभा झाला आणि सरपंच सचीवावर अफरातफरीचे गुन्हे दाखल झालेत. काही ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सरपंचाचे राजकारण आडवे आले. ग्राम सचिवांनी सुद्धा तंटामुक्त पुरस्काराची सक्कम गावामध्ये खर्च करण्यास कुचराई केली असल्याचे उघड झाले आहे. खामगाव तालुक्यात शिवाजी नगर पोलिस ठाणे आहे. शहरामध्ये काही भाग व ग्रामीण भागातील सजनपुरी, घाटपुरी, सुटाळा बुद्रुक,...
  August 21, 09:41 AM
 • अमरावती- सीडीवर अश्लील चित्रफिती ध्वनिचित्रमुद्रित करून विक्री करण्याऐवजी आता मोबाइलवर डाटा कार्डमध्ये अशा चित्रफिती डाउनलोड करण्याचा व्यवसाय शहरात तेजीत आहे. चित्रफिती विकण्याकरिता पूर्वी सीडीचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होत होता. मात्र, पोलिसी कारवाईचा धोका आणि असल्या व्यवसायावरील निर्बंधाची भीतीमुळे अवैध व्यवसाय करणार्यांनी आता इंटरनेट माध्यमाचा उपयोग करून पळवाटा शोधल्या आहेत. शहरातील काही विशिष्ट भागात असलेल्या सायबर कॅफेतून अशा प्रकारच्या अवैध डाउनलोड करण्याला आर्थिक...
  August 20, 01:09 PM
 • अकोला- शहरातील प्रभाग क्र 7 मधील नागरिकांनी दूषित पाण्याची बॉटल 19 ऑगस्टला जिल्हाधिकार्यांना भेट दिली. हनुमान बस्तीतील नागरिकांच्या आरोग्याची महापालिकेला काळजी नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार संजय गावंडे यांना समस्येबाबत जाणीव करून देत साकडे घातले. नालीतून गेलेल्या जलवाहिनीत बिघाड झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे, अशी ओरड होत आहे. नालीमधील दूषित पाणी जलवाहिनीत जात आहे. सामाजिक...
  August 20, 01:01 PM
 • अकोला- दि अकोला अर्बन को-ऑप बँक फसवणूक प्रकरणातील मोकाट आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. पोलिस या सर्व आरोपींच्या संपत्तीची माहिती संकलित करत आहेत. यापूर्वीच पोलिसांनी आरोपींची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी विविध बँकांकडून त्यांच्या खात्यांची माहिती प्राप्त करून घेतली आहे. त्यानुसार त्यांची काही खाती सीलही करण्यात आली आहेत. याप्रकरणी केवळ के.के. प्रसाद ला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. उर्वरित सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज...
  August 20, 12:42 PM
 • अकोला- सप्टेंबरमध्ये गणरायांचे आगमन होणार असून, महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी गणेशमूर्ती तयार करण्याची जोरदार लगबग सुरू असल्याचे चित्र आह़े. या वर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे बाप्पांच्या मूर्तींचीही सुमारे 15 टक्के दरवाढ होणार असल्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला आहे. आकर्षक व मनमोहक गणेशमूर्ती बनवणारे जठारपेठ येथील प्रसिद्घ मूर्तिकार शिवा मोकळकर गेल्या 6 महिन्यांपासून मूर्ती बनवण्याच्य...
  August 19, 12:44 PM
 • अकोला- शिवर परिसरातील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी शरद पंजाबराव तायडे (वय 20, रा. गोरेगाव), ज्ञानेश्वर गणेश गीते (वय 23, रा. खडकी), संतोष विठ्ठल शिंदे (रा. मूर्तिजापूर) तीन ग्राहकांसह अड्डा चालवणार्या आंटीलाही ताब्यात घेतले. पोलिसांनी 700 रुपये रोख जप्त केले. घटनास्थळावर पोलिसांना दोन महिलाही आढळून आल्या. पोलिस या महिलांचीही चौकशी करणार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया...
  August 19, 12:33 PM
 • अकोला- शहरात खानावळीच्या व्यवसायाला चालना मिळत असून, दररोज सुमारे 40 हजार डबे पुरवल्या जातात. त्यामुळे 18 हजार विद्यार्थी व दोन हजार नोकरदार असे एकूण 20 हजार जणांना सकाळ-संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली आहे. खानावळीच्या या व्यवसायातून शहरात कोट्यवधींची उलाढाल होते, हे विशेष. शहरातील शिक्षणाच्या सुविधांमध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा स्पर्धात्मक...
  August 19, 12:16 PM
 • अकोला- आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रतिनिधींसाठी थेट निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ कायद्यात मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या वर्षीही गतवर्षीप्रमाणेच विद्यापीठ निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला. 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरून पक्षीय...
  August 19, 02:19 AM
 • बुलडाणा जिल्ह्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील ऐतिहासिक चांदणी तलाव तुडुंब भरला असून, त्याच्याभोवतीची वनराईही हिरवाइने नटली आहे. पर्यटकांना आता हा तलाव खुणावू लागला आहे.
  August 18, 12:50 PM
 • बुलडाणा - बुलडाणेकरांची पाण्यासाठी होणारी वणवण येत्या काळात थांबणार असून, लवकरच शहराला खडकपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण आता काठोकाठ भरले असले तरी दरवर्षी शहरास जाणवणारी तीव्र पाणीटंचाई पाहता खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलडाणा शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी 113 कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना आकारास येत आहे. या योजनेचे काम आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. बुलडाणा शहराची 2043 मधील लोकसंख्या गृहीत धरून ही योजना आखण्यात आली आहे. नगरोत्थान...
  August 18, 12:33 PM
 • अकोला - महापालिका स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लागला. आज या निकालाची प्रत उपलब्ध झाली. त्यामुळे महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सत्तारूढ पक्षातर्फे केली जात आहे, अशी माहिती मिळाली. तसे झाले नाही तर स्थायी समिती सदस्य निवडीची सभा घेण्याची गरज विरोधकांमार्फत व्यक्त केली जात आहे. नगरसेवक साजिद खान (काँग्रेस), अजय रामटेके (राष्ट्रवादी काँग्रेस),...
  August 18, 12:28 PM
 • अकोला - येथील रेल्वेस्थानकावरील वाहनतळ वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 19 जुलैपासून दुचाकी, तर 1 ऑगस्टपासून चारचाकीच्या पार्किंग दरात रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आले आहेत. कंत्राटदारांनी नवीन दराने वाहनधारकांकडून वसुली सुरू केली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडे जुन्याच दराने रक्कम देण्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली. त्यामुळे चारचाकीचे पार्किंग रविवारपासून स्वत:च चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दुचाकी पार्किंगचा कंत्राट मालेगाव येथील एका व्यक्तीने 96 लाखांत तीन...
  August 18, 12:24 PM
 • बुलडाणा - माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, अशी भावना आपल्या काव्यातून मांडणारे महाकवि वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी मिसाळ रंगमंच, गर्दे सभागृह वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने अभिवादन करणात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल हिरोळे होते. दिलीप जाधव यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अँड गणेश इंगळे, निवृत्ती घोंगटे, के. ओ. बावस्कर, शाहीर जनार्दन गवई, सुरेश साबळे, उपस्थित होते. या...
  August 18, 10:39 AM
 • अमरावती- 4129 या आकड्याचा दारू या शब्दाशी काही संबंध असू शकतो काय? दादा शब्दाचे 5151 शी किंवा मामा या शब्दाचा 4141 या आकड्याशी काही देणे-घेणे असू शकते काय? हे प्रश्न हास्यास्पद असले तरी त्यांचे होय असे उत्तर आहे. कारण वार्याशी गप्पा मारत गाड्या उडवणार्या सध्याच्या तरुणाईला नंबर प्लेटवर आकड्यांना शब्दाचे रूप देण्याच्या फॅशनने ग्रासले आहे. फॅन्सी क्रमांक टाकण्याचे हे फॅड कायदेभंगाच्या चौकटीत बसवण्याऐवजी शहर वाहतूक पोलिसही याकडे दुर्लक्ष करणेच अधिक पसंत करतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे...
  August 17, 12:53 PM
 • अमरावती- शहरातील एक लाख नागरिकांसाठी खुशखबर! पाण्यासाठी वाट पाहणार्या शहरातील चार झोनमध्ये भर उन्हाळ्यात 24 तास पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून, अमरावतीला वॉटर सिटी बनवण्याचा मानस आहे. अर्जुननगर, मायानगर, साईनगर, विद्यापीठ परिसर अशा चार झोनमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुमारे दोन वर्षांपासून 24 तास पाणीपुरवठा सुरू केला आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभला; तसेच पाण्याची बचतदेखील होत असल्याने आता भीमटेकडी,...
  August 17, 12:37 PM
 • अमरावती- बसपा नगरसेविकेच्या पतीसोबत आलेल्या सर्मथकांनी रमाई घरकुल योजनेचे सहायक अभियंता दिनेश हंबर्डे यांना त्यांच्याच कक्षात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्याचे पडसाद महापालिकेत उमटले. मनपा अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नगरसेविकेच्या पतीविरोधात शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी-कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलनामुळे महापालिका प्रशासन प्रभावित झाले आहे. आमदार रावसाहेब शेखावत यांच्या उपस्थितीत आयोजित रमाई घरकुल योजनेच्या आढावा बैठकीला का...
  August 17, 12:27 PM
 • अकोला- मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक हजार 97 घरे बाधित झाली आहेत, तर तीन हजार 390 व्यक्ती बाधित झाल्या आहेत. यासोबतच बाधित गावांची संख्या 303 आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. या शेतीचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत जिल्हय़ात अतिवृष्टी व नदी-नाल्यांना आलेल्या नुकसानीबाबत तहसीलदारांकडून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार 28 हजार 701 हेक्टरवरील पिकांचे खरडून नुकसान...
  August 17, 12:01 PM
 • अकोला- स्वातंत्र्यदिनी शिक्षकेतर कर्मचार्यांच्या रंगलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. हा जुगार तापडियानगर परिसरातील अपार्टमेंटच्या टेरेसवर रंगला होता. गजानन अपार्टमेंटच्या टेरेसवर जुगार रंगल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकत उदय अंजन कुलकर्णी (लिपिक), रवी भीमराव हरणे (लिपिक), ललित सुरेश दुबे, राहुल गजानन कुलकर्णी, विजय रामराव निकम, राजेश सखाराम चांडे (लिपिक) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्यात...
  August 17, 11:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED