Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - शहर बससेवेचा महापालिका व संस्थेमधील करार 31 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. सत्ताधारी व मनपा अधिकारी केवळ बैठकांमध्ये व्यस्त असल्याने कराराबाबत मंगळवारी निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे एक ऑगस्टपासून बसेस धावणार की थांबणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. सत्ताधार्यांचा बैठकींचा दिखावा शहर बस उपक्रमाबाबत मनपा, अकोला प्रवासी आणि मालवाहू सहकारी संस्थेचा करार झाला आहे. संपुष्टात येणारा करार आणि तोट्यातील उपक्रमाबाबत महापौर ज्योत्स्ना गवई, उपमहापौर रफिक सिद्दीकी, भारिप-बमसंचे...
  July 31, 12:36 PM
 • अकोला - शहर महापालिकेची हद्दवाढ करण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत शासनाने ताजी आकडेवारी मागितल्याने हद्दवाढीची शक्यता बळावली आहे. निर्णय झाल्यास महापालिका बरखास्त होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हद्दवाढ झाल्यास विकासकामांना अधिकचा निधी मिळेल, अशी आशा अधिकारीवर्गातून व्यक्त होत आहे. शासन स्तरावर अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास या भागातून जमीन विकास शुल्क, बांधकाम विकास शुल्क, गुंठेवारी विकास शुल्क,...
  July 31, 12:31 PM
 • अकोला - शिघ्र दुधासाठी दुभत्या जनावरांवर प्रतिबंध घालण्यात आलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची शहरात सर्रासपणे विक्री केली जात आहे. ऑक्सिटोसिनमुळे जनावरे लवकर दूध देतात. पशुपालकांची ही घाई नागरिकांच्या मात्र जीवावर उठली आहे. कारण हे दूध प्राशन केल्याने मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. बिहार, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील टोळी यासाठी सक्रिय आहेत. या टोळीत अकोल्यातील काहींना संपर्क करत ऑक्सिटोसिन इंजेक्शनची विक्री करतात. त्यास पशुपालकांचीही साथ मिळत आहे. मुलांमध्ये नपुंसकत्वाचा धोका...
  July 31, 12:29 PM
 • सातत्याने कोसळणार्या जलधारांमुळे विदर्भातील महाबळेश्वर असा लौकिक असलेल्या चिखलदर्याचे सौंदर्य बहरले आहे. अकोटहून (जि. अकोला) अंजनगावमार्गे परतवाडा आणि परतवाड्यावरून धामणगाव गढीमार्गे गेल्यास चहूबाजूने बहरलेली हिरवळ आल्हाददायक प्रवासाची अनुभूती देते. भीमकुंड, गाविलगड, देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, फॉरेस्ट गार्डन, पंचबोल इको पॉइंट ही स्थळे डोळ्याचे पारणे फेडतात.
  July 30, 02:11 PM
 • अकोला - पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढू, असे स्पष्ट संकेत ज्येष्ठ व तरुण नेत्यांनी आज दिव्य मराठीशी बोलताना दिले. राजकीय क्षेत्रात आपण माघारी फिरलो नसून, पक्षाच्या आदेशानुसार कुणाच्याही विरोधात लढा देण्याचा निर्धार ज्येष्ठांनी व्यक्त केला. बाळापूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असून, हा मतदारसंघ भारिप-बमसंच्या ताब्यात आहे. बळीराम शिरस्कार हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणूकीत भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांना बाळापूर येथून प्राप्त मतदानाच्या टक्केवारीवर येथील...
  July 30, 12:31 PM
 • अकोला - रोजगार व स्वयंरोजगार विभागाची वेबसाइट तांत्रिक बिघाडामुळे खराब झाली आहे. याकडे अधिकार्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून रोजगारासाठी एकाही विद्यार्थ्याला संदेश प्राप्त झाला नाही. नोकरीसाठी संधी उपलब्ध व्हावी, या अपेक्षेने हजारो विद्यार्थी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करतात. या कार्यालयांतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महा ई-सेवा केंद्र, तंत्रशिक्षण महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नोंदणी करता...
  July 30, 12:26 PM
 • अकोला - विजेचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी मिक्सर, ग्राईंडर आणि पाण्याचा पंप चालवू शकता. मेहरबानो महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात बेलखेडच्या सावित्रीबाई कन्या विद्यालयातील ऋतुजा वानखडे या विद्यार्थिनीने अशी वाचवा वीज या प्रकल्पाच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे. दहावीत शिकणार्या ऋतुजाने यासाठी जुन्या सायकलचा वापर केला. प्रदर्शनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमुळे अनेकांना प्रेरणा मिळालीच, शिवाय मान्यवरही विद्यार्थ्यांमधील...
  July 30, 12:11 PM
 • अकोला - सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे सुरक्षेबाबत ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात पोलिस प्रशासनाकडूनही निराशाच पडली आहे. अधिसूचनेनुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यांचा अहवाल दर महिन्याला पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकार्यांना सादर करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयानेच असा कोणताही अहवाल पाठवण्यात येत नसल्याचे माहितीअंतर्गत लेखी कळवले...
  July 30, 12:02 PM
 • अकोला - बनावट दस्तावेजांच्या आधारे पीककर्ज घेऊन सिंडीकेट बँकेच्या फसवणूकप्रकरणी बँकेचे दोन अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. यामध्ये हे अधिकारीही लाभार्थी असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दामले चौकातील सिंडीकेट बँकेत नऊ शेतकर्यांनी 2005 ते 2009 या कालावधीत पीक कर्जासाठी अर्ज केले होते. मात्र, बनावट दस्तावेजांच्या आधारे कर्ज घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी 14 लाख 39 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आठ कर्जदारांना अटक...
  July 30, 11:59 AM
 • गुड न्यूज । महसूल, विमानतळ प्राधिकरण अधिकार्यांनी केली पाहणी अकोला - शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या शिवणी विमानतळाची धावपट्टी विस्तारीकरणासाठी मोजण्यात आली. सोमवारी करण्यात आलेल्या या मोजणीत महसूल, विमानतळ प्राधिकरण, भूमी अभिलेख व कृषी विद्यापीठाचे अधिकारी संयुक्तपणे सहभागी होते. शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. तूर्तास या विमानतळाची धावपट्टी सुमारे 1400 मीटर लांब आहे. धावपट्टी सुमारे 1800 मीटर किंवा 2100 मीटर करण्याची गरज आहे. कृषी...
  July 30, 11:54 AM
 • अकोला - सर्वोपचार रुग्णालयाने गांभीर्य दाखवत सोमवारी क्षयरोग वॉर्डातील सामान्य रुग्णांना दुसर्या खोलीत हलवले. रुग्णालयात क्षयरोग पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांवरही उपचार केले जात होते. या प्रकाराने सामान्य रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे वृत्त दिव्य मराठीने सोमवारी प्रकाशित केले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने त्वरित कारवाई करत रुग्णांवर त्याच वॉर्डातील दुसर्या खोलीत उपचार करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरापासून...
  July 30, 11:50 AM
 • अकोला- चतुर्मासात आषाढी एकादशीपासून विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यात नागपंचमी, श्रावण सोमवार, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा, हरतालिका, गणेशोत्सव, ऋषिपंचमी, महालक्ष्मी (गौरी) पूजन, श्राद्धपक्ष (सर्वपित्री अमावस्या), नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच दिवाळी पर्वाचा समावेश आहे. यादरम्यान लग्नसमारंभ होणार नाहीत; मात्र 13 नोव्हेंबरपासून लग्नाची धामधूम सुरू होणार आहे. पंडित गदाधर शास्त्री यांनी सांगितले आषाढातील पाच दिवस, श्रावणाचे 30 दिवस, भाद्रपदचे 30 दिवस,...
  July 29, 10:25 AM
 • अकोला- शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात सिलिंडरची कृत्रिम टंचाई भासत आहे. पैसे देऊनही नागरिकांना दिवस दिवसभर सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर अवैधरीत्या सिलिंडरची विक्री होत असल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. यावर नियत्रंण ठेवणारा जिल्हा पुरवठा विभाग मात्र, याबाबत अनभिज्ञ आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन सिलिंडर बुकिंग सुरू झाल्यानंतर शहरात सिलिंडरसाठी नागरिकांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. आपले कामे बाजूला ठेवून...
  July 29, 10:20 AM
 • अकोला- प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना आता आरक्षित रेल्वेच्या डब्यात पाय ठेवता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने आता वेटिंगसंदर्भातील नियम बदलले आहेत. त्यानुसार नेहमी आरक्षण निश्चित करून प्रवास करणार्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. रेल्वेचा हा निर्णय अनेक प्रवाशांच्या मुळावर उठला असला तरी, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये कही खुशी कही गमचे वातावरण आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा आरक्षण निश्चित झाले नसले तरी वेटिंगवर उभे राहून जाऊ, असे म्हणून...
  July 29, 10:12 AM
 • अकोला- मान्सूनच्या आगमनामुळे फुलपाखरांच्या 70 प्रजातींचे निरीक्षण करण्याची संधी अकोलेकरांना उपलब्ध झाली आहे. क्रीमसन रोझ, कॉमन रोझ, डॅनाईड एगफ्लायसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींसह ग्रास येलो, कॉमन येलो, मॉटेल येलो, लाईम बटरफ्लाय, कॉमन क्रो यांचा यात समावेश असून, हिरवळीवर फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यावर बागडणारी फुलपाखरे सध्या सार्यांचे लक्ष वेधत आहेत. जगभरात अस्तित्वात 15 लाख सजीवांच्या प्रजातींपैकी आठ लाख प्रजाती केवळ किटकांच्या आहेत. फुलपाखरे आणि पतंगांच्या संख्या त्यात...
  July 29, 09:54 AM
 • अकोला- अकोला मध्यवर्ती बसस्थानक सध्या समस्यांचे आगार बनले आहे. बसस्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. समस्यांचे हे बसस्थानक कधी हायटेक होणार, या प्रतीक्षेत प्रवासी आहे. त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बसस्थानकावर मनोरंजनासाठी लावण्यात आलेला एलसीडी मागील काही दिवसांपासून बंद आहे. तसेच काही पंखे आणि पथदिवे देखील बंद आहेत. प्रवाशांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले तिकीट दर...
  July 29, 09:51 AM
 • अकोला- आठवडाभर बाहेरगावी जायचे आहे, पण डॉगीला कुठे ठेवायचे? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. पण, आता काळजी करायची गरज नाही. कारण अकोल्यात लवकरच डॉग होस्टेल सुरू होत आहे. शहरामध्ये बहुतांश नागरिकांकडे लेब्रेडॉल, जर्मनशेपर्ड, बॉक्सर, रॉट व्हीलर, पामोरेरियन, ग्रेड डेन, डॉबरमॅन अशा विविध जातीची कुत्रे पाळली जातात. कुत्रे पाळणे आणि त्याची काळजी घेण्यापेक्षा कठीण जर कुठले काम असेल, तर ते बाहेरगावी जाताना लाडक्या डॉगीला कुठे ठेवायचे याचे. श्वानप्रेमींना पडणार्या या प्रश्नाचे उत्तर पशू व...
  July 29, 09:46 AM
 • अकोला- मनपाला शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून सिग्नल व्यवस्था सुस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर अकोल्यातील सिग्नल व्यवस्था दुरुस्ती व देखभालीसाठी बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊ, असे सत्ताधार्यांनी स्पष्ट केले आहे. बीओटीमुळे होऊ शकतो शहराचा विकास असे वृत्त दिव्य मराठीने शनिवारी प्रकाशित केले होते. शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला 26 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यांतील 1 कोटी रुपयांचा खर्च शहरातील सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग आदींवर खर्च...
  July 29, 09:39 AM
 • अकोला-क्षयरोगाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच सामान्य रुग्णांवरही उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात होत आहे. त्यामुळे संसर्गजन्य असलेल्या या आजाराचा सामान्य रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे; मात्र या प्रकाराकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात असलेल्या सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या बाजूला क्षयरोग नियंत्रण वॉर्ड आहे. या ठिकाणी क्षयरोगाच्या सामान्य आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर...
  July 29, 09:32 AM
 • अकोला - अत्यंत रुबाबदार व एका डरकाळीनेही भल्याभल्यांची पाचावर धारण बसवणारा भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आज अस्तित्वासाठी झगडतो आहे. मागील शंभर वर्षांत जगभरातील 97 टक्के वाघ नाहीसे झाले असून, एक लाख वाघांपैकी केवळ 3,200 वाघ शिल्लक आहेत, तर देशात काही दशकांपूर्वी 40 हजारांवर असलेली त्याची संख्या आज केवळ 1,706 वर येऊन ठेपली आहे. भारतीय जंगलांचे वैभव म्हणून वाघांकडे पाहिले जाते. शक्तीचे वाहन असलेला वाघच मात्र आज अस्तित्वासाठी झगडत आहे. घनदाट जंगलांचा अभाव व अन्न न मिळणे, शिकार ही वाघांची संख्या कमी...
  July 28, 08:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED