Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - राज्य शासनाकडून समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणारी सूट एसटी प्रशासनासाठी बोजा ठरत आहे. शासनाकडे थकित असलेल्या सवलत रकमेत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली असून, त्या तुलनेत राज्य सरकारकडून एसटीला परतावा मिळाला नाही़ सवलतीच्या योजनांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याने एसटी प्रशासन त्रस्त आहे. मागील पाच वर्षांत या सवलतीच्या रकमेचा आकडा भलताच वाढला आह़े त्यामुळे एसटीला सवलत योजना अवजड ठरत आहेत़ एसटी महामंडळाने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आह़े 2008-09 मध्ये...
  August 14, 11:39 AM
 • अकोला - वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर जुने शहर पोलिस ठाण्यात सोमवारी 12 ऑगस्टला कर्मचार्यांचा कायद्याचा पेपर घेण्यात आला. ही परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि पोलिसांनी एकमेका साहाय्य करू.. ही उक्ती प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवली. दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले पोलिस कर्मचारी या परीक्षेत सहभागी झाले होते. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचार्यांना अधिकार्यांनीही सहकार्य केले. सर्वांनी प्रश्न-उत्तरांची देवाणघेवाणही केली गेली. पोलिस दादांनी एकमेकांच्या...
  August 13, 11:59 AM
 • अकोला - हैदराबाद येथील मज्जलिस ए इत्तेहादूल अल मुसलमिन अर्थात एमआयएम या राजकीय पक्षाच्या अकोल्यात होणार्या उभारणीकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस या पक्षाचे संभाव्य पदाधिकारी, सदस्य, पक्ष कार्यालयाबाबत माहिती संकलीत करीत आहेत. एमआयएमचे आमदार अकरोबुद्दिन ओवेसी यांचे अकोल्यात ईदची शुभेच्छा देणारे फ्लेक्स बोर्ड झळकल्यामुळे पक्ष बांधणीचे संकेत प्राप्त झाले आहेत. एमआयएमने आता विदर्भात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यातही पक्ष विस्तार होणार आहे. अशातच एमआयएमची...
  August 13, 11:50 AM
 • अकोला - पीक कर्ज फसवणूक प्रकरणात पोलिसांनी देना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र गुन्नाडे आणि कर्जदार सतीश सहदेव गुव्हाळे यांना 12 ऑगस्ट रोजी अटक केली. या दोघांची तीन दिवसांकरिता पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. देना बँकेमार्फत वितरण करण्यात आलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची तहसील कार्यालयाने चौकशी केली. अधिकारी व कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अफरातफरी भोवली ? कर्ज मंजूर करताना...
  August 13, 11:44 AM
 • अकोला - एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होत असताना जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतून दररोज 9,800 कोटी लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. एवढे पाणी वाहत जात असताना मात्र पाणी अडवण्याचा कुठलाही प्रयत्न शासनाकडून होत नसल्याची खंत आहे. हे पाणी पूर्णा, तापी नदीमार्गे पुढे खान्देशात जात आहे. जिल्ह्यात काटेपूर्णा, मोर्णा, निगरुणा आणि उमा अशी चार महत्त्वाची धरणे आहेत. या धरणांमध्ये पाणी साठवण्याची पातळी वेगवेगळी असून, या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निकड...
  August 13, 11:41 AM
 • अकोला - जिल्हय़ात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत असलेल्या रस्त्यांपैकी सुमारे 200 किलोमीटर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे हे नुकसान झाले असून, या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी जवळपास दोन कोटींची गरज आहे. जिल्हय़ातील 151 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे नवीनीकरण करावे लागणार आहे. लहान पूल, रस्त्याचा व पुलांचा पोहोच मार्ग, गटारांची दुरुस्ती करावी लागणार आहे. अतिवृष्टीमुळे कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 62 कोटींची गरज भासणार आहे. जिल्हय़ातील प्रमुख राज्य मार्गांपैकी पाच किलोमीटर...
  August 13, 11:28 AM
 • अकोला- पाऊस टाळतो येणे, कधी विसरतो जाणे, कणसाच्या गावाकडली वाट हरविती दाणे या तिफनकार विठ्ठल वाघांच्या ओळीतून पावसाची दोन्ही रुपे अल्पाक्षरात पावसाक्षरं च्या निमित्ताने दिसून आली. पावसाचे अनेकविध रंग, भाव, स्वभाव, रुप कविंनी उलगडले. शब्द आणि टाळ्यांच्या पावसाचा सभागृहात पूर होता. विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे साने गुरुजी वाचनालयाच्या सहकार्याने दहा ऑगस्टला पावसाक्षरं या पावसावर आधारित काव्यमैफील झाली. अध्यक्षस्थानी वर्हाडी कवी विठ्ठल वाघ होते. व्यासपीठावर साहित्य...
  August 11, 11:01 AM
 • अकोला- साप आणि मुंगसाच्या लढाईसोबतच हातचलाखीचे अनेक प्रयोग दाखवणारा कजबी कलाकार असलेले गारुडी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने 2002 पासून आणलेल्या कायद्यानंतर डमरूच्या तालावर सापाचे खेळ करणार्या गारुडींचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला असला तरी, अद्यापही नागपंचमीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात गारुडींची वाट पाहिल्या जाते. सरकारच्या कायद्यामुळे गारुडी जमातीच्या पोटावर पाय पडला असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या 11 वर्षांपासून कायम आहे. गारुडी समाजाचे अकोल्यात आता...
  August 11, 10:54 AM
 • अकोला- हैदराबाद येथील मज्जलिस ए इत्तेहादूल अल मुसलमिन अर्थात एमआयएम या राजकीय पक्षाची उभारणी अकोल्यात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. एमआयएमचे आमदार अकरोबुद्दिन ओवेसी यांचे अकोल्यात ईदची शुभेच्छा देणारे फ्लेक्स झळकल्याने पक्ष बांधणीचे संकेत प्राप्त झाले. एमआयएमची कार्यप्रणाली लक्षात घेता अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करणार्या अनेक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एमआयएमची धडक ही काही पक्षाच्या मुळावर तर काहींच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. अल्पसंख्यांकासाठी...
  August 11, 10:52 AM
 • अकोला- करिअर घडवतानाच विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव शास्त्रीनगरात आठ ऑगस्टला रात्री झालेल्या घटनेच्या निमित्ताने उजेडात आले आहे. क्षुल्लक कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्याला मारहाण केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. गौरव प्रकाश गावंडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दृष्टिक्षेप घटनेवर.. तीनही विद्यार्थ्यांमध्ये प्रभात ले-आऊट,...
  August 10, 11:57 AM
 • अकोला- राजकीय नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक ही एक परीक्षा असते. या परीक्षेला अद्याप वेळ आहे. त्यामुळे जिल्हय़ातील आजी-माजी आमदारांनी पदवी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी हे दोन्ही लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी एकाच खोलीत परीक्षा देतील. यासाठी त्यांनी येथील एका महाविद्यालयात मुक्त प्रवेश घेतला आहे. दरम्यान यातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला. जीवनभर माणूस शिकत असतो, अशी शिकवण आहे. नेते कधी कार्यकर्त्यांकडून तर कधी वरिष्ठ नेत्यांकडून शिकतात. आमदार होण्यासाठी...
  August 10, 11:57 AM
 • अकोला- भरदिवसा घडणार्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू केलेल्या सिटिझन पोलिसिंगच्या उपक्रमाला तडा देण्याचा प्रयत्न आठ ऑगस्टला रात्री करण्यात आला. माधवनगर आणि गुरुकुल कॉलनी परिसरातील सहा कारची तोडफोड करण्यात आली. या उपक्रमामुळे घरफोडी आणि चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड केली असावी, अशी शक्यता पोलिस आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. काय घडले आठ ऑगस्टच्या रात्री माधवनगरातील सागर...
  August 10, 11:46 AM
 • अकोला - डॉक्टरांना देव मानणारे अनेक जण आज समाजात आहेत. कठीणप्रसंगी दु:खाच्या वेदनेतून बाहेर काढणारे डॉक्टरच असतात. मात्र, रुग्ण दगावला की त्याच डॉक्टरला दोष देऊन नातेवाईक रान उठवतात. या प्रवृत्तीला अपवाद ठरणारा अनुभव गुरुवारी डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या खासगी रुग्णालयात आला. तीन वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या मुलाच्या उपचाराचे पैसे डॉक्टरांना देण्यासाठी आलेल्या वडिलांकडून डॉक्टरांनीही पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, डॉक्टर आणि आपला मुलगा गमावलेल्या वडिलांनी ते पैसे कठीण...
  August 9, 09:39 AM
 • अकोला - घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानाचा प्रश्न दप्तर दिरंगाईत अडकला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आश्वासनांव्यतिरिक्त ठोस कारवाई या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून झाली नाही. 2008 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी र्शीकर परदेशी यांनी स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवासस्थाने बांधावी, असा निर्णय घेतला होता. तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांनी त्याला मान्यता दिली होती. रामदासपेठेतील महसूल विभागाच्या खुल्या जागेत स्वातंत्र्य...
  August 9, 09:37 AM
 • अकोला - सीलिंग कायद्याला आमचा विरोध आहे. याचा निषेध आम्ही करतो. येत्या 10 ऑगस्ट रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे अमरावती येथे पुढील रणनीती घोषित करतील. शेतीचे तुकडे कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका राहणार आहे, असे मत शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी येथे व्यक्त केले. येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. सीलिंग कायद्याचा फटका राज्यात विदर्भ व मराठवाडा या भागातील कोरडवाहू शेती करणार्या शेतकर्यांना बसणार आहे. शेतकरी...
  August 9, 09:35 AM
 • वर्धा - शेतातील काम आटोपून परतताना डोंगा उलटल्याने नदीत बुडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथे वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ घडली. डोंग्यात 30 ते 35 शेतमजूर प्रवास करत होते. हिंगणघाट येथील शेतमजूर कान्हापूर (बोरगाव) शिवारात शेतातील कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून सायंकाळी दोन जोडलेल्या डोंग्यांनी ते घरी परतत होते. वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ खडकाला धडकलेल्या डोंग्याचे दोन तुकडे होऊन सगळे मजूर नदीच्या...
  August 9, 09:34 AM
 • अकोला - जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे अकोला शहरासह जिल्ह्यातील एकाही जवानाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नोंद ठेवण्याचे काम नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम निवडणूक विभाग व गृह शाखेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील जवान देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. यामध्ये आर्मी, एसआरपी, सीआरपीएफ यासह अन्य विभागाचा समावेश आहे. काश्मीरमधील पूंछ भागात भारतीय लष्कराच्या...
  August 9, 09:33 AM
 • अकोला - मागील महिन्यात खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांचे एक पथक सुरत येथे गत तीन दिवसांपूर्वी गेले होते. या चोरीतील 70 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एक आरोपी अटकेत आहे. खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या केशवनगर येथील रहिवासी उंबरकार यांच्या घरी चार लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांनी दौलताबाद येथून शेख लियाकत शेख बाबू या आरोपीला अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे....
  August 9, 09:32 AM
 • अकोला - शहर व ग्रामीण भागातील अनेक बार मालकांना त्यांच्या बारचे नूतनीकरण झाल्याचे प्रमाणपत्र (लायसन्स) मिळाले नाही. लायसन्सशिवाय अनेक बार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. जिल्हय़ात एसएल थ्री या वर्गवारीत 111 बार आहे तर सीएल थ्री या वर्गवारीत 30 देशी दारूचे दुकान आहे. यांपैकी अनेक बारचालकांना त्यांचे लायसन्स मिळाले नाही. बार मालकांना 1 मार्च रोजी हे प्रमाणपत्र मिळण्याची गरज होती. दरवर्षी बार मालक एप्रिल महिन्यात शासकीय चलान या माध्यमातून नूतनीकरणासाठी आवश्यक लायसन्स फी सरकारला अदा...
  August 9, 09:27 AM
 • अकोला - अकोटफैल भागातील नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली जमा केलेला सुमारे 47 हजार रुपयांचा निधी महापालिकेत जमाच झाला नाही. या प्रकरणाची जलप्रदाय विभागाने चौकशी सुरू केली आहे. पाणीपट्टीच्या नावाखाली जमा झालेला हा निधी नेमका गेला कुठे ?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या प्रकरणातील निधीचा अपहार हा वसुलीकर्ता व कुली पदावर कार्यरत असलेल्या मारोती शेंडे यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर विभागाने चौकशीअंती ठेवला, अशी माहिती मिळाली आहे. नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली...
  August 9, 09:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED