Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- शहरात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस चांगलाच गाजला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रिपाइंच्या दोन गटांची वेगवेगळी आंदोलने केली. युवक आघाडीचा रास्ता रोको पाच ऑगस्ट रोजी रिपाइंच्या (आठवले गट) युवक आघाडीने रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात पश्चिम विदर्भाचे मुख्य संघटक अशोक नागदेवे, कार्याध्यक्ष सुनील अवचार, युवक आघाडीचे महानगराध्यक्ष गोपाल...
  August 6, 11:30 AM
 • अकोला- मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी निलंबित असलेल्या कर्मचार्यांच्या वेतनाचा पैसा शासनाने द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली. निलंबित माजी आयुक्त जी. एन. कुर्वे हे जुलै महिन्यात निवृत्त झाले. तसेच उपायुक्त उमेश कोठीकर हे एका प्रकरणात निलंबित असून, त्यांना 75 टक्के पगार द्यावा लागत आहे. या दोघांवर सुमारे 60 हजार रुपयांचा मासिक खर्च गेल्या महिन्यापर्यंत होता. निलंबन काळात या दोघांवर वेतनापोटी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे हे पैसे राज्य शासनाने द्यावे, अशी मागणी...
  August 6, 11:26 AM
 • अकोला- शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी आठ कोटी रुपये महापालिकेकडून खर्च करण्यात येतो. मात्र, असे असतानाही नागरिकांना चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणात पाणी असल्यामुळे रोज पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, अभियंता व कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे रोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. रोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 16 कोटी रुपयांची गरज आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या सात लाखांवर आहे. पण, महापालिकेच्या लेखी साडेचार लाख नागरिकांना...
  August 6, 11:22 AM
 • अकोला- महापालिका पूर्व झोन कार्यालय परिसरात जुगार खेळणार्या सहा कर्मचार्यांना आयुक्त दीपक चौधरी यांनी सोमवारी निलंबित केले. निलंबित कर्मचार्यांमध्ये सहायक कर अधीक्षक संतोष नायडू, नंदकिशोर उजवणे, लिपिक राजेश सांळुखे, दीपक महल्ले, र्शीकृष्ण कडू, जितेंद्र रणपिसे यांचा समावेश आहे. महापालिका आवारात जुगार खेळणे हा सर्व प्रकार गैर असून, यामुळे महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त दीपक चौधरी यांनी दिली. शासकीय...
  August 6, 11:18 AM
 • अकोला- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी रिपाइंतर्फे (आठवले गट) दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार आहेत. रिपाइं जिल्हा व महानगरतर्फे रेल रोको, तर रिपाइंच्या युवक आघाडीतर्फे रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको करण्यात येईल. सारख्या मागणीसाठी एकाच परिसरात एकाच पक्षातर्फे दोन आंदोलन होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने रिपाइं नेत्यांमधील गटबाजी पुन्हा एकादा चव्हाट्यावर येणार काय, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपाइंचे महागराध्यक्ष गजानन कांबळे यांनी रेल्वे...
  August 5, 11:29 AM
 • अकोला- मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही अकोलेकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. अकोला शहरासंदर्भात अनेक प्रश्न रेंगाळत पडून आहेत. शिवणी विमानतळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासना व्यतिरिक्त अकोल्याला कुठलाही लाभ या अधिवेशनातून झाला नाही. विधानसभा व विधान परिषदेतील नऊ सदस्य जिल्ह्याला लाभले आहेत. वर्षात होणार्या तिन्ही अधिवेशनात चर्चा होऊन तोडगा निघण्यासाठी जिल्ह्यातील आमदार अनेक प्रश्न विधिमंडळात पाठवत असतात. त्यापैकी काही प्रश्नांची तारांकित, तर...
  August 5, 11:24 AM
 • अकोला- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तातडीने बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृहाजवळ 4 ऑगस्टला दुपारी 1 वाजता आंदोलन केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक धीरज राऊत, सनातन संस्थेच्या मेघा वसंत जोशी, अखिल भारतीय गुजराथी समितीचे डॉ. प्रवीण चौहान आदी सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराचे आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेने माहिती...
  August 5, 11:13 AM
 • अकोला- पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस आढळून आलेल्या चार बॅग्स्मध्ये 70 किलो गांजा असल्याचे 4 ऑगस्टला उजेडात आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. या बॅग्स् अकोल्याच्या रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्या होत्या. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील बोगी नंबर एस-2 मध्ये चार बेवारस बॅग्स असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने येथील जीआरपीच्या कर्मचारी आणि अधिकार्यांना दिली. जीआरपीने फलाट क्रमांक 1 वर धाव घेत चार बॅग्स् ताब्यात घेतल्या. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी 4...
  August 5, 11:10 AM
 • अकोला- पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस आढळून आलेल्या चार बॅग्स्मध्ये 70 किलो गांजा असल्याचे 4 ऑगस्टला उजेडात आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. या बॅग्स् अकोल्याच्या रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्या होत्या. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील बोगी नंबर एस-2 मध्ये चार बेवारस बॅग्स असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने येथील जीआरपीच्या कर्मचारी आणि अधिकार्यांना दिली. जीआरपीने फलाट क्रमांक 1 वर धाव घेत चार बॅग्स् ताब्यात घेतल्या. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी 4...
  August 5, 11:10 AM
 • अकोला- मनपाच्या शाळा क्रमांक 15 मध्ये थाटलेल्या पूर्व झोन कार्यालयात रंगलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री 8 वाजता छापा टाकला. या छाप्यात दोन कर अधीक्षकांसह सात जणांना अटक करण्यात आली. जठारपेठ परिसरात महापालिकेचे पूर्व झोन कर वसुली कार्यालय आहे. रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी.एन.फड, हेडकॉन्स्टेबल मनोहर मोहोड, शिवसिंग डाबेराव, र्शीकृष्ण गायकवाड, संदीप तवाडे यांनी झोन कार्यालयात छापा टाकला. पूर्व झोन कार्यालयात पत्त्याचा डाव रंगला...
  August 5, 11:04 AM
 • अकोला - हाडांची निगा न राखल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हाडांसह जोडांवर भरपूर अत्याचार होतो. त्याच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे सुमारे 70 टक्के अकोलेकरांना हाडे-सांधे दुखीचा त्रास असल्याची धक्कादायक माहिती डॉ. हेमंत जोशी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. जागतिक हाडे-सांधे दिनानिमित्त (बोन अँड जॉइंट डे) हाडांच्या व जोडांच्या विविध आजारांसंदर्भात त्यांनी विस्तृतपणे सांगितले. डॉ. जोशी म्हणाले, की गुडघ्यांचे व्यायाम, इंजेक्शन व काही वेदनाशामक गोळ्या घेतल्यास...
  August 4, 02:05 PM
 • अकोला - शहरातील कचर्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी गाजली. या बैठकीत विविध ठिकाणी साचलेल्या कचर्याचा मुद्दा पदाधिकार्यांनी उपस्थित केला. उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना नियमित शहरातील साफसफाई करण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेंद्र दर्डा होते. खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम शिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड,...
  August 4, 02:01 PM
 • मैत्रीची साथ अनेक पैलूंनी विणलेली असते. जीवनात मैत्री आवश्यक असल्याचे सांगून आपली संस्कृती जपणाराच हा दिवस असल्याचे मत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फ्रेन्डशिप डेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. फ्रेन्डशिप डेला विरोध करणे अयोग्य आहे. विरोध करणार्यांच्या जीवनात मित्र किंवा प्रेमाचे व्यक्ती नाहीत का, असा टीकात्मक सवालही त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाशी तरी गाठ पडते, स्नेहसंबंध जुळतात. मैत्रीच्या अतूट गाठीतून जीवनात...
  August 4, 01:00 PM
 • अकोला - मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे महान, वान व दगडपारवा या धरणाचे प्रत्येकी चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील 24 तासांत 186 मिमी. पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद केली आहे. संततधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. पावसामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागले आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. शाळा,...
  August 3, 10:20 AM
 • अकोला - न्यायालयाच्या जागेवर 15 वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणाचा शुक्रवारी सफाया करण्यात आला. अतिक्रमण काढताना पोलिस-वकील आणि अतिक्रमणधारक एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करत अतिक्रमणधारकांचा विरोध मोडीत काढला. त्यामुळे मनपा प्रशासनाने अतिक्रमण काढता आले. महसूल अधिकारी, मनपा प्रशासन, पोलिस, अकोला बार असोसिएशनचे सदस्य आणि कोर्ट कमिश्नर यांनी शुक्रवारी अतिक्रमण काढण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी काही झोपड्या, पक्की घरे आणि हॉटेल...
  August 3, 10:18 AM
 • अकोला - तब्बल 22 तासांपासून पुराच्या वेढय़ात अडकलेल्या टाटा स्कॉर्पिओतील 11 जणांची अखेर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता रेल्वेच्या मदतीमुळे सुखरूप सुटका करण्यात जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व अजिंक्य साहसी संघास यश आले. थांबा नसतांनाही रेल्वेगाडी किनखेड पूर्णा स्थानकावर थांबविण्यात आली आणि बचावपथक अडकलेल्यांपर्यत पोहोचू शकले. चोहोट्टा बाजार व केळीवेळीला नातेवाइकांकडे स्कॉर्पिओ गाडीने कामानिमित्त गेलेले मेहेत्रे व अंबळकार कुटुंब गुरुवारी रात्री परतीच्या प्रवासात रात्री...
  August 3, 10:16 AM
 • अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या चांदी प्रकल्पातील झाडांवर चढलेली माकडे अचानकपणे आलेल्या पावसामुळे तब्बल दीड दिवस खालीच उतरू शकली नाहीत. अखेर शुक्रवारी (2 ऑगस्ट) शासकीय यंत्रणा आणि प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी बारा माकडांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चांदी प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी पाणी नव्हते. या भागात असलेल्या झाडांवर नेहमीच माकडे बसतात. नेहमीप्रमाणे 31 जुलैला झाडावर चढलेले माकड खाली उतरू शकले नाहीत. कारण 31 जुलैला...
  August 3, 10:15 AM
 • अकोला - शहरात गुरुवारीही सलग तिसर्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वे-बससेवेवरही याचा परिणाम दिसून आला. रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याचे प्रवाशांचे टाइमटेबल कोलमडले तर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांचे कामकाजही प्रभावित झाले. 110 बस झाल्या रद्द एसटी बसलाही पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे गुरुवारी एसटीच्या 110 गाड्या रद्द करण्यात आल्या. गांधीग्रामजवळील पुलावर पाणी आल्याने अकोटकडे जाणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या. अकोट...
  August 2, 10:10 AM
 • अकोला - शालेय क्रीडा स्पर्धांचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी पावसाच्या व्यत्ययानंतर क्रीडांगणांची मात्र दुरवस्था झाली आहे. राज्यात दोन क्रीडा संकुले लाभलेला एकमेव अकोला जिल्हा यंदा 43 खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांसह पाच विभागीय व दोन राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी क्रीडांगणांची मलमपट्टी करणे आवश्यक असल्याचे मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. यंदा 1 ऑगस्टपासून सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेने क्रीडा हंगामाची सुरुवात होणार होती....
  August 2, 10:08 AM
 • अकोला - इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठय़पुस्तके गुरुवारी भरपावसात शाळांमध्ये पोहोचवण्यात आली. शिक्षण विभागाकडून पुस्तके वाटपात दिरंगाई होत असल्याची पालकांची ओरड होती. याची दखल घेत धास्तावलेल्या प्रशासनाने भरपावसात पुस्तके उपलब्ध करून दिली. जिल्हय़ातील सर्व शाळा सुरू होऊन एक महिना उलटूनदेखील इयत्ता पहिल्या आणि दुसर्या वर्गाची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी पुस्तकाविनाच शाळेत जात होते, तर शिक्षकांनाही पुस्तक कसे आहे, हे माहीत नव्हते. शिक्षणाधिकारी...
  August 2, 10:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED