Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणार्या 6 ते 14 वयोगटातील सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके देण्यात येत आहे. पहिली आणि दुसरीसह इतर आणखी दीड लाख पुस्तके मिळाली नसल्याने गेल्या 24 दिवसांपासून पुस्तकाविना मुलांची शाळा भरवण्यात आली आह़े या दीड लाख पुस्तकांची प्रतीक्षा कायम असून, हे पुस्तके केव्हा येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अकोल्यासाठी 1 लाख 76 हजार 128 विद्यार्थ्यांसाठी 12 लाख 18 हजार 653 पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण 10 लाख 67...
  July 22, 10:15 AM
 • अकोला- शहराला पाणीपुरवठा करणार्या दोन प्रमुख धरणांमधील जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून, अकोलेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी जलसाठय़ात वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणामध्ये पावसामुळे 80 टक्के जलसाठा झाला आहे. भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी शेतीच्या सिंचनालादेखील पाणी मिळणार आहे. महानचे दोन आणि वान धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने...
  July 21, 11:09 AM
 • अकोला- वेळेअभावी पती-पत्नीतला संवाद तुटल्याने ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे संसाररूपी वेलीला घटस्फोटाचे ग्रहण लागले असून, वर्षाकाठी अकोला शहरातून 40 संसार अध्र्यावरती मोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय 453 प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत. यावर्षीसुद्धा 12 जुलैपर्यंत 297 प्रकरणे दाखल झाली आहेत. अकोला शहरातील कौटुंबिक वादाचे प्रलंबित प्रकरणो निकाली काढण्यासाठी 20 डिसेंबर 2009 मध्ये स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कौटुंबिक...
  July 21, 11:06 AM
 • उन्हाळय़ात उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी आइस्क्रीमच्या गोडव्याचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड आता बदलला असून, आइस्क्रीम एव्हरग्रीन पदार्थ झाला आहे. रविवारी असलेल्या राष्ट्रीय आइस्क्रीम दिनानिमित्त शहरातील आइस्क्रीम पार्लरचा आढावा घेतला असता, अकोल्यात सर्वच ऋतूंमध्ये आइस्क्रीमला चांगली मागणी असल्याचे आढळून आले. कधीकाळी आइस्क्रीमला उन्हाळ्यात मागणी होती. एक गोड पदार्थ म्हणून आता आइस्क्रीमला मागणी वाढली आहे. आइस्क्रीमच्या फ्लेवरची युवकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे...
  July 21, 10:41 AM
 • अकोला - मागील 24 तासांत 8.00 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात करण्यात आली, तर सर्वात कमी पावसाची नोंद अकोट, बाळापूर तालुक्यात करण्यात आली. जिल्हय़ातील वान व काटेपूर्णा जलसाठय़ामध्ये वाढ झाली आहे. अकोला तालुक्यात 2.00 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच बार्शिटाकळी तालुक्यात 3.00 मि.मी., अकोट व बाळापूर तालुक्यात पाऊस निरंक आहे, तेल्हारा तालुक्यात 1.00 मि.मी., पातुर तालुक्यात 2.00 मि. मी., तर मूर्तिजापूर तालुक्यात 7.00 मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली...
  July 20, 10:11 AM
 • अकोला - महापालिका आयुक्तांचा कारभार आता महापालिकेतून नव्हे, तर थेट नेहरू पार्क चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक सभागृहातून पाहिला जात आहे. हा प्रकार महापौर व उपमहापौर यांना अवगत आहे. मात्र, त्यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले आहेत. महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांना भेटण्यासाठी नागरिक, नगरसेवक आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महापालिकेत येतात, परंतु त्यांचे दर्शन नागरिकांना होत नाही. मागील काही दिवसांपासूनचे हे वास्तव आहे. महापालिकेत सर्व सोयी-सुविधायुक्त कार्यालय असताना...
  July 20, 10:09 AM
 • अकोला - शहरात वाढलेल्या घरफोडया रोखण्यासाठी शहरात सिटीझन पोलिसिंगचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नागरिक आणि पोलिस संयुक्तपणे सहभागी होत आहेत. यासाठी खदान, गोरक्षणरोडवरील परिवार कॉलनी, आसरा कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, निवारा कॉलनी, केशवनगर, माधवनगर भागातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. अलीकडच्या काळात शहरात चोरी, घरफोडी, लुटमार यांसारखे संपत्तीचे गुन्हे घडण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील 20 दिवसांत सर्वात जास्त घरफोडीच्या घटना खदान पोलिस ठाण्यांतर्गत घडल्या. या सर्व घटना भरदिवसा...
  July 20, 10:07 AM
 • अकोला - अकोल्यात फूड व कॉटन पार्क होण्यासाठीचा प्रस्ताव राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सादर केला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. अकोल्यात फूड व कॉटन पार्क झाल्यास थेट प्रक्रिया केलेला माल बाहेर पडणार होता. मात्र, फूड व कॉटन पार्कचे अकोलेकरांचे दिवास्वप्नच राहणार की काय, अशी स्थिती सध्या आहे. अकोल्यासह पश्चिम विदर्भात मोठय़ा प्रमाणात फूड व कॉटन उत्पादन होत असले तरी या ठिकाणी प्रक्रिया उद्योग...
  July 20, 10:06 AM
 • अकोला - जातपडताळणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. त्यामुळे विभागीय जातपडताळणी कार्यालयात शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या ठिकाणी रांगेमध्ये लागण्यासाठी नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे गोंधळ उडाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अमरावती विभागाचे विभागीय जातपडताळणी उपविभागीय कार्यालय अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या तीन जिल्ह्यांची लोकसंख्या लक्षात...
  July 20, 10:05 AM
 • अकोला - शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 40 टक्के रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे वास्तव दैनिक दिव्य मराठीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. दिव्य मराठी चमुने प्रत्यक्षात रस्त्याची रूंदी मोजत वाढलेला अतिक्रमणांचा आढावा घेतला. मनपा प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवरून वाहनचालकांना मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमांचे होणारे उल्लंघन, रस्त्यांची दुरवस्था, साचलेले पाणी, यामुळे वाहतुकीच्या कोंडी होते. प्रमिलाताई ओक हॉलकडे जाणारा मार्ग...
  July 20, 10:04 AM
 • अकोला - रणपिसे नगर येथील व्यापरी अनिल धोत्रे यांच्या घराचे लॅच तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धोत्रे कुटुंबासह बंगलोर येथे गेले होते. शुक्रवारी ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात चौकशी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना या वेळी पाचारण करण्यात आले होते. सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोत्रे यांच्या डायनिंग हॉलमधील...
  July 20, 10:03 AM
 • अकोला - बालकांना मोफत शिक्षण कायदा 2009 नुसार, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ यानुसार वर्ष 2013-14 साठी 162 शाळांमध्ये पहिली व नर्सरी मिळून 1767 विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होत़े त्यांपैकी 1319 विद्यार्थ्यांना या राखीव कोट्यातून महागड्या शाळेत प्रवेशाची संधी मिळाली आह़े अद्यापही 448 जागा रिक्त असून, शाळांना प्रवेशासाठी गरीब विद्यार्थी भेट नसल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित...
  July 20, 10:01 AM
 • अकोला - घरातील बाग फुलवण्यासाठी अकोलेकर आता वनऔषधींच्या रोपांना पसंती देत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी प्रकल्पातून गेल्या वर्षभरात अकोलेकरांनी मोठय़ा प्रमाणात रोपांची खरेदी केली आहे. कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यानात दुर्मीळ औषधी वनस्पती जमा करून त्याचा संग्रह व संगोपन करण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीत नागार्जुन उद्यानात 400 वनौषधींच्या विविध प्रजाती जतन केलेल्या आहेत. या विभागात अश्वगंधा, काळमेद्य, कवचबीच, सफेद मुसळी, कोरफड, लेंडी...
  July 19, 11:08 AM
 • अकोला- जिल्ह्यातील वाळू माफियाकंडून महसूल विभागाच्या खनिकर्म विभागाने 2012 व मार्च 2013 अखेरीस सुमारे 72 लाखांवर दंड वसूल केला आहे. याप्रकरणी तब्बल 99 वाळू माफियांवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती खनिकर्म विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सातही तालुक्यांतील रेती घाटाचे लिलाव दोन ते तीन महिने उशिरा करण्यात आले होते. याचा फायदा जिल्ह्यातील वाळू माफियांना चांगलाच झाला आहे. रेती घाटाचे लिलाव झाल्यानंतरही जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले. अनेकदा पोलिस कारवाई करण्यात...
  July 17, 09:39 AM
 • अकोला- गॅस कनेक्शनधारकाला कंपनीतर्फे विम्याचे संरक्षण प्राप्त असते. त्यामुळे सिलिंडरमुळे दुर्घटना झाली किंवा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 ते 25 लाख रूपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र त्यासाठी कंपनीकडे दावा करण्याची आवश्यकता असते. सामूहिक दुर्घटना घडल्यास 50 लाखापर्यंत लाभ होऊ शकतो. दुर्दैवाने असंख्य ग्राहकांना याविषयाची माहिती नाही. प्रसारा अभावी या योजनेपासून ग्राहक वंचित राहात आला आहे. शहरात 1 लाख 50 हजार गॅस सिलिंडरधारक आहते. या सर्व ग्राहकांना संबंधित विम्याविषयी गॅस...
  July 17, 09:34 AM
 • अकोला- पश्चिम विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे शिवणी विमानतळ केवळ कागदांवरील रेघांवर चर्चेत आहे. धावपट्टीचा विस्तार गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, विद्यापीठाची जमीन विमानतळासाठी देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने पुन्हा या प्रश्नाने डोके वर काढले आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीकिशन बाजोरिया शिवणी विमानतळाचा प्रश्न उचलून धरणार आहे. उद्योग विकासासाठी मूलभूत सोय म्हणून अकोला विमानतळाचा विस्तार महत्त्वाचा आहे. शिवणी...
  July 17, 09:29 AM
 • अकोला- अकोलेकरांच्या सेवेत असलेल्या बहुतांश शहर (सिटी) बस वयस्क झाल्या असून, त्यांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्या, असे पत्रच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे शहर बसमधून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ असल्याचेच समोर आले आहे. महापालिकेने अकोलेकरांसाठी दहा वर्षांपूर्वी शहर बससेवा सुरूकेली आहे. या बस सध्या वापरण्याच्या स्थितीत राहिलेल्या नाहीत, तरीही त्यांच्यावरच काम भागवले जात आहे. महापालिकेने बससेवेचे कंत्राट अकोला प्रवासी व माल वाहतूक...
  July 17, 09:23 AM
 • अकोला- तोतया सीबीआय पथकाने टोल नाक्यांवर प्रवेश शुल्क न भरण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर केल्याची बाब उघडकीस आली आहे. टोल नाक्यांवरील कर्मचारीही सीबीआयचे ओळखपत्र पाहून शुल्क न घेताच गाडीचा मार्ग मोकळा करीत होते, अशी माहिती पोलिस कोठडीत असलेल्या चालकाने पोलिसांना दिली आहे. या चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अकोला येथील सराफा व्यवसायी प्रशांत झांबड यांच्या घरावर 2 जुलै रोजी बनावट छापा टाकला होता. हे तोतया सीबीआय पथक मुंबईचे होते. या पथकाने एमएच-04-एफआर-260 या क्रमांकाची...
  July 17, 09:20 AM
 • अकोला- शहरामध्ये मोठय़ा संख्येने सार्वजनिक शौचालये तसेच स्वच्छतागृहे आहेत. या शौचालय, स्वच्छतागृहांशेजारीच उपाहारगृहे तसेच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने त्याच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या शेजारील उपाहारगृहांमध्ये तसेच पावभाज्यांच्या गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. या परिसरात शौचालये असल्याने तेथे घोंगावणार्या माशा तसेच कीटक खाद्यपदार्थांवर...
  July 17, 09:18 AM
 • अकोला - सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून आदर्श शिक्षकांना सन्मान म्हणून देण्यात येणार्या दोन अतिरिक्त वेतनवाढी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे गेल्या सात वर्षात राज्यातील 72८ आदर्श शिक्षक या सवलतीपासून वंचित राहिले होते. यातच भर म्हणून ज्या शिक्षकांना वेतनवाढ दिली, त्यांच्याकडून पठाणी वसुली करण्यात आली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागस्तरावर 9६ आदर्श शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी...
  July 16, 05:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED