जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- महाविद्यालयात अभ्यासू विद्यार्थ्यांबरोबर काही शिक्षणाच्या नावाखाली एन्जॉय करण्यासाठी येतात.एन्जॉय करण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. मात्र, आता महाविद्यालयातील धिंगामस्तीला चाप बसणार आहे. महाविद्यालयातील मस्तीला लगाम लावण्यासाठी विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने विद्यापीठाला दिल्या आहेत. महाविद्यालयात होणार्या गैरकारभारावर आळा बसावा, म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने...
  September 26, 11:20 AM
 • अकोला- गेल्या दोन दिवसांपासून शहरातील महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहेत. याचाच फायदा घेत महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांच्या सेवेकरिता शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केलेआहेत. मात्र, याचा फायदा होण्याऐवजी नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासनाच्या विविध...
  September 26, 11:14 AM
 • अकोला- महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे यांना आज महापालिका अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे यांनी मारहाण केली. ही मारहाण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नगररचना विभागात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यानंतर बराच गदारोळ व धावपळ घटनास्थळी झाली. राजेंद्र टापरेंचा मोबाइल नगरसेवकाच्या ताब्यात व तो बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. गोरक्षणरोडवरील कीर्तीनगरातील रस्त्यावरील अवैध बांधकामाच्या विरोधातील तक्रारीवरून ही मारहाण झाल्याची माहिती...
  September 26, 11:10 AM
 • अमरावती- मोर्शी (सिंभोरा) येथील धरणावर असलेले भूकंपमापक यंत्र गेल्या चार दिवसांपासून बंद आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे, की भूकंपमापक यंत्रातील हा बिघाड जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हता. त्यामुळे धारणीतील धरणीकंपानंतर त्यांची खूप धावपळ उडाली. भारतासह जगभरातील भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र अप्पर वर्धा धरणावर आहे. परंतु शनिवारी 21 तारखेला या यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे पुणे येथील महाराष्ट्र इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला (मीरी) कळवल्याचे यंत्रणेचे...
  September 26, 11:07 AM
 • अकोला- शहरातील रस्त्यांची लागलेली वाट आणि पडलेले मोठमोठे खड्डे याबाबत जिल्हाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शहरात रस्त्यांची समस्या फार मोठी आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना तसेच पादचार्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची काहीही तमा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा...
  September 26, 11:06 AM
 • बडनेरा- टपाल विभागाच्या गलथानपणाचा फटका रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या युवकांना बसल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई येथून निघालेल्या परीक्षापत्रास बडनेरा येथे पोहोचण्यास तब्बल एक महिना लागला. टपाल विभागाच्या चुकीमुळे युवकांना मात्र परीक्षेला मुकावे लागले. बडनेराच्या जुनीवस्ती येथील टिळक कॉलनी येथील काही युवकांनी मुंबई रेल्वे भरती बोर्डात अर्ज सादर केले होते. मुंबई येथील विविध केंद्रांवर ही परीक्षा रविवारी (दि. 22) घेण्यात आली. या परीक्षेसाठी...
  September 26, 10:53 AM
 • अमरावती- साईनगर परिसरातील नित्यानंद कॉलनीत राहणार्या एक शिक्षिकेचे एक लाखाचे मंगळसूत्र बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घराच्या परिसरातच दुचाकीवर आलेल्या भामट्याने हिसकावून पळ काढला. त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. 18 ऑगस्टपासून मंगळसूत्रचोरीची शहरातील ही अकरावी घटना आहे. आतापर्यंत सहा लाख 65 हजारांचे सोने भामट्यांनी लुटले आहे. मंजूषा प्रमोद देशमुख (45) असे शिक्षिकेचे नाव आहे. त्या स्कूल ऑफ स्कॉलर्सला शिक्षिका आहेत. सकाळी शाळेत जाण्यासाठी त्या घरापासून पायी चालल्या होत्या....
  September 26, 10:48 AM
 • अकोला - एका क्रूरकर्मा युवकाने चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना 24 सप्टेंबरला सकाळी जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये घडली. महिला अत्याचार रोखण्यासाठी सक्षम कायदा केल्यानंतरही बलात्काराच्या घटना थांबत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी प्रदीप उर्फ सुरेश दांडगे (18) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपास ठाणेदार नंदकिशोर शर्मा, करनकार करत आहेत. अत्याचार आला उजेडात बलात्कारानंतर चिमुकलीने नराधमाच्या तावडीतून कशी तरी...
  September 25, 10:13 AM
 • अकोला - शहरातील रामनगरात म्हाडांतर्गत सुरू असलेले घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी या बांधकामाला काही लाभार्थींनी भेट दिली असता हा गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आला. विशेष म्हणजे बांधकाम सुरू असताना म्हाडाचा एकही अभियंता उपस्थित नसल्याचेही या वेळी निदर्शनास आले. मागील वर्षी सुरू झालेले हे बांधकाम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचेही संथगतीमुळे दिसून येत आहे. नागरिकांना मुबलक आणि दज्रेदार घरे उपलब्ध करून देण्याची योजना...
  September 25, 10:11 AM
 • अकोला - समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील संतोषी माता चौकात शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी इयत्ता 11, 12 वी चे 100 विद्यार्थी राहतात. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी असल्याने काही ना काही कारणावरून प्रशासनासोबत त्यांचे नेहमीच...
  September 25, 10:10 AM
 • अकोला - काळानुसार शहर आता झपाट्याने बदलत आहे. यात बरेचसे सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक बदल घडत आहेत. पण, खरंच हा बदल विकासात्मक आहे का? याची मीमांसा करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी यासंदर्भातील पहिले पाऊल म्हणून चिकित्सा हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. अकोलेकरांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी आज विशेष प्रयत्नांची गरज आहे. अकोल्यात आज अनेक भागांत विखुरलेले रुग्णालय एका ठिकाणी मेडिकल कॉम्प्लेक्स निर्माण केल्यास नागरिकांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. यासंदर्भात मध्य प्रदेशात...
  September 25, 09:59 AM
 • अकोला - सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची सक्ती नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही येथील गॅस एजन्सीचालकांकडून आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. एजन्सीचालकांच्या या मनमानीपणावर प्रशासनाकडून नियंत्रण घालण्यात यावे, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. गॅस एजन्सीचालकांनी अनेक दिवसांपासून आधार कार्ड सक्तीचे करत ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. अनुदान थेट बँकेच्या खात्यात वळते करण्यासाठी आधार कार्ड व बँकेच्या खात्याची गरज असल्याचे सांगत एजन्सीचालक...
  September 25, 09:48 AM
 • अमरावती- हृदयविकाराच्या असाध्य असलेल्या 1,100 शस्त्रक्रिया गेल्या सात वर्षांत अमरावतीत यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये जन्मजात व्याधी असलेल्या लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, बायपास प्रकारातील शस्त्रक्रियेची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना मुंबईच गाठावी लागते. जिल्हानिहाय हार्ट केअर सेंटरची कल्पना प्रत्यक्षात अमलात आली तर गोरगरीब रुग्णांना हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कमी खर्चात आणखी...
  September 24, 11:04 AM
 • अकोला- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागपूर दौर्यावरून अकोल्यात जोरदार राजकारण रंगत आहे. या राजकारणाचा फटका जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांना बसला आहे. जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व महासचिवांना या दौर्याची साधी माहितीही देण्यात आली नाही तसेच त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत होणारी भेटदेखील टाळली. दरम्यान, याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराव विखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्यस्त असल्याचे सांगत या विषयावर भाष्य देणे टाळले. राहुल गांधी...
  September 24, 10:55 AM
 • अकोला- कुरिअरच्या 21 लाखांवर दरोडा पडल्याच्या निमित्ताने कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून होणारी पैशांची हस्तांतरण प्रक्रिया चर्चेत आली. हवाला, ब्लॅकमनी आणि कर बुडवता यावा, यासाठी कुरिअरच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत आहे. गोरखधंद्यात जिल्ह्यात रोज 12 कोटी रुपयांची उलाढाल होत असून, यासाठी कुरिअर कंपन्या त्या रकमेवर सहा ते आठ टक्के शुल्क आकारत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही कुरिअर कंपनीच्या कर्मचार्यांचे लुटारूंशी लागेबांधे असतात. त्यामुळे लुटारूंना कुरिअरचा कर्मचारी...
  September 24, 10:52 AM
 • अकोला- आजच्या धकाधकीच्या जीवनात हृदयविकाराचा धोका निर्माण झाला आहे. सरासरी 100 पैकी 25 व्यक्तींना हृदयविकाराचा धोका निर्माण झाल्याचे शहरातील डॉक्टरांकडे येणार्या रुग्णांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे, तर मानसिक ताणतणावामुळे हृदयविकाराचे वय 40 हून 20 वर आले आहे. राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यास हृदयविकार होतो. त्यामुळे हृदयाची काम करण्याची शक्ती कमी होऊन झटका येतो. अगोदर 40 वयाच्या आत...
  September 24, 10:20 AM
 • अकोला- येथील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचा प्रश्न राज्य शासनाने गंभीरतेने घेतला आहे. या विस्ताराच्या आड येत असलेल्या पीडीकेव्हीच्या जागेची सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कचेरीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन या मुद्यावर एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. पीडीकेव्हीच्या अखत्यारीतील शरद सरोवराची पाहणी राज्यमंत्री फौजिया खान यांनी केली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश...
  September 24, 10:08 AM
 • अकोला - शिवणी विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा प्रo्न निकाली लागल्याचा गवगवा नेत्यांकडून करण्यात येत असला तरी, शिवणी विमानतळावरून टेक ऑफ आणखी कोसो दूरच आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विमानतळासाठी पश्चिमेऐवजी पूर्वेकडील हवी तेवढी जागा घेण्याचा ठराव झाला आहे. त्यामुळे अद्यापही विमानतळासाठीच्या जागेचा प्रo्न सुटलेला नाही. शिवणी विमानतळाची धावपट्टी 1400 मीटर वरून 1800 मीटर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाची 54...
  September 23, 11:14 AM
 • अकोला - जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम अभियानाचा अँक्शन प्लॅन तयार केला आहे. आता जिल्हय़ात या अभियानाचा व्यापकपणे प्रचार करण्यात येणार आहे. योजना अधिक गतिमान करण्यासाठी संबंधितांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. याचा आढावा विभागीय आयुक्त दर दोन महिन्यांनी घेणार आहेत. जिल्हय़ात निर्मल ग्राम अभियानाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. यासंदर्भातील विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. अमरावती विभागात केवळ अकराच गावे निर्मल ग्राम योजनेसासाठी पात्र...
  September 23, 11:13 AM
 • अकोला - राज्य शासनाने महापालिकांच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध करांच्या बोझ्यात अडकवण्याचा कयास बांधला की काय, असा प्रश्न आता उभा ठाकला आह़े शासनाच्या एलबीटीसंदर्भातील परिपत्रकानुसार, नागरिकांना घर बांधण्यासाठीही एलबीटी भरावा लागणार आह़े शासनाने एलबीटीसंदर्भात परिपत्रक जाहीर केले असून, या परित्रकात घर बांधण्याची परवानगी घेण्यासाठी नागरिकांना एलबीटीकर आकारण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासन सर्वसामान्यांची सर्वच बाजूंनी लूट करत आहे. प्रती...
  September 23, 11:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात