जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला - एकीकडे शहराला अतिक्रमणाचा विळखा बसत असताना दुसरीकडे मात्र मनपाला अतिक्रमणधारकांचा पुळका आला आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे महापालिकेच्या लेखी बाधित असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अतिक्रमण काढणार्या मनपाच्या अधिकार्यांनाच आयुक्तांनी नोटीस बजावली असून, त्यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अकोला शहरामध्ये मुख्यमार्गासह इतरही रस्त्यांनाही अतिक्रमण करणार्यांची संख्या कमी नाही. या अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होते. असाच रस्त्यावर...
  July 24, 11:28 AM
 • अकोला - गुटखाबंदीच्या निर्णयाला एक वर्षांची मुदतवाढ देताना राज्य सरकारने आता मावा, खर्रा, सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूवरही बंदी लागू केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे महिन्याकाठी शहरातील संत तुकाराम कर्करोग रुग्णालयात 25 रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला शहरासह पश्चिम विदर्भात खर्राची मोठी बाजारपेठ आहे. खर्राच्या माध्यमातून अकोल्यात कोट्यवधींचा उलाढाल होतो. नागरिकांवर तंबाखूजन्य पदार्थांमुळे दुष्परिणाम होऊ नये, म्हणून राज्यात गुटखाबंदी लागू...
  July 24, 11:22 AM
 • अकोला - बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाच्या नावाखाली देना बँक आणि शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, कृषी अधिकारी व शेतक र्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देना बँकेमार्फत वितरित केलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. तहसील कार्यालयाने या तक्रारीची चौकशी केली. नायब तहसीलदार चरणदास कोवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रवींद्र अमृतराव...
  July 24, 11:18 AM
 • अकोला - विदर्भातील जलसाठय़ांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमरावती विभागातील जवळपास सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात जवळपास 80 टक्के जलसाठा आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प प्रमाणात जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नागपूर विभागातील 366 प्रकल्पांमध्ये केवळ 24 टक्के जलसाठा होता. या प्रकल्पांमध्ये सध्या 65 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील 376 प्रकल्पांमध्ये मागील वर्षी 23 टक्के जलसाठा होता. यावर्षी हा जलसाठा...
  July 24, 11:13 AM
 • अकोला - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महान धरणाचे दहा, तर वान प्रकल्पाचे चार वक्रद्वार उघडली आहेत. जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील महसूलच्या अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणाचे दहा वक्रद्वार उघडण्यात आले. त्यामधून 230.598 घनमीटर प्रतिसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत...
  July 24, 10:56 AM
 • अकोला - शहरात धावणार्या या वाहनांच्या नियंत्रणासाठी शहरात केवळ 76 वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. वाहतूक शाखेत 73 पोलिस तैनात असले तरी यामध्ये 18 पोलिसांना प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणाव्यतिरिक्त काम करावे लागते. तसेच रोज 12 कर्मचार्यांची साप्ताहिक सुटी असते आणि 5 कर्मचारी रजेवर असतात. एवढेच नव्हे तर 5 कर्मचारी रोज विविध बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे केवळ 33 पोलिसच प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर असतात. परिणामी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहनांना नियंत्रित करता-करता...
  July 23, 12:03 PM
 • अकोला - शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट अमरावती येथील क्षितिज नागरी सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. मात्र, मागील अकरा महिन्यांपासून महापालिकेने या कंत्राटदाराला देयक न दिल्यामुळे मनपाकडे तब्बल दोन कोटी 25 लाख रुपयांचे देयक थकित आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलणार्या 70 कर्मचार्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 15 फेब्रुवारी 2010 पासून शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट क्षितिज या बेरोजगारांच्या संस्थेला देण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी संस्थेतर्फे 20 ट्रॅक्टर, एक जेसीबी,...
  July 23, 11:58 AM
 • अकोला - धार्मिक, भाषिक अल्पसंख्यक दर्जाप्राप्त शासन अनुदानित तसेच कायम विना अनुदानित शैक्षणिक संस्थाव्दारा राबवण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमात अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना धर्म व भाषेचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अल्पसंख्यक दर्जा प्रमाणपत्र शासनाकडून केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शासन अनुदानित तसेच कायम विना अनुदानित शाळा, शैक्षणिक संस्था यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या धर्म...
  July 23, 11:53 AM
 • अकोला - पोलिस यंत्रणेचे आव्हान मोडीत मागील दीड वर्षात चोरट्यांनी अकोलेकरांच्या दोन कोटी 89 लाख सात हजार 787 रुपयांवर हात साफ केला आहे. संपत्ती विषयक गुन्ह्यांत दाखल आकडेवारीवरून हे स्पष्ट होत असून, दीड वर्षात यापैकी केवळ 66 लाख 14 हजार 219 रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अकोलेकरांचे उर्वरित दोन कोटी 22 लाख 93 हजार 568 रुपये चोरट्यांकडून कधी वसूल होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 2012 ते 2013 (मे महिन्यापर्यंत) कालावधीत शहरात चोरी, घरफोडी, लुटमार यांसारखे गुन्हे वाढतच आहेत. आता...
  July 22, 10:20 AM
 • अकोला - महापालिकेकडून शनिवारी शहरातील सिव्हिल लाइन मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, महापालिकेच्या आवाराच्या भिंतीलगतच अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरात होत असलेले अतिक्रमण महापालिका पदाधिकार्यांच्या आशीर्वादानेच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात अतिक्रमणामुळे रस्ते पूर्णपणे अरुंद झाले आहेत. त्यामुळे पादचार्यांना व वाहनधारकांना रस्त्याने चांगलीच कसरत करावी लागते. अतिक्रमणाबरोबरच रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिक वैतागले आहेत. शहरात तर अतिक्रमण आहेच,...
  July 22, 10:19 AM
 • अकोला - जिल्ह्यात मागील 24 तासांत सरासरी 69 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस अकोला तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊस तेल्हारा तालुक्यात झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 1 जूनपासून बरसलेल्या पावसाने जिल्हय़ातील जलसाठय़ामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील धरणामध्ये 84 टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. वान धरणामध्ये सुद्धा 82 टक्के जलसाठा आहे. अकोला तालुक्यात 22.10 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली....
  July 22, 10:18 AM
 • अकोला - अकोला शहरातील एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक उद्योजक तयार आहेत. मात्र, मूलभूत सुविधांअभाव आणि दप्तर दिरंगाईचा फटका बसल्यामुळे अनेक उद्योजकांनी इतर जिल्ह्याच्या वाटा पकडल्या आहेत. उद्योजक अकोल्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याने केवळ विकासाची मानसिकता आता अपेक्षित आहे. अकोला शहराच्या एमआयडीसीमध्ये अस्तित्वात असलेल्या उद्योगांना समस्यांमुळे घरघर लागली आहे. येथील 700 पैकी 300 उद्योग बंद पडले. सुरु असलेल्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही नवीन...
  July 22, 10:16 AM
 • अकोला - जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणार्या 6 ते 14 वयोगटातील सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके देण्यात येत आहे. पहिली आणि दुसरीसह इतर आणखी दीड लाख पुस्तके मिळाली नसल्याने गेल्या 24 दिवसांपासून पुस्तकाविना मुलांची शाळा भरवण्यात आली आह़े या दीड लाख पुस्तकांची प्रतीक्षा कायम असून, हे पुस्तके केव्हा येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अकोल्यासाठी 1 लाख 76 हजार 128 विद्यार्थ्यांसाठी 12 लाख 18 हजार 653 पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण 10 लाख 67...
  July 22, 10:15 AM
 • अकोला- शहराला पाणीपुरवठा करणार्या दोन प्रमुख धरणांमधील जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून, अकोलेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी जलसाठय़ात वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणामध्ये पावसामुळे 80 टक्के जलसाठा झाला आहे. भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी शेतीच्या सिंचनालादेखील पाणी मिळणार आहे. महानचे दोन आणि वान धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने...
  July 21, 11:09 AM
 • अकोला- वेळेअभावी पती-पत्नीतला संवाद तुटल्याने ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे संसाररूपी वेलीला घटस्फोटाचे ग्रहण लागले असून, वर्षाकाठी अकोला शहरातून 40 संसार अध्र्यावरती मोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय 453 प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत. यावर्षीसुद्धा 12 जुलैपर्यंत 297 प्रकरणे दाखल झाली आहेत. अकोला शहरातील कौटुंबिक वादाचे प्रलंबित प्रकरणो निकाली काढण्यासाठी 20 डिसेंबर 2009 मध्ये स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कौटुंबिक...
  July 21, 11:06 AM
 • उन्हाळय़ात उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी आइस्क्रीमच्या गोडव्याचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड आता बदलला असून, आइस्क्रीम एव्हरग्रीन पदार्थ झाला आहे. रविवारी असलेल्या राष्ट्रीय आइस्क्रीम दिनानिमित्त शहरातील आइस्क्रीम पार्लरचा आढावा घेतला असता, अकोल्यात सर्वच ऋतूंमध्ये आइस्क्रीमला चांगली मागणी असल्याचे आढळून आले. कधीकाळी आइस्क्रीमला उन्हाळ्यात मागणी होती. एक गोड पदार्थ म्हणून आता आइस्क्रीमला मागणी वाढली आहे. आइस्क्रीमच्या फ्लेवरची युवकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे...
  July 21, 10:41 AM
 • अकोला - मागील 24 तासांत 8.00 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात करण्यात आली, तर सर्वात कमी पावसाची नोंद अकोट, बाळापूर तालुक्यात करण्यात आली. जिल्हय़ातील वान व काटेपूर्णा जलसाठय़ामध्ये वाढ झाली आहे. अकोला तालुक्यात 2.00 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच बार्शिटाकळी तालुक्यात 3.00 मि.मी., अकोट व बाळापूर तालुक्यात पाऊस निरंक आहे, तेल्हारा तालुक्यात 1.00 मि.मी., पातुर तालुक्यात 2.00 मि. मी., तर मूर्तिजापूर तालुक्यात 7.00 मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली...
  July 20, 10:11 AM
 • अकोला - महापालिका आयुक्तांचा कारभार आता महापालिकेतून नव्हे, तर थेट नेहरू पार्क चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक सभागृहातून पाहिला जात आहे. हा प्रकार महापौर व उपमहापौर यांना अवगत आहे. मात्र, त्यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले आहेत. महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांना भेटण्यासाठी नागरिक, नगरसेवक आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महापालिकेत येतात, परंतु त्यांचे दर्शन नागरिकांना होत नाही. मागील काही दिवसांपासूनचे हे वास्तव आहे. महापालिकेत सर्व सोयी-सुविधायुक्त कार्यालय असताना...
  July 20, 10:09 AM
 • अकोला - शहरात वाढलेल्या घरफोडया रोखण्यासाठी शहरात सिटीझन पोलिसिंगचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नागरिक आणि पोलिस संयुक्तपणे सहभागी होत आहेत. यासाठी खदान, गोरक्षणरोडवरील परिवार कॉलनी, आसरा कॉलनी, टेलिकॉम कॉलनी, निवारा कॉलनी, केशवनगर, माधवनगर भागातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. अलीकडच्या काळात शहरात चोरी, घरफोडी, लुटमार यांसारखे संपत्तीचे गुन्हे घडण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील 20 दिवसांत सर्वात जास्त घरफोडीच्या घटना खदान पोलिस ठाण्यांतर्गत घडल्या. या सर्व घटना भरदिवसा...
  July 20, 10:07 AM
 • अकोला - अकोल्यात फूड व कॉटन पार्क होण्यासाठीचा प्रस्ताव राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सादर केला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. अकोल्यात फूड व कॉटन पार्क झाल्यास थेट प्रक्रिया केलेला माल बाहेर पडणार होता. मात्र, फूड व कॉटन पार्कचे अकोलेकरांचे दिवास्वप्नच राहणार की काय, अशी स्थिती सध्या आहे. अकोल्यासह पश्चिम विदर्भात मोठय़ा प्रमाणात फूड व कॉटन उत्पादन होत असले तरी या ठिकाणी प्रक्रिया उद्योग...
  July 20, 10:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात