जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला -डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त १५१ कोटी रुपये देण्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षांत भाषणात केली. कृषी विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी विद्यापीठाच्या सभागृहात झाला. कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठ झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंदकुमार, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू व्यासपीठावर होते. १५१ कोटी...
  February 6, 10:37 AM
 • बुलडाणा : लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास भाजपसोबत युती असावी,असे मत सेनेच्या काही खासदारांचे आहे.पण त्याला पक्षप्रमुखांनी थारा न दिल्यामुळे काम न करणाऱ्या व मोदी लाटेत तरणाऱ्या खासदार आता चिंतेत आहेत. तर शेवटी येनकेन प्रकारे युती झालीच तर केवळ लाटेत निवडुन येणाऱ्या खासदाराला आता भाजपातूनच विराेध होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांकडून काही मिळेना व ज्याला मोदी लाटेत लाखाच्या मताधिक्याने निवडून आणले तो लक्ष देईना, अशी स्थिती भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे. नेतेही कार्यकर्त्यांच्या...
  February 4, 01:12 PM
 • अकोला : न्यू तापडिया नगरातील पवन नगरीत एका घरात घुसून तीन गुंडांनी धुडगूस घातला, या वेळी त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून दहशत माजवली व कारमधील चार लाख रुपये लंपास केले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तीनही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हेमंत भगीरथ मिश्रा हे एचडीएफसी फायनान्स मध्ये वसुली एजन्सी चालवतात. फायनान्स घेतलेले कर्ज वसुलीचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी...
  February 4, 01:07 PM
 • अकोला- पाच वर्षीय चिमुकलीला पाच रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग १ एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अब्दुल अजीज लालमीया देशमुख असे आरोपीचे नाव आहे. चिमुकलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने चिमुकलीला ९ जानेवारी २०१७ रोजी पाच रुपयांचे आमिष देऊन तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी गेल्यानंतर आईला मुलीची अस्वस्थता दिसली, त्यानंतर मुलीवर...
  February 3, 11:43 AM
 • शेगाव- निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच घेतांना शेगाव नगर पालिका मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी 9 वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्ताऐवज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी...
  February 2, 05:09 PM
 • संग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका सहा वर्षीय निरागस मुलीसोबत मागील १५ दिवसांपासून शिक्षक वर्ग खोलीतच अश्लील चाळे करत असल्याचे पीडित मुलीने आईवडिलांना सांगितले. त्यामुळे या नराधम शिक्षकाचे पितळ उघडे पडले आहे. ही घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक फरार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील एक सहा वर्षीय विद्यार्थिनी गावातील...
  February 2, 11:47 AM
 • अकोला : यागराज त्रिवेणी संगमात कुंभ मेळाव्याच्या पर्वावर स्नानासाठी रेल्वेने जात असलेल्या अकोल्यातील भाविकांना लुटल्याची घटना मध्यप्रदेशात गुरुवारी मध्यरात्री नंतर घडली. लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर ७ ते ८ लाखाचा ऐवज लंपास केला. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. अकोल्यावरून नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, रेखा खंडेलवाल यांचे समवेत जुगलकिशोर खंडेलवाल, शामली खंडेलवाल, रश्मी खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल सह १५...
  February 2, 11:40 AM
 • खामगाव- यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राणांना देखील बसत आहे. चारा व पाणी टंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावू लागला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहे. जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वन विभागासह वन्य जीव विभागाने अभयारण्यात त्यांच्या खाण्याची...
  February 1, 11:16 AM
 • मुर्तिजापूर- अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमारेषेपासून ५० फूट अंतरावर कुरुम पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या करूम रेल्वे स्टेशन जवळील दाढी मोरी जवळ एक मोटार सायकल घसरल्याने मोटरसायकलवरील पतीसोबत आधार कार्ड बनवण्याकरता जात असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान घडली. अमरावती जिल्ह्यातील फुलआमला येथील अनंता तुकाराम मुंढे वय २५ हे पत्नी सौ. दुर्गा आणि पाच महिन्याचा मुलगा यांच्यासह मोटरसायकल क्रमांक एम एच २७-बी.एच.७११२ ने कुरुम येथे...
  February 1, 11:12 AM
 • अकोला- अकोल्याच्या विकासाशी उद्योग वृद्धीला नेहमी जोडले जाते. अशावेळी शासकीय धोरणही पोषक नसल्याने उद्योगांची वाढ खुंटली आहे. उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी नवीन उद्योजकांना गेली पाच महिने वीजजोडणी मिळत नसल्याचे सत्य समोर आले आहे. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करुन देखील काहीही उपयोग झालेला नाही. अकोला आैद्योगिक वसाहतीचा विस्तार ५ फेज पर्यंत झालेला आहे. परंतु जड उद्योग एकही नसल्याने रोजगार निर्माण होण्यात अडचणी येताहेत. त्यातच विद्युत प्राधिकरणाच्या नवीन...
  February 1, 11:05 AM
 • चिखली- तालुक्यातील कोलारा येथे गावातील उपवर युवक युवतींचे एकाच दिवशी व एकाच ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावण्याची जुनी परंपरा आहे. एक गाव एक लग्नतिथी साठी राज्यात आदर्श ठरलेल्या कोलारा गावाने यावर्षी देखील आपली परंपरा कायम राखण्याचा निर्धार केला असून या आदर्श विवाह सोहळ्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. गावातील सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनाबाबतची पहिली बैठक २७ जानेवारी रोजी पार पडली. गावातील सर्व लग्न एकाच मंडपाखाली लावून विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्चाला फाटा...
  January 31, 11:41 AM
 • अकोला- महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी परीक्षा घेतल्या नंतर परीक्षेत नापास झाल्याने महिनाभरात २९ कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. यात ८ मानसेवी, १८ कंत्राटी तसेच ३ सेवा निवृत्ती नंतर महापालिकेत मानसेवी म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. तसेच पदोन्नतीही झालेली नाही. त्यामुळे कुली, चपराशी या पदावर नियुक्त असलेल्या मात्र शिक्षित कर्मचाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या कामाचा गाडा चालावा, यासाठी १८ ते २०...
  January 31, 11:38 AM
 • अकोला- करबुडव्या शिकवणी वर्गांना धडा शिकवण्यासाठी आता वस्तू व सेवाकर विभागाने म्हणजेच जीएसटीने कारवाया सुरु केल्या केल्या आहेत. या कारवायांमुळे काही शिकवणी वर्ग संचालकांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश शिकवणी संचालकांनी जीएसटी न भरण्यासाठी पळवाटा काढून विद्यार्थी संख्या लपाछपीचा खेळ सुरु केल्याची माहिती आहे, आता जीएसटीचे अधिकारी शिकवणी वर्ग सुरु असताना विद्यार्थी संख्या मोजून प्रत्यक्ष तपासणी करतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षी शहरातील काही बड्या शिकवणी वर्गावर आयकर...
  January 31, 11:32 AM
 • देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी मराठवाड्यात नेण्याचा घाट रचण्यात आला आहे. या योजनेचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यास दिल्यास देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यावर जल संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे ही योजना रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज २९ जानेवारी रोजी शहरासह देऊळगाव महीत सर्व पक्षीयांच्या वतीने बंद पाळण्यात आला. खडकपूर्णा धरणातून मराठवाड्यातील ९२ गावाची पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत झाल्यास सिंदखेडराजा मतदार संघातील जनतेसमोर मोठे...
  January 30, 12:44 PM
 • खामगाव : स्वातंत्र्य पूर्व काळात देशात स्वातंत्र्याची चळवळ राबवत असताना येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयास महात्मा गांधी यांनी २८ डिसेंबर १९३३ रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी चरख्याचे उद्घाटन केले होते. टिळक राष्ट्रीय विद्यालय हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र असल्याने अनेक स्वातंत्र्य वीरांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयात भेट देऊन वास्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांनी येथे चरख्याचे उद्घाटन करून संस्थेविषयी स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय दिल्याचे...
  January 30, 12:41 PM
 • अकोला : महावितरणच्या अकोला शहर उपविभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायण शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराकडून सौर ऊर्जा कंपनीने दिलेल्या कामाची परवानगी मिळवून देण्यासाठी त्याने पंचासमक्ष लाच स्वीकारली. या कारवाईवरून महावितरणचे अधिकारी किती खालच्या पातळीवर उतरलेत, हे समोर आले आहे. सुरेखा नामक व्यावसायिकाने सौर ऊर्जेचे...
  January 30, 12:31 PM
 • अकोला : महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या झाली. देशाच्या विविध भागांतील नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. अकोल्यापासून १८ किमी अंतरावरील वाघाेली गावात पूर्णा नदीच्या पात्रामध्येही १२ फेब्रुवारी १९४८ रोजी अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. या वेळी केळीवेळीचे अॅड. रामसिंह राजपूत यांच्यासह परिसरातील मंडळी उपस्थित होती. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी अकोला ते गांधीग्राम पायी यात्रा काढून बापूंना आदरांजली वाहण्यात येते. तिथे...
  January 30, 08:36 AM
 • अकोला- महापालिकेचा बेताल कारभार सुधारण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून, सोमवार आयुक्तांनी थेट विविध विभागामध्ये सकाळी धाव घेत झाडाझडती घेतली. या वेळी गैरहजर आढळलेल्या ५१ कर्मचाऱ्यांची एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सर्व अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयात भेटतातच असे...
  January 29, 11:57 AM
 • अकोला- शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल तसेच मतदानाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन व निसर्ग कट्टा मार्फत पक्षी निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये राखी मनेष, हप्पू , सुमग, गायबगळा व काळा शराटी या पाच पक्ष्यांना अकोला शहरातून उमेदवारी देण्यात आली होती. जिल्ह्यातील ७० शाळांमधील एकूण १७८८५ विद्यार्थ्यांनी मतदान करून पुढील ५ वर्षासाठी अकोला शहर पक्षी म्हणून गायबगळा या पक्षींची निवड करण्यात आली आहे. यासाठी शहरपक्षी...
  January 29, 11:49 AM
 • delete
  January 28, 11:59 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात