Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकाेला- राज्य दुष्काळमुक्तीच्या लढ्यात भारतीय जैन संघटना (बीजेएस) तन-मन-धनाने उतरली हाेती. संघटनेतर्फे सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८मध्ये श्रमदान केलेल्या राजया्ीतल १ हजार ५०० गावांना एकूण १६५० मशिन्स उपलब्ध करुन देण्यात अाल्या हाेत्या. या मशिनने एकूण ८ लाख ५२ हजार ६१० तास खाेदकाम केले. परिणामी राज्यात ५१०० काेटी लिटर्स पाणी साठवणुकीची क्षमता निर्माण हाेणार अाहे, अशी माहिती संघटनेने बुधवारी अायाेजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली. याप्रसंगी संघटनेचे...
  June 7, 10:51 AM
 • अकोला- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे आगामी ११ जुलैला विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर एल्गार महामोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनात स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक महासंघाचे अध्यक्ष कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अमरावती येथे पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे स्टेशन चौक स्थित उर्जा भवनात पार पडलेल्या या बैठकीत विविध संघटनात्मक...
  June 6, 11:08 AM
 • अकोला- मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. शहराच्या बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. वादळी वारे, विजांचा कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील आंबे, लिंबू, केळी या फळवर्गीय पिकांना फटका बसला. अनेकांच्या शेतातील कांदाही खराब झाला. गेल्या दोन तीन दिवसांपासून या भागात कमालीचा उष्मा जाणवत आहे. मंगळवारी सायंकाळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग जमू लागले आणि सायंकाळी पाऊस झाला. सोसाट्याचा वारा...
  June 6, 11:05 AM
 • अकोला- पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे काम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांशी आज ५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधलाे. या अनुषंगाने चर्चा करु शकणाऱ्या १६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. देशभरात पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरु आहे. काही शहरात घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अकोला महापालिका क्षेत्रात ६० घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे देशभरातील मोजक्या लाभार्थ्यांशी...
  June 6, 11:02 AM
 • अकोला- धावत्या रेल्वेतून प्रवाशाला फेकून नंतर इंजिनसमोर ठेवणाऱ्या ८ तृतीयपंथीयाची अखेर ओळख पटली आहे. रेल्वे पोलिसांनी १० तृतीयपंथीयांना मंगळवारी तहसीलदारांसमोर उभे केले होते. त्यापैकी हेच ते ८ जण असे म्हणून तक्रारदार प्रवाशाने त्यांना ओळखले. २२ फेब्रुवारी रोजी माना-कुरुमजवळ धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयांनी ही मुजोरी केली होती. संत्रागाछी एक्स्प्रेसमध्ये इंजिनपासून दुसऱ्या जनरल डब्यात अकोल्यातून १० ते १५ तृतीयपंथी चढले होते. गाडी कुरूम बडनेरा दरम्यान असताना वरच्या सीटवर...
  June 6, 10:56 AM
 • अकोला- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात आता केवळ १४३ कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. दररोज होणारी उचल, उन्हामुळे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, या साठ्यातून आणखी एक महिना शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. मागील वर्षी पावसाने सरासरी न गाठल्याने वान प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. काटेपूर्णा प्रकल्पातही ५० टक्के जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळेच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, काटेपूर्णा प्रकल्पातून मागील रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी न...
  June 5, 11:26 AM
 • अकोला- महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २१ गावातील मालमत्ता धारकांना संपूर्ण मालमत्ता करातून नव्हे तर सामान्य कराच्या २० टक्के कर आकारला जाणार आहे. त्यामुळे इतर करांचा १०० टक्के भरणा या भागातील नागरिकांना करावा लागणार आहे. परिणामी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना भरमसाठ कराचा भरणा मात्र या नागरिकांना करावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मालमत्ताच्या नोंदणीचे काम सुरू करण्यात आले. तर महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने...
  June 5, 11:22 AM
 • अकोला- पंतप्रधान आवास योजना सर्वासाठी घरे, ही संकल्पना समोर ठेवून सुरु केली आहे. शहरात ६० घरांचे काम पूर्ण झाले तर १६४ घरांचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात हजारो नागरिकांकडे गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट आहेत. नियमानुसार गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉटवर बांधकामाची परवानगी देता येत नसल्याने अशा हजारो लाभार्थ्यंांना या योजने पासून वंचित राहावे लागत आहे. केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांना हक्कांची घरे मिळावीत, यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरु केली. ही योजना एकूण चार घटकात विभागली. ज्या ठिकाणी...
  June 5, 11:13 AM
 • अकोला - नोकरीचे आमिष दाखवून दोन मुलींचे अपहरण झाल्याची घटना रविवारी समोर आली. दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. बारावी झालेल्या शहरातील दोन मुलींची ओळख पुणे येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सीत काम करणाऱ्या मुलीसोबत सोशल मीडियातून झाली. त्यानंतर नोकरी लावून देण्याचे आश्वासन तिने या दोघींना दिले. त्यानंतर दोन्ही मुली घरून कागदपत्रे घेऊन गेल्या. दोघींचेही मोबाइल बंद आल्याने पालकांची चिंता वाढली. एका मुलीच्या पालकाने डाबकी रोड ठाणे तर दुसऱ्या मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाइन्स...
  June 4, 11:33 AM
 • अकोला- वडील पेट्रोलपंपावर काम करीत असताना मुलाला अकरावीसाठी खासगी शिकवणी लावणे शक्य नव्हते. मात्र, मुलाची शिकण्याची धडपड व जिद्द पाहून सरस्वती कोचिंग क्लासचे संचालक प्रा. प्रशांत देशमुख यांनी मुलाचे शैक्षणिक दायित्व स्वीकारले. आज हाच मुलगा जपानमधील मोठ्या कंपनीत ६२ लाखांच्या पॅकेजवर रुजू होतोय. आपल्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश पाहून चिज झाल्याची प्रतिक्रिया प्रा. प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली. आजपर्यंत गरीब परिस्थिती असलेल्यांना त्यांनी मदतीचा हात दिल्याचे उदाहरणे आहेत....
  June 4, 11:29 AM
 • अकाेला- एकच वाण वेगळ्या नावाने विक्री करणाऱ्या अाणि परवान्यात सुधारणा न करणाऱ्या राज्यातील ५३ कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात अाल्याचे कृषि विभागाने कळवले केले अाहे. त्यामुळे बाेगस वाणाचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले अाहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली असून, कृषि कंपन्या, विक्रेत्यांनीही खत, बियाण्यांसह इतरही साहित्य बाजारात अाणण्यासाठी प्रयत्न सुरु अाहेत. अशा वेळी बाेगस खते, बियाण्यांचे उत्पादन, साठा, विक्री हाेण्याची शक्यता असते. मूळ...
  June 4, 11:21 AM
 • अकाेला - शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला किमान हमीभाव, दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री, यासह इतरही मागण्यांसाठी देशातील शेतकरी मैदानात उतरले असून, हे अांदाेलन अकोल्यात तीव्र हाेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु हाेणार अाहे,अशी माहिती अाहे. या संपात देशातील २२ राज्यांतील १३० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन तयार केलेल्या राष्ट्रीय किसान महासंघाने या संपाची हाक दिली आहे. शेतातल्या भाज्या, दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी दहा दिवसांच्या अांदाेलनाचा बिगुल १ जूनला फुंकला. राज्यात सर्वत्र...
  June 3, 10:19 AM
 • अकोला - जूनच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वादळी पावसाचा जिल्ह्यातील तीन तालुक्यांना फटका बसला. अकोला, बाळापूर,बार्शीटाकळी तालुक्यात ३६६ घरांची पडझड झाली तर सोमठाण्यात एक गोठा भुईसपाट झाला. जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने हा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवला असून विस्तृत अहवाल, नुकसानाच्या रकमेची मोजदाद सुरु केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार अकोला तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाले. या तालुक्यातील चांदूर येथील २६८ घरांवरील टिनाचे छत उडून गेले. त्यामुळे...
  June 3, 10:17 AM
 • अकाेला- गत काही दिवसांपासून तापमानामुळे अंगाची लाही लाही हाेत असलेल्या अकाेलेकरांना शुक्रवारी वरुण राजाने दिलासा दिला. काही ठिकाणी नागरिकांनी पावसाचे स्वागत करीत उत्साहच साजरा केला. ग्रामीण भागातही वरुण राजाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला अाहे. काही वेळ तर मुसळधार पाऊस झाला. दुपारी ४३.८ तापमान असलेल्या अकोल्यात संध्याकाळी ६.१० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाचे अागमन झाले. जुने शहरातील काही घरांवरील टिनपत्रे उडाली. काही भागात झाडं पडली. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला हाेता....
  June 2, 11:02 AM
 • अकोला- पंतप्रधान आवास योजनेंतंर्गत बांधकाम सुरू असलेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना अनुदानातील चौथा व अंतिम टप्प्यातील निधी भोगवटा प्रमाणपत्रामुळे रखडला आहे. जोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत अंतिम टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना मिळणार नाही. विशेष म्हणजे अनेक लोक विकास शुल्काचा भरणा करण्यास तयार असताना हा प्रकार सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये चार घटकांतर्गत घरकुलासाठी शासनाकडून निधी दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात घटक क्रमांक ४ अंतर्गत शिवसेना...
  June 2, 10:53 AM
 • अकोला- पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी १ जूनला पावसाने हजेरी लावली. दरम्यान अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील चांदूर जहानपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ परिसरात पाळखंबा शिवारात झाडावर वीज पडून बैल ठार झाला. दर्यापूर तालुक्यात वीज पडून शेतमजूर महिला ठार एक मोठे झाड पडून त्याखाली दबल्याने कारचे मोठे नुकसान झाले. शहरातील वीजपुरवठा दोन तास खंडित झाला. जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील चांदूर जहानपूर येथे वीज...
  June 2, 10:29 AM
 • मुंबई-आपल्याच दिवंगत मंत्र्याबाबत फडणवीस सरकारच्या असंवेदनशीलतेचे गुरुवारी दर्शन घडले. ज्येष्ठ भाजप नेते आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले आणि दुपारीच सामान्य प्रशासन विभागातील उपसचिवांनी कृषिमंत्र्यांच्या खासगी सचिवाला फोन करून सरकारी कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले. त्याची माहिती मिळताच साेमय्या रुग्णालयात उपस्थित मुख्य सचिव व कृषी विभागाचे मुख्य सचिव यांनी संबंधित उपसचिवाची कानउघाडणी केली. कृषिमंत्र्यांचे ओएसडी विपुल शिंदे यांना विचारले...
  June 2, 05:19 AM
 • खामगाव- राज्याचे कृषी, फलोत्पादन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे गुरुवार, ३१ मे रोजी सकाळी ४.३५ वाजता मुंबई येथील के. जे. सोमेय्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री होते. शेती आणि सहकारासह संबंधित विविध विषयांची त्यांना सखोल जाण होती. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राज्यात शाश्वत शेती विकासासाठी...
  June 1, 04:01 PM
 • अकोला- जिल्ह्यात चार वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक एच. सी. वाकडे यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार केल्या. पोलिस निरीक्षकांमध्ये कैलास नागरे, प्रमोद काळे यांना एक वर्षाची मुदतवाढ, पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे यांची बदली वाशीम, सचिंद्र शिंदे यांची बदली अमरावती ग्रामीणमध्ये केली. सहायक पोलिस निरीक्षक एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके व पिंजरचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांना एक वर्ष मुदतवाढ...
  June 1, 11:21 AM
 • अकोला- राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या राजकीय वाटचालीत अकोला जिल्ह्याचाही मोठा वाटा राहिला असल्याने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी दुपारी शिवणी विमानतळावर मोठ्या संख्येत उपस्थिती होती. पोलिस विभागाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात आली. दुपारी ३.४० वा. मुंबईहून विशेष विमानाने भाऊसाहेब फुंडकर यांचे पार्थिव अकोल्याला आणण्यात आले. दरम्यान, आप्तेष्ठांनी फुंडकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. विठ्ठलराव लोखंडकार यांनाही भावना आवरणे कठीण झाले.शिवणी विमानतळावर...
  June 1, 11:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED