Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • आर्णी (यवतमाळ)- नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटातट्रक आणि तवेरा गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जागीच ठार झाले. आज पहाटे 5 वाजेदरम्यान ही घटना घडली. मृत झालेलेसर्व जण दिल्ली आणि पंजाब येथील रहिवाशी होते. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडहून नागपूरकडे पपई घेऊन जाणारा ट्रक आणि यवतमाळकडून नांदेडकडे जाणाऱ्या तवेरा गाडीचा आज पाहटे साडेपाच वाजता कोसदनी घाटातअपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, तवेरा गाडीतील 10 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार चिमुकल्यांचा...
  June 1, 10:15 AM
 • अकाेला - प्राथमिक शिक्षकांच्या अाॅनलाइन बदली प्रक्रियेबाबत बुधवारी शिक्षकांनी प्रथम जिल्हा परिषदेत धाव घेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर कर्मचारी भवन येथे जमा हाेत अांदाेलनाचा निर्णय जाहीर केला. या बदली प्रक्रियेतील घाेळ थांबण्याचे नावच घेत नसून, मंगळवारी ३७७ सुधारित अादेश जारी केले गेले. त्यामुळे यंत्रणांचा सावळा गाेंधळ शिक्षकांच्या मुळावर उठल्याचा अाराेप अाहे. जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या १७५४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या...
  May 31, 10:15 AM
 • अकोला - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३१मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत गुरुवार ३१ मे ते ६ जून दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी यांना तंबाखू विरोधी शपथ...
  May 31, 10:05 AM
 • अमरावती-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात कृषी क्षेत्रात ५० पेक्षा जास्त योजना यशस्वीरीत्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे ज्या परिसरात सिंचनाच्या सुविधा नाहीत त्या परिसरातही कृषी क्षेत्राने मोठा पल्ला गाठला आहे. राव यांनी मुख्यमंत्रिपदाच्या त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तेलंगणामध्ये कृषी क्षेत्राला नफ्यातील व्यवसाय बनवले आहे. त्यामुळे राज्यातील जनता त्यांच्याकडे आत्महत्या, बाजारात पिकाची विक्री, पीक विमा, पीक सबसिडीमध्ये दलालांची फसवणूक यापासून...
  May 31, 05:12 AM
 • बुलडाणा- कर्ज माफीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. नाफेड मार्फत तूर खरेदीचे १५ ते २० हजार शेतकऱ्यांचे थकीत १२६ कोटी रुपये पेरणीपूर्वी देण्यात यावे, बोगस खते व बियाण्यांची तपासणी क्वॉलिटी कंट्रोलर मार्फत करण्यात यावी, खतांचे वाढवलेले दर कमी करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज २९ मे रोजी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. तर बुलडाणा येथील...
  May 30, 11:22 AM
 • अकोला- पूर्ववैमनस्यातून प्रेयसीच्या आईने प्रियकराविरुद्ध मुलीला तक्रार द्यायला भाग पाडले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्यावर खोटी कारवाई केली आणि फसवले म्हणून युवक तणावात होता. त्या परिस्थितीत त्याने ३४ पानांची सुसाइड नोट लिहिली आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतक युवकाचे वडील मंगळवारी खदान पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी खदान पोलिसांना ३४ पानांची सुसाइड नोट दिली आहे. वैभव उर्फ सोनू वीर (वय २२ रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्या...
  May 30, 11:11 AM
 • अकोला- रेल्वेत अनधिकृतपणे निकृष्ट, तसेच अप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री करणारे मोकाट आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्याकडून हप्ते घेऊन हा प्रकार सर्रास चालत असल्याचे उघडपणे बोलले जाते. साधे तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसलेल्या प्रवाशाला गुन्हेगारासारखी वागणूक देणारे गाडीतील तिकीट निरीक्षक खाद्य विक्रेत्यांवर मात्र काहीही कारवाई करत नाहीत. तसेच रेल्वे सुरक्षा बलही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. या...
  May 30, 11:08 AM
 • अकोला- भूजलाच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन आता पुढे सरसावले आहे. ४०० इमारतींना नोटीस बजावण्याचे काम सुरु असतानाच आता महापालिका क्षेत्रात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी २०० शोषखड्डे केले जाणार आहेत. यासाठी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून भूजल सर्वेक्षण विभागाकडून हे काम केले जाईल. हा खर्च नगरोत्थान योजनेतून केला जाणार आहे. भूजलाची चिंताजनक स्थितीत खोल गेलेली पातळी लक्षात घेऊन दिव्य मराठीने हा विषय सातत्याने लावून धरला. कोण-कोणत्या ठिकाणी लाखो लिटर भूजलाचा उपसा...
  May 30, 11:04 AM
 • बुलडाणा- भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात बुलडाणा जिल्हयात काँग्रेसची आंदोलने सुरुच असून आज २८ मे रोजी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मेहकर, नांदुरा व लोणार येथे तिरडी मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोटार सायकलची अंत्ययात्राही काढण्यात आली. मेहकर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने उप विभागीय कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्राम गृह, जिजाऊ चौक, जुने बसस्थान मार्गे हा मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र व राज्य सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर...
  May 29, 09:39 AM
 • अकाेला- ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पेटत असून, मंगळवारी बाळापूर तालुक्यातील कवठा येथील महिलांनी पाणी भरण्याच्या हंड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली. पालकमंत्र्यानीही आठवड्यात समस्या मार्गी लावण्याचे अाश्वासन दिले. गावातील ४ लाखांची मंजूर झालेली तात्पुरती नळ याेजना रखडल्याने पाण्याची समस्या तीव्र झाली . जिल्हाधिकारी अास्तिकुमार...
  May 29, 09:27 AM
 • अकोट- बँजो पार्टीत वादक युवकाचा अमरावतीतील मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान रविवारी २७ मे ला रात्री मृत्यू झाला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी सोमवारी २८ मे ला मृतदेह शहर पोलिस ठाण्यात आणला. मनोज सुभाष काफफाय, वय २६ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर असे मृतक युवकाचे नाव आहे. तो ताज बँजो पार्टीत वादकाचे काम करत होता. १० मे रोजी लग्न समारंभासाठी ही पार्टी अमरावती येथे गेली होती. तिथे वाद झाल्यावरून मनोज काफफायला ताज बँजो पार्टीतील वादकांनी मारहाण केल्याचा...
  May 29, 09:17 AM
 • अकाेला- शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेला शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलोटे यामुळे खीळ बसल्याचे खरेदी प्रक्रिया मंगळवारी बंद हाेणार असल्याच्या अनुषंगाने अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात एकूण २४ हजार ९ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी अातापर्यंत केवळ ४ हजार ५१६ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात अाला असून, १९ हजार ४९४ शेतकरी प्रतीक्षेत अाहेत. त्यामुळे २९ मे राेजी संध्याकाळी ५ पर्यंत या शेतकऱ्यांकडे असलेल्या हरभऱ्याची...
  May 29, 09:10 AM
 • आर्णी- राज्यात व केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली असून भाजप सरकारच्या काळात दरोरज होणारी पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसने नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध केला. आंतरराष्ट्रीय दरात प्रचंड घसरण होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्व सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडल्याने परिनामी जिवनाश्क वस्तूचे देखील भाव दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे...
  May 28, 01:27 PM
 • अकाेला - भक्तांची अगाध श्रद्धा असलेल्या देवाच्या मंदिरात स्वच्छता असावी, निर्माल्य पायदळी न यावे यासाठी अकाेला जिल्हा सर्व खाद्य पेय विक्रेता असोसिएशनने भगवंतांच्या साक्षीनेच स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मंदिरांमध्ये डस्टबिन वितरणाला प्रारंभ केला अाहे. तूर्तास महानगरातील प्रमुख मंदिरांमध्ये डस्टबिनची व्यवस्था करण्यात अाली असून, या सर्व मंदिरांमध्ये डस्टबीनचा वापर हाेत अाहे. दुसऱ्या दिवशी कचरा मनपाच्या घंटा गाडीत टाकण्यात येताे. काही मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ प्रचंड असते....
  May 28, 10:45 AM
 • अकोला - स्वातंत्र्याच्या होमकुंडात सावरकर बंधूंनी सर्वस्व पणाला लावले परंतु त्यांच्या वीर पत्नींचे योगदान कमी मोलाचे नव्हते. त्या तिघींनी देखील या रणसंग्रामात आहुती दिली, असे प्रतिपादन नागपुरातील सावरकर साहित्याच्या अभ्यासक डॉ. शुभा साठे यांनी केले. अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या युवा आघाडीने स्वा. वि. दा. सावरकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रमिलाताई आेक सभागृहात रविवारी त्या तिघी यावरील व्याख्यानात डॉ. साठे बोलत होत्या. सावरकर कुटुंबातील येसूबाई, यमुनाबाई माई शांताबाई ताई या...
  May 28, 10:41 AM
 • अकोला - आलिशान हॉटेलात थांबलेल्या भोंदू बाबाकडे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी गेले. बाबा मूल होत नाही, काय करावे लागेल, असे म्हणून बाबाकडे याचना केली. त्यावर भोंदूबाबा म्हणाला, १०-११ हजार रुपये द्यावे लागतील, मी एक चमत्कारिक मुर्ती बनवून देतो. देवघरात ठेवा, तीन महिन्यात तुमच्या पत्नीला गर्भधारणा होईल,. या भोंदूबाबाची तक्रार अ. भा.अंनिसचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसांकडे केली. पोलिसांनी या भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करून रविवारी त्याला...
  May 28, 10:34 AM
 • अकोला - दारूड्या पतीने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीजवळ पैसे नसल्याने ती देऊ शकली नाही. पतीला तिचा राग आला. त्याने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतले. त्यात ती ९० टक्के भाजली. उपचारादरम्यान मात्र तिचा मृत्यू झाला. महिलेला एक १५ वर्षाची मुलगी आहे. वर्षा प्रदीप भुबंरकर (४०) या १५ वर्षीय मुलीसोबत राहत होत्या. मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी वर्षा भुबंरकर या छोटेमोठे काम करीत होत्या. त्यांचा पती प्रदीप भुबंरकर हा मोर्शी येथे राहत होता. तो कधीकधीच...
  May 27, 10:42 AM
 • अकाेला -जून २०१७मध्ये जिल्हा परिषदेच्या दाैऱ्यात पंचायत राज समितीला (पीअारसी) अाढळून अालेले विविध विभाग-योजनांमधील घाेळ, अनियमितता यावर २९ आणि ३० मे राेजी राेजी मंत्रालयात संबंधित सचिवांची साक्ष नोंदवण्यात येणार अाहे. तत्पूर्वी सोमवार, २८ मे राेजी ग्राम विकास विभागाच्या सचिवांना प्रशासनाकडून संक्षिप्त माहिती सादर करण्यात येणार अाहे. यासाठी चौथ्या शनिवारी सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी माहितीची अंतिम पडताळणी व दस्तावेज संकलनाचे काम करीत...
  May 27, 10:39 AM
 • बुलडाणा- एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे शेतकऱ्यांना शिव्या देत आहेत. त्यामुळे त्याचा सूड म्हणून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या दाभडी गावातून खा. दानवे यांच्या भोकरदन पर्यंत आसूड यात्रा काढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीच शेतकरी कट्टरवाद सुरु केला असून बापाच्या घामाचे दाम वसूल करण्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या आसूड यात्रेचे आज २५ मे रोजी...
  May 26, 11:35 AM
 • अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयासह एसडीओ आणि तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात २७ अव्वल कारकून (एके) आणि १८ लिपीकांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वर्षीच्या बदल्या समुपदेशनाने करावयाच्या असल्याने बदलीपात्र सर्व कर्मचाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर सर्वसंमतीने बदल्यांची गावे ठरविण्यात आली. याबाबतचे आदेश सोमवार, २८ मे रोजी जारी केले जाणार आहेत....
  May 26, 11:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED