जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- पोलिसांनी साेमवारी ७० गुरांची (गाैवंश) निर्दयतेने वाहतूक करणारा कंटेनर पकडला. पोलिसांना पाहून चालकाने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्वत:चे वाहन कंटेनरसमाेर अाडवे करुन कंटेनर पकडला. याप्रकरणी पाेलिसांनी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एका कंटेनरमधून गोवंशाची वाहतूक होत अाहे, अशी माहिती विशेष पथकाला मिळाली. एपीअाय हर्षराज अळसपुरेंच्या पथकाने एमअायडीसीत सापळा रचला. नागपूरकडून येणाऱ्या या कंटेनरवर पोलिसांनी मूर्तिजापूर राेडवरुन वाॅच ठेवला. युपी २१ बीएन ८३१० या क्रं...
  December 25, 11:11 AM
 • अकोला- बायोमेट्रिक पंचींगची अट आणि वेळेपूर्वी परीक्षा केंद्र न गाठल्यामुळे तब्बल ७८८ विद्यार्थ्यांना रविवारी एमपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. अकोल्यात २ हजार २२७ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु सदर अटीमुळे ३५.३८ टक्के विद्यार्थ्यांच्या नावासमोर अनुपस्थित अशी नोंद केली गेली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर आपला राग व्यक्त केला. परंतु परीक्षा नियंत्रकांची भेट घेण्याबाबत त्यांचे एकमत होऊ शकले नाही. दरम्यान बायोमेट्रिक...
  December 24, 11:08 AM
 • अकाेला :भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची साथ साेडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सहभागी हाेतील असा दावा कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केला असतानाच अाता अकोल्यात एमआयएम, भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. आंबेडकर यांच्याच नेतृत्वात मुस्लिम अारक्षण महामोर्चा काढण्यात येणार अाहे. २७ डिसेंबर राेजी निघणाऱ्या या महामाेर्चाची तयारीही सुरू झाली अाहे. त्यामुळे या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार अाहे. परिणामी...
  December 23, 11:39 AM
 • अकोला :सिटी कोतवालीच्या परिसरातील देवरावबाबा चाळ येथे आलिशान फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेने या कुंटणखान्यावर शनिवारी छापा टाकला. या वेळी दोन ग्राहकासह एका महिलेला रंगेहात पकडले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी सिटी कोतवाली पोेलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या या कुंटणखान्याने परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे...
  December 23, 11:29 AM
 • अकोला-येथील दीपक चौक स्थित मेसर्स प्राईड सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर जिल्हाधिकाऱ्यांनी धाड घातली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या कारवाईत भाग घेतल्याने इतर विभागाचे अधिकारीही लवाजम्यासह तेथे पोहोचले. तूर्त हा पेट्रोल पंप सील केला असून, पेट्रोलजन्य पदार्थांची विक्री थांबवली. वृत्त लिहिस्तोवर तपासणीचे काम सुरुच होते. उशिरा संचालकांविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल, अशी माहिती आहे. तपासणी अंती गंभीर उणिवांबाबत पेट्रोल पंप संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा...
  December 22, 11:14 AM
 • अकोला- देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उद्या, शुक्रवार २१ डिसेंबरला एक दिवसाचा संप पुकारला आहे. तर सर्व बँकांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आगामी २६ डिसेंबर रोजी संपावर जाण्याची हाक दिली आहे. या संपामुळे बँकिंग व्यवहार ठप्प पडणार असून एटीएमवरील व्यवहाराशिवाय इतर सर्व कामांना ब्रेक लागणार आहे. केंद्र सरकारने बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक या तीन वित्तीय संस्थांना एकाच बँकेत विलीन करण्याचा प्रयत्न चालवला...
  December 21, 11:15 AM
 • अकोला- ट्रकमधून १८ म्हशींची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना विशेष पथकाने अटक केल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. एमएच ०४ सीपी ८७०४ क्रमांकाच्या ट्रकमधून म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर खडकी नजीक पुलावर सापळा रचला. यावेळी ट्रक आल्यानंतर त्याला अडवण्यात आले. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये १८ म्हशी दिसून आल्या. पोलिसांनी यावेळी इर्शाद उल्ला खाँ किस्मत उल्ला खाँ रा....
  December 21, 11:13 AM
 • अकोला - शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठीची स्वाधार योजना शासनाच्या धोरणामुळेच अडचणीत आली आहे. एकीकडे या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठीची कोणतीही अंतिम तारीख निश्चित केली नाही. त्याचवेळी आर्थिक वर्ष (३१ मार्च) संपण्यापूर्वी मात्र या योजनेचा लाभ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अजब धोरणामुळे अंमलबजावणी करणारी यंत्रणा कमालीची अडचणीत आली आहे. एक तर सर्व पात्र अर्जदारांना तो अर्ज देईल, त्यावेळी मदतीचे धोरण आखा. नाहीतर ३१ मार्चच्या आंत पात्र उमेदवार...
  December 20, 12:35 PM
 • अकोला | विवाहितेचा छळ करणाऱ्या डॉक्टर पती विरुद्ध रामदास पेठ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांच्या ताब्यातील डॉक्टरने प्रकृतीच्या कारणावरून रुग्णालयाचा आसरा घेतला आहे.येथील एका विवाहितेने रामदास पेठ ठाण्यात तक्रार केली की, कोल्हापुरातील बेळगाव येथील डॉ. शेखर रामचंद्र भिसे सोबत २३ जानेवारी २०१७ रोजी विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसांनीच सासरच्या मंडळीने त्रास देणे सुरू केले. पती डॉ. शेखर रामचंद्र भिसे कधी सोन्याच्यामागणीवरून तर कधी इतर कारणावरून शिवीगाळ करून मारहाण...
  December 20, 12:19 PM
 • अकोला - शहरात मंगळवारी रात्री तेली पुरा भागातील शिकस्त इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याने एरवी पावसाळ्यात शिकस्त इमारतीबाबत होणारी चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे शहरात अद्यापही २२ शिकस्त इमारती मृत्यूच्या दाढेत उभ्या आहेत. यापैकी काही इमारती अती जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नगररचना विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची तपासणी केली जाते. त्यानुसार दुरुस्ती लायक, जीर्ण, अतिजिर्ण यानुसार संबंधितांना नोटीस दिल्या जातात. तसेच ज्या इमारती...
  December 20, 12:14 PM
 • सिंदखेडराजा- सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे १७ डिसेंबर रोजी दोन विद्यार्थिनींनी विहिरीत उड्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत नेहा प्रभाकर गवई हिचा मृत्यू झाला. नेहाला बदनामी करण्याची धमकी मिळाल्याने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली. त्यावरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत नेहाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून नातेवाइकांनी उचलला नव्हता. साखरखेर्डा येथील एस. ई. एस....
  December 19, 10:51 AM
 • अकोला- शहरातील सुभाष रोडवरील तेलीपुरा चौकातील तीन मजली शिकस्त इमारत कोसळली. ही दुर्घटना मंगळवारी १८ डिसेंबरला रात्री ८.५० वाजताच्या सुमारास घडली. या इमारतीचा ढाचा कोसळताक्षणी कुटुंबातील चौघे बाहेर पडले; तर वृद्ध महिला आत अडकली. रात्री १२.४० वाजता महिलेला बचाव पथकाने बाहेर काढले. तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जानकीराम चोपडे, मंगेश जानकीराम चोपडे, योगेश चोपडे व शिल्पा चोपडे हे किरकोळ जखमी झाले. येथील सुभाष रोडवरील तेलीपुरा परिसरातील रहिवासी चोपडे यांची तीन मजली...
  December 19, 10:46 AM
 • अकोला - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार १५ डिसेंबर रोजी संपुष्टात आला. तर दुसरीकडे अद्याप नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली नाही. या प्रकारामुळे महापालिका पुन्हा एकदा पोरकी झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने हद्दवाढ झालेल्या भागासाठी नुकत्याच ९८ कोटी रुपयाच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व कामांचा निपटारा करण्यासाठी कायम स्वरूपी आयुक्तांची महापालिकेला गरज आहे. मात्र असे होत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक त्रस्त झाले आहेत....
  December 18, 11:35 AM
 • बुलडाणा- महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणे दोन तरुणांच्या जिवावर बेतल्याची घटना मलकापुरात सोमवारी सकाळी घडली. अज्ञात वाहनाने तरुणांना चिरडले. त्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. मृत तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. मलकापूर तालुक्यातील मौजे निंबारी फाट्यानजीक सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहुल समाधान नेमाडे (वय-20) असे मृत तरुणाचे नाव असून अमर निना शेळके (वय-20) हा गंभीर जखमी आहे. सरकारी नोकरीसाठी फिटनेस हवा म्हणून राहुल आणि अमर मॉर्निंग...
  December 17, 12:13 PM
 • अकाेला- भाजपला काेणतेही आव्हान देण्याचा प्रश्न नसून, उलट भाजपकडूनच शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा खाेचक टाेला परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी रविवारी अकोल्यात लगावला. अमरावती येथून औरंगाबादला जात असलेले ना. रावते काही वेळेसाठी अकोल्यात थांबले. त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांवर भाष्य केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज रहा, असे...
  December 17, 10:26 AM
 • अकाेला- बीटी कापसाची परवानगी नसलेले बियाणे विक्री केल्याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) वाढीव मुदत मागितल्यानंतर त्या वाढीव मुदतीचा कालावधीही संपला आणि त्यानंतर बाराव्या दिवशी मुदतवाढीचा शासनादेश काढून कृषी विभागाने तत्परतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. १५ डिसेंबर राेजी शासनाने जारी केलेल्या आदेशात एसआयटीला अहवाल सादर करण्यासाठी ३ सप्टेंबर २०१८पासून तीन महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. वास्तविक ३ सप्टेंबरला संपलेल्या...
  December 16, 08:13 AM
 • पिंपळगाव रेणुकाई- भूतबाधा असल्याच्या संशयावरून नातेवाइकांनी तरुणाला उपचारासाठी विदर्भातील सैलानीबाबा देवस्थानात नेण्याचे सांगितले. त्यामुळे आईवडिलांनी त्यास तेथे नेले. परंतु तरुणाला तेथे घेऊन थांबलेले आई-वडील चहा घेण्यासाठी बाहेर गेले असता त्याच वेळात तो तरुण बेपत्ता झाला. याबाबतची तक्रार बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता तरुणाच्या पत्नीने दिली असून या तक्रारीनुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोमलसिंग सुरतसिंग राजपूत (२८, रेलगाव, ता. भोकरदन)...
  December 15, 12:45 PM
 • delete
  December 15, 10:56 AM
 • अकोला- केरोसिनचा वापर घटत चालल्याने घाऊक परवानाधारकांच्या मिळकतीतही कमालीची घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांच्या पुढ्यात नवा पर्याय ठेवला असून संबंधितांनी पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी अर्ज करावेत, असे सूचविले आहे. जिल्ह्यात १६५ नवे पेट्रोल-डिझेल पंप सुरु होत आहेत. आयओसीएल, बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) व एचपीसीएल (हिंदुस्थान पेट्रोलियम) या तिन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठीची जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार २४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. यामध्ये...
  December 15, 10:27 AM
 • अकोला- घरात घुसून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सदरपूरच्या (ता. तेल्हारा) विधवा महिलेने माथ्यावरील जखमेसह कलेक्ट्रेटवर उपोषण सुरु केले आहे. तब्बल १७ पुरुष-महिलांनी जबरदस्तीने घरात घुसून मारहाण केल्याची मीरा भास्कर मेतकर या महिलेची तक्रार आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आधी या महिलेने हिवरखेड पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळेच माथ्यावर भरली जखम असतानाही ती न्यायासाठी कलेक्ट्रेटवर उपोषण करीत आहे. ५ डिसेंबरच्या...
  December 15, 10:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात