जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • पिंपळगाव रेणुकाई- भूतबाधा असल्याच्या संशयावरून नातेवाइकांनी तरुणाला उपचारासाठी विदर्भातील सैलानीबाबा देवस्थानात नेण्याचे सांगितले. त्यामुळे आईवडिलांनी त्यास तेथे नेले. परंतु तरुणाला तेथे घेऊन थांबलेले आई-वडील चहा घेण्यासाठी बाहेर गेले असता त्याच वेळात तो तरुण बेपत्ता झाला. याबाबतची तक्रार बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता तरुणाच्या पत्नीने दिली असून या तक्रारीनुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोमलसिंग सुरतसिंग राजपूत (२८, रेलगाव, ता. भोकरदन)...
  December 15, 12:45 PM
 • delete
  December 15, 10:56 AM
 • अकोला- केरोसिनचा वापर घटत चालल्याने घाऊक परवानाधारकांच्या मिळकतीतही कमालीची घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांच्या पुढ्यात नवा पर्याय ठेवला असून संबंधितांनी पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी अर्ज करावेत, असे सूचविले आहे. जिल्ह्यात १६५ नवे पेट्रोल-डिझेल पंप सुरु होत आहेत. आयओसीएल, बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) व एचपीसीएल (हिंदुस्थान पेट्रोलियम) या तिन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठीची जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार २४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. यामध्ये...
  December 15, 10:27 AM
 • अकोला- घरात घुसून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सदरपूरच्या (ता. तेल्हारा) विधवा महिलेने माथ्यावरील जखमेसह कलेक्ट्रेटवर उपोषण सुरु केले आहे. तब्बल १७ पुरुष-महिलांनी जबरदस्तीने घरात घुसून मारहाण केल्याची मीरा भास्कर मेतकर या महिलेची तक्रार आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आधी या महिलेने हिवरखेड पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळेच माथ्यावर भरली जखम असतानाही ती न्यायासाठी कलेक्ट्रेटवर उपोषण करीत आहे. ५ डिसेंबरच्या...
  December 15, 10:23 AM
 • पातूर- मागून येणाऱ्या अज्ञात तीन मोटारसायकलस्वारांनी मालवाहू वाहनास अडवून दोघांना चाकूच्या धाकावर ५० हजार रुपये लुटल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पातूर ते अकोला महामार्गावरील नंदखेड फाट्याजवळ घडली. अकोला येथील हिना बेकरीचे मालवाहू वाहन क्रमांक एमएच ३० एव्ही ०४६१ नेहमीप्रमाणे मेहकर येथून सायंकाळी मालाचे पैसे गोळा करून परत येत होते. मेहकरवरून १४ डिसेंबरला सायंकाळी अकोलाकडे परत जात असताना नंदखेड फाट्याजवळ टाटा यस हिना बेकरीच्या गाडीचे चालक शेख अन्सारी शेख अजगर वय २४...
  December 15, 10:19 AM
 • अकाेला- जिल्ह्यात सामान्य निधी, जवाहर राेजगार याेजना, जवाहर ग्राम समृद्धी याेजना, संपूर्ण ग्रामीण राेजगार याेजनेत अनियमितता झाली अाहे. जिल्हयातील सातही पंचायत समितीअंतर्गत ७०१ प्रकरणांमध्ये ४ काेटी ४ काेटी ४० लाख १६ हजार २९८ रुपये गुंतले असून, या रकमेच्या वसुली थकली अाहे. ही बाब लेखा परीक्षण अहवालातून पुढे अाली असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना अर्धशासकीय पत्रच पाठवले अाहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा अादेश दिला अाहे. अहवाल प्राप्त हाेण्यास...
  December 15, 10:06 AM
 • अकोला- डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताचे औषधे मिळत नाहीत. मात्र अवैधरीत्या गर्भपाताचे औषधे विकणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला. पोलिस-आरोग्य विभाग व अन्न औषध विभागाने बनावट ग्राहक बनवून पाठवलेल्या एका महिलेला ४३३.९० रुपये किमतीच्या पाच गर्भपाताच्या गोळ्या ४ हजार रुपयांत विकताना संध्या नामक महिलेला रंगेहात पकडले. तसेच तिला औषधे पुरवणाऱ्या तोतयालाही पोलिसांनी पकडले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे एक तक्रार प्राप्त झाली. त्यात म्हटले होते की, शहरात...
  December 14, 10:07 AM
 • अकाेला- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१८-१९ अंतर्गत नोव्हेंबरपर्यंतच्या खर्चाचा आढावा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात अाला. वितरीत केलेला निधी-खर्च यावर लालफीतशाही काराभाराचा परिणाम झाल्याचे अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. १३९ काेटी ५१ लाखांपैकी ७८ काेटी ८२ लाख ४७ हजार रुपये वितरीत करण्यात अाले. मात्र या निधीपैकी ५७ कोटी ७२ लाख ६६ हजार इतका निधी खर्च झाला अाहे. यंदाच्या अार्थिक वर्षाच्या खर्चाचे असे चित्र असतानाच पुढील सन २०१९-२०च्या आराखड्यावर झालेल्या...
  December 13, 10:35 AM
 • अकोला- महापालिकेच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने बुधवारी रंगेहात पकडले. ठेकेदारांचे आठ लाख ५० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यास फाइल पुढे सरकवण्याच्या मोबदल्यात त्याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सईद अहमद शेख मुसा (वय ४१, पद कनिष्ठ अभियंता, वर्ग ३) हा कंत्राटी मानधन तत्वावर महापालिकेत गेल्या १५ वर्षापासून कार्यरत आहे. महापालिकेकडे ठेकेदाराचे कामाचे आठ लाख ५० हजार रुपयांचे देयक होते. हे देयक काढण्यासाठी ठेकेदाराची फाइल...
  December 13, 10:22 AM
 • अकोला- शहरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी असलेली मनपा एका विद्यार्थ्यामागे एका वर्षी ४१ हजार ५९८ रुपये खर्च करीत आहे. मात्र बोटावर मोजण्या इतक्या शाळा वगळल्यास पाचवी ते सातवीतील अनेक विद्यार्थ्यांना एबीसीडी लिहिता येत नाही. या धक्कादायक प्रकारामुळे महापालिकेचे शाळांकडे दुर्लक्ष झाले असून दरवर्षी शाळांवर कोट्यवधी रुपयाचा खर्च करुनही शैक्षणिक गुणवत्ता मात्र खालावलेलीच आहे. शहरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य...
  December 12, 10:26 AM
 • अकोला- कान्हेरी गावाजवळ ग्राम पंचायतीने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरच बोअर खोदण्याचे काम सुरु केले. या प्रकारामुळे मुख्य जलवाहिनी फुटली. परिणामी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला तर दुसरीकडे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शहराला महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. रस्त्याच्या एका बाजूने ६०० मिलिमीटर व्यासाची तर दुसऱ्या बाजूने ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचवले जाते. दोन दिवसापूर्वी अशोक वाटिका चौकात...
  December 12, 10:16 AM
 • अकोला- राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी सकाळी जुने शहरातील गुलजारपुरात छापा टाकला. त्यात त्यांनी वाह, विमल व पानबहार गुटख्याचा साठा जप्त केला. अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी सोमवारी सकाळी सहायक आयुक्त एल.जी. राठोड यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे व गजानन गोरे यांनी गुलजारपुऱ्यातील शामसुंदर बैजनाथ भरतीया याच्या गोडावूनवर छापा टाकला. येथे...
  December 11, 10:16 AM
 • तिवसा- जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रकवर तिवसा पोलिसांनी कारवाई करीत ४० जनावरांना जीवनदान देत दोन आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी पंचवटी चौक परिसरात करण्यात आली. ट्रक चालक शेख रिहान शेख इब्राहिम (२५) व फैय्याज इब्राहिम(२५) दोघेही रा. आसेगाव, जि. वाशीम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीकरिता जनावरांची वाहतूक केल्या जाते. नागपूर येथून तिवसामार्गे अमरावतीकडे जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तिवसा...
  December 11, 10:12 AM
 • अमरावती- विरुद्ध दिशेने येणारा सिमेंटनी भरलेला ट्रक चालकाला अनियंत्रित झाला. त्यामुळे चालकाने हा ट्रक विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर घातला. यामध्ये दुचाकीस्वार माजी सैनिकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा अपघात कठोरा मार्गावर सोमवारी (दि. १०) सायंकाळी झाला आहे. दिनकरराव विठ्ठलराव गिरपुंजे (६०, रा. पुसदा) असे मृतक माजी सैनिकाचे नाव आहे. गिरपुंजे त्यांच्या दुचाकीने शहरातून गावाकडे जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर गहूसुद्धा होता. मार्गातील बोर नदीच्या पुलावर विरुद्ध...
  December 11, 09:57 AM
 • अमरावती-वलगाव येथील सुफीनगरमध्ये एक आठ वर्षीय बालक घरासमोर खेळत होता. याचवेळी एका मालवाहू टाटा एस चालकाने आपले वाहन भरधावपणे चालवून खेळणाऱ्या बालकाला चिरडले. यामध्ये बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ९) घडली आहे. दरम्यान बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी मार्गावर शनिवारी रात्री दुचाकी अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला आहे. दयान मुल्ला तौसिफ मुल्ला (८, रा. सुफीनगर, वलगाव) असे मृतक बालकाचे नाव आहे. दयान रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत...
  December 10, 09:44 AM
 • अमरावती- शेगाव नाका ते पंचवटी मार्गावरील राठीनगर परिसरात एसबीआय बँकेच्या समोरील बाजूला रस्त्याने जाणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरला तीन तेे चार युवकांनी थांबवले. प्रॉपर्टीच्या वादातून ते युवक व ब्रोकरमध्ये वाद झाला. त्यानंतर याच युवकांनी मारहाण करून खिशातील पंधरा हजार रुपये आणि सोन्याची अंगठी काढल्याचा आरोप करून प्रॉपर्टी ब्रोकरने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. ही घटना रविवारी (दि. ९) दुपारी चारच्या सुमारास घडली या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तीन ते चार युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला...
  December 10, 09:38 AM
 • दर्यापूर- खल्लार पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलोरा येथील एका महिलेने पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या त्रासाला कंटाळून स्वत: रॉकेल ओतून जाळून घेतल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली. अमरावती येथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी पोलिसांनी पतिविरोधात गुन्हा दाखल केला. रविवारी (दि. ९) पोलिसांनी पतीला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. मनोरमा भीमराव तायडे (४५) असे मृतक पत्नीचेे, तर भीमराव...
  December 10, 09:37 AM
 • संग्रामपूर- बंद पडलेली पाण्याची हापशी, सर्वत्र पसरलेले गाजर गवताचे थैमान, उघडे पडलेले छत, विजेचा अभाव, तुटलेल्या खिडक्या व दरवाजे यासह इतर कारणांमुळे तालुक्यातील तामगाव येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. वसाहतीतील ठाणेदाराचे निवासस्थान वगळता एकही निवास स्थान राहण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना भाड्याची खोली घेवून त्यामध्ये संसार थाटावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षापासून पोलिस वसाहतीची दुर्दशा झाली असतानादेखील या...
  December 10, 09:31 AM
 • अमरावती- शहरातील कठोरा नाका परिसरात असलेल्या श्रमसाफल्य कॉलनीमध्ये रॉयल एम्पायर नावाचे अपार्टमेंट आहे. याच अपार्टमेंटच्या तळमाळा व पहिल्या माळ्यावरील तीन फ्लॅट रविवारी (दि. ९) दुपारी एक ते अडीच वाजताच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. विशेष म्हणजे हे तिन्ही फ्लॅट डॉक्टरांचे आहे. यापैकी एका फ्लॅटमधून काही चोरीला गेले नाही. मात्र दोन फ्लॅटमधून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांची रोकड आणि ८० ग्रॅम सोने असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच अपार्टमेंट...
  December 10, 09:31 AM
 • अकाेला- गत अार्थिक वर्षात ग्राम पंचायत प्रादेशिक पाणी पट्टी वसुली केवळ ६.२ टक्के झाली असून यंदा तर अातापर्यंत केवळ ४.५३ टक्केच वसुली झाली अाहे. त्यामुळे चार महिन्यात २८ काेटी १९ लाख १६ हजार ७३६ रुपये वसुलीचे अाव्हान िजल्हा परिषदेसमाेर उभे ठाकले अाहे. वसुली न झाल्यास प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनांची देखभाल करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देखभालीसाठी जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नातून द्यावे लागणार असून, याचा कल्याणकारी याेजनांना कात्री लागणार अाहे. वसुलीची जबाबदारी असलेल्या...
  December 10, 09:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात