Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ११ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ८ लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात अद्यापही मुबलक जलसाठा उपलब्ध झालेला नाही. परिणामी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेच. जिल्ह्यात ३६ लघु प्रकल्प आहेत. विशेष म्हणजे लघु प्रकल्प हे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन तसेच पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु...
  July 28, 11:55 AM
 • अकोला- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील विविध मार्गावर रहदारीत अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. ही मोहिम फार्स ठरु नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील गांधी चौक, जैन मंदीर परिसर, बस स्थानक रोड वरील, टाॅवर चौक रोड, मुख्य डाक घर ते सिव्हिल लाईन रोडवरील, नेकलेस रोडवरील, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चहाच्या टपऱ्या, पान ठेले, पोलवर विना परवानगी लावलेले छोटे जाहिरात होर्डिंग काढण्यात आले. तसेच नेहरू पार्क रोडवरील छत्री,कारपेट व कुशन किरकोळ व्यावसायिकांच्या...
  July 28, 11:52 AM
 • अकाेला- ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या (एअायएसटीसी) नेतृत्वाखाली मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम अांदाेलनाअंतर्गत शुक्रवारी दुपारी माेर्चा काढला. मात्र संध्याकाळी विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अांदाेलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अकोल्यात संघटनेच्या कार्यालयाबाहेर फटाके फाेडून जल्लोष करण्यात. दरम्यान भाजीपाला-फळांची अावक कायम असून खताचा साठाही मुबलक अाहे. जिल्ह्यात तब्बल ३० हजार ३७८ मेट्रिक...
  July 28, 11:47 AM
 • अकोला- सोशल ऑडिटच्या साखळीत आज, गुरुवारी गोरक्षण आणि अशोक वाटिका ते सरकारी बगीचा या सिमेंट रस्त्यांचेही नमून घेण्यात आले. दोन्ही रस्त्यांवर पाच ठिकाणी ड्रील करून त्यातील सामग्री बाहेर काढण्यात आली. उद्या, शुक्रवारी ११ ठिकाणी ड्रील केले जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांत या सामग्रीचे परीक्षण करून अहवाल सादर केला जाईल. शहरातील मुख्य व अॅप्रोच मार्गांवर ठिकठिकाणी दिसणारे खड्डे आणि डांबरी रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रचंड तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल...
  July 27, 12:30 PM
 • अकोला- जमिनीची मोजणीच्या दस्तावेजावर सही करण्यासाठी शेतकऱ्याकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमीअभिलेख कार्यालयाच्या तीन लाचखोर कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. परशराम संभाजी इंगळे (भूमापक, वर्ग ३, भूमी अभिलेख कार्यालय बाळापूर) व विजय सखाराम गवई (छाननी लिपिक, वर्ग ३, भूमी अभिलेख कार्यालय, बाळापूर) आणि लाच देण्यास प्रोत्साहन देणारा अब्दुल लतीफ पांडे, (शिरस्तेदार, वर्ग ३,भूमी अभिलेख...
  July 27, 12:26 PM
 • अकोला- व्यापारी किशोर खत्री खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दुसरे दिवशी गुरुवारी दुसरे जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी बालाजी मॉलमध्ये मृतक किशोर खत्री व आरोपी रणजितसिंग चुंगळे यांच्यामध्ये झालेली बैठक व त्यानंतर वाहनाने दोघे सोमठाणा शेत शिवारात गेल्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला. पुढील सुनावणी १६ व १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी मोबाइल कॉलडाटा...
  July 27, 12:14 PM
 • अकोला- शहरातील व्यापारी किशोर खत्री हत्त्यांकाड प्रकरणाची अंतिम टप्प्यातील सुनावणीला बुधवारी सुरुवात झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पावणेदोन तास सरकार पक्षाची बाजू मांडली. गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. आर्थिक वादातून व्यापारी किशोर खत्री यांची हत्या सोमठाणा शेत शिवारात गोळ्या झाडून ३ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली होती. त्यांच्या हत्येचा आरोप रणजितसिंग चुंगडे, रुपेशसिंह चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी व राजू मेहरेवर आहे. किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी दुसरे...
  July 26, 12:25 PM
 • अकोला- मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी साेमवारी सकल मराठा समाजातर्फे बुधवारी पुकारलेल्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंददरम्यान महामार्गावर अांदाेलकांनी दाेन ठिकाणी टायर टाळून संतप्त भावनांना वाट माेकळी करुन दिली. मराठा बांधवांनी एल्गार पुकारून मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढून मागण्या लावून धरल्या. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गही बंद हाेती. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळल्या हाेत्या. त्यानंतर दुपारी तीन दिवस सुरु असलेल्या ठिय्या अांदाेलनाचा समारोप झाला. या...
  July 26, 12:17 PM
 • बुलडाणा- जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील आठवडी बाजारातील नागरिकांचे मोबाइल चोरी करून त्यांची एका दुकान मालकाच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीच्या ५१ मोबाइलसह चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज २५ जुलै रोजी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोबाइलची चोरी व विक्री करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही...
  July 26, 12:13 PM
 • मुक्ताईनगर/देऊळगावराजा / देऊळगाव मही- आषाढीनिमित्त संत मुक्ताई पालखीसोबत पंढरपूरला गेलेले भाविक आता परतीच्या वाटेवर आहेत. या वारकऱ्यांच्या उभ्या मॅटॅडोअरला देऊळगाव महीजवळ बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता लक्झरी बसने मागून जोरदार धडक दिली. यात ४५ पैकी १६ भाविक जखमी झाले असून त्यातील चौघांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. एक जखमीवर भुसावळ,तर उर्वरित ११ जणांवर बुलडाणा येथे प्रथमोपचार करण्यात आले. जखमी झालेले सर्व भाविक मुक्ताईनगर, बोदवड व बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. दवाखान्यात...
  July 26, 10:44 AM
 • अकोला- नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट- अर्थात ई नाम प्रणालीत एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने, परिणामी शेतकऱ्याला याेग्य भाव न मिळाल्याचा ठपका ठेवत कृषी उत्पन्न बाजार समितीने एका अडत व्यावसायिकाचा परवाना निलंबित केला. त्यामुळे अडते-व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून, बाजार बंद असल्यासारखेच चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देशपातळीवरील एक बाजार, या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय कृषी बाजार (नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट- नाम) ही प्रणाली...
  July 25, 12:40 PM
 • अकोला- मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, २५ जुलै राेजी अकाेला बंदची हाक देण्यात अाली अाहे. बंदचा निर्णय मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सुरु असलेल्या ठिय्या अांदाेलन मंडपातील बैठकीत घेण्यात अाला. बंदमध्ये शाळा, महाविद्यालयांचाही समावेश राहणार अाहे. मात्र अांदाेलनातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात अाले अाहे. तत्पूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जलसर्मपण केल्याने मराठा समाजाकडून रस्त्यावर...
  July 25, 12:36 PM
 • अकोला- शिवम बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित अंशुमन विचारे अॅक्टिंग क्लासेस, अकोला व शुभम मराठी बालकुमार, युवा व नवोदित साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आनंदी साहित्य पुरस्कार २०१८ स्पर्धेचे सर्वच विभागातील पुरस्कार गुरुवारी प्रा. दीपाली आतिश सोसे, प्रा. आतिश सुरेश सोसे यांनी जाहीर केले. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आठव्या शुभम मराठी बालकुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार विजेत्या साहित्यिकांना प्रदान केले जातील, अशी माहिती...
  July 25, 12:21 PM
 • अकोला- १७ दिवसाचे बाळ आईच्या कुशीतच दगावले. ते कधी दगावले याची खबरही तिला लागली नाही. पतीच्या शोधात ती वणवण फिरतच राहिली. बराच वेळ गेल्यानंतर बाळाच्या हालचाली बंद झाल्या व बाळ दगावल्याचे तिला कळले. राहण्यासाठी डोक्यावर छप्परही नसल्याने काय करावे, तिला कळेनासे झाले. परिसरातील नागरिकांनी तिला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचारपूस केली. बाळाचे शवविच्छेदन झाले. नंतर बाळाचा अंत्यविधी नगरसेवक अमोल घोगे यांच्या पुढाकाराने पार पडला. हे विदारक चित्र पाहून पोलिसांसह अनेकांच्या डोळ्याच्या कळा...
  July 24, 12:53 PM
 • अकोला- मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या अांदाेलन केले. जनता दरबारासाठी उपस्थित पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी अांदाेलकांनी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. मात्र पोलिसांनी मुख्य द्वार बंद करीत अांदाेलकांना अडवले. परिणामी अांदाेलकांनीही अाक्रमक पवित्रा घेत गेट लाेटत अात धडक दिली. त्यामुळे काही वेळेतच पोलिसांच्या जादा कुमकने तेथे धाव घेत अांदाेलकांना घेरत यांना राेखले. यात अांदाेलक व पोलिसांत संघर्षही...
  July 24, 12:47 PM
 • अकोला- प्रेयसीपासून सुटकेसाठी प्रियकराने निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा दाबला. नंतर तिच्या मानेवर काचेने वार केले. त्यानंतर तिची ओळखही पटू नये म्हणून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून त्याने पोबारा केला. तीन दिवसांनंतर अज्ञात महिला जळाल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली. मात्र घटनास्थळावरून जप्त केलेले जोडवे, पडलेल्या चपला, गळ्यातील डोरल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. अखेर महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराला रविवारी रात्री अटक केली. या महिन्यातील खुनाचे...
  July 24, 12:41 PM
 • अकोला - बार्शिटाकळी तालुक्यातील येवता येथील सरपंच रेणुका प्रमाेद कुलट हिच्या घरात देहव्यापार करणाऱ्या दोन युवती व मेहकर येथील ग्राहकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की, येवता येथील रेणुका प्रमोद कुलट हिच्या घरी कुंटणखाना चालवल्या जातो. त्या माहितीवरून अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी...
  July 23, 12:15 PM
 • देऊळगावमही- वन विभागाच्या वतीने राज्यात तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय निमशासकीय तसेच सामाजिक संस्थांना दिलेल्या उद्दिष्टा नुसार दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्षलागवड करूनही वृक्ष संवर्धन होत नाही. अनेक वेळा वृक्षलागवडीचे आकडे जुळवून उद्दिष्ट पूर्ती साधल्या जाते. मात्र देऊळगावराजा तालुक्यात पाडळी शिंदे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मागील वर्षी वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करून तब्बल चारशे झाडांचे संगोपन व संवर्धन करून शंभर टक्के झाडे...
  July 23, 12:15 PM
 • अकोट- कालवाडी येथील शिवारातील शेततळ्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.स्थानिक रामटेकपुरा भागातील रहिवासी सागर अशोक चंदन वय २४ वर्ष हा पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, कालवाडी शेत शिवारातील शेततळ्यात त्याचा मृतदेह आज दुपारी २२ जुलै रोजी आढळून आला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मृत झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतक सागर हा अविवाहित होता, त्याला दोन भाऊ व एक बहीण असून त्याचे आई-वडील मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवतात. घटना कळताच ग्रामीण...
  July 23, 12:14 PM
 • अकोला- चाळण झालेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज, रविवारी दिवसभर मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत तीन रस्त्यांवर नऊ ठिकाणी ड्रील करून रॅण्डम सॅम्पल्स घेण्यात आले. या सॅम्पलद्वारे प्राप्त मटेरियलची २७ भागांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक यंत्रणेकडून स्वतंत्र अहवाल मागवण्यात आला आहे. शहरातील रस्ते अल्पावधीतच खराब झाले असून ते वाहतूक आणि चालण्यायोग्य नाहीत, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल ऑडिटचा...
  July 23, 12:09 PM
 
जाहिरात

RECOMMENDED