Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- खारपाणपट्ट्याची ओळख बदलण्या साठी जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हे पर्याय असून या योजनांच्या एकत्रिकीकरणाने भूसुधाराचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. जिल्ह्यातील विकास कामे, प्रस्तावित योजनांच्या आढाव्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात बैठक घेतली. या वेळी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाशी चर्चेत त्यांनी हा पर्याय सुचवला. विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,...
  12:03 PM
 • खामगाव- येथील दंडे स्वामी मंदिराजवळील रहिवासी तथा नॅशनल शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचे १६ जुलै रोजी दुपारी अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान अपहृत विद्यार्थ्याने एकाच्या हाताला चावा घेवून त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. याप्रकरणी आज १७ जुलै रोजी विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाने पोलिस ठाण्यात धाव घेवून हा प्रकार पोलिसांना सांगितला. नॅशनल शाळेतील विद्यार्थी गौरव सुधीर एकडे हा दुपारी स्थानिक एकबोटे चौकातून...
  11:59 AM
 • बुलडाणा- राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात महाराष्ट्रात आता कुठेही दारुबंदी करणार नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज १७ जुलै रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडीयमवर अस्तित्व महिला संघटनेच्या वतीने छत्री आंदोलन करण्यात आले. अस्तित्व महिला संघटना गेल्या पाच वर्षापासुन विविध आंदोलनाचे माध्यमातुन मातृतीर्थ व विदर्भ पंढरी बुलडाणा ज़िल्हा संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी करीत आहे. संपूर्ण जिल्ह्यामधे दारुबंदीची लोक चळवळ झाली असून अनेक संघटना व...
  11:56 AM
 • अकाेला- सावकारी अधिनियमची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती साेमवारी नागूपर येथे विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशानादरम्यान धरणे अांदाेलन केले. या अांदाेलनाची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सावकारी कलम १८ मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार करण्याची कालमर्यादा १५वरुन ३० वर्षे हाेण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. त्यामुळे अांदाेलन मागे घेण्यात अाले. हे...
  11:40 AM
 • अकोला- अपक्ष नगरसेवक डब्बुसेठ यांना विभागीय आयुक्तांनी ६ जुलैला शिवसेनेच्या आघाडीत सामिल झाल्या प्रकरणी अपात्र घोषित केले होते. मात्र १६ जुलैला विभागीय आयुक्तांनीच या अपात्रतेला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. परिणामी डब्बुसेठ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने भारिप-बमसं, एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेवून ९ सदस्यांची लोकशाही आघाडी स्थापन केली. यामुळे शिवसेनेचा स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग रोखला गेला. शिवसेनेने राष्ट्रवादी कॉग्रेसला शह देण्यासाठी...
  July 17, 01:08 PM
 • धारणी- चिखलदरा येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चार मित्र मैत्रिणीच्या चार चाकी गाडीला अपघात होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सेमाडोह-चिखलदरा मार्गावरील मेमणा फाट्याजवळ (दि. १५) रात्री उशीरा घडली. सलोनी रमेश गोडबोले (१८) रा. पूजा कॉलनी, दस्तुरनगर असे मृतक युवतीचे नाव असून वृत्त लिहिस्तोवर तीन जखमींची नावे कळू शकली नाही. मृतक सलोनी ही तिचे दोन मित्र व दोन मैत्रिणी आणि चालक अविनाश सुरेंद्रसिंग येवतीकर (२८) रा. शंकर नगर, अमरावती यांच्यासह स्वत:च्या इंडिका व्हिस्टा (एमएच...
  July 17, 01:04 PM
 • अकोला- नटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात निःस्वार्थ व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या, कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. २०१० पासून सुरू असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यंदा उत्कर्ष शिशुगृह, पिंजरचे दीपक सदाफळे, प्रा. डॉ. अनिरुद्ध खरे, समर्पण प्रतिष्ठानचे अमोल मानकर, हास्य कवी अरविंद भोंडे, सिने दिग्दर्शक नीलेश जळमकर, ऐश्वर्या तापडीया यांना...
  July 17, 01:00 PM
 • अकोला- अवघ्या १६ ते १८ वर्षे वयोगटातील काही युवकांनी सुरू केलेली आस फाऊंडेशन आता सामाजिक कार्यात उतरली आहे. सोमवारी अकोल्यातील सुर्योदय आश्रमातील अनाथ विद्यार्थीनींना सात सायकलींचे वितरण करून या युवकांनी आणखी एक आदर्श उभा केला. आस फाऊंडेशनची उभारणी केलेल्या युवकांना त्यांच्या शिक्षकांनी कधीतरी अनाथ आश्रमात नेले होते. तिथली मुले बघून ही युवा मंडळी भावनिक झाली होती. त्या भारावलेपणातूनच त्यांनी आस फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून ते आता वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत....
  July 17, 12:48 PM
 • जानेफळ- स्वतःच्या शेतात फवारणी करण्यासाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या घटनेत शेतकऱ्याची पत्नी बालबाल बचावली आहे. ही घटना आज १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देळप शिवारात घडली. पारडी येथील शेतकरी ग्यानु दशरथ पवार वय ३८ याचे देळप शिवारात शेत आहे. दरम्यान आज ग्यानु व त्याची पत्नी हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव...
  July 16, 12:29 PM
 • खामगाव- सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात खामगाव तालुक्यातील १९ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार असून खामगाव तालुक्यासाठी १ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता...
  July 16, 12:18 PM
 • अकोला- बोंडअळीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी ५४.१० कोटींची रक्कम प्रशासनाकडे पोहोचली. या रकमेचे तालुकानिहाय वितरण सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर केले जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेली ही रक्कम दुसऱ्या टप्प्याची असून ३६.१४ कोटींचा पहिला टप्पा यापूर्वी प्राप्त झाला होता. गतवर्षी बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या...
  July 16, 12:11 PM
 • अकोला- कोट्यवधी रुपये खर्च करुन अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे सबलीकरण सुरु आहे. योजनेचे सबलीकरणही केले जाईल. तरी भविष्यात लागणारे पाणी आणण्याचे नियोजन मात्र महापालिकेने केलेले नाही. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, काटेपूर्णा एवढा प्रकल्प उभारणे आता शक्य नाही. वान प्रकल्पात महापालिकेसाठी ९ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. मात्र या आरक्षणास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, महापालिकेला पोपटखेड प्रकल्पात शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी...
  July 16, 12:04 PM
 • अकोला - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने शहराचे पाणी पुरवठ्याच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे. आठवड्यातून एकदा होणारा पाणी पुरवठा आता काही भागाला दोन तर काही भागाला तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. बदललेले हे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी पावसाने सरासरी न गाठल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात ५० टक्केही जलसाठा उपलब्ध झाला नव्हता....
  July 15, 12:25 PM
 • अकोला - शहरातील रस्त्यांची चाळण. पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी मनपा आयुक्तांनी पाच दिवसांचा कालावधी मागितला. परंतु सोमवारी याबाबत कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बांधकामाला सहा महिने उलटत नाही तोच शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले. परिणामी पादचाऱ्यांसह नागरिकांना वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी...
  July 15, 12:19 PM
 • अकोला - गुन्हेगारांवर वचक राहावा, त्यांची तपासणी व्हावी, म्हणून ऑपरेशन ऑल आऊट जिल्हा पोलिस राबवत असतात. हा उपक्रम पोलिसांनी शनिवारी रात्री राबवला. रात्र गस्तीवर पोलिस अधीक्षकांसह २४ अधिकारी व १२९ पोलिस कर्मचारी उतरले होते. त्यात त्यांनी निगराणी बदमाश, तडीपार आरोपीच्या घरी अचानक छापे टाकले. रात्री ११ वाजतापासून २ वाजेपर्यंत पोलिसांनी ऑपरेशन ऑल ऑऊट राबवले. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे व उपविभागीय पोलिस अधिकारी,...
  July 15, 12:19 PM
 • अकोला- पावसाळ्यात मन आल्हाददायी करणारी हिरवळ मनात भरते. जलाशये भरलेली असतात त्यामुळे साहजिकच पर्यटकांचा त्याकडे आेढा असतो. पर्यटनासाठी अकोला आणि परिसरातही रम्य स्थळे आहेत. पावसाळी पर्यटनाला निघाल्यास त्याची मजा लुटता येईल. निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळांमध्ये दुधाणी जंगलातील वॉटरफॉल, जटाशंकर वॉटरफॉल यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांची आेळख करुन घेऊ या... दुधाणी वॉटरफॉल : अकोल्याहून पातूर, माळराजुरा मार्गाने गेल्यावर फाट्याने दुधाणी पर्यंत वाहनाने जाता येते. दुधाणीपासून दीड ते दोन किमी....
  July 14, 12:19 PM
 • दर्यापूर- अल्पभूधारक शेतकऱ्याने जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज काढले. कर्जमाफी जाहीर झाली, परंतु ती न मिळाल्यामुळे नैराश्यात असलेल्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. यातूनच त्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांत पेपरवर चार एकर शेती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्रलेख करून जानेवारीत कार्यालयाला पाठविला. दहा महिन्यांपासून शेतकरी प्रमोद कुटे यांचा प्रशासनाशी लढा सुरू असून राज्य शासनाला तीन पत्र पाठवून कर्जमाफीची मागणी केली आहे. दरम्यान कुटे यांनी...
  July 14, 12:02 PM
 • भारताच्या उज्ज्वल परंपरेचे इतर देशवासीयांना मोठे आकर्षण आहे. त्यामुळेच आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अभ्यास जगभर सुरू आहे. अनेक देशांनी आपली संस्कृती आणि संस्कार आत्मसात करत आपली जीवनशैली बदलायचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. आपल्या व्यवस्थेत कुटुंब संस्थेला मोठे महत्त्व आहेे. याच कुटुंब संस्थेने आपली संस्कृती परंपरा आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. बदलत्या समाजव्यवस्थेत धकाधकीच्या आणि हम दो हमारे दोच्या जमान्यात कुटुंब लहान होत चालले आहे. शिक्षित आणि...
  July 14, 08:17 AM
 • अमरावती- स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहणारी एक युवती व अभिंयांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झालेला एक युवक बडनेरा ते अकोला महामार्गावर बुधवारी (दि. ११) मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास (डान्सिंग) कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांना सापडले. बडनेरा पाोलिसांनी या दोघांनाही ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. बडनेरा ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी बुधवारी मध्यरात्री ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर...
  July 13, 12:51 PM
 • अकोट- स्वत:जवळ कोणतीही वैध वैद्यकीय पदवी व वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर निखिल नंदकिशोर गांधी याच्यावर अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा बोगस डॉक्टर अकोट शहरातील डॉ. जपसरे व डॉ. केला यांच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तीन डॉक्टरांचे एक पथक तपासणीसाठी सिटी केअर हॉस्पिटल अकोट येथे पाठवून तपासणी केली असता निखिल गांधी याच्याकडे वैध वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र...
  July 13, 12:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED