जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Akola

Akola News

 • अकोला- सासुरवाडीत आलेला जावई हायटेन्शन लाइनच्या (उच्च दाब वाहिनी)खांबावर आत्महत्या करण्यासाठी चढला. पत्नी व सासरचे विनवण्या करू लागले; मात्र तो खाली उतरेना. डाबकी रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय खंडारे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नशेत असल्याचे पाहून त्याला पोलिस म्हणाले, तुला काय पाहिजे सांग, दारूचा बॉक्स देतो, खायला मटण देतो, तुझ्या बायकोपोरांकडे पाह्य अन् खाली उतर. त्यावर तो म्हणाला, मी खाली उतरलो तर तुम्ही मला मारहाण करणार.. घरी गेल्यावर तुम्ही रात्री घरी आले तर येणार...
  February 18, 10:49 AM
 • यवतमाळ- पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा बदला घेऊन त्यातील दोषींना त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरीही शिक्षा नक्की देण्यात येईल. मात्र, या गुन्हेगारोना शिक्षा कधी, कुठे आणि कशी द्यायची, हे आता भारतीय सैनिक ठरवणार आहेत. त्यासाठी आम्ही सैन्याला खुली सुट दिली आहे, अशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शनिवार (ता.16) यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांची पायाभरणी तसेच काही प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते...
  February 16, 06:45 PM
 • मलकापूर- देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या मलकापूरच्या संजय भिकमसिंग राजपूत यांना पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले. संजय यांच्या सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशभक्ताला कसली निवृत्ती? असे म्हणत आपल्या सेवेचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवून घेतला होता. संजय हे मलकापूर येथील वॉर्ड नं. २१, लखानी प्लॉटमध्ये लहानाचे मोठे झाले. शहीद संजय १९९६ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते. ते सीआरपीएफच्या ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते....
  February 16, 08:29 AM
 • बुलडाणा/धुळे- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे. मलकापूर येथील संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन्ही जवानांनी भारतमातेसाठी बलिदान दिले आहे. मामाच्या गावात पसरली स्मशान शांतता.. शहीद मेजर संजय राजपूत हे मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत. सात महिन्यापूर्वी भावाचा अपघातात मृत्यू झाला झाला होता. संजय राजपूत हे धुळे जिल्ह्यातील...
  February 15, 02:20 PM
 • सिंदखेडराजा - राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत असतील तर पहिले शांततेत सांगून पाहा, नसतील ऐकत तर माझ्याकडे तक्रार द्या, मी बघून घेतो, असा राष्ट्रीयीकृत बँकांना इशारा देत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मागील सरकारने पंधरा वर्षांत चारशे पन्नास कोटींची खरेदी केली तर आम्ही साडेचार वर्षांत तूर व हरभऱ्याची खरेदी करून ८ हजार ५०० कोटी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांचे तूर व हरभऱ्याचे ऑनलाइन व ऑफलाइनचे सर्व पैसे देणार आहोत, अशी...
  February 15, 10:45 AM
 • खामगाव- चुलत मामाने तोंड दाबून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याने तीला गर्भधारणा झाली आहे. नात्याला कलंक फासणारी ही घटना तालुक्यातील हिवरखेड येथे उघडकीस आली आहे. प्रकरणी अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम मामाला पुण्यातून अटक केली आहे. तालुक्यातील हिवरखेड येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच नात्याने चुलत मामा असलेल्या तानाजी विठोबा शिंगाडे (वय-30) याने रात्रीच्या वेळी वेळोवेळी तोंड दाबून...
  February 9, 07:35 PM
 • यवतमाळ - स्वाती भोयर हिने आत्महत्या केली नसूच तीचा खूनच करण्यात आल्याचा आरोप वडील माणिकराव गोरे यांनी केला असून शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि कळंब पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ७ फेब्रुवारी रोजी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यवतमाळ येथील स्वाती भोयर आपल्या दोन मुलांसह पती सुधीर भोयर यांच्या बहिणीकडे कळंबला कार्यक्रमानिमित्त गेली होती. त्या ठिकाणी पती सुधीर भोयर देखील हजर होते. अशातच १९ जानेवारीला...
  February 8, 12:25 PM
 • बुलडाणा - केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे शासन परिपत्रक जारी झाले असून, जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन हेक्टर लागवडीखालील क्षेत्रासाठी सहा हजार रुपये अर्थसाहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने गावनिहाय शेतकऱ्यांची यादी करण्यास आज ७ जानेवारीपासून सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र वहितीखाली असून यापैकी ९८ टक्के क्षेत्रावर...
  February 8, 11:33 AM
 • अकोला- 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे)एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने ४० वर्षीय आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने बुधवारी दिला. 24 एप्रिल 2018 रोजी आरोपी गजानन किसन आडदाळे (40) याने शौचास जाणाऱ्या 12 वर्षीय मुलाचा पाठलाग केला. शौचालयातच मुलाला 500 रुपये आमिष देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने विरोध केला असता त्याला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर जबरदस्ती करून अनैसर्गिक कृत्य केले....
  February 7, 12:04 PM
 • यवतमाळ- शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील गिट्टी खदानीजवळ प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.6) सकाळी समोर आली. दीपक जाधव (वय-21, रा. कमलेश्वर मंदिर, परिसर, लोहारा) या तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असून तिचे नाव गोपनिय ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.3) अल्पवयीन मुलगी ग्रंथालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची...
  February 6, 04:09 PM
 • अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून, शेतकऱ्यांचे दु:ख दूर सारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज योजनेत शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपये दिले. परंतु केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर, तसेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात मेरे देशकी धरती सोना उगले वाली परिस्थिती आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असा निर्धार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण...
  February 6, 10:51 AM
 • अकोला - दहा वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीच्या हमीवर उधारीतत्त्वावर रस्ते रुंदीकरण-बांधकामाची याेजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे. या उधारी व कंत्राटदाराची मानगूट सरकारच्या हातात असून, त्यामुळे रस्त्याचा दर्जा अबाधित राहण्यास मदत होईल, असे मत सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. याच हायब्रिट अॅन्युईटीअंतर्गत चार रस्त्यांचे भूमिपूजन हिंगणा फाटा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रस्ते चांगले होण्यासाठी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी...
  February 6, 10:44 AM
 • अकोला -महानगरात मंगळवारी पोलिसांनी दाेन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकले. दाेन्ही छाप्यात जवळपास ५० अाराेपींवर कारवाई करण्यात अाली असून, दाेन्ही छाप्यात राेख रक्कम, शस्त्रांसह इतरही साहित्य जप्त करण्यात अाले. छाप्याच्या वेळी कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात करण्यात अाले हाेते. जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात माेठ्या प्रमाणात जुगार सुरु हाेता. या ठिकाणी जुगारींची जत्राच भरत असे. जुगारींकडे कारवाई हाेऊ नये, अड्ड्यावर...
  February 6, 10:41 AM
 • अकोला -डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त १५१ कोटी रुपये देण्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षांत भाषणात केली. कृषी विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी विद्यापीठाच्या सभागृहात झाला. कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठ झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंदकुमार, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू व्यासपीठावर होते. १५१ कोटी...
  February 6, 10:37 AM
 • बुलडाणा : लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास भाजपसोबत युती असावी,असे मत सेनेच्या काही खासदारांचे आहे.पण त्याला पक्षप्रमुखांनी थारा न दिल्यामुळे काम न करणाऱ्या व मोदी लाटेत तरणाऱ्या खासदार आता चिंतेत आहेत. तर शेवटी येनकेन प्रकारे युती झालीच तर केवळ लाटेत निवडुन येणाऱ्या खासदाराला आता भाजपातूनच विराेध होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांकडून काही मिळेना व ज्याला मोदी लाटेत लाखाच्या मताधिक्याने निवडून आणले तो लक्ष देईना, अशी स्थिती भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे. नेतेही कार्यकर्त्यांच्या...
  February 4, 01:12 PM
 • अकोला : न्यू तापडिया नगरातील पवन नगरीत एका घरात घुसून तीन गुंडांनी धुडगूस घातला, या वेळी त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून दहशत माजवली व कारमधील चार लाख रुपये लंपास केले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तीनही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हेमंत भगीरथ मिश्रा हे एचडीएफसी फायनान्स मध्ये वसुली एजन्सी चालवतात. फायनान्स घेतलेले कर्ज वसुलीचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी...
  February 4, 01:07 PM
 • अकोला- पाच वर्षीय चिमुकलीला पाच रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग १ एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अब्दुल अजीज लालमीया देशमुख असे आरोपीचे नाव आहे. चिमुकलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने चिमुकलीला ९ जानेवारी २०१७ रोजी पाच रुपयांचे आमिष देऊन तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी गेल्यानंतर आईला मुलीची अस्वस्थता दिसली, त्यानंतर मुलीवर...
  February 3, 11:43 AM
 • शेगाव- निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच घेतांना शेगाव नगर पालिका मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी 9 वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्ताऐवज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी...
  February 2, 05:09 PM
 • संग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका सहा वर्षीय निरागस मुलीसोबत मागील १५ दिवसांपासून शिक्षक वर्ग खोलीतच अश्लील चाळे करत असल्याचे पीडित मुलीने आईवडिलांना सांगितले. त्यामुळे या नराधम शिक्षकाचे पितळ उघडे पडले आहे. ही घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक फरार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री अडगाव येथील एक सहा वर्षीय विद्यार्थिनी गावातील...
  February 2, 11:47 AM
 • अकोला : यागराज त्रिवेणी संगमात कुंभ मेळाव्याच्या पर्वावर स्नानासाठी रेल्वेने जात असलेल्या अकोल्यातील भाविकांना लुटल्याची घटना मध्यप्रदेशात गुरुवारी मध्यरात्री नंतर घडली. लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर ७ ते ८ लाखाचा ऐवज लंपास केला. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. अकोल्यावरून नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, रेखा खंडेलवाल यांचे समवेत जुगलकिशोर खंडेलवाल, शामली खंडेलवाल, रश्मी खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल सह १५...
  February 2, 11:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात