Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- २५ वर्षांपूर्वी अपघातामुळे कमरेतून अधू झाल्याने चालणे-फिरणे मुश्कील झाले, मात्र त्याचा बाऊ न करता निवृत्तीनंतर एका ७९ वर्षीय आजींनी परिसरातील लहान मुले, महिलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हरिपाठ वाचून दाखवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विमल मुकुंदराव क्षीरसागर असे या आजींचे नाव असून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ज्ञानदानाचे आपले कार्य या वयातही तेवढ्याच उत्साहाने सुरू ठेवले...
  3 mins ago
 • औरंगाबाद- गोळीबंद आवाजात जीवनावर परखड भाष्य करणारे लोकप्रिय कवी, अभिनेते पीयूष मिश्रा, पानिपतच्या लढाईला जिवंत करणारे विश्वास पाटील, भाषेवर अमोघ प्रभुत्व असलेले स्वानंद किरकिरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या कलांचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी दिव्य मराठी आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी (२५ नोव्हेंबर) रसिकांना लाभणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत हा महोत्सव रंगणार आहे. २५...
  20 mins ago
 • औरंगाबाद- दारणा धरणातून सोडलेले आणि केटीवेअरमध्ये अडवलेले पाणी जायकवाडीत सोडण्यास रविवारी रात्रीपासून सुरुवात झाली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडीत २.७१ दलघमी पाण्याची आवक झाली. केटीवेअरमधून अजूनही ७०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. निळवंडेचे पाणी जायकवाडीत दाखल झाले आहे. सध्या निळवंडेमधून सोडलेल्या विसर्गातून जायकवाडीत ७९४ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. गंगापूर, पालखेडचे थांबवलेले १.२० टीएमसी पाणी दारणा धरणातून सोडण्यात आले होते. मात्र नांदूर-मधमेश्वरसह खालच्या...
  21 mins ago
 • मुंबई/ अाैरंगाबाद-इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ मॅनेजमेंट (अायअायएम) ही अाैरंगाबादला हाेऊ घातलेली राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्था नागपूरला पळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबदल्यात अाैरंगाबादेत स्कूल अाॅफ प्लॅनिंग अँड अार्किटेक्चर (स्पा) ही संस्था उभारण्याची घाेषणा २०१४ मध्ये विधिमंडळात केली हाेती. तसेच ९ डिसेंबर २०१७ राेजी अाैरंगाबादेत विधी विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमातही त्यांनी तसे जाहीरही केेले. मात्र गेल्या ४ वर्षांत ही संस्था उभा राहू शकलेली नाही....
  06:33 AM
 • औरंगाबाद- माणसे जपण्याची हातोटी, व्यवस्थापन कौशल्य, नाविण्याचा वेध आणि समर्पण भावना, आदी बाबींच्या जोरावर ऋषी बागला हे देशातील उद्योग जगतात ठसलेले नाव. वडिलांनी दाखवलेला रस्ता आणि पत्नीने दिलेली उत्तम साथ, यामुळेच यश संपादन करू शकलो असेही ऋषी बागला सांगतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा संघर्षमय प्रवास! औरंगाबादमध्ये फारसे कुणी ओळखीचे नव्हते. आर्थिक परिस्थिती तर अत्यंत हातावर आलेली. पण, तरीही तिथे जाऊन उद्योग सुरू करायचा, ही खुणगाठ बांधून त्यांनी औरंगाबाद गाठले. सुरुवातीला...
  12:30 AM
 • औरंगाबाद - दुचाकीचे स्टँड रस्त्यावर घासत गेल्यामुळे तोल जाऊन रस्त्यावर पडल्यामुळे मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात एका शिक्षक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पैठण रस्त्यावर घडली. शिक्षकाच्या डोक्यावर हेल्मेट होते, मात्र ट्रकची जोरदार धडक बसताच हेल्मेट बाजूला पडले आणि अवाढव्य ट्रक डोक्यावरून गेल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले असून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा...
  November 20, 11:56 AM
 • औरंगाबाद- कला, साहित्य, संस्कृती म्हणजे सुसंस्कृत समाजाचे आभूषण असते. ही बाब लक्षात घेऊन दिव्य मराठीतर्फे २३ ते २५ नोव्हेंबर कालावधीत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या अनोख्या उत्सवात शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, अवधूत गुप्ते, साबरी ब्रदर्स, जितेंद्र जोशी, ऋजुता दिवेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. यापूर्वी हा महोत्सव नाशिकमध्ये होत होता. खास औरंगाबादकर आणि मराठवाड्यातील रसिकांची...
  November 20, 11:42 AM
 • खुलताबाद- तालुक्यातील पिंपरी शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. बिबट्याचा मृत्यू वन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. खुलताबाद वन विभागाला वन्यप्राण्यांचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न वन्यजीव तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात अाहे. तालुक्यात वन्यजीव...
  November 20, 09:01 AM
 • औरंगाबाद- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर ५ जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी खडसेंविरुद्ध दमानिया व इतर पाच जणांनी डिसेंबर २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. त्याला राष्ट्रीयकृत बँकेचा ९.५ कोटी, तर एका सहकारी बँकेच्या १० लाखांच्या डीडीच्या प्रती पुरावा म्हणून जोडल्या. मात्र हे डीडी दमानिया व इतरांनी बँकेतून चोरल्याची तसेच खोटी कागदपत्रे...
  November 20, 07:43 AM
 • औरंगाबाद - माहेरी राहण्यासाठी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास चिकलठाणा परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संगीता सुनील घोडके (२१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचा पती सुनील घोडके हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. चिकलठाणा भागातील सावित्रीनगरात मागील सात ते आठ महिन्यांपूर्वी संगीता आई-वडिलांकडे राहायला आली होती. त्यानंतर सुनीलदेखील शिर्डीहून...
  November 19, 10:15 AM
 • औरंगाबाद - गेल्या १८ महिन्यांपासून रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी असूनही मनपाला एक इंचभरही काम करता आले नाही. स्थायी समितीने दोन नोव्हेंबर रोजी एजन्सी नियुक्तीस मंजुरी दिली. १६ दिवसांत दोन ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीने पाठवले, उर्वरित दोन ठेकेदाराचे प्रस्ताव अडकवून ठेवल्याने यात अर्थकारण असल्याची चर्चा मनपात होत आहे. दुसरीकडे या हिश्श्यांमुळे रस्ते कामांना विलंब होत आहे. राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांची गेल्या...
  November 19, 09:40 AM
 • औरंगाबाद - गरवारे स्टेडियमवरील कलाग्राममध्ये सुरू असलेल्या औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शनात रविवारी गॅस सुरक्षा उत्पादनांचे प्रात्यक्षिक दाखवत असतानाच आगीचा भडका उडाला. विशेष म्हणजे संबंधित एजन्सीजचे कर्मचारी हातात लायटर घेऊन हे प्रात्यक्षिक दाखवत होते. सुदैवाने आग लागताच इतर स्टॉलधारक, प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी तत्काळ घरगुती वापराचे दोन सिलिंडर बाहेर काढून नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी आगीची घटना घडल्याने आयोजकांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रदर्शनच...
  November 19, 09:38 AM
 • अाैरंगाबाद - पतीच्या निधनानंतर दु:ख मनात ठेवून खंबीरपणे मुलांंना माेठे केले. एक मुलगी अपूर्वा पुण्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय, मुलगा अनिरुद्ध मुंबईत इंजिनिअरिंग करतोय. अाता मुलांनाही समज अाली हाेती. वडिलांच्या निधनानंतर सासरच्यांनी अंतर दिले, मुले बाहेरगावी शिकू लागल्याने अाई पुन्हा एकटी पडली, याची मुलांना जाणीव हाेती. त्यामुळेच अायुष्याच्या उत्तरार्धात तरी अाईलाही खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या जाेडीदाराची गरज अाहे, हे त्यांना पटू लागले. नकारार्थी उत्तर मिळणार हे माहीत...
  November 19, 08:48 AM
 • औरंगाबाद - पोलिस अधिकारी, राजकारणी, मंत्रालयात मोठ्या अधिकाऱ्यांच्या आेळखी असल्याचे सांगून तिघांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकाला हज कमिटीच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवून ३३ लाख रुपयांना गंडा घातला. तीन वर्षे वाट पाहूनही पद अन् पैसे परत मिळत नसल्याने व्यावसायिकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. आरेफोद्दीन सिद्दिकी नुरुद्दीन सिद्दिकी (४३, रा. जयसिंगपुरा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांचे शिक्षक असलेले मित्र हाफिज खालेद यांच्यासोबत बांधकाम व्यवसायाच्या...
  November 18, 10:57 AM
 • औरंगाबाद - मानसिक शांततेच्या शोधात असलेल्यांना आध्यात्मिक अनुभूती मिळवून देणाऱ्या रामकृष्ण ध्यान मंदिराचे शनिवारी (१७ नोव्हेंबर) हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. ९ वर्षांपूर्वी या मंदिराची पायाभरणी झाली होती. बीड बायपास येथील या मंदिराच्या लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजेपासून सुरुवात झाली. ६.३५ वाजता संन्याशांच्या चमूने श्रीरामकृष्ण देव यांचा महिमा विशद करणाऱ्या भजनांची सुरुवात करताच वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले. रामकृष्ण...
  November 18, 10:54 AM
 • औरंगाबाद - ऐतिहासिक शहर म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या औरंगाबादचे नाव आता खड्डे आणि कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जात आहे. आता ही ओळख पुसण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पातून होणार आहे. या प्रकल्पाद्वारे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील. मात्र, सर्व कामे महापालिकाच करेल, अशी भावना ठेवू नका. प्रत्येकाने हे माझे शहर म्हणून पुढे येत जबाबदारी घेतल्यास शहर स्मार्ट होईल. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कमिटी स्थापन करून लोकांचा सहभाग वाढवावा. आमची मदत...
  November 18, 10:45 AM
 • पैठण - तब्बल ३० ते ४० वर्षांपासून पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिर प्रशासनाच्या सर्व्हे क्र. २३३, २३५, २३७ वर ७४ कुटुंबांनी केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी नाथ संस्थान अधिक अाक्रमक झाले अाहे. नगर परिषद तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शनिवारी येथील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. याला स्थानिकांनी जाेरदार विराेध केला. या वेळी एक तरुण व तीन महिलांनी अंगावर राॅकेल अाेतून घेत अात्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला हाेता. दाेघा कुटुंबीयांनी पोलिस तसेच...
  November 18, 09:34 AM
 • औरंगाबाद - मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असलो म्हणून काय झाले, माझे मराठवाड्यालाच झुकते माप हे असणारच. मी नांदेडमध्येच लक्ष देतो, अशीही टीका होते. पण नांदेड आहे म्हणून मी तेथे आहे. त्यामुळे मी नांदेड आणि मराठवाड्याचाच विचार करणार. पाणीप्रश्न पेटवण्याचा प्रयत्न हाेताेय. या प्रश्नावर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येताना दिसतात. तसे आपल्याकडे होत नाही. मनातून सर्वजण एकत्र आल्याचेही वाटत नाही. हाही मागासलेपणाचा भाग असावा. त्यामुळे येत्या काळात तरी मराठवाड्यातील सर्वांनी एकत्र...
  November 18, 07:53 AM
 • औरंगाबाद-स्वामी विवेकानंद यांनी जबाबदारीची भावना, मानसिक दृढता, पराक्रम, विनय आणि विनम्रतेसह आचरण, ईश्वरभक्ती आणि देशभक्ती यांचा समन्वय साधणे आणि महिलांविषयी आदर बाळगणे या पंचकिरणांद्वारे जीवन कसे जगावे याची शिकवण युवकांना दिली. त्यांच्या या पंचकिरणांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनी स्वत:सोबतच देशाचीही प्रगती साधावी, असे आवाहन केरळच्या हरिपद येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी वीरभद्रानंद यांनी शुक्रवारी केले. निमित्त होते औरंगाबाद येथील विवेकानंद मार्गावरील (बीड बायपास)...
  November 17, 12:22 PM
 • औरंगाबाद- शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पोलिस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. पोलिस हा फोर्स नाही ती सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनदिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधावा, अशा शब्दांत आयुक्तांनी नागरिकांना अाश्वस्त केले होते. हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे एक हजार रुपयांची लाच घेताना योगेश पंडित सूर्यवंशी या पोलिस शिपायास वेदांतनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या दिवशी १३...
  November 17, 11:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED