Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान ९ अाॅगस्टला वाळूज एमआयडीसीत ७० कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे, असे अाैरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण गुन्हेगार अाहेत. अाराेपींपैकी काही जण वाळूजमधील कंपन्यांत कंत्राटी म्हणून काम करत असल्याचेही समाेर अाले अाहे. हल्लेखोरांची ओळख सीसीटीव्हीच्या...
  August 15, 09:05 AM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी ७० कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जगभरात पोहोचलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीला विशेष पोलिस दलाचे संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने एमआयडीसीत प्रवेशासाठीच्या सातही रस्त्यांवर पोलिसांचे चेक पॉइंट असतील. रांजणगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन होणार आहे. कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, मोर्चा, उपोषण आदी आंदोलनाला बंदी घालण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत ही कार्यवाही...
  August 14, 09:40 AM
 • बीड- बी.फार्म.ला प्रवेश न मिळाल्याने बीड तालुक्यातील सात्रा येथील मराठा समाजातील २० वर्षीय विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. दरम्यान, हिंगोली येथेही दोन ठिकाणी दोन महिलांनी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील सात्रा येथील राहुल पद्माकर हावळे (२०) याला औषधनिर्माणशास्त्र विषयाला प्रवेश घ्यायचा होता. मात्र इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुण कमी असल्याने शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला नाही. घरची परिस्थिती...
  August 14, 08:17 AM
 • अाैरंगाबाद- महाराष्ट्र बंदच्या दिवशी वाळूजमध्ये समाजकंटकांनी धुडगूस घालत सुमारे ७० कंपन्यांवर सशस्त्र हल्ले केले हाेते. मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ करून काेट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकाराची राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात अाली. साेमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत संपूर्ण वाळूज औद्योगिक वसाहतीला विशेष पोलिस संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद वाळूजमध्ये असताना हा...
  August 14, 07:31 AM
 • औरंगाबाद- अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात हालचालींना वेग अाल्याने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे २६ दिवसांपासूनच्या मान्सून ब्रेकची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. आयएमडीच्या अंदाजानुसार, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून सक्रिय होत आहे. दक्षिण कोकण व गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत मान्सूनचा आस उत्तरेकडून पुन्हा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण व मध्य भारतात मान्सून सक्रिय हाेऊ शकताे....
  August 14, 06:13 AM
 • अाैरंगाबाद- धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने साेमवारी मराठवाड्यासह राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता राेकाे, ठिय्या अांदाेलने करण्यात अाली. जालन्यात तीन ठिकाणी टायरची जाळपाेळ व किरकाेळ दगडफेक या घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र अांदाेलन शांततेत पार पडले. भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातही रस्त्यांवर मेंढ्या साेडून रास्ता राेकाे करण्यात अाला. ज्या धनगर समाजाने भाजपला सत्ता मिळवून दिली ताे समाज सत्तेवरून खाली...
  August 14, 05:46 AM
 • औरंगाबाद / वाळूज- मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी वाळूज एमआयडीसीत टोळक्यांनी केलेल्या तोडफोडीचा ठरावीक पॅटर्न पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या टोळक्यांनी ठरावीक कंपन्यांनाच टार्गेट केले. पोलिसांनी आतापर्यंत २८ कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्याचा अभ्यास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या ३६ संशयितांच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपवरील अकाउंटसह कौटुंबिक आणि मित्रपरिवाराचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. अटक केलेल्या तरुणांचा कुठल्या एका गटाशी संबंध आहे काय, या...
  August 13, 09:24 AM
 • परळी/वेरूळ/हिंगोली- पहिल्या श्रावणी सोमवारला भाविकांची होणारी गर्दी पाहता बारा मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांनी पुरेपूर तयारी केली आहे. परळीतील प्रभू वैद्यनाथ, वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी देवस्थानांसह प्रशासनानेही विविध सुविधा दिल्या आहेत. तिन्ही देवस्थानांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. परळी येथील वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख आणि राजश्री देशमुख यांनी वैद्यनाथास ट्रस्टच्या वतीने रुद्राभिषेक केला....
  August 13, 07:12 AM
 • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाचे निमित्त साधून गुरुवारी औरंगाबादजवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत ६० मोठ्या आणि १० लहान कंपन्यांवर भीषण हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही मोठी हानी झाली आहे. त्यामुळे एकेकाळी अत्यंत झपाट्याने वाढणाऱ्या या औद्योगिक नगरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा बदनामी झाली आहे. इथे उद्याेगांचा पाणीपुरवठा कधीही बंद केला जातो, असा संदेश दाेन वर्षापूर्वी सरकारच्या आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे...
  August 13, 06:48 AM
 • तीर्थपूरी / सेलू- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे ३२ वेळा लिहून घनसावंगी तालुक्यात ४० वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर सेलू तालुक्यातील एका युवकाने आपल्या मित्राला एसएमएस करून धनगर समाज आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (४०) यांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास विष घेतले. त्यांच्या खिशात दोन पानांची चिठ्ठी सापडली असून त्यात ३२ वेळा आरक्षण मिळालेच पाहिजे असे लिहिलेले होते. दरम्यान,...
  August 13, 06:02 AM
 • औरंगाबाद - पूर्वनियोजित कटानुसारच वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांची तोडफोड झाली. ही बाब दिव्य मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये स्पष्ट झाली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी प्रकरणात १२०-ब हे कलम (कट रचून दंगल घडवणे) वाढवले आहे. तसे जबाबही नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. ही तोडफोड उत्स्फूर्त असल्याचे पोलिसांचे शुक्रवारपर्यंत म्हणणे होते. मात्र सोबत हत्यार असणे, दारू पाजून लोकांना चिथावणी देणे, पोलिस पोहोचू नयेत यासाठी अडथळे आणणे, सिक्युरिटीच्या...
  August 12, 11:18 AM
 • औरंगाबाद - उद्योजकांनो, मी तुमची बाजू संसदेत त्याच दिवशी पूर्ण ताकदीने मांडली आहे. सरकार तुम्हाला मदत करणारच आहे, पण अशी वेळ पुन्हा उद्भवली तर शिवसैनिकांना एक फोन करा, असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी उद्योजकांना दिला. त्यांनी शनिवारी वाळूज येथील आठ कारखान्यांची पाहणी केली. वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात खा. खैरे यांनी उद्योजकांची बैठकही घेतली. त्यात हा सल्ला दिला. या वेळी आमदार संजय शिरसाट, वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष वसंत वाघमारे, पदाधिकारी पी. व्ही. मानकर, अशोक...
  August 12, 11:13 AM
 • वाळूज, औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान गुरुवारी वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. शनिवारपर्यंत या प्रकरणात ४९ कंपन्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात अाले असून प्रथमदर्शनी ६१ कोटींचे नुकसान झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कंपन्यांनी अद्याप नुकसानीचा आकडा जाहीर केला नाही. महसूल विभाग आणि पोलिसांकडून इन कॅमेरा पंचनामे सुरू असून सहा पथके नेमण्यात आली आहेत. दोन दिवसांत दीड हजार जणांवर सात गुन्हे दाखल होऊन पोलिसांनी ३६ जणांना अटक केली आहे....
  August 12, 10:41 AM
 • दौलताबाद/औरंगाबाद- सनातन संस्थेचा साधक म्हणून मुंबईतील नालासोपारा भागातून अटक केलेला शरद कळसकर 25 याचे अवघ्या 50 उंबऱ्यांचे केसापुरी हे मूळगाव देवगिरी किल्याच्या पायथ्याशी आहे. शरद कळसकर याच्या कुटुंबानी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे नोकरीसाठी जातो, असे सांगून तो गेला होता. अधूनमधून घरी येत होता. दर आठवड्याला फोनवरही बोलत होता. शुक्रवारी फोन आला की तुमच्या मुलाला एटीएसने अटक केली आहे. त्याचा नेमका दोष काय हे अजून समजले नाही. टीव्हीवर जेवढे पाहीले तेवढीच...
  August 11, 11:33 PM
 • औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदरम्यान वाळूजमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली. मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू असताना वाळूज एमआयडीसीतील ६० ते ७० कंपन्यांवर हल्ला करून तरुणांनी प्रचंड तोडफोड व जाळपोळ केली होती. पुण्यात १८५ अटकेत पुण्यात याच आंदोलनकाळात जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक व डेक्कन भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी १८५ जणांना अटक केली. दरम्यान, पुण्यात आता रस्त्यावर आंदोलन न करता साखळी...
  August 11, 10:28 AM
 • वाळूज- मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीमुळे उद्योग जगत हादरून गेले आहे. या घटनेतून आम्ही पुन्हा एकदा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ, मात्र तोडफोड करणाऱ्या दंगलखोरांना आम्ही क्षमा करणार नाही. हे दंगलखोर आमच्या कंपन्यांत काम करत असतील तर त्यांना कामावरून काढू टाकू आणि नसतील तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठेच रोजगार मिळणार नाही याची काळजी घेऊ. आमचा कोणत्याही आंदोलनाला विरोध नाही, मात्र...
  August 11, 09:12 AM
 • औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही. कंपन्यांत घुसून तोडफोड कुणी केली याचा उद्योजक व पोलिसांनी शोध घ्यावा. या हिंसाचाराची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. पाटील म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना घडल्या तर शहरात नवीन उद्योग येणार नाहीत. विविध कंपन्यांत मराठा मुले-मुली मोठ्या संख्येने...
  August 11, 08:30 AM
 • औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या अांदाेलनादरम्यान वाळूज एमअायडीसीतील सुमारे ६० ते ७० कंपन्यांत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीमुळे देशाच्या औद्योगिक नकाशावर औरंगाबादची माेठी बदनामी झाली. या घटनेने आम्ही भयभीत झालेलो असलो तरी उमेद सोडली नाही. आम्ही अाैरंगाबाद साेडून कुठेही जाणार नाही. विदेशी कंपन्यांनादेखील धीर देऊ. आतापर्यंत आम्ही समाजासाठी काम केले आहे आणि यापुढे करतच राहू, अशा भावना वाळूजमधील उद्योजकांच्या बैठकीत शुक्रवारी व्यक्त करण्यात अाल्या. आमचा कोणत्याही...
  August 11, 06:54 AM
 • औंरगाबाद - वाळूज एमआयडीमध्ये 60 कंपन्यात झालेली तोडफोड मराठा आंदोलकांनी केलेली नाही. या तोडफोडीशी आमचा काहीही संबंध नाही. काही जणांतर्फे आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या परिसरांत हिंसा कोणी केली, याची सीआयडी चौकशी करावी व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे. औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा हल्ला उद्योगांवर नव्हे, शहराच्या अस्मितेवर यावेळी विनोद पाटील यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये...
  August 10, 04:44 PM
 • औरंगाबाद- क्रांती चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आंदोलनात सहभागी होऊन ठिय्या मांडला. यादरम्यान काही आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढले. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने दानवे यांचा पारा चढला. त्यामुळे आंदोलक, दानवे व दानवे समर्थकांत धक्काबुक्की झाली. घोषणा देणाऱ्या तरुणांपैकी देवा नामक तरुणाला अंबादान दानवेंनी लाथ घातली. त्यामुळे वातावरण तापले. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि दानवे यांना तेथून तत्काळ बाहेर काढले. या...
  August 10, 12:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED