जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या १५५ उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सर्वच मतमाेजणी केंद्रांवर २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या वेळी सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात असून येथील निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची पहाटच उजाडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडणुकीत आठ मतदारसंघांतून तब्बल १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. औरंगाबाद...
  May 22, 09:54 AM
 • वैजापूर -माता-पित्याची हत्या करण्याची भीती दाखवून नवविवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार डागपिंपळगाव येथे शनिवारी पहाटे घडला. अत्याचार केल्यानंतर आरोपी पोलिस कारवाई होईल, या धास्तीने फरार झाला आहे. अप्पा मधूकर माकोडे (रा. डागपिंपळगाव) असे आरोपीचे नाव आहे. गावातील १९ वर्षीय युवतीचा विवाह १४ मे रोजी म्हस्की येथील युवकाशी झाला. विवाहानंतर दोन दिवस नवविवाहिता सासरी राहिली. तिसऱ्या दिवशी रितीरिवाजानुसार ती माहेरी आली. माहेरी ती रात्री घरात झोपलेली असताना आरोपी माकोडे याने तिच्याशी संपर्क...
  May 20, 10:04 AM
 • सिल्लोड -अवैधरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी (दि. १८)रात्री संशयित दोन आरोपींसह चार धारदार तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी शनिवारी तक्रार दाखल केली. सुनील पवार यांनी फिर्यादीत म्हटले की, शहरात झालेला लुटीचा तपास करत असताना राहूल मिलिंद सूर्यवंशी जयभवानीनगर, सिल्लोड याच्याकडे दोन तलवारी ठेवल्याची माहिती मिळाली. पथकासोबत पवार यांनी राहूल सूर्यवंशी याच्या घराची झडती घेतल्यानंतर...
  May 19, 10:03 AM
 • औरंगाबाद -भगवान गौतम बुद्धांनी जगाला मानवता, अहिंसेची शिकवण दिली. त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या शिकवणुकीबद्दल जगभरात संशोधन झाले. दुर्मिळ साहित्य निर्माण झाले. हे सारे साहित्य बुद्धपौर्णिमेनिमित्त म्हणजे १८ मे रोजी एका क्लिकवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाने ही किमया घडवून आणली आहे. तथागत गौतम बुद्धांनी कायम ज्ञानप्राप्तीचा आग्रह धरला. प्रत्येक गोष्ट स्वत: तपासून, अभ्यासून बघा, असे सांगितले. त्यांच्या शिकवणुकीवर...
  May 18, 09:32 AM
 • गंगापूर -गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जायकवाडी बॅकवाटर परिसरात चर खोदून पाणी उपसा सुरू असण्याबाबतच्या तक्रारीवरून जायकवाडी प्रशासन व वन विभागाने पोलिसांकडे कारवाईसाठी शिफारस केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हीकारवाई एकतर्फी यासंदर्भात माहिती अशी की, जायकवाडी बॅकवाटर भागातील गंगापूर व पैठण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ब्रम्हगव्हाण येथील शेतकरी सचिन लक्ष्मण तेजीनकर व त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून गंगापूर...
  May 17, 08:35 AM
 • औरंगाबाद -सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या जमिनीतील जलस्रोतही आटत चालले आहेत. राज्यातील ३५३ पैकी २९७ तालुक्यांतील भूजल पातळी एक मीटरपेक्षा अधिक खाली गेली आहे. २६४२ गावांमध्ये हे प्रमाण तर ३ मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्चच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात भूजल पातळीचा मागील ५ वर्षांच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास आहे. यातील आकडेवारी धक्कादायक आहे. अनेक ठिकाणी शेकडो फुटांवरही पाणी लागत नसल्याचे चित्र...
  May 16, 09:05 AM
 • पैठण -पैठण तालुक्यात दरवर्षी दुष्काळ असो किंवा नसाे, उन्हाळ्यात टँकर सुरु राहणारच ही परिस्थिती अाहे. यंदा तर टँकरच्या खेपांचा आकडा अडीचशे पार करून गेला असून अनेक गावांना टँकरचेही पाणी मिळत नाही ही परिस्थिती निम्म्या तालुक्यातील गावांची झाली अाहे. मात्र जायकवाडी धरणाच्या लगत अर्धा किमी अंतरावरील अनेक गावांनाही जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी मिळत नाही.एवढेच काय जायकवाडी धरणाच्या भिंतीलगत वसाहतीला देखील धरणाचे शुध्द पाणी मिळत नसल्याने पैठणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून धरणाच्या लगतचे...
  May 16, 08:22 AM
 • पैठण - पैठण तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांची तहान भागवणाऱ्या आपेगाव, हिरडपुरी या दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी साेमवारी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या गेटच्या पायथ्याशी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी धरणावर जाण्यापासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना रोखले असल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. रात्री काय तो निर्णय घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. सायंकाळी ६...
  May 14, 10:17 AM
 • औरंगाबाद - चिकलठाणा येथील गॅस पंपासमोरील एका गॅरेजला सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे आग भडकली. आगीमुळे सात ते आठ दुकानांचे नुकसान झाले. या आगीत १० ते १५ दुचाकींसह काही चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
  May 14, 08:32 AM
 • पुणे- औरंगाबादमधील एमआयएमचा माजी नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरोधात चाकण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीनवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद मतीन याच्यासोबत त्यांचा मेहुणा हमीद सिद्दीकी आणि बानी रशीद सय्यद यांच्यावरही विनयभंग आणि महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. सय्यद मतीन यांच्यावर आरोप करणारी महिला चाकणमध्ये राहते....
  May 13, 12:07 PM
 • कन्नड -तालुक्यातील गराडा येथे आग लागून चार घरे जळून खाक झाली तर चार मुके प्राणी आगीत होरपळून दगावले. दोन प्राणी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास आग लागली. कूड आणि पत्र्याची घरे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार घरे आगीत भस्म झाली. तर एक गाय, दुभती म्हैस, एक वगारू आणि एक बैल असे चार मुके प्राणी दगावले. एक वासरू,गाय आगीत गंभीररीत्या होरपळले आहेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. गावातही लग्न असल्याने चारही घरांतील माणसे लग्नासाठी गेलेली होती. काही मुले बाहेर...
  May 13, 09:59 AM
 • औरंगाबाद -दुष्काळामुळे जायकवाडी धरण यंदा इतके आटले की काही दशकांनंतर पहिल्यांदाच पाण्याअभावी विद्युत निर्मिती प्रकल्प बंद पडला आहे. त्यामुळे नदीपात्रात येणारा पाण्याचा प्रवाहच बंद झाला आहे. परिणामी या धरणाच्याच पायथ्याशी दक्षिण काशी म्हणून विख्यात असलेल्या तीर्थस्थळी उत्तर कार्यासाठी येणाऱ्या भाविकांना नदीतले स्वच्छ पाणी विकत घेऊन विधी उरकावे लागत आहेत. दक्षिण काशी अर्थात, पैठण हे संत एकनाथांचे गाव. इथे त्यांची समाधी आहे.याच गावात गोदावरी काठी संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून...
  May 13, 08:43 AM
 • बालानगर -पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात गट नं. २०३ शेतकऱ्याच्या शेतात कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकीत असताना भरलेले खासगी टँकर कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने या अपघातात जीवितहानी टळली. मात्र यात टँकरचे माेठे नुकसान झाले आहे. तलाठी दिलीप मानघरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेचे वृत्त हाती येईपर्यंत पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. दररोज विकतचे पाणी आणून...
  May 12, 02:53 PM
 • उस्मानाबाद -दुष्काळी पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी (दि.११) उस्मानाबादेत दुष्काळ, पाणीटंचाई व रोहयोची कामे यासंदर्भात सुरू असलेले काम व नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. या वेळी अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होऊन संतापलेल्या केंद्रेकर यांनी केवळ कार्यालयात बसून कागद काळे करू नका. बाहेर पडा, प्रत्यक्षात भेटी द्या, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी तेथे कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी स्वत:ची अक्कल चालवा, अन्यथा नोकरी सोडून घरी जा, असा...
  May 12, 09:54 AM
 • औरंगाबाद -चलती फिरती आँखों से अज़ाँ देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है... मुनव्वर राणा यांच्या या शेरमध्ये आईचे माहात्म्य एका ओळीत सांगितले आहे. औरंगाबादच्या अशाच एका मुस्लिम समाजातील आईने जेमतेम परिस्थिती असताना मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला. मात्र, तो काळ होता १९३०-४० चा. एकूणच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झालेले नव्हते. त्यात आठ मुली आणि मुस्लिम समाजातील महिला. पण आईच्या शक्तीने प्रत्येक संकटावर मात केली. त्यामुळे त्यांच्या घराला ग्रॅज्युएट हाऊस असे नाव देण्यात...
  May 12, 09:25 AM
 • औरंगाबाद- नागपुरमध्ये कुख्यात गुंडाने पोलिस व्हॅनमधून TikTok व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याची घटना ताजी असतानाच आता औरंगाबादमधूनही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. औरंगाबादमधून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा TikTok व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम अशी व्हिडिओत दिसत असलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे TikTok व्हिडिओ बनवल्याचं कोर्ट परिसरात बनवलाय. आरोपींनी TikTok व्हिडिओतून रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत....
  May 11, 03:26 PM
 • औरंगाबाद -राज्यातील रस्त्यांची चाळणी झाली असताना त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. एकट्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यात अशी १५९४ कामे आढळून आली. त्यापैकी १३४४ चे रेकॉर्डच उपलब्ध नाही. शासनाने बोगस कामांची देयके देण्यास मनाई केली होती. हा आदेश डावलून सा. बां. विभागाने ठेकेदारांना ६० कोटी रुपये वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. २००९ ते २०१४ या काळात राज्यात सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य...
  May 10, 08:52 AM
 • बोरगाव अर्ज -फुलंब्री तालुक्यातील गिरिजा नदीमुळे लगतची जमीन सुपीक असल्याने तालुक्यात हा गिरिजा काठ बागायती क्षेत्रात माेडताे. याच कारणामुळे गिरिजा काठ हा रब्बीच्या गव्हासाठी प्रसिद्ध हाेता. परंतु गेल्या दाेन वर्षांत ही परिस्थिती बदलली असून अल्प पावसामुळे गहू, बाजरी, ज्वारी ही रब्बीची पिके दाेन वर्षांपासून बंद झाल्याने आता धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवरच बाजारातून धान्य खरेदी करतानाचे भीषण चित्र फुलंब्री तालुक्यात दिसत आहे. अन्नदाता बळीराजालाच आता बाजारातून धान्य खरेदीची वेळ...
  May 9, 10:33 AM
 • औरंगाबाद - ईव्हीएमवरून होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर माझा अजिबात विश्वास नाही. मी दिलेल्या मताचे काय होईल, हे सांगताच येत नाही. अशा स्थितीत मी मतदान तरी का करायचे, म्हणून यंदा मी मतदान केलेच नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव यांनी दिव्य मराठीशी बाेलताना दिली. विशेष म्हणजे २०१४ मध्ये लाेकसभा निवडणूक लढवताना संपूर्ण यंत्रणेतच बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करणारे नंदू माधव यांचा आता मात्र निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. २०१४ मध्ये...
  May 9, 09:05 AM
 • औरंगाबाद -जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराची प्रकरणे एकामागून एक समोर येत असतांना मुख्यमंत्र्यांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामातही अधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील शेकटा येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामात मोठी अनियमितता झाली अाहे. ती लपवण्यासाठी योजनेचे रेकॉर्डच गायब करण्याचा कारनामाही करण्यात आला आहे. जलयुक्तच्या ४ कामांत ६८.४० लाख रुपयांचा अपहार समोर आला. याप्रकरणी ७ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे....
  May 8, 08:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात