Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- महाराष्ट्रात जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर जुलैपासून नैऋत्य मान्सूनचे गणित बिघडले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आता २२ ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये मान्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला या ब्रेकचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आता सर्व...
  August 9, 06:02 AM
 • औरंगाबाद- मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आश्वासने नकोत, ठोस अंमलबजावणी हवी. सरकारवर आमचा विश्वास नाही. म्हणूनच समाजाच्या विविध २० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोर्टाचा सन्मान राखून ९ ऑगस्ट राेजी अहिंसात्मक, असहकार व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात अाली अाहे. बुधवारी अाैरंगाबादेत समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. १० ऑगस्टला आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून एक वेळ चूल बंद, अन्नत्याग आंदोलनास सुरुवात होईल,...
  August 9, 05:44 AM
 • नागपूर- जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या अजिंठ्यातील लेण्या, शिल्प व चित्रांवर काळानुरूप झालेला प्रदूषणाचा थर काढून टाकण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंचा वापर केला जाणार आहे. जिवाणूंचा वापर करून होणाऱ्या बायो क्लिनिंगमुळे प्राचीन शिल्पांना धोका न पोहोचवता या कलाकृतींचे गतवैभव बऱ्याच प्रमाणात प्राप्त करता येईल, असा विश्वास नागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांना वाटत आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या...
  August 8, 12:15 PM
 • औरंगाबाद- भडकल गेट, ज्युबली पार्कच्या मॉडेल हायस्कूलमध्ये कारला हात लावल्यानंतर बझर वाजल्यामुळे एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. सोमवारी (6 ऑगस्ट) दुपारी दीड वाजता ही घटना घडली असून मंगळवारी पालकांनी ठिय्या आंदोलन करत शिक्षिकेला बडतर्फ करण्याची मागणी केली. नवखंडा महिला महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मॉडेल हायस्कूलची सुटी दुपारी एक वाजता होते. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापिकेच्या दालनाबाहेर लावलेल्या कारला इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत...
  August 8, 11:42 AM
 • मुंबई- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला अाहे. तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार बाबाराव मुसळे, पत्रकार, लेखक पुरस्कार डॉ. बाळ बोठे पाटील यांना, अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हेरंब कुलकर्णी आणि विशेष साहित्य पुरस्कार महेश लोंढे यांना देण्यात येणार...
  August 8, 08:05 AM
 • औरंगाबाद- सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मराठवाड्यात या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असले तरी प्रशासनाने मराठवाड्यात केवळ ४८०४८ कर्मचारी म्हणजे ४२ टक्केच कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा केला आहे. संपात राजपत्रित कर्मचारी संघटना सहभागी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी खोटी आकडेवारी सादर केल्याचा दावा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव देविदास जरारे यांनी केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महसूलसह इतर...
  August 8, 07:13 AM
 • गंगापूर/ नांदेड- सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव (ता. गंगापूर) येथील गोरखनाथ भीमराज वढणे (४५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. तसेच नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल येथील हाराजी माणिक जोगदंड यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. कायगाव येथील शेतकरी गोरखनाथ वढणे यांची कायगाव शिवारात दोन एकर बारा गुंठे शेती असून मागील काही वर्षांपासून नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यांनी नुकतेच पीक कर्ज काढून कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी...
  August 8, 05:56 AM
 • औरंगाबाद- रविवारी फ्रेंडशिप डेच्या रात्री दहानंतर अवैधरीत्या दारू उपलब्ध करून देऊन मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर तरुण- तरुणी नाचत असलेल्या कोकणवाडी चौकातील शैल फॅमिली रेस्टॉरंट अँड स्पोर्ट बारवर गुन्हे शाखेने छापा टाकला. आधी या ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू असल्याची टिप पोलिसांना प्राप्त झाली होती. परंतु घटनास्थळी कुठलेही अमली पदार्थ आढळले नाहीत. परंतु कुठलाही परवाना न घेता ठरावीक जागेच्या बाहेर बारच्या तिन्ही मजल्यांवर रात्री दहानंतर कर्कश आवाजात डीजे सुरू असल्याने पोलिसांनी...
  August 7, 02:47 PM
 • पैठण- पैठण शहरात आज आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो धनगर बांधव रस्त्यावर उतरले. यात पैठण शहर शंभर टक्के बंद राहिले. सरकारच्या निषेधार्थ भव्य रॅली काढण्यात आली व पैठण बंदचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे तत्काळ दुकाना बंद करण्यात आल्या. माजी आमदार संजय वाघचौरे, माजी जिल्हा परिषद सभापती रामनाथ चोरमले, सरपंच साईनाथ सोलाट, पंचायत समिती सदस्य बालाजी नलभे, योगेश पाचे, सुनील वीर, भगवान मैंदड, भरत पाचे, संदीप गाढे, शिवाजी पाचे, मिठ्ठू नन्नवरे, संतोष पाचे, महादेव गाढेकर, दादा पाचे, कैलास घटे, बाबासाहेब...
  August 7, 10:43 AM
 • औरंगाबाद- शहरात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून त्याचे पडसाद सोमवारी समांतर जलवाहिनीबाबत विचार करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत उमटले. महापौरांना दूषित पाण्याच्या बाटल्या देत हे पाणी पिणार कसे, असा सवाल नगरसेवकांनी केला आणि शहरभर पुरवठा होत असलेल्या दूषित पाण्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला. समांतरसाठी बोलावलेल्या सभेत नेमकी चर्चा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे नगरसेविका अंकिता विधाते यांनी दूषित पाण्याची बाटली महापौरांना देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले....
  August 7, 10:20 AM
 • औरंगाबाद- गेल्या १३ वर्षांपासून चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे नेमके काय करायचे, याविषयी निर्णय घेण्यासाठी सोमवारी मनपाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. पण त्यात तब्बल साडेसात तास नागरी समस्यांवरच चर्चा झाली. त्यावरही ठोस आदेश नव्हतेच. युतीच्या पदाधिकाऱ्यांना समांतरविषयी वाटाघाटीसाठी वरिष्ठस्तरावरून ग्रीन सिग्नल मिळालाच नाही. त्यामुळे सभेला समस्यांच्या वळणावर नेऊन औरंगाबादकरांची निराशा करण्यात आली. शनिवारी होणाऱ्या सभेत समांतरविषयी निर्णय घेऊ, असा...
  August 7, 10:16 AM
 • औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनांच्या वतीने मंगळवारपासून पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्यातील १६ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास जरारे यांनी दिली. राजपत्रित अधिकारी संघटनेने रात्री उशिरा या आंदोलनातून माघार घेतली असून सहभागी होणार असून सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार त्यात सहभागी होणार नाहीत. सातवा वेतन आयोग, रिक्त पदांची भरती व पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांवर सातत्याने चर्चा...
  August 7, 10:10 AM
 • औरंगाबाद- मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यत आरक्षण देणार, असे सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्री नोव्हेंबर म्हणत असतील तर आम्ही डिसेंबर महिना संपेपर्यत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोत. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून कॉग्रेसचे चक्री उपोषण सुरु आहे. पाचव्या दिवशी चक्री उपोषणाच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड,शहराध्यक्ष...
  August 6, 07:38 PM
 • औरंगाबाद- मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडीत अडकलेल्या औरंगाबादकरांना आता कचर्यावरही कर (Tax) द्यावा लागणार आहे. घरासमोर साचलेल्या कचर्यावर महापालिकाकडून घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नागरिकांकडून ग्राहक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. स्वच्छचा कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा पुरेसा नसल्याचे महापालिकेने म्हणणे आहे. ग्राहक शुल्कातून मिळालेल्या पैसा महापालिका कचरा निर्मूलनासाठी वापरणार आहे. असा कसा असेल कर? - सामान्य नागरिकांसाठी घरासमोरील कचरा दिवसभरात एक वेळ कचरा उचलण्यात...
  August 6, 06:14 PM
 • औरंगाबाद- गेल्या दीड वर्षापासून केवळ चर्चेत असलेली शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा सोमवारी उघडल्या जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळी तीनपेक्षा अधिक ठेकेदारांनी या कामात स्वारस्य दाखवले आहे. त्यातच या निविदा तिसऱ्यांदा मागवण्यात आल्याने एकमेव ठेकेदार आला तरी त्यालाच काम दिले जाईल. थोडक्यात, शहरातील दीडशे कोटींचे रस्ते कोण करणार यावर सोमवारी शिक्कामोर्तब होऊ शकते. नेमक्या कोणत्या रस्त्यांची कामे होणार हे दिव्य मराठी नागरिकांच्या समोर ठेवत...
  August 6, 09:53 AM
 • औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी सकाळी १० वाजेपासून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजेच्या सुमारास बागडे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले असता साडेतीन वर्ष आपण काय केले, १८ मराठा तरुणांनी बलिदान दिले आपण कुठे आहात? असे प्रश्न उपस्थित करताच विधिमंडळ चालवणारे अध्यक्ष काही वेळ निरुत्तर झाले. नंतर सरकार आरक्षण देणारच असे सांगत त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे आंदोलकांनी बागडेंच्या विरोधात...
  August 6, 09:50 AM
 • औरंगाबाद- बेरोजगारी आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसल्याच्या दुष्टचक्रात भरडल्या जाणाऱ्या तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आचार्य विद्यासागर हातमाग केंद्र संजीवनी ठरत आहे. केंद्रातर्फे तरुणांना हातमागावर खादीचे कपडे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी २५ हजार रुपये किमतीचे हातमाग यंत्र भेट देण्यात येत आहे. कच्च्या मालाचा पुरवठा करून तयार मालाच्या विक्रीची जबाबदारीही केंद्रच घेते. या उपक्रमात एकट्या औरंगाबादेत २१ हातमाग यंत्रांवर...
  August 6, 09:06 AM
 • औराळा- शेतातील राहत्या घरासमोरील अंगणात झोपलेल्या पती-पत्नीच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याची घटना, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हसनखेडा येथे घडली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जवळी येथील कारभारी रामचंद्र शिनगारे (६५), यमुनाबाई कारभारी (६०) असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हसनखेडा येथील गावातील एक महिला शेतात कामासाठी...
  August 6, 06:41 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यात सर्व ८६७ प्रकल्पांत केवळ २० टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्यातील येलदरी, सिद्धेश्वर, सिना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पांसह ११ प्रकल्पांत ऑगस्ट महिना सुरू झाला तरी शून्य टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २९० मिमी इतका पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीनुसार हे प्रमाण ८३ टक्के इतकेच आहे....
  August 6, 06:13 AM
 • औरंगाबाद- मॅनेजमेंट, फार्मसीच्याउच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एआयसीटीऐवजी यंदाच्या सत्रापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रवेश परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन असेल. यासंबंधीच्या सूचनादेखील एनटीएने संकेतस्थळावर दिल्या आहेत. यात म्हटले आहे की, यूजीसी नेट, सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) व जीपॅटमध्ये (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूट टेस्ट) काही प्रमाणात बदल केला आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील. या निर्णयामुळे एनटीए आता नीट आणि जेईईबरोबरच...
  August 6, 06:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED