Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतापासून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर दोन स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार अाहे. गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतून वाहत आंध्र प्रदेशात जाते. मराठवाड्यातून वाहणाऱ्या नदीची लांबी तब्बल ४९९ किलोमीटर आहे. मराठवाड्यातील...
  August 4, 09:19 AM
 • औरंगाबाद - अाैरंगाबादेतील एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराकडून अश्लील मेसेज, व्हिडिओ क्लिप पाठविण्यात येत आहेत. या त्रासाला वैतागलेल्या या महिलेने अखेर या माजी आमदाराविरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्याची पोलिसांनी आता चौकशी सुरू केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला उस्मानपुरा परिसरात राहते. ती अनेक वर्षांपासून एका राजकीय पक्षात काम करते. सध्या तिच्याकडे त्या पक्षाच्या महिला...
  August 4, 08:39 AM
 • औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी आमदारांनी विधिमंडळात तर खासदारांनी संसदेत आवाज उठवून तातडीने तोडगा काढावा, या प्रमुख मागणीसाठी लक्षवेधण्यासाठी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता आमदार सावे यांच्या औरंगाबादेतील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. सावे, खैरे, बागडे आरक्षणाच्या प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या नावे हाय हाय च्या घोषणा देवून मराठा बांधवांनी आपला रोष व्यक्त केला. पंधरा दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन, आत्मबलिदान,...
  August 3, 06:10 PM
 • औरंगाबाद - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय प्रशिक्षण सुरू असल्याचे दिसते आहे. राज यांच्या औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अमित हे त्यांच्या सोबत होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा आणि मनमोकळ्या स्वभावामुळे कार्यकर्ते ही त्यांच्याजवळ गेले. त्यामुळे अमित ठाकरे यांचेही या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाँचिंग होण्याची शक्यता आहे. अमित यांच्यासोबत...
  August 3, 04:46 PM
 • औरंगाबाद- ऐतिहासिक औरंगाबादेत विदेशी पर्यटक तोंडाला मास्क लावून येतात, ही सर्वांसाठी शरमेची बाब आहे. कचऱ्याचे ढीग पाहून महापौर, नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे रक्त खवळत नाही का? अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मनपाच्या कारभारी, राजकारण्यांना फटकारले. कचरा समस्येला महापौर, नगरसेवकांसह सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे. कोण चांगले, वाईट याचे प्रमाणपत्र आम्ही देणार नाही. सहा महिन्यांपासून कचरा प्रश्न सोडवण्याची केवळ...
  August 3, 10:26 AM
 • औरंगाबाद- जालना रोडवरील रामगिरी हॉटेलकडून कॅनॉट प्लेसमध्ये प्रवेश करताना मुख्य रस्त्यावर असलेले सराफा व्यापाऱ्याचे दुकान फोडून चोरांनी सव्वा किलो चांदीचे दागिने चोरून नेले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रिकब देवीलाल हिंगड (४२, रा. कॅनॉट) यांचे याच परिसरात कंचन ज्वेलर्स नावाचे चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. गुरुवारी सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या एका नागरिकाला दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्यानंतर हा प्रकार समोर...
  August 3, 10:25 AM
 • औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी उमेश इंडाईत (२२) या चिकलठाणा येथील राहणाऱ्या तरुणाने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. यामुळे दिवसभर चिकलठाणा भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शेकडो लोकांनी रस्त्यावर येत जालना ते औरंगाबाद मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद केली होती. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तब्बल दीड तासानंतर तणाव निवळला. उमेशने मृत्यूपूर्वी बी.एस्सी. होऊनही नोकरी मिळत नाही. मी मराठा आहे म्हणून की काय अशी चिठ्ठी लिहिली होती. २३ जुलैला काकासाहेब शिंदे या...
  August 3, 09:01 AM
 • औरंगाबाद-औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) अधिवेशनात दुसऱ्या दिवशी राज्यभरातून आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी सकाळच्या सत्रात भाषणे केली. आम्ही संघटना वाढवतो. मात्र, शेकाप रायगडातून बाहेर कधी येणार, असा सवाल या कार्यकर्त्यांनी पक्ष नेत्यांना भर व्यासपीठावरच विचारत त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असा आरोप होतो. मात्र, मोठ्या वडाखाली छोटे रोपटे कसे वाढणार, असे सांगत कार्यकर्त्यांकडून शेकाप-राष्ट्रवादीच्या...
  August 3, 07:51 AM
 • औरंगाबाद- दोन वर्षांपासून उमेश आसाराम एंडाईत (२२, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) हा बँकेच्या परीक्षांची तयारी करत होता. एमएस्सी केमिस्ट्रीच्या प्रवेशासाठीही प्रयत्न सुरू होते. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच तो दोन कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन आला होता. शुक्रवारी सकाळी एका मित्रासोबत टीव्ही सेंटर येथील एका कन्सल्टन्सीत जाण्याचे ठरवले होते. मात्र, सततच्या अपयशामुळे तो प्रचंड तणावात होता. गुरुवारी दुपारी दवाखान्यातून तपासणी करून घरी आल्यानंतर साडेबाराच्या सुमारास...
  August 3, 06:58 AM
 • औरंगाबाद- तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणारा प्रत्येक व्हिडिओ खराच असतो असे नाही. कारण आता फोटोप्रमाणे फेक व्हिडिओही सहज तयार करता येतो. त्यामुळे सोशल नेवटवर्किंगवरील माहिती तपासून घ्यावी आणि नंतरच ती फॉरवर्ड किंवा प्रकाशित करावी, अन्यथा हेतुपुरस्सर समाजात अशांतता पसरवणाऱ्यांचे फावते, असा सल्ला देत अशा प्रकारे फेक व्हिडिओ कसा तयार करता येतो याचे प्रात्यक्षिक न्यायवैद्यक तज्ज्ञांनी बुधवारी पत्रकारांना दाखवले. फेक न्यूज कशा ओळखायच्या आणि दक्षता कशी घ्यावी याबाबत जागृतीसाठी माध्यम...
  August 2, 10:26 AM
 • औरंगाबाद- कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया मागील महिन्यात जारी केली होती. यात दिल्ली, आंध्र प्रदेश आणि औरंगाबाद येथील कंपन्यांनी निविदा भरल्या. हे प्रकल्प उभे राहिले की औरंगाबादकरांची कचराकोंडीतून मुक्तता होईल, अशी आशा आहे. वर्षभरापूर्वी जे करायला हवे होते ते आता विलंबाने का होईना सुरू झाले असून निविदांना प्रतिसाद मिळाला...
  August 2, 09:42 AM
 • नेवासे- मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदेच्या दहाव्याचा कार्यक्रम बुधवारी कायगाव टाेका येथे झाला. शिंदेने ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली हाेती त्या कायगावच्या पुलाला त्याचे नाव मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने देण्यात अाले. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात अाला. काकासाहेब शिंदेने २३ जुलै राेजी कायगावातील गाेदापात्रात जलसमाधी घेतली हाेती. त्या वेळी या ठिकाणी संतप्त जमावाने माेठ्या प्रमाणावर ताेडफाेड केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली...
  August 2, 07:02 AM
 • औरंगाबाद - दहावीला 75 % गुण मिळूनही केवळ आरक्षणाअभावी अकरावीला प्रवेश मिळू शकला नाही या नैराश्यातून फुलंब्री तालुक्यातील वडाेदबाजार येथील प्रदीप हरिदास म्हस्के (16) या विद्यार्थ्याने मंगळवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. साेमवारी रात्री प्रदीपने जेवण करताना अाई-वडीलांकडे अारक्षणाचा विषय काढला हाेता. 75% मार्क्स मिळूनही अापल्याला केवळ अारक्षण नसल्याची खंत त्याने व्यक्त केल्याची माहिती प्रदीपच्या वडीलांनी दिली अाहे. तर प्रदीप वाचला असता... आयटीआय करण्याची प्रदीपची खूप...
  August 1, 11:34 AM
 • औरंगाबाद- राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलन सुरूच असून आरक्षणासाठी आत्महत्या केेल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यातील दोन आत्महत्या मराठवाड्यात तर विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे झाल्या. केज तालुक्यातील विडा येथे अभिजित बालासाहेब देशमुख (३५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात अकरावीला प्रवेश न मिळाल्याने प्रदीप हरिदास म्हस्के याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अभिजित याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत...
  August 1, 11:30 AM
 • औरंगाबाद- सरकारवरील दबाव आणखी वाढवण्याबरोबरच मराठा क्रांती मोर्चा आंदोलनास योग्य पटलावर आणण्यासाठी नवी रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार ज्येष्ठ विधिज्ञ, राजकारणी, उद्योजक, समाजकारणी, साहित्यिक, तरुण बुद्धिजीवी मराठा कार्यकर्त्यांना सहभागी करून घेऊन त्यांना मैदानात उतरवले जाणार आहे. त्याचे नियोजन मंगळवारी न्यायमूर्ती (निवृत्त) बी. एन. देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत झाले. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय बैठक बोलावली जाणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला...
  August 1, 11:09 AM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाचा बुधवारी दहाव्याचा कार्यक्रम असल्यामुळे औरंगाबाद- पुणे महामार्गावरील वाहतूक विविध मार्गे वळवण्यात आली आहे. औरंगाबाद-पुणे बस पैठण, शेवगाव, नगर मार्गे पुण्यासाठी धावणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाढलाच शिवाय प्रवाशांना जास्तीचे भाडेही मोजावे लागणार आहे. साध्या बससाठी प्रति प्रवासी ८५ रुपये, एसी बससाठी प्रति प्रवासी २१५ रुपये अधिक भाडे मोजावे लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या...
  August 1, 10:47 AM
 • औरंगाबाद- मराठ्यांसह सर्वच समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करत आहोत. एक सक्षम पर्याय यातून देण्याचा मानस आहे, अशी माहिती मराठा अारक्षणासाठी राजीनामा दिलेले शिवसेनेचे कन्नडमधील अामदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी दिली. क्रांती चाैकात सुरु असलेल्या सकल मराठा माेर्चाच्या ठिय्या अांदाेलनास भेट देऊन जाधव यांनी तिथेच पत्रकार परिषद घेतली. राजीनामा दिल्यानंतर जाधव साेमवारी मुंबईत गेले हाेते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट...
  August 1, 08:10 AM
 • पुणे- शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते म्हणून त्यांच्या विरोधात रान उठवत होतो. मग लोक म्हणतील आता मोदींच्या विरोधात का? कारण आताच्या राधामोहन सिंह यांना माहिती नसेल की ते कृषिमंत्री आहेत म्हणून. सगळे निर्णय मोदीच घेतात. त्यामुळे कृषिमंत्र्यांऐवजी निर्णयाचा अधिकार असणाऱ्या मोदींविरोधात बोलतो. शेवटी औत ओढणाऱ्या बैलालाच चाबकाचे फटके खावे लागतात, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते....
  August 1, 06:21 AM
 • लातूर- औसा येथील तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मंगळवारी दुपारी अमंगल घटना टळली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. एक मराठा...लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा जोरदार घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यापैकी 8 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा...
  July 31, 05:06 PM
 • बीड-मराठा आरक्षणासाठी आज (मंगळवार) आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. केज तालुक्यातील अभिजित देशमुख नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. कर्ज, औषधींचा खर्च आणि मराठा आरक्षणामुळे मी जात आहे. असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या शर्टाच्या खिशात आढळून आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही घटना वार्यासारखी पसरली. यानंतर जिल्हाभरातून मराठा समाज बांधवांनी विड्याकडे धाव घेतली आहे. दुसरीकडे संतप्त गावकर्यांनी अभिजित देशमुख याचा अंत्यसंस्कार विधी रोखला आहे. औरंगाबादमध्ये...
  July 31, 11:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED