Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाचा बुधवारी दहाव्याचा कार्यक्रम असल्यामुळे औरंगाबाद- पुणे महामार्गावरील वाहतूक विविध मार्गे वळवण्यात आली आहे. औरंगाबाद-पुणे बस पैठण, शेवगाव, नगर मार्गे पुण्यासाठी धावणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाढलाच शिवाय प्रवाशांना जास्तीचे भाडेही मोजावे लागणार आहे. साध्या बससाठी प्रति प्रवासी ८५ रुपये, एसी बससाठी प्रति प्रवासी २१५ रुपये अधिक भाडे मोजावे लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या...
  August 1, 10:47 AM
 • औरंगाबाद- मराठ्यांसह सर्वच समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करत आहोत. एक सक्षम पर्याय यातून देण्याचा मानस आहे, अशी माहिती मराठा अारक्षणासाठी राजीनामा दिलेले शिवसेनेचे कन्नडमधील अामदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी दिली. क्रांती चाैकात सुरु असलेल्या सकल मराठा माेर्चाच्या ठिय्या अांदाेलनास भेट देऊन जाधव यांनी तिथेच पत्रकार परिषद घेतली. राजीनामा दिल्यानंतर जाधव साेमवारी मुंबईत गेले हाेते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट...
  August 1, 08:10 AM
 • पुणे- शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते म्हणून त्यांच्या विरोधात रान उठवत होतो. मग लोक म्हणतील आता मोदींच्या विरोधात का? कारण आताच्या राधामोहन सिंह यांना माहिती नसेल की ते कृषिमंत्री आहेत म्हणून. सगळे निर्णय मोदीच घेतात. त्यामुळे कृषिमंत्र्यांऐवजी निर्णयाचा अधिकार असणाऱ्या मोदींविरोधात बोलतो. शेवटी औत ओढणाऱ्या बैलालाच चाबकाचे फटके खावे लागतात, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते....
  August 1, 06:21 AM
 • लातूर- औसा येथील तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मंगळवारी दुपारी अमंगल घटना टळली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. एक मराठा...लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा जोरदार घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यापैकी 8 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा...
  July 31, 05:06 PM
 • बीड-मराठा आरक्षणासाठी आज (मंगळवार) आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. केज तालुक्यातील अभिजित देशमुख नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. कर्ज, औषधींचा खर्च आणि मराठा आरक्षणामुळे मी जात आहे. असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या शर्टाच्या खिशात आढळून आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही घटना वार्यासारखी पसरली. यानंतर जिल्हाभरातून मराठा समाज बांधवांनी विड्याकडे धाव घेतली आहे. दुसरीकडे संतप्त गावकर्यांनी अभिजित देशमुख याचा अंत्यसंस्कार विधी रोखला आहे. औरंगाबादमध्ये...
  July 31, 11:35 AM
 • औरंगाबाद-केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असूनही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सरकारने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नागपूर ते पंढरपूर धनगर समाजाची जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने पांडुरंग मेरगळ यांनी सोमवारी औरंगाबादेत दिली. धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक औरंगाबादेत पार पडली. यासाठी...
  July 31, 08:39 AM
 • नांदेड/परभणी/औरंगाबाद- मराठवाड्यातच पावसाने चांगलीच दडी मारली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता नसल्याने आणि पावसाचा खंड मोठा असल्याने मराठवाड्यावर यावर्षी दुष्काळाचे मोठे सावट आहे. सोमवारपर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ४४.२२ टक्के पाऊस झाला आहे. इतरही जिल्ह्यांत अशीच परिस्थिती असून १५ वर्षांच्या काळातील हे सर्वात कमी पर्जन्यमान आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर या वर्षीही मराठवाड्याला दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येण्याची...
  July 31, 08:18 AM
 • सिल्लाेड- मराठा, मुस्लिम, धनगर, काेळी या समाजाच्या अारक्षणाबाबत फडणवीस सरकार ठाेस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ सिल्लाेड (जि. अाैरंगाबाद) येथील काँग्रेसचे अामदार अब्दुल सत्तार यांनी साेमवारी अापल्या पदाचा राजीनामा विधिमंडळाच्या प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला. काँग्रेसच्या सर्व अामदारांंची मुंबईत बैठक झाली. त्यात अनेक अामदारांनी राजीनामा देऊन सरकारवर दबाव वाढवण्याची सूचना केली हाेती. त्यासाठी पक्षश्रेष्ठींची परवानगीही घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. मात्र यानंतर काही वेळातच...
  July 31, 07:52 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यातील मराठा आरक्षण आंदोलनाची धग कमी झाली अाहे. आंदोलनात काही समाजकंटक घुसून हिंसाचार घडवत असल्याचा संशय आंदोलक आयोजकांना अाहे. त्यामुळे आयोजकांनीच आंदोलनाची तीव्रता कमी केल्याचे चित्र आहे. नांदेड येथे सोमवारी दोन बसेसवर दगडफेक झाली. वास्तविक रविवारी आणि सोमवारी कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नव्हती. आरक्षण आंदोलनाची तीव्रता कमी झाली असली तरी काही समाजकंटक महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करीत आहेत. रविवारी कोणत्याही आंदोलनाची घोषणा झाली नसतानाही...
  July 31, 07:45 AM
 • फुलंब्री- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला तहसीलदारांनी अडवताच चालकाने अात्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. फुलंब्रीच्या तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसीलदार उद्धव नाईक हे साेमवारी सायंकाळी खासगी वाहनाने जात असताना त्यांना बिल्डा फाट्याजवळ वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक दिसला. त्यांनी ट्रक थांबविण्यास सांगितले मात्र चालकाने गाडी औरंगाबादच्या दिशेने वेगाने पळविली. तहसीलदारांच्या वाहनाने पाठलाग करुन गणोरी फाट्याजवळ हा ट्रक...
  July 31, 07:29 AM
 • औरंगाबाद- चला आज एक मराठा जातोय...पण काहीतरी करा...मराठा आरक्षणासाठी करा अशी पोस्ट रविवारी (२९ जुलै) दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी फेसबुकवर तीन मित्रांना टॅग करून टाकत प्रमोद जयसिंग होरे पाटील (३६, जे सेक्टर, मुकुंदवाडी) याने मुकुंदवाडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पोस्ट टाकल्यानंतर नऊ तासांनी त्याने जीवनयात्रा संपवली. तत्पू्र्वी म्हणजे ४ वाजून ५० मिनिटांनेी त्याने रेल्वे रुळाजवळ सेल्फीही काढून फेसबुकवर टाकली होती. प्रमोदच्या मृत्यूचे कारण समोर येताच त्याचे शहरभर पडसाद उमटले....
  July 31, 06:53 AM
 • औरंगाबाद- सरकारच्या वेळखाऊ धोरण आणि मुद्दाम चालढकलपणा केल्यामुळे सकल मराठा समाज संतप्त झाला असून तो रस्त्यावर उतरुन ठोक मोर्चाच्या नेतृत्वात रोष व्यक्त करत आहे. पाच जणांचे बलिदान देखील गेले आहे. संपत्तीची हानी होत आहे. आपल्याला हे परवडणारे नाही. त्यामुळे जो पर्यंत ठोस निर्णय होत नाही तोवर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन सुरु ठेवावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जे चर्चाचे गुऱ्हाळ ठेवले त्याला आमचा तीव्र विरोध असून त्यांनी आता प्रत्यक्ष कृती करावी, यासाठी मागास वर्गीय अहवाल, अध्यादेश,...
  July 30, 07:38 PM
 • औरंगाबाद - रविवारी रात्री मुकुंदवाडीतील तरुण प्रमोद पाटील होरे यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्यानंतर सोमवारी सकाळी औरंगाबादेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व आत्महत्येमुळे प्रक्षुब्द्ध जमाव रस्त्यावर उतरला होता. जालना रोडवरील विविध दुकाने व कार्यालये बंद करण्यात आली होती. मुकुंदवाडी चौकापासून ते सिडको चौकापर्यंत जालना रोड ठप्प होता. त्या ठिकाणी जवळपास 1 ते दीड हजारांचा जमाव उतरला होता. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस व्हॅन व दंगा नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले होते....
  July 30, 02:16 PM
 • औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर प्रमोद होरे पाटील या तरुणाने मराठा आरक्षणासाठी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रमोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे, अशा आशयाची पोस्ट काल दुपारी फेसबुकवर टाकली होती. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आईवडील व मित्रांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते आढळून आले नव्हते. नंतर पोलिसांनीच घरी पोहोचून आईवडिलांना घटनेची माहिती दिली. तेव्हा हा प्रकार उजेडात आला. प्रमोद पाटील यांनी फेसबुकवर मराठा आरक्षणासाठी...
  July 30, 11:29 AM
 • औरंगाबाद- शहरात बनावट नोटा पुरवणाऱ्या बदमाशाला उस्मानपुरा पोलिसांनी हैदराबाहून अटक केली. इम्रान खान पठाण अब्दुल करीम खान पठाण (३०, रा. मूळ कंधार, हल्ली मुक्काम मेहंदी पटम, हैदराबाद) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी शहरात नोटा वितरित करण्याचा प्रयत्न करणारा दिशांत राजा साळवे (२४) आणि सय्यद मुसादिक अली यांना अटक करण्यात आली असून तिघांनाही ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घरीच नोटा बनवणारा इम्रान या टोळीचा सूत्रधार आहे. ग्राफिक्स डिझायनर असलेला इम्रान घरीच नोटा बनवत...
  July 30, 10:33 AM
 • औरंगाबाद- पडेगाव प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास पहिल्या दिवसापासून विरोध होत आहे. त्या त्या वेळी अधिकाऱ्यांनी समजूत काढताच नागरिकांचा विरोध मावळतो. परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा दुसरे आंदोलक विरोधासाठी रस्त्यावर उतरत असल्याने मनपाची डोकेदुखी वाढत आहेत. असा प्रकार रविवारी घडला. सकाळी सहापासून दुपारी दोनपर्यंत महिलांसह नागरिकांकडून कचरा टाकण्यास विरोध झाला. नागरिकांनी गाड्याच अडवून ठेवल्याने कचऱ्याची एक गाडी रिकामी केल्यानंतर अन्य दहा गाड्या परत आणाव्या लागल्या. प्रकरण वाढू...
  July 30, 10:30 AM
 • औरंगाबाद- भूजल पातळी खालावल्याने शेकडो फूट खोल बोअर मारूनही पाण्याचा टिपूस मिळण्याची शक्यता नाही. भरपावसाळ्यातही टँकरशिवाय पर्याय नाही, असे शहराच्या अनेक भागांचे सध्याचे चित्र आहे. हीच बाब हेरून शिवाजी पाटीलबा तुपे या तरुण प्लंबरने स्वत:हून टँकरमुक्तीचा विडा उचलला. स्वत:चे काम आटोपून वेळ मिळेल तेव्हा त्याने घरोघरी जाऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली आणि लोकांना घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी प्रोत्साहित...
  July 30, 10:25 AM
 • औरंगाबाद- थेट जेद्दाहपर्यंत सुरू झालेल्या विमानसेवेचा लाभ घेत १४६ हज यात्रेकरूंचा पहिला जथ्था रविवारी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावरून रवाना झाला. यात ७८ पुरुष, ६८ महिलांचा समावेश असून त्यात औरंगाबाद, नगर, जालना जिल्ह्यातील भाविकांची संख्या अधिक होती. दरम्यान, प्रतिमाणसी प्रवासभाडे २२ हजार ८०० रुपयांनी कमी असल्याने ५४० यात्रेकरूंनी मुंबईहून जाण्याचा पर्याय निवडला. २९ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान मुंबई विमानतळावरून, तर २९ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान चिकलठाणा विमानतळावरून भाविक चार...
  July 30, 09:18 AM
 • औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी बारा दिवसांपासून परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू असून रविवारी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी परळीत दुपारी येऊन आंदोलनस्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांसंदर्भात आलेल्या संदेश पत्राचे आंदोलकांत वाचन करून ते आंदोलकांना सुर्पूद केले. दोन वेळा चर्चा करूनही हे आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाच्या वतीने त्यांनी विनंती केली, परंतु तोडगा निघाला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत परळीतून...
  July 30, 06:09 AM
 • औरंगाबाद - शहराच्या विविध भागांतून चोरीस गेलेले तीन लाख दहा हजार रुपये किमतीचे २६ मोबाइल उत्तर प्रदेशात नेण्यापूर्वीच ते सिडको पोलिसांनी हस्तगत केले. दुचाकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने कबुली दिल्यामुळे बिंग फुटले आणि पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली. शहाबाज खान शरीफ खान, शाहबाज खान अन्वर खान (रा. मिसारवाडी) तसेच दिलदार अनिस अहेमद सिद्दिकी (रा. गोबराह बाजार, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. शाहबाज अन्वर खान हा सराईत गुन्हेगार...
  July 29, 11:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED