Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- शहराचा मध्यवर्ती भाग असणा-या गुलमंडीतील अतिक्रमणे काढण्यास आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तीन दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने दुकानासमोरील शेड आणि ओटे तोडण्यात आले. व्यापारी, राजकारण्यांच्या विरोधामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेल्या गुलमंडीतील अतिक्रमण हटाव मोहिमेला आज अखेर मुहूर्त सापडला. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या मोठ्या लवाजम्यासह येथील तीन दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढताना तणाव होऊ नये...
  June 5, 12:49 AM
 • औरंगाबाद - न्यायालयाने एका प्रकरणात जामीन मंजूर करूनही केवळ जामीनदार, सातबारा व ओळखपत्राअभावी दहा दिवस उलटले तरी हर्सूल जेलमधून दोघींची सुटका होत नसल्याची बाब समोर आली आहे. रेखा अजय दांडगे हिला २२ फेब्रुवारी २०११ रोजी तिच्या पतीने जाळले. घाटीत उपचार सुरू असताना २४ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पती अजय दांडगे, मयताची सासू सुजाता प्रभाकर दांडगे व नणंद शालिनी कैलास खरात यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात...
  June 5, 12:46 AM
 • औरंगाबाद - ग्राहक मंचने रिव्हरडेल हायस्कूलला त्रुटीची सेवा दिल्याबद्दल १८ हजार २५० रुपये देण्याचे आदेश दिले आहे. साई शिक्षण ट्रस्ट व इतरांनी हा दंड अर्जदारास देण्याचे आदेश ग्राहक मंचचे अध्यक्ष डी. एस. देशमुख व सदस्य रेखा कापडिया आणि ज्योती पत्की यांनी दिले आहेत. साई शिक्षणसंस्था, रिव्हरडेल हायस्कूल सातारा परिसर आणि संचालक साई संस्था यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. अर्जदार सुनील संभाजी वारभुवन यांनी आपल्या मुलाला सदर संस्थेत प्रवेश घेतला होता. संस्थेने ११ व १२ वीच्या...
  June 5, 12:44 AM
 • औरंगाबाद- योगगुरू रामदेवबाबा यांनी दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी सकाळपासूनच सत्याग्रह आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अनेकजण सहभागी झाले. प्राणायम व योगासनाने सकाळी ५ वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळपासूनच या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग मिळत होता. वृद्धासह युवकांनी सकाळपासूनच मंडपात गर्दी केली होती. या आंदोलनात पतंजली योग समितीच्या सेवकांसह अनेक...
  June 5, 12:40 AM
 • औरंगाबाद - जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली. बदल्या करताना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्टवादी शिक्षक संघटनेने केला आहे. बदली प्रक्रियेतील कर्मचा-यांच्या सी.आय.डी. चौकशीची मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. आहे. ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही संघटनेने दिला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल्या करताना शासन नियमांची पायमल्ली केली आहे. तसेच या प्रक्रियेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने केला आहे. हा...
  June 5, 12:36 AM
 • वाळूज । रोहिणी नक्षत्राचा शुक्रवारी दमदार पाऊस झाल्याने खाम नदीला पूर आला. नदी खळखळल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खाम नदीला पूर आला. या पाण्याचा विहिरींची पाणी पातळी वाढण्यासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.
  June 5, 12:34 AM
 • औरंगाबाद - ऐतिहासिक औरंगाबाद शहराला मिळालेली एक नैसर्गिक देणगी म्हणजे खाम नदी. कधीकाळी खाम नदीकिनारी ताज-ए-दख्खन म्हणजे बीबी का मकबरा आणि हिमायतबाग हे मुघलकालीन वैभव नांदत होते; पण मानवी हस्तक्षेप वाढला आणि या जैववैविध्य असलेल्या उद्यानाभोवती प्रदूषणाचा फास आवळला गेला. या परिसरात दिसणा-या पक्ष्यांच्या ३० प्रजाती तर दिसतच नाहीत. खाम नदीतील जलप्रदूषण, उद्यानाभोवती वाढलेली नागरी वस्ती, वाहनांचा गोंगाट, वृक्षतोड यामुळे येथील जैवसाखळीच नष्ट होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा...
  June 5, 12:30 AM
 • औरंगाबाद - गुजरातमधील कांडला पोर्ट येथून आलेले ३२०० टन डीएपी खत (डायअमोनिअम फॉस्फेट) रात्री पावसाने भिजले. यातील सुमारे ५०० टन खत २४ तास उलटले तरी त्याच प्लॅटफॉर्मवर पडलेले होते. भिजलेले खत बीड, उस्मानाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील इतर भागांत विक्री झाले. दरम्यान, भिजलेले खत विक्रीचा प्रयत्न झाल्यास शेतकयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खत भिजत असल्याची माहिती रुक्मिणी ट्रान्सपोर्टला दिली असतानाही कंपनीने खत न उचलले नसल्याचे रेल्वे विभागाचे कमर्शियल इन्स्पेक्टर शैलेश...
  June 5, 12:28 AM
 • औरंगाबाद- अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क आयोजित महाराष्ट्राचा' अप्रतिम महावक्ता स्पर्धेचे विजेतेपद गडचिरोलीच्या अॅड. सविता मोहरकर यांनी पटकावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या उपस्थितीत व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या वेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन पवार, भारत बरुरे हे विशेष उपविजेते ठरले. ३२ जणांना उपविजेते घोषित करण्यात आले. महाराष्ट्रातील राजकारणापासून...
  June 5, 12:25 AM
 • औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात ३ जूनला सरासरी ३०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वायासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. औरंगाबादसह जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात अंजनवती या गावात सावित्रीबाई शिवाजी येडे (४०), धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील शाहू ज्योतिराम नेहरकर (३०) व दोन बैल मरण पावले. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील बंदेवाडीचे रहिवासी विष्णू अंबादास जगताप यांचाही वीज पडून मृत्यू झाला.
  June 5, 12:21 AM
 • औरंगाबाद - दौलताबाद ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अतिक्रमण काढत असताना ग्रामसेवक पुंडलिक शंकरराव पाटील (एन-९ सिडको ) यांना शेख रहीम शेख अजीम आणि शेख बाबा शेख सत्तार (रा. दौलताबाद) या दोघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. पाटील यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. छावणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
  June 4, 11:30 PM
 • वाळूज - औद्योगिक परिसरातील कारखानदार रसायनयुक्त घनकचरा मोकळ्या जागेत टाकत असल्याने परिसरातील वातावरण धोक्यात आले आहे. कच-याच्या ठिकाणी साचलेले पाणी प्यायल्याने जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्याने परिसरातील विहिरी आणि इतर जलसाठे दुषित झाले आहेत.वाळूज औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमनीपणा सुरु केला आहे. रसायनयुक्त घनकचरा मोकळ्या जागेवर टाकण्यात येत आहे. या कचयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नाही. त्यामुळे...
  June 4, 11:23 PM
 • वाळूज - विरंगुळ्यासाठी उद्यान नसल्याने बजाजनगरातील बसथांब्यावरच ज्येष्ठ नागरिक बसत आहेत. घरात चांगली वागणूक मिळत नसल्याने अनेक वृद्ध बसथांब्यावर बसतात. या गप्पात कधी हसवणूक तर धीरगंभीर वातावरण असते. घरात वाईट वागणूक मिळत असल्याने कायद्याच्या माध्यमातून मदत मिळावी अशी अपेक्षा काही वृद्धांनी केली आहे. जागृत हनुमान मंदिर परिसरातील बसथांब्यावर गेल्या दहा वर्षांपासून वृद्ध बसतात. या परिसरात बहुतेक कामगार वास्तव्यास राहतात. वसाहतीला वाळूज औद्योगिक विकास महामंडळाकडून नागरी सुविधा...
  June 4, 11:14 PM
 • अहो, तुमच्या मुलात गुणवत्ता आहे. त्यालाही पाठवा खेळायला...... असे विवेक देशपांडेच्या वडिलांना त्यांच्या मित्राने सांगितले. त्यानंतर लगेचच सांस्कृतिक मंडळावर जिम्नॅस्टिक खेळण्यासाठी विवेकला त्याचे वडील सुधीर देशपांडे यांनी पाठविले. येथूनच जिम्नॅस्टिक खेळाची कारर्कीदीस सुरुवात झाली. खेळात काही तरी करून दाखवायचे या जिद्दीने विवेक गेल्या अकरा वर्षांपासून राष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू म्हणून नावारूपास आला आहे. आई-वडिलांनी घेतलेला निर्णय विवेकच्या कारकीर्दीस आकार देणारा ठरला. विवेक सात...
  June 4, 11:11 PM
 • औरंगाबाद - जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होत नाही आणि देशाची राष्टीय संपत्ती असलेले अब्जावधींचे काळे धन देशाला परत मिळत नाही तोपर्यंत महासत्तेचे स्वप्न साकारणे अशक्य आहे. त्यासाठीच रामदेवबाबांची भ्रष्टाचाराविरोधात लढाई आहे. त्या लढाईत आम्ही स्वत:ला झोकून दिले आहे. ही देशासाठीची लढाई जिंकणारच. बाबांचा विजयही देशाचा विजय असेल, असा सूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी जमलेल्या आंदोलनात सहभागी तरूणांमधून उमटला. दिल्लीतील रामलीला मैदानावर शनिवारी (४ जून) रामदेवबाबांचे...
  June 4, 10:59 PM
 • भर रस्त्यावर दिवसाढवया ट्रकचालकाकडून लाच घेणारे उमाकांत पाटील आणि तुकाराम राठोड हे दोन वाहतूक पोलिस अखेर निलंबित झाले. डीबी स्टार टीमने या लाचखोरांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांचे बिंग उघडकीस आणले होते. त्यानंतरही वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त एस. आर. ठाकूर यांनी आपल्या या दोन पोलिसांना वाचवण्यासाठी आटापिटा चालवला होता. निवेदन देणा:या अभियंता संघटनेच्या प्रवीण जाधव यांनाही आपल्या कार्यालयात बोलावून ठाकूर यांनी हवा तसा जबाब लिहून घेतला होता. त्याचेही डीबी स्टार टीमने स्टिंग...
  June 4, 03:21 AM
 • सर्व प्रकारच्या सुविधा असुनही औरंगाबादच्या प्री-आयएएस कोचिंग सेंटरमधून फक्त एक आयएएस झाला. सेंटरने तब्बल २५ वर्षांनंतर हा पराक्रम केला आहे. १९८६ मध्ये राज्यात चार ठिकाणी रिजनल स्टेट इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर सेंटर सुरू करण्यात आले. प्रशासनात मराठी टक्का वाढावा हा यामागे उद्देश होता. औरंगाबादसह नागपूर, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत. गेल्या वर्षापर्यंत औरंगाबादमधील केंद्रामध्ये दरवर्षी ६ जागांची प्रवेश क्षमता होती. यंदा प्रथमच...
  June 4, 03:19 AM
 • राजकारण ही कुणा एकाची मक्तेदारी नाही. मी आणि माझे पती दोघांनाही राजकारणाचा वारसा नसताना देखील समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाची संधी मिळाली. महापौर म्हणून काम करताना शहरासोबत महिलांचाही विकास करणार आहे. असे मत महापौर अनिता घोडेले यांनी डीबी स्टारच्या प्रश्न वाचकांचे या सदरात वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यक्त केले.आपल्या शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. कायमस्वरूपी भाजी मंडया का नाहीत? -अमित वसमतकरटी.व्ही.सेंटर चौक, जाधववाडी, औरंगपुरा...
  June 4, 03:16 AM
 • झाडांनाही मन असते. त्यांनाही हसत-खेळत बागडावेसे वाटते, ही दादासाहेब देशमुख यांची भावना. त्यांना जिव्हाळा-प्रेम दिला तर ती आनंद आणि फळे देतात, हा विचार. यातूनच अवघे पाऊणशे वयमान असलेल्या दादासाहेबांनी झाडांशी नाते जोडले. सिडको एन-८ भागात दादासाहेब हे सेवानिवृत्त अभियंता राहतात. या भागात त्यांचे सुंदर घर आहे. त्यांच्या घराची चार हजार चौरस फूट जागा आहे. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बाग फुलवण्यासाठी मोठी जागा सोडली आहे. या बागेत त्यांनी पंधरा प्रकारची विविध झाडे फुलवली आहेत. त्यात...
  June 4, 03:11 AM
 • शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या समतानगर, कोटला कॉलनीमधील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई, कचरा, खराब रस्ते, फुटलेली ड्रेनेजलाइन यामुळे समतानगर 'समस्यानगर' बनले आहे. या वसाहतीत मनपाची स्वतंत्र जलवाहिनी नसल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वसाहतीत सर्वत्र कच:याचे ढिग साचले आहेत. कच:यावर कुत्री, मांजरी, गायी, डुकरे यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रस्ते अरुंद असल्यामुळे रात्री-अपरात्री...
  June 4, 03:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED