जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद: बाळाचे शिक्षण आईच्या गर्भातच सुरू होते, त्यातही २ ते ६ वर्ष दरम्यानचा काळ बालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे दर्जेदार, विज्ञानवादी आणि वास्तववादी पूर्वप्राथमिक शिक्षण ही शिक्षण काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.जिजाऊ ज्ञान मंदिर या इंग्रजी शाळेच्या उदघाटप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव बोचरे यांची उपस्थिती होती. खेडकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे ठेवण्यासाठी...
  June 25, 01:53 AM
 • औरंगाबाद: दैनिक दिव्य मराठी आणि एमजीएम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी शास्त्रीनगर, गारखेडा परिसर, आंबेडकरनगर, विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिला व मुलांनी पुढाकार घेत या अभियानात उस्फू र्त सहभाग नोंदवला. साई पार्क एन-६ येथे सुनीता पवार, संगीता जाधव, डॉ. मंगला इंगळे, उत्तम चव्हाण यांनी वृक्षारोपण केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भानुदास मते (७५०७७७७६८०) यांच्याशी संपर्क साधावा.
  June 25, 01:47 AM
 • औरंगाबाद: अखिल महाराष्ट्र सुतार, लोहार संघाच्या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे २६ जूनला लोकार्पण करण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष सुदाम अण्णा खैरनार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल महाराष्ट्र सुतार, लोहार संघाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने तापडिया नाट्यमंदिरामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील सात मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. स्मरणिकेचे प्रकाशन व संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते होणार आहे....
  June 25, 01:44 AM
 • औरंगाबाद: थेट कारखान्यांतून रेडिमेड कपडे खरेदीनंतर बरीच वर्षे अवकळा सोसणा- या टेलरिंग व्यवसायाला कॉलेजकुमार, कुमारींच्या फॅशनेबल दुनियेत रममाण होण्याच्या ट्रेंडमुळे चांगले दिवस आले आहेत. फॅशनच्या झगमगाटाबरोबरच टेलर्सच्या व्यवसायाचा झगमगाट सुरू झाला आहे. कपड्यांच्या फॅशनचं विश्व बदलतंय. गेल्या काही वर्षांत रेडीमेड कपड्यांची मागणी वाढत होती. विशेषकरून कॉलेजकुमारींची पसंती चकचकीत रेडिमेड कपड्यांना होती. आता मात्र तो ट्रेंड हळूहळू बदलत चालला आहे. त्यामुळे टेलरिंग व्यवसायाला...
  June 25, 01:41 AM
 • औरंगाबाद: पुंडलिकनगर भागातील गजानन स्वरमंदिर दुकानावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांच्या सीडी जप्त केल्या. शुक्रवारी रात्री उशिरा ही धाड टाकण्यात आली. याप्रकरणी तीन युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. युनायटेड कॉपीराईट संघटनेचे विभागीय अध्यक्ष कुणाल खरात यांनी पोलिस उपायुक्त सुनीता साळुंके यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गजानन स्वरमंदिर या दुकानावर अवैध सीडीचा साठा सापडला आहे. यापूर्वी अशाच प्रकरणात किरण गोवर्धन पांडव, किशोर...
  June 25, 01:35 AM
 • औरंगाबाद: तंत्रनिकेतन पदविका अर्थात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आता ३५ टक्के गुणही पात्र धरले जाणार आहेत. बेस्ट आॅफ फाइव्हप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. अजित थेटे यांनी दिली. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी शहरातील दोन केंद्रांवर २२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी प्रवेशासाठी ५० टक्के गुण खुल्या गटासाठी आणि ४५ टक्के गुण राखीव गटासाठी होते. हा निकष आता ३५ टक्के...
  June 25, 01:31 AM
 • औरंगाबाद: गाळे सील करण्याची कारवाई कुणाच्याही दबावाखाली थांबविली जाणार नसून, या कारवाईसाठी लोकप्रतिनिधींचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज सांगितले. शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना दे म्हणाले, कारवाईत सुटलेले गाळे सील केले जाणार आहेत. आजपर्यंतच्या कारवाईत ३७७ गाळे सील केले गेले आहेत. एकदा लावलेले सील कुणाच्याही दबावाखाली उघडले जाणार नाही. एकूण ६५८ पैकी किती गाळ्यांना सील लावण्यात आले याचा हिशेब मात्र जुळत नसल्याचे त्यांनी...
  June 25, 01:29 AM
 • औरंगाबाद: बांधकाम क्षेत्रात जागतिक पातळीवर ओळख असलेल्या हिरानंदानी उद्योगसमूहाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी हे दिव्य मराठीच्या वतीने शनिवारी (२५ जून) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना ते कानमंत्र देणार आहेत. हा कार्यक्रम हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सायंकाळी ७ वाजता होईल. कॉन्फेडरेशन आॅफ रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स असोसिएशन्स आॅफ इंडिया (सीआरईडीएआय) या संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या सहकार्याने आणि शमित बिल्डकॉन व...
  June 25, 01:26 AM
 • औरंगाबाद: केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग केल्याने संतापलेल्या लोकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. आधीच महागाईने जगणे कठीण केले. त्यात गॅस, डिझेल दरवाढीचा भडका उडवून सरकार आम्हाला आणखी किती दिवस छळणार, असा संतप्त सवाल करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांत रॉकेल, डिझेल, गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या आगीत लोक होरपळत असताना केंद्र सरकारने आज रात्री आणखी तेल ओतले. यावर शहरातील लोकांनी...
  June 25, 01:21 AM
 • औरंगाबाद: रेंगटीपुरा रस्त्याकडून चंपा चौकाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर असलेल्या डीपीची संरक्षक भिंत पडली आहे. डीपीभोवती मोठय़ा प्रमाणावर कचराही साचला आहे.वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डीपीच्या संरक्षक भिंतीत पावसामुळे वीजप्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
  June 24, 05:54 AM
 • औरंगाबाद: जगात भारतीय संयुक्त कुटुंब पद्धत सर्वर्शेष्ठ मानली जाते. मात्र, बदलत्या काळानुसार आता विभक्त कुटुंब पद्धत रुजू लागली आहे.त्यामुळे अनेक घरातील ज्येष्ठ नागरिक वृद्धार्शमात राहतात. काहीजण परिस्थितीमुळे तर काहीजण परिस्थिती चांगली असूनही स्वत:च्या र्मजीने वृद्धार्शमात राहणे पसंत करतात. वृद्धार्शमात राहणार्यांकडे समाजातील काही लोक वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहत असतो. मात्र, वृद्धार्शम ही अपरिहार्यता आहे, असेच आज म्हणावे लागेल.ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या संध्यासमयी आधार...
  June 24, 05:52 AM
 • औरंगाबाद: गजबजलेल्या जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुर्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, वारंवार होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.रेंगटीपुरा ते चंपा चौक रस्त्यावर जड वाहनांना बंदी असूनही पोलिस कारवाई करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जड वाहनांमुळे वाहतूक नेहमीच खोळंबते.रस्त्यावरील खड्डय़ांमुळेही छोटेमोठे अपघात रोजच घडतात. तसेच खड्डय़ांमुळे वाहने घसरून पडतात.चंपा चौकातील ड्रेनेजलाइनवरील लोखंडी ढापे वाहनांच्या ओझ्यामुळे...
  June 24, 05:49 AM
 • औरंगाबाद: अखेर दहावीच्या त्या १२ विद्यार्थ्यांना बोर्डाने पास असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सर्वांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.आपल्या मुलांना घेऊन पालक दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात आले आणि त्यांनी डीबी स्टारचे आभार मानले. १७ जून रोजी दहावीचा निकाल लागला. या आॅनलाइन निकालात शहरातील जागृती शाळेतील १२ विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात शाळेनेच ग्रेड न दिल्याचे कारण सांगत बोर्डाने पास असूनही नापास ठरवले. त्यामुळे निकाल लागल्यापासून हे विद्यार्थी आणि...
  June 24, 04:56 AM
 • सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करणे ही खरे तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी. मात्र औरंगाबाद महापालिका यास अपवाद ठरणार आहे. समांतरच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. यामुळे औरंगाबादचे पाणी महानगरापेक्षाही महागाचे ठरणार आहे. गेल्या ६ वर्षांपासून समांतरचे गुहाळ मनपामध्ये सुरू आहे. नगरसेवकांना पूर्णपणे अंधारात ठेऊन महानगरपालिका प्रशासनाने हा महागडा प्रकल्प मंजूर करवून घेतला. ७९२ कोटी रुपयांची ही योजना असली तरी २०...
  June 24, 04:51 AM
 • औरंगाबाद: ४९ व्या राष्ट्रीय चॅलेंजर्स स्पर्धेत आज संपलेल्या १० व्या फेरीनंतर रेल्वेचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने दहापैकी ८.५ गुण मिळवून निर्विवाद आघाडी घेतली आहे. एम. आर. व्यंकटेशने स्पर्धेत जोरदार मुसंडी मारत पहिले दोन पराभव पचवत संयुक्त दुस-या स्थानावर १० जणांत विराजमान झाला आहे. एमआयटीमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत दहाव्या फेरीअंती पहिल्या पटावर महाराष्ट्रचा आदित्य उदेशी विरुद्ध रेल्वेचा विक्रमादित्य कुलकर्णी यांच्यातील फें्रच बचाव प्रकाराने डावास सुरुवात...
  June 24, 04:42 AM
 • औरंगाबाद : धरण क्षेत्रातील नादुरुस्त कालव्यातून वाहणा-या पाण्यामुळे व ड्रेनेजमुळे जमीन मृत होते. ती जमीन कशी पुनरुज्जीवित करावी, तसेच क्षारयुक्त जमिनीचा पोत कसा उंचवावा याची माहिती घेण्यासाठी (कर्नाटक) बेळगाव येथील मलप्रभा घटप्रभा प्रॉडक्ट संस्था, बेळगावचे संचालक एस. एम. बेबीनामवाड, प्रशासक ए. जे. धुमाळे व दोन अभियंते गेल्या तीन दिवसांपासून जल व भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) नवे तंत्र शिकत आहेत.कर्नाटकातील बेळगावमध्ये ड्रेनेज आणि नादुरुस्त कालव्यांतून वाहणाया पाण्यामुळे नापीक...
  June 24, 04:37 AM
 • औरंगाबाद : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणावर विसंबून न राहता सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच कुठलेही काम करताना योग्य नियोजन आणि कामाचा आराखडा तयार केल्यास यश नक्कीच प्राप्त होते, असे मत एम. एम. पटेल (सीएमए) यांनी व्यक्त केले. तापडिया नाट्यमंदिरात कॅटालिस्ट प्रोफेशनल अकॅडमी व दिव्य मराठीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉमर्स शाखेतील करिअर संधी या मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी कॅटालिस्टचे सीए सुमीत साबू, सीए नंदकिशोर मालपाणी, सीए गिरीश...
  June 24, 04:34 AM
 • औरंगाबाद: बडतर्फ मुख्याध्यापक फादर पीटर अमोलिक यांच्या तक्रारीने एसएफएस शाळा अडचणींचा सामना करत होती. मात्र, सर्व संकटाचा सामना करून ही शाळा नेटाने सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या हस-या चेह-यांनी शाळा आज गजबजून गेली, तर संस्थेचे सचिव फादर रॉड्रिक्स यांच्या चेहयावरही हसू झळकत होते. शहरातील नामांकित सेंट फ्रान्सिस डिसेल्स हायस्कूल या शाळेला कुलूप लागण्याची नामुष्की आली होती. शाळेत प्राथमिकचे १,४५०, माध्यमिकचे ८५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेचे माजी विद्यार्थी आणि पालकांनी...
  June 24, 04:31 AM
 • औरंगाबाद: वेळ आठ ते नऊ... स्थळ सूतगिरणी चौक... बरीच वर्षे खडकाळ रस्त्यांची सवय झालेल्या औरंगाबादकरांना दर्गा रोड ते गजानन महाराज मंदिरापर्यंत सध्यातरी गुळगुळीत रस्ता मिळाल्याने सुसाट वेगाने वाहने पळविण्याची शर्यत सुरू झाली आहे. त्यामुळेच गजानन महाराज मंदिराकडून येणारी, दर्गा रोडकडून येणारी आणि मंदिराकडे व शिवाजीनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने एकमेकांवर आदळण्याची आता प्रतीक्षा आहे. कदाचित अशा अपघातामध्ये काही जणांचे बळी गेल्यानंतरच येथे सिग्नल सुरू करण्याचा शुभमुहूर्त साधला...
  June 24, 04:29 AM
 • औरंगाबाद: सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांविषयीची माहिती आता शाळकरी मुले देतील. महापालिका आणि प्राणिमित्र संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. परदेशातील प्राणिसंग्रहालयांच्या धर्तीवर झू पोलिस ही नवीन संकल्पना राबवण्यात येणार आहे. संग्रहालयातील प्राण्यांची माहिती देण्यासाठी विद्यार्थी किमान दोन तास स्वयंसेवक म्हणून उद्यानात काम करतील. मुलांमुळे पर्यटकांना प्राण्यांची अचूक माहिती मिळेलच, शिवाय उपद्रवी पर्यटकांपासून प्राण्यांचे संरक्षणही शक्य होईल. सिद्धार्थ...
  June 24, 04:26 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात