जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद - एक कदम उठाया था राह-ए-शौक में गलत.. मंजिल हमें सारी जिंदगी ढूढती रही....हा शेर औरंगाबादेतील.....लोकांना तंतोतंत लागू होतो. या सा-यांनी तंबाखू आणि सिगारेटच्या व्यसनात आपले जीवन बर्बाद केले आहे. ३१ मे रोजी व्यसने सोडण्याचे संकल्प सोडले जातात, पण पाळले जात नाहीत. आज जागतिक तंबाखूविरोधी दिवस आहे. या दिवसाला व्यसने सोडा आणि संकल्प पाळा, असा संदेश तंबाखू आणि सिगारेटमुळे बर्बाद झालेल्यांनी इतरांना दिला आहे. 'कॉर्पोरेट' जीवनशैलीने सारे बिघाड हेडगेवार रुग्णालय में चेस्ट फिजिशियन डॉ....
  May 31, 02:34 AM
 • औरंगाबाद - गुटख्याच्या सेवनामुळे २0ते २५ या वयोगटात सबम्युकस फायब्रोसिसचे म्हणजेच कर्करोगाच्या पूर्वस्थितीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्य:स्थितीत तरुणांबरोबरच बालकामगारांमध्येही गुटखा, तंबाखू सेवन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तंबाखू, गुटखा, सुपारी, दारू आदींच्या व्यसनामुळे मुखकर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यातच अलीकडे गुटखा सेवन हे अतिशय सहज दिसणारे चित्र आहे. गुटखा हे सबम्युकस फायब्रोसिस या आजाराचे महत्त्वाचे कारण समजले जाते. आजघडीला सबम्युकस फायब्रोसिसचे...
  May 31, 02:31 AM
 • औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटीच्या लिथोट्रिप्सी विभागातील यंत्रणा चार ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मूतखड्याच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ही यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना ऑपरेशनद्वारे मूतखडा काढण्याची प्रक्रिया करावी लागते. घाटीमध्ये शहराबरोबरच जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे रुग्णांचा ओघ जास्त असतो. मात्र, लिथोट्रिप्सी यंत्रणा बंद असल्याने...
  May 31, 02:27 AM
 • औरंगाबाद - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी येत्या ४ आणि ५ जून रोजी काँग्रेस पदाधिका-यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. या वेळी केंद्रीय नेते जनार्दन द्विवेदी, मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश काँग्रेस नेते मार्गदर्शन करणार आहेत. नाशिकच्या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि ब्लॉक प्रतिनिधी हजर राहणार आहेत. त्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी सुरू असून,...
  May 31, 02:22 AM
 • औरंगाबाद - जिल्हा परिषदेत बदल्यांचे वातावरण तापलेले असतांनाच सामान्य प्रशासन विभागात संघटनेत असणा-या पदाधिका-यांना बदल्यांमध्ये सूट देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या आज (३ मे) निश्चित करण्यात आल्या. या विभागात असणारे कर्मचारी हे सरकारमान्य संघटनांशी संबंधित आहेत. यामुळे बदल्यांमध्ये कर्मचा:यांना संघटनेत असण्याचा लाभ घेता आला, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी दिली. विभागात एकुण ८ बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी ३९...
  May 31, 02:20 AM
 • औरंगाबाद - स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे शहरात ३१ मे रोजी आगमन होत आहे. रात्री ८ वाजता सामुदायिक महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १ जूनला दुपारी १२ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा पूर्ण करणारा हा पालखीचा सोहळा शहरात ११ व्या वर्षी होत आहे. या प्रयोजनातून श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे भक्ती निवास ही भव्य वास्तू अन्नछत्र महामंडळाच्या वतीने साकार होत आहे. अक्कलकोट येथील राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची...
  May 31, 02:19 AM
 • औरंगाबाद - शिफॉन, प्लेन, क्रॅश शिफॉन, क्रोशावर्क, मिररवर्क, नेट, चिरमन आदी पॅटर्नच्या ओढण्या घेण्याकडे तरुणींचा कल वाढतो आहे. जास्तीत जास्त शिफॉन, कॉटन, नेट या प्रकारातील ओढण्यांची विक्री मोठया प्रमाणात होत आहे फॅशनच्या दुनियेत दररोज टे्रंड बदलतात. पंजाबी डे्रसच्या फॅशन दुनियेत ओढणीला फार महत्त्व आहे. ओढणी, दुपट्टा या शब्दांवर बॉलीवूडमध्ये अनेक गाणी चित्रित झाली आहेत. इतरांपेक्षा वेगळे दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे रेडिमेड ड्रेस न घेता ब:याच तरुणी टॉप आणि चुडीदारसाठी...
  May 31, 02:05 AM
 • औरंगाबाद - वाळूज,शेंद्रा,बीडबायपास हया भागात कंपन्यांची संख्या वाढत असल्याने या भागात महिला चुल्याच्या आधाराने पोळी भाजी केंद्र चालवित आहे. सध्या औरंगाबादेत साठहून अधिक पोळी-भाजी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांतून दररोज अनेक महिला आपल्या पाककौशल्याच्या जोरावर अर्थार्जन करत मान सन्मानाने जगत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे कुटुंबातील दोघांनाही घर चालविण्यासाठी काम करावे लागते. त्यातही अपुरे शिक्षण हे महिलांच्या विकासातील मोठा अडथळा असतानाही यावर मात करून उपजत गुणांना...
  May 31, 02:02 AM
 • औरंगाबाद - व्हिजन २२, नगरोत्थान नावाच्या दोन योजनांनी शहराचा विकास होईल, असे सुंदर स्वप्न महापौरांकडून दाखवले जात आहे. हे स्वप्न ६२२३ कोटी रुपयांचे आहे. या स्वप्नाचे कागदी वास्तव असे की, ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण या योजनांसाठीची ५ टक्के रक्कम महापालिकेला उभी करायची आहे. कर्मचा:यांच्या पगारासाठी पैसा नसलेली, तीन वर्षांपूर्वी रस्त्यांकरिता ६ कोटींचे कर्ज नाकारणारी महापालिका हा पैसा कसा उभा करणार हे अजूनही ठरलेले नाही. आधीच्या महापौरांनीही याचा विचार केला नाही. नगरोत्थान, व्हिजन...
  May 31, 01:55 AM
 • औरंगाबाद - जिल्हा न्यायालयामध्ये दररोज दोन हजारांवर लोकांचा वावर असतो. त्यात न्यायाधीश, वकील, पक्षकार, साक्षीदार, सामान्य नागरिक आणि आरोपी यांचा समावेश असतो. मात्र, या न्यायालयाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात सध्या एकही पोलिस सुरक्षेसाठी तैनात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीबरोबरच न्यायाधीश व सरकारी वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. अनेकदा निवेदने देऊनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. जिल्हा...
  May 31, 01:52 AM
 • औरंगाबाद - वीजदाबात अचानक वाढ झाल्यामुळे काल, दि. २९ मे रोजी शहरामधील काही दुकानदारांची उपकरणे जळाली. कॅनॉट प्लेस मार्केट परिसरातील सुमारे १५ हून अधिक दुकानांमध्ये झेरॉक्स आणि फॅक्स मशीन्स विजेचा दाब वाढल्यामुळे जळाल्या. दाब कमी-जास्त असल्यामुळे दुकादारांनी जनरेटर वापरण्यास सुरुवात केली आहे. जीटीएल कंपनीला शहरातील वीज वितरण व दुरुस्तीचे आव्हान पेलत नसल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. रविवारी कॅनॉट प्लेसमध्ये असणा:या बाजारपेठेत सायंकाळी अचानक विजेचा दाब वाढला. यामुळे शॉर्टसर्किट...
  May 31, 01:46 AM
 • औरंगाबाद - युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड अर्थात 'आधार'साठी नोंदणी करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील ५ हजार कर्मचा:यांनी अद्यापही नोंदणी केली नसल्याची माहिती उघड झाली आहे. या कर्मचा:यांचे पगार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्ड तयार करून घेणे सर्वांना बंधनकारक आहे. त्यानुसार शासकीय कर्मचा:यांना नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या नोंदणीसाठी 'अलंकित'आणि 'विप्रो' या दोन एजन्सीज काम करत आहेत. कर्मचा:यांना नोंदणीसाठी जून महिन्याची मुदत देण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी...
  May 31, 01:45 AM
 • औरंगाबाद - स्थायी समितीचे पाच सदस्य व विशेष समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या ७ जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार काँग्रेसच्या सदस्य निवडीचे अधिकार मीर हिदायत अली यांना देण्याची तयारी महापौरांनी दाखविली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे प्रमोद राठोड आणि अब्दुल साजेद यांनी स्वतंत्र पत्र देऊन स्थायी समिती सदस्य निवडीच्या अधिकारावर दावा केला होता. महापौर अनिता घोडेले यांनी त्यावर शासनाचा अभिप्राय मागितला होता. त्यावर काही...
  May 31, 01:43 AM
 • औरंगाबाद - काही पालिका अधिका-यांच्या कारभारामुळे होर्डिंग्जच्या (जाहिरात फलक) माध्यमातून मिळणारे महापालिकेचे ५६ लाख रुपये कंत्राटदाराच्या घशात गेले आहेत. त्याची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसूल करण्याएवजी टोलवाटोलवीचा प्रकार सुरू आहे. २१ मध्ये महापालिकेने शहरातील ३ जागी होर्डिंग्ज लावण्याची एकत्रित निविदा काढली. त्यात करारामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवत कंत्राटदाराला अनुकूल अशा काही सवलती देण्यात आल्या. नागपूरच्या एका कंपनीने ७६ लाख रुपयांत हे कंत्राट मिळविले. २३ मध्ये...
  May 31, 01:41 AM
 • जनार्दन रामचंद्र कापुरे औरंगाबाद - माझ्यासोबत प्रवास करीत असलेल्या अमोल जगत याचा अपघातात मृत्यू झाल्याचे मला सहा महिन्यांनंतर समजले. कारण माझाही त्यासोबत अपघात झाला होता. नऊ दिवस मी कोमात होतो. माझे सुदैव की मी त्या अपघातात वाचलो आणि माझा जीवश्च कंठश्च मित्र अमोलने या जगाचा निरोप घेतला.फुलंब्री चौकात घडलेला तो अपघात आजही आठवला तर अंगावर शहारे येतात. २९ डिसेंबर २८ ला रात्री ८.३ वाजता आमचा अपघात झाला. फुलंब्रीहून येत असताना एका पोल्ट्रीच्या टेम्पोने आम्हाला धडक दिली. अमोल जगत हा माझ्या...
  May 31, 01:26 AM
 • औरंगाबाद - करोगे याद तो हर बात याद आयेगी, गुजरते हर वक्त की हर मौज ठहर जायेगी, याच आशयावर आधारित नवे लेखन साहित्यप्रेमींना लवकरच वाचनासाठी उपलब्ध होणार आहे. जिंदगी-जैसे मैंने देखी या नव्या पुस्तकात प्रसिद्ध शायर बशर नवाज त्यांना आलेले अनुभव आणि जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. या पुस्तकाच्या ३ ते ३५ भागांचे लेखन पूर्ण झाले आहे असे नवाज यांनी सांगितले. आत्मचरित्र लिहिताना प्रत्येकजण स्वत:विषयी भरभरून लिहितो. मात्र, ज्यांच्यामुळे आयुष्यात परिवर्तन घडले त्यांच्याविषयी कुणी लिहीत नाही....
  May 31, 01:23 AM
 • औरंगाबाद - शेतक-यांच्या जीवनाचे यथार्थ चित्रण लढा मातीचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना शेतक-यांच्या दु:खाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अंजली बिग चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देवा पांडे शेतकरी कुटुंबातील आहेत. देवा मुव्हीज अॅण्ड मीडिया इंटरटेनमेंट या बॅनरखाली लढा मातीचा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतक:यांवरील अन्याय, पिळवणूक, भ्रष्ट व्यवस्था आणि सावकारी पाश या...
  May 31, 01:21 AM
 • औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाच्या नाट्य महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २ तारखेला महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर करणार आहेत. तर अभिनेत्री मिताली जगताप विशेष उपस्थित राहणार आहे. महोत्सवाच्या तयारीसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. महोत्सवात सादर करायच्या नाटकांच्या तालमी सुरु आहेत. अनेक गाजलेल्या कलाकृती विद्यार्थी सादर करणार आहेत. यात महानिर्वाण, लिव्ह मी अलोन, महानिर्वाण, कायनी दोस्त या नाटकांचा...
  May 31, 01:17 AM
 • औरंगाबाद - मन:शांती आणि आत्मविश्वासासाठी देवाच्या नामस्मरण करण्याकडे अनेकांचा कल आहे. हा संस्कार टिकवण्यासाठी घराघरात देवघर असतेच. सध्या शहरात लखनौचे कारागीर देवघर करीत आहेत. सुंदर कलांंंकुसर असलेल्या देवघरामुळे घराला शोभा येत आहे. लखनौ येथील रामसुरत विश्वकर्मा या कामासाठी प्रसिद्ध आहेत. जागेअभावी देवघरांची रचना बदलत असते. देवघरात नावीन्य असावे असे भाविकाला वाटते. संगमरवरी देवघर घडवणे महागडे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी लखनवी देवघर घेण्याला प्राधान्य दिले आहे. लखनौहून...
  May 31, 01:12 AM
 • औरंगाबाद - भारतीयांमध्ये आनुवंशिकतेमुळेच मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. या कारणामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत डॉ. विलास मगरकर यांनी व्यक्त केले. हृदयविकार टाळण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सिडको नाट्यगृहात आयोजित आरोग्य कार्यशाळेत ते बोलत होते. हृदयविकार ही जगभरात भेडसावणारी समस्या आहे. परदेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीयांमध्येच हृदयविकार अधिक आढळून येतो. याबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे या...
  May 31, 01:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात