Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • वैजापूर- विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देण्यपूर्वी पक्षाचे राज्य प्रमुख जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून राजीनामा देण्याविषयी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला आमदारपदाचा राजीनामा देण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे आहे. त्यांनी आरक्षणाचा विषय चिघळत ठेवला आहे. आपण विरोधी पक्षाचे सदस्य आहात असे सांगितले. मात्र मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेला युवक काकासाहेब शिंदे हा तरुण माझ्या मतदार संघातला आहे. आरक्षणासाठी त्याचा बळी गेल्याचे मला दुःख झाले असून आमदारकी पेक्षा...
  July 26, 08:36 AM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षण प्रश्नावर आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा फक्त कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यावरच होऊ शकते, असे आरक्षणाविषयी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी सांगितले. या सरकारने तर ठरवले तर सर्व शक्य आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल दोन दिवसांतही येऊ शकतो, असेही ते म्हणाले. एकनाथ खडसे प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाने लागोपाठ तीन पत्रे देऊन जस्टिस झोटिंग यांच्याकडून अहवाल घेतला. मग मराठा आरक्षण अहवालावरही हाच निकष का लावला जात नाही, असा प्रश्नही विनाेद पाटील यांनी विचारला....
  July 26, 08:17 AM
 • औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समितीच यापुढील आंदोलनाची दिशा ठरवेल, असे क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केेरे पाटील यांनी सांगितले. काही मंडळी अफवा पसरवून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तो मराठा तरुणांनी हाणून पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले. तुळजापूर येथून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. परळी येथून सुरू झालेल्या अांदाेलनांनी राज्य व्यापले अाहे. मुख्यमंत्र्यांनी अांदाेलनकर्त्यांशी चर्चेची तयारीही दाखवली अाहे. त्यासंदर्भात केरे पाटील म्हणाले...
  July 26, 07:48 AM
 • औरंगाबाद- राज्यातील तमाम मराठा बांधवांच्या मराठा आरक्षण मागणीची सहनशीलता संपल्याची जाणीव काकासाहेब शिंदे या तरुणाने आपल्या बलिदानाने करून दिल्याने मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी सायंकाळी केली. गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, राज्यात माणसे मरू लागली आहेत....
  July 26, 07:20 AM
 • मुंबई/ औरंगाबाद- मराठा आरक्षण आंदोलनाने बुधवारी मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकसह राज्यातील इतर भागांतही हिंसक रूप धारण केले. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. नवी मुंबईत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही साडेसहा तास खोळंबली होती. मराठवाडा-विदर्भातही बुधवारी पडसाद उमटले. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व कन्नडच्या आमदारांनी राजीनामा दिला. दरम्यान, सकल मराठा समाजाचे समन्वयक...
  July 26, 06:41 AM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात सुरू असलेले आंदोलन आज (बुधवार) मुंबईत पोहोचले आहे. मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर सकल मराठा समाजाने बुधवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, उदगीर (जि.लातूर) शहरात मराठा आंदोलनादरम्यान दोन गटांत जुंपल्याने तणाव निर्माण झाला आहे. एका गटाने बाजारपेठेत बळजबरीने दुकाने बंद करण्यास सांगितल्यानंतर दुसर्या गटाने त्याला विरोध केला. त्यावरून हा तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे....
  July 25, 05:57 PM
 • औरंगाबाद- पोलिस खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी व पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा अटकपूर्व जामीन आठवड्यात दोन दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी मंगळवारी (24 जुलै) मंजूर केला. या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांकडे व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार दिली होती. त्यानंतर श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता....
  July 25, 12:16 PM
 • औरंगाबाद-मराठा समाज आरक्षण प्रकरण कोर्टात गेल्यानंतर चालढकल एवढेच मुख्यमंत्र्यांचे धोरण राहिले. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका प्रामाणिक असल्याचे दिसले नाही. म्हणून मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर, सरकारवर राग आहे, असे मराठा आरक्षणाविषयी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनीसांगितले. 1. आरक्षण : 2014 ते 30 सप्टेंबर 2016 पर्यंत सरकारने आरक्षणावर हालचाल केली नाही. कोर्टाच्या आदेशावरूनच मागासवर्ग आयोग स्थापन केला. अध्यक्षांचे निधन झाल्यावर तातडीने नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली नाही....
  July 25, 12:09 PM
 • नगर/अाैरंगाबाद- मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी साेमवारी नगर- अाैरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कायगाव टाेका (ता. गंगापूर) येथील गाेदावरीच्या पात्रात काकासाहेब शिंदे या अांदाेलकाने उडी घेतली, यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून पुणे- अाैरंगाबाद महामार्गावरील या गावात हिंसक अांदाेलन सुरू झाले अाहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी काकासाहेब यांच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणातच अंत्यसंस्कार करण्यात अाले. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने पाेलिसांवर दगडफेक करण्यास...
  July 25, 11:54 AM
 • औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 जुलै रोजी विष प्राशन करणारे देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांचे निधन झाले आहे. लासूर टी पॉइंटजवळ जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे यांनी विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगन्नाथ सोनवणे यांचे रात्री 3 च्या सुमारास निधन झाले. शवविच्छेदन पूर्ण झाले असून मृतदेह घेऊन कुटुंबीय गावाकडे रवाना झाले. मराठवाड्यात आंदोलनाला आत्मघाताचे वळण 1. देवगाव रंगारी : (ता.कन्नड) जयेंद्र साेनवणे या तरुणाने...
  July 25, 11:19 AM
 • delete
  July 25, 10:22 AM
 • औरंगाबाद -मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात कायगाव टोका येथील घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या बंददरम्यान शहरातील बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तीन ठिकाणी दगडफेकीचे प्रकरण घडले. शंभरपेक्षा अधिक संख्येने असलेल्या तरुणांच्या जमावाने घोषणाबाजी करत दुकाने बंद केली. त्यामुळे सिटी चौकात काही काळ बाचाबाची झाली. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरूच राहील. मात्र, शहरातील व्यवहार बुधवारी सुरळीत राहतील, असे क्रांती...
  July 25, 10:16 AM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान मराठवाड्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. हिंगोलीत पोलिसांची जीप जाळण्यात आली. जालना जिल्ह्यात घनसावंगी येथे एक अग्निशमन दलाचा बंब जाळला गेला. तर परभणीत आंदोलकांनी दोन पॅसेंजर रेल्वेगाड्यांसह सचखंड एक्स्प्रेस तासभर रोखून धरली. परळीत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जालन्यात मराठा...
  July 25, 07:56 AM
 • औरंगाबाद/ मुंबई- मराठा आरक्षणावरून राज्यभर आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. मराठवाड्यात ही तीव्रता जास्त असून मंगळवारी विभागातील सर्वच जिल्ह्यांत जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. सोमवारी कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठवाड्यात ठिकठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. कायगाव टोका येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे हजारो आंदाेलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. नांदेडमध्ये पोलिस अधीक्षकांची गाडी फोडण्यात आली....
  July 25, 06:52 AM
 • अाैरंगाबाद-मराठा अारक्षणासाठी साेमवारी अात्महत्या करणारा काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर मंगळवारी कायगाव टाेका येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष जाधव, कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष माने यांची उपस्थिती हाेती. काही वेळातच काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड व शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाहून एका संतप्त युवकाने इथे श्रेय घेण्यासाठी कशाला अालात, चालते व्हा, अशी...
  July 25, 06:27 AM
 • औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारच्या हातात राहिला नाही, अशी भूमिका मांडणा-या चंद्रकांत पाटलांवर सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे. विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटलांनी 30 आमदारासंह विधान भवनासमोर मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन केले होते, याची आठवण त्यांना मराठा कार्यकर्त्यांनी करून दिली आहे. त्यावेळच्या धरणे आंदोलनाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यासोबतच वर्तमानात वायफळ बोलताना भुतकाळातही डोकावून पाहा, असा सल्ला त्यांना कार्यकर्त्यांनी दिला आहे. मात्र...
  July 24, 07:45 PM
 • औरंगाबाद- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचा भडका आणखीच तीव्र होत चालला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी कायगाव टोका येथे आला. मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी सोमवारी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती. तेव्हापासून आंदोलन आणखीच पेटले. काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. काकासाहेब अमर रहेच्या घोषणा काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर गोदावरी नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले....
  July 24, 07:32 PM
 • औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. Updates: मराठा संघटनांतर्फे बंददरम्यान वारकरी तसेच रुग्णवाहिकांना लक्ष्य करण्यात येऊ नये असे आवाहन राज्यभरातील आंदोलकांना करण्यात आले आहे. गंगापुरमधील कायगाव टोक पुलावर आंदोलन सुरू आहे. याच पुलावरून सोमवारी काकासाहेब शिंद यांनी गोदावरीत उडी...
  July 24, 07:08 PM
 • औरंगाबाद- मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी कायगाव टोका येथे सोमवारी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत एका कार्यकर्त्याच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कन्नड तालुक्यात अशीच घटना समोर आली आहे. एका कार्यकर्त्याने नदीत उडी घेऊन तर दुसर्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेली माहिती अशी की, कन्नड तालुुक्यातील देवगाव रंगारी येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. जयेंद्र द्वारकादास सोनवणे ऊर्फ गुड्डू (वय-30) नामक तरुणाने कोरड्या नदीत उडी घेऊन तर...
  July 24, 05:57 PM
 • औरंगाबाद- सिडको एन-३ भागात राहणारे महेश अर्बन बँकेचे व्यवस्थापक अशोक माहेश्वरी (५८) यांनी सोमवारी रात्री साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी माहेश्वरी यांची पत्नी जालन्याला गेली होती, तर मुलगी बाहेर गेली होती. ते घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी सिडकोतील एमआयटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले....
  July 24, 11:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED