जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- एखाद्या क्षयरोगग्रस्त (टीबी) रुग्णाजवळ जायला सहसा कुणी धजावत नाही. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील तीन मुस्लिम महिला या रुग्णांची केवळ सेवाच करत नाहीत, तर एखाद्या क्षयरोगग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी पार पाडतात. फैमिदा अब्दुल्ला शेख, फरिदा जहीर शेख, रईसा नईम शेख अशी या महिलांची नावे आहेत. विविध गावांत त्यांना या कामासाठी लोक घरी येऊन बोलावून नेतात. त्यांनी आजवर देओघाट, सागोना, राजूूर आदी गावांत जाऊन हा विधी केला. कोणत्याही धर्मात...
  April 17, 10:10 AM
 • औरंगाबाद-चार दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेने होरपळून निघालेल्या महाराष्ट्राला सोमवारी व मंगळवारी अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले. विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाने शेतीचे नुकसान केले. बीड जिल्ह्यात वीज पडून एक शेतकरी ठार झाला. विदर्भात विजा कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातही वीज कोसळल्याच्या घटनेत महिलेसह दोन बालके भाजली. सोमवारी देशात सर्वाधिक ४५ अंश तापमानासह हॉट ठरलेल्या चंद्रपुरातही पारा तीन अंशांनी घसरला. नाशिक जिल्ह्यात या पावसाने...
  April 17, 08:55 AM
 • औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला पार पडल्यानंतर मतदानाचा दुसरा टप्पा जवळ येऊन ठेपला आहे. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि बहुजन वंचित आघाडी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत विजयासाठी आटापिटा करत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मतांचे अंतर १६ टक्के होते. दोन उमेदवार वगळता शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार एक लाख मतांपेक्षा अधिक फरकाने जिंकून आले होते. त्या...
  April 17, 08:49 AM
 • खंडाळा - राफेल घोटाळ्याचे कागद चोरीला गेले तेव्हा चौकीदार काय करत होता. हे सरकार बनवाबनवी करुण दिशाभुल करत असल्याचा आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यांनी केला. ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.१५ रोजी खंडाळा ता.वैजापूर येथे आयोजित सभेत बोलत होते. थोरात यांनी आपल्या शैलीत भाजप, शिवसेना,वर चौफेर टिका करताना जाती जातीत धर्मा धर्मात वाद लाऊन हे लोक आपली पोळी भाजत आहेत. प्रत्येकाला...
  April 16, 06:58 PM
 • औरंगाबाद- गेल्या वेळी माेदींची लाट हाेती, आता मोदींची त्सुनामी आहे. या निवडणुकीत भाजपला केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमधून सरप्राइज मिळेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले. भाजप यंदा स्वत:च्या बळावर तीनशेचा आकडा सहज पार करणार असून, सहयोगी पक्ष अबकी बार चारशे पार करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आपण यंदा निवडणूक लढवत नसून भाजप व मित्रपक्षांच्या प्रचारासाठी देशभर फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिव्य...
  April 16, 10:50 AM
 • कन्नड- तालुक्यातील रेलतांडा रोडवर औराळाच्या यात्रेहून दुचाकीवरून परत येताना दगड वाहणाऱ्या हायवा ट्रकची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद अशोकराव गायकवाड (२८, रा. अंधानेर), संदीप बाळू गायकवाड (३०, रा. बाभुळगाव), अनुसया संदीप गायकवाड(४, रा. बाभुळगाव ता.वैजापूर) हे कन्नड तालुक्यातील औराळा येथे यात्रेला गेले होते. सायंकाळी दुचाकीवरून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या...
  April 16, 10:08 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या सहा लोकसभा मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी होणार आहे. आदर्श आचारसंहितेनुसार या सहा मतदारसंघांतील प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावतील. या सहा लोकसभा मतदारसंघांतील ११९ उमेदवारांनी गेली १५ ते २० दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडवला होता. हिंगोलीत २८ उमेदवार : हिंगोली लोकसभा मतदारसंघात या वेळी एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ११ उमेदवार पक्ष आणि संघटनांच्या छत्राखाली...
  April 16, 10:04 AM
 • औरंगाबाद - काशीगिरी महाराजांनंतर आता काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्तारांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी जाधवच निवडून येणार असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड कुठेच रेसमध्ये नाहीत, त्यांच्या पराभवानंतर काँग्रेसला त्यांची चूक कळेल तसेच चंद्रकांत खैरेंचा पराभव करण्यासाठी आपण जाधवांना पाठिंबा देत असल्याचे ते यावेळी...
  April 15, 01:35 PM
 • औरंगाबाद -आत्ता जसे फोडाफोडी करून राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करतात, अगदी तसेच काँग्रेसने १९५४ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीतही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे (शेकाफे) कार्यकर्ते फोडले होते. पैकी भाऊराव बोरकरांना काँग्रेसने उमेदवारी दिली. बाबासाहेबांच्या पराभवासाठी काँग्रेसने ६५ वर्षांपूर्वी केलेली ही खेळी आता तर सर्वच पक्षांचा पॅटर्न बनलाय. लोकशाहीचे उद्गाते अन् संविधानाच्या शिल्पकाराचा त्या वेळी कसा पाडाव केला गेला, यासंदर्भातील खास विवेचन. मुंबईत १९५२ च्या...
  April 14, 10:09 AM
 • औरंगाबाद- महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबतची घोषणा करून माहितीला दुजोरा दिला. तत्वाच्या आधारावर हर्षवर्धन यांना पाठिंबा देत असल्याचे भक्तांनी सांगितले. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यासह जिल्ह्यातही शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे....
  April 11, 07:24 PM
 • औरंगाबाद - गेल्या पावसाळ्यात सप्टेंबर कोरडा गेला. त्यातच कोकण वगळता इतर भागात पावसाने सलग १०० पेक्षा जास्त दिवस दडी मारली. त्यामुळे राज्यातील बहुतांश जलसाठे मार्चअखेरच कोरडे पडले. परिणामी भीषण पाणीटंचाई आहे. मे-जूनमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता उद्योगांची पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांत सध्या गंभीर स्थिती आहे. जलसाठ्यांतील पाणी तळाशी जाऊन सर्वांचे प्राण कंठाशी आल्याचे सध्याचे चित्र आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या महिन्यांत राज्यात बेताचा मोसमी पाऊस झाला....
  April 11, 09:18 AM
 • औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्यामुळे शेतात काम नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनीच पिके जमीनदोस्त केली. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे पोटाची आग शमवण्यासाठी त्यांनी चक्क कचरा वेचण्याचे काम स्वीकारले आहे. दिवसभरात त्यांची ३०० रुपयांपर्यंत कमाई होते. मेहनतीला घाबरत नाही, पण कचरा वेचणे हे कमीपणाचे काम समजले जात असल्याने, अनेकांना ओळख लपवून ते करावे लागत आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. दुष्काळाचा शेतकऱ्यांएवढाच शेतमजुरांना फटका बसतो. गेल्या वर्षी...
  April 10, 10:14 AM
 • औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळाची भीषणता गंभीर होत आहे. भूजल सर्वेक्षणच्या अहवालात ४३ तालुक्यांतील पाणीपातळी २ ते ४ मीटरपर्यंत घटल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे २०१२ च्या तुलनेत ही घट दुपटीपेक्षा अधिक आहे. उर्वरित ६९ तालुक्यांतही परिस्थिती कठीण आहे. मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत जेमतेम १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. भूजल सर्वेक्षण गेल्या पाच वर्षांपासूनची सरासरी ग्राह्य धरून घट मोजते. २४ तालुक्यांत गंभीर संकट : ऑक्टोबरपर्यंत पावसामुळे पाणीपातळीत वाढ होते. मात्र या वर्षी ती...
  April 10, 09:08 AM
 • औरंगाबाद -मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांकडून आलेल्या अर्जांमध्ये करण्यात आलेल्या बनवाबनवीचा प्रकार समोर आला आहे. काही पालकांनी एक नंबर लागावा आणि आपल्याला हवी ती शाळा मिळावी. यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली. घरी असतांनाही भाडेत्त्वावर असल्याचे दाखवियाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकाच पाल्याचे दोन तीन अर्ज आल्यानेही ही बाब उघडीकस आली असून असे...
  April 9, 11:56 AM
 • औरंगाबाद - सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह असणे बंधनकारक आहे.परंतु आजवर केवळ कागदारवर शंभर टक्के स्वच्छता गृह असून, त्यात आवश्यक सुविधा नसल्याने मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढत आहे. ही बाब समोर आल्यानंतर आता समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छता गृहात सर्व सुविधा देण्यात याव्यात. या स्वच्छतागृहासाठी मिळणारा १० टक्के निधी योग्यपद्धतीने स्वच्छतागृहासाठी वापरावा अंमलबजावणी करण्यात यावी. असे सूचनापत्र राज्य प्रकल्प संचालक तथा अपर...
  April 9, 11:46 AM
 • मुंबई -नाकपुडीत औषध सोडून व ठराविक जप करून पुत्रप्राप्तीचा दावा करणाऱ्या औरंगाबाद येथील आयुर्वेदिक डाॅक्टर सुषमा जोशी यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यान्वये स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती पीसीपीएनडीटी राज्य कक्षाच्या प्रमुख डाॅ. अर्चना पाटील (पुणे) यांनी दिव्य मराठीला दिली. डाॅ. जाेशी यांच्या कुकृत्याचा पर्दाफाश दिव्य मराठीच्या रविवारच्या (ता. ७) अंकात करण्यात आला हाेता. त्याची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली आहे. डाॅ. अर्चना पाटील म्हणाल्या, यासंदर्भात...
  April 9, 11:25 AM
 • औरंगाबाद - काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांचे नाराजीनाट्य अखेर संपले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना डावलून औरंगाबादमधून लोकसभेची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावर नाराज अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता तोच अर्ज त्यांनी सोमवारी मागे घेतला आहे. औरंगाबादमध्ये दलित आणि मुस्लिमांचे मतविभाजन होऊ नये याचा विचार करून त्यांनी ही माघार घेतली अशी चर्चा आहे. दोनदा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांत...
  April 8, 02:43 PM
 • औरंगाबाद - नाकपुडीत औषधाचे थेंब टाकून आणि एक मंत्र देऊन गर्भवती महिलेला पुत्रप्राप्ती हाेण्याचा दावा करणाऱ्या व त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या औरंगाबाद येथील महिला आयुर्वेदिक डाॅक्टरची चाैकशी करून त्यांच्यावर याेग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिव्य मराठीला दिली. औरंगाबाद शहरातील बसस्थानक परिसरात ओसाड बंगल्यात डाॅ. सुषमा जाेशी (आयुर्वेदिक) या महिलेकडून सुरू असलेल्या या गाेरखधंद्याचा दिव्य मराठीच्या टीमने शनिवारी...
  April 8, 09:42 AM
 • औरंगाबाद -आपल्या बाळाबाबत जोडप्यांची काही स्वप्नं असतात. खासकरून महिला यासाठी जास्त सजग दिसून येतात. आपलं बाळ कसं असावं, ते कुणासारखं दिसावं? त्याचा रंग कसा असावा? हे सारं काही आधीच निश्चित करून स्पर्म बँकेकडे यादीच सोपवली जातेय. या यादीमध्ये आरोग्य, उंचीपाठोपाठ आता धर्म आणि व्यवसायालाही नव्याने प्राधान्य दिले जात आहे.देशातील वाढते वंध्यत्व, दत्तक मूल घेण्याऐवजी आपल्याच पोटी बाळ जन्माला यावं ही मातृत्वाची वाढती ओढ यामुळे हा नवीन ट्रेंड महाराष्ट्रातही प्रचलित होत आहे. मुंबईसह नाशिक,...
  April 7, 12:09 PM
 • औरंगाबाद - आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून नाकपुडीत थेंब टाकायचे. यानंतर एक मंत्र देत याचा जप केल्यास गर्भवती महिलेच्या पोटी ९५ % मुलगाच जन्माला येईल, असा दावा करत भोळ्या-भाबड्यांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या औरंगाबाद शहरातील एका महिला डॉक्टरचा दिव्य मराठी आज पर्दाफाश करत आहे. मागील १० वर्षांपासून शहरात राजरोसपणे या डॉक्टरचा हा गोरखधंदा सुरू आहे. डॉक्टर मॅडमच्या औषधाने आतापर्यंत नेमकी किती पोरं जन्माला आली याचा आकडा समोर आला नसला तरी विज्ञानाच्या युगात मुलगाच व्हावा या लालसेपोटी...
  April 7, 11:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात