Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- गेल्या चार दिवसांपासून जायकवाडी पंपहाऊस आणि सबस्टेशनमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुरुवारी पुन्हा फारोळा केंद्रात विजेच्या खांबावरील वेलीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे शहराकडे येणारे पाणी आणि जलशुद्धीकरण बंद होते. महावितरण आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी अडीच तासांत दुरुस्ती केल्यानंतर काही वेळातच शहराला पाणी मिळाले. असे असले तरी शुक्रवारी काही ठिकाणी एक तास, तर काही ठिकाणी दोन तास विलंबाने पाणीपुरवठा होईल. शहराची पाणीपुरवठा...
  10:14 AM
 • औरंगाबाद- मोबाइल दुकानावर येणाऱ्या व्यक्तीने मैत्रीचे नाटक करत दुकान मालकाला सराफा व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून १५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी साईनाथ खंडू जानवळे (२३, रा. जय भवानी नगर) याच्या तक्रारीवरून नितेश घेवरचंद जैन (रा. एन-४) याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ याचे मोबाइलचे दुकान आहे. नितेश हा त्याच्या दुकानावर नेहमी जात होता. मैत्री झाल्यानंतर त्याचा विश्वास संपादन करत दोन वर्षांपूर्वी सोन्या-चांदीच्या व्यापारात भागीदार झाल्यास...
  10:05 AM
 • औरंगाबाद- रोजाबाग वॉर्ड क्रमांक १० मध्ये सत्यविष्णू रुग्णालयासमोरील जागेत खोदण्यात आलेल्या कंपोस्ट पीटमध्ये ओला आणि सुका कचरा एकत्रच कोंबल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. या दुुर्गंधीमुळे अर्धा किलोमीटर परिसरातील म्हणजेच निम्म्या वॉर्डातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असतानाच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी वॉर्ड क्रमांक १० कचरामुक्त झाल्याची घोषणा शुक्रवारी केली. कचराकोंडी फोडण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी महापालिका कागदोपत्री जादूचे प्रयोग करत...
  09:53 AM
 • वडोद बाजार- औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ गुरुवारी दुपारी पाऊने तीन वाजेच्या सुमारास पुणे-रावेरजाणारी बसवनांदुरा (जिल्हा बुलढाणा) हुन औरंगाबादकडे जाणारा टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारीपाऊने तीन वाजेच्या सुमारास औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ पुणे हुन रावेर जाणारी बस व नांदुरा (जिल्हा बुलढाणा)हुन औरंगाबाद कडे जाणार टेम्पो यात समोरासमोर धडक होऊन अपघात...
  September 20, 08:02 PM
 • औरंगाबाद- वादग्रस्त समांतर जलवाहिनी योजनेचे काम त्याच औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून करून घेण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाने ४ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. १० तारखेला हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी म्हटले होते. परंतु १७ सप्टेंबरपर्यंत हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आता महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत: पुन्हा नव्याने हा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस...
  September 20, 09:48 AM
 • औरंगाबाद- मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणूक प्रकरणात फसलेल्या ठेवीदारांना संचालकांची मालमत्ता विकून पैसे देण्यात येणार आहेत. त्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देशभरातील मैत्रेयची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही कांचनवाडी परिसरात मैत्रेयची दोन हेक्टर ९६ गुंठे जमीन आहे. शिवाय उस्मानपुरा, समर्थनगर आणि सिल्लोड येथेदेखील मैत्रेयचे कार्यालय आहे. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता फसलेल्या...
  September 20, 09:40 AM
 • नाशिक- आगामी निवडणुक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल ३१ प्रवक्त्यांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्यासह तीन प्रदेश प्रवक्ते आणि २७ जिल्हा प्रवक्त्यांचा यात समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण आणि संजय खोडके यांच्याकडे प्रदेश प्रवक्ते तर, सुरज चव्हाण यांची प्रवक्ता समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या यादीत ८ नवीन...
  September 20, 07:43 AM
 • सिद्धनाथ वाडगाव- तादुंळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग इयत्ता ५ वी वर्गातील ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पडला. यात अर्जुन अंगतसिंग शिहरे या विद्यार्थ्याच्या खांद्यास मुका मार लागला. तेजस गोरख राजपूतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा प्रकार घडला, असे नागरिकांसह पालकांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अंभोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ जगदाळे, शिक्षक मोटे यांनी...
  September 20, 06:51 AM
 • फर्दापूर- चालक कारमधून खाली उतल्यानंतर न्यूटल कार तब्बल पाचशे फूट लांब जाऊन पुलाखाली कोसळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झाली नाही. परंतु, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. बुधवारी दुपारच्या सुमारास जळगाववरून औरंगाबादकडे सँट्रो कार (एमएच १२ एचएफ १९३४) जात असताना फर्दापूर येथील हुतात्मा स्मारकासमोरील हॉटेलवर कार थांबवून चालक खाली उतरला. चालक खाली उतरताच न्यूटल कार तब्बल पाचशे फूट लांब जाऊन पुलाखाली कोसळली. सुदैवाने रस्त्यात कोणतेही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली.
  September 20, 06:33 AM
 • औरंगाबाद- मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्यास राज्य सरकार चालढकल करत असल्याने मी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याच दिवशी माझा शिवसेनेची संबंध संपला. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असून, येत्या दीड महिन्यात पक्षाच्या नावाची घोषणा करीन, अशी माहिती आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आमदार हर्षवर्धन जाधव मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित चिंतन बैठकीत ते बोलत होते. सरकारच्या...
  September 19, 09:23 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मंगळवारी हलका पाऊस झाला. जिंतूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी जिंतूर मंडळात ९२ मिमी, औरंगाबाद शहर ३३, पैठण येथे ३१, लोहगाव (जि. औरंगाबाद) ३८,अंबड १५, गंगाखेड २८, चारठाणा ३०, बोरी २९, हट्टा व जवळाबाजार १७, पेठवडज (जि. नांदेड) २७, मुखेड १७, जातेगाव (जि. बीड) २२, चकलांबा १९, कौडगाव बु. ४६, अंधोरी (जि. लातूर) १७, जळकोट ३०, कासारशिरसी १९, मुरूम (जि. उस्मानाबाद) ३७,...
  September 19, 07:15 AM
 • औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराॅय (७०) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अाेबराॅय यांचा राजकारणापेक्षा समाजकारणात मोठा आवाका होता. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा ते औरंगाबादचे पहिले शहर अध्यक्ष होते. महापालिकेत दहा वर्षे सक्रिय होते. त्यांनी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता आदी पदे भूषवली.
  September 19, 06:50 AM
 • औरंगाबाद- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर (९०) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी असा परिवार अाहे. विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी मुंबईत झाला. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक ते प्राचार्यपदावर काम करताना त्यांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून काम पाहिले होते. दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी अनेक...
  September 19, 06:45 AM
 • औरंगाबाद - कोन बनैगा करोडपती सारखी मोबाईल धून तयार करुन तुम्हाला ३५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असा वॉटसअॅप मॅसेज औरंगाबादेत अनेकांच्या मोबाईवर सध्या फिरत आहे. हडकोतील तरुण व्यावसायिक अमित गंगवाल यांच्या मोबाईलवर देखील सोमवारी 17 सप्टेबर रोजी अशाच प्रकारचा मॅसेज आला. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते तो क्रमांक ट्रु कॉलरवर पाकिस्तानचा दाखवत असल्याचेही गंगवाल यांनी सांगितले. प्रथम दर्शनी हा...
  September 18, 09:24 PM
 • औरंगाबाद- जायकवाडीतील कालबाह्य झालेले जुने पंपहाऊस आणि सबस्टेशनमध्ये दोन दिवसांपासून अडचणी येत आहेत. सोमवारी सकाळी अकरापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तेथील एअर सर्किट आणि बस बार बदलण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे जुन्या योजनेच्या ७०० व्यासाच्या जलवाहिनीचा उपसा बंद राहिल्याने मंगळवारी जुन्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही, तर शहराच्या अन्य भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शहराला जायकवाडीतील जुन्या आणि नवीन या दोन...
  September 18, 10:41 AM
 • औरंगाबाद- समांतर प्रकल्पाचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ४ सप्टेंबरला मंजूर केलेला प्रस्ताव १० तारखेला राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले होते खरे; परंतु सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक भाजप नेत्यांनी विचारणा केली असता हा प्रस्ताव अद्यापि माझ्याकडे प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर पुढील कारवाई होईल, असेही...
  September 18, 10:31 AM
 • औरंगाबाद- पद्मश्री पुरस्कारप्राप्त भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६८व्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी भारतीय संघातील अन्य खेळाडू सुदीप कोडावतीसह सुमारे १३ हजार फूट उंचीवरून उडी घेत मोदींच्या नावे शुभेच्छापत्र झळकावले. आपण ४ वर्षांपासून पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचे प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून काहीच उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे अशा माध्यमातून त्यांचे लक्ष वेधण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी...
  September 18, 09:35 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्ती देत समृद्धी आणि विकास करण्यासाठी सरकार पावले टाकत अाहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात दिली. अाैरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर ध्वजारोहण केले. ते म्हणाले, निझाम राजवटीत रझाकारांच्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा उभारला. या...
  September 18, 08:42 AM
 • औरंगाबाद- नैऋत्य मान्सून सध्या देशाच्या उत्तर भागात रेंगाळला आहे. देशातून मान्सून साधारणपणे एक सप्टेंबरपासून परतण्यास सुरुवात होते. यंदा १८ सप्टेंबर उजाडला तरी मान्सूनने परतीची वाट धरलेली नाही. त्यामुळे यंदा मान्सूनचा मुक्काम १५ ते २० ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. राज्यात २८ दिवसांच्या खंडानंतर काही ठिकाणी पावसाने पुनरागमन केले. अाता गुरुवारपासून (२० सप्टेंबर) जोर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. राज्यांत १८ ऑगस्टनंतर कोठेही दमदार पाऊस झाला नाही. गेल्या दोन...
  September 18, 07:12 AM
 • औरंगाबाद - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. त्यानंतर बोलताना मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. यावेळी मंत्री दिवाकर रावते आणि इतर नेत्यांचीही प्रमुख उपस्थिती होती. CM @Dev_Fadnavis also did the flag hoisting on Marathwada Mukti Sangram Din in Aurangabad. Minister Diwakar Raote and others were present....
  September 17, 01:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED