Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • गंगापूर- राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर करून सोळा महिने उलटूनही गंगापूर तालुक्यातील अवघ्या पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना माफीचा लाभ मिळाला असून अद्याप चाळीस हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या विषयात काही ठोस भूमिका सरकार घेते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी माहिती जाणून घेतली असता शासनाकडूनच काही निर्देश आले नसल्याची बाब समोर आली असून द्यायची नाही तर पोकळ घोषणा कशासाठी, असा सवाल संतप्त शेतकरी...
  November 15, 10:35 AM
 • औरंगाबाद-रेल्वे प्रवासात चोरीस गेलेल्या दोन बँकांच्या एटीएम कार्डमधून चोरट्यांनी परस्पर एक लाख ४४ हजार रुपये काढले. या प्रकरणात केवळ बँकांना कळवूनही कार्ड त्वरित बंद केले नाही. बँकेच्या सेवेत त्रुटी आढळल्याने ग्राहकाची रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले अाहेत. केवळ नाव व बँकेची शाखा सांगितल्यावर ग्राहकाच्या चोरी गेलेल्या एटीएम कार्डची सेवा खंडित करण्याची प्रणाली बँकेने विकसित करणे गरजेचे...
  November 14, 10:21 AM
 • औरंगाबाद- दिल्लीहून पावणेआठच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून एका ३० ते ३५ वर्षांच्या तरुणाला केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाच्या ( सीआयएसएफ) जवानांनी थेट विमानात शिरून ३ किलो सोन्यासह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत सीअायएसफ आणि सीमा शुल्क (कस्टम)विभागाचे अधिकारी त्याची विमानतळावरच चौकशी करत होते. त्याने विमानातून आणलेले सामान देखील जप्त करण्यात आले आहे. मात्र गोपनीय कारवाई असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना देखील या पासून दूर ठेवण्यात...
  November 14, 10:17 AM
 • औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची कचरा कोंडी फोडण्यासाठी कचरा समस्या सोडवण्यात निपुण असलेल्या डॉ. निपुण विनायक यांना मनपात आयुक्त म्हणून नियुक्त केले. मात्र, याच आयुक्तांकडून शिवसेनेचे आदेश पाळण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेच्या कामांना होकार देणारे मनपा आयुक्त भाजपच्या मागण्या धुडकावून लावत असल्याचे गाऱ्हाणे या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडले. विशेष म्हणजे शहराच्या...
  November 13, 12:06 PM
 • औरंगाबाद- सुधाकरनगर पोलिस वसाहतीमधील ४ जवानांसह शहरात गेल्या २४ तासांत एकूण ७ ठिकाणी घरफोडी करण्यात आली. दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सुधाकरनगरसह पुंडलिकनगर, वानखेडेनगरातही घरफोड्या केल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सातारा परिसरातील सुधाकरनगरात बीट पुस्तिकेवर पोलिसांची साधी स्वाक्षरीदेखील नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांची गस्तही बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा परिसरात रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान मोपेड दुचाकीवर...
  November 13, 11:59 AM
 • बदनापूर - कमी पावसामुळे या हंगामात पिकांची वाढ खुंटून उत्पन्न घटले. मात्र एका शेतकऱ्याने कपाशीबरोबरच गांजाची झाडे लावली. परंतु कपाशीपेक्षा गांजाची झाडेच जास्त वाढल्याने ती पोलिसांच्या नजरेत भरली आणि बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दादासाहेब भूजंग या शेतकऱ्याने दाेन एकर शेतात गांजाची ६१ झाडे लावली होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीअाय रामेश्वर खनाळ, पंढरीनाथ बोलकर, चैनसिंग घुसिंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी...
  November 13, 09:03 AM
 • औरंगाबाद-शनिवारी (१७ नोव्हेंबर) औरंगाबादकरांना उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात शनिवारी रात्री आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात नक्षत्र ताऱ्यांची ओळख करून दिली जाणार आहे. सायंकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी (१८ नोव्हेंबर) पहाटेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमातील ग्रहताऱ्यांची तोंडओळख करून देण्यात येणार आहे. आकाशदर्शनाचा या सत्रात दोन मोठ्या दुर्बिणीद्वारे (न्यूटोनियन व गॅलिलियन) नवमीची चंद्रकोर पाहायला...
  November 12, 11:22 AM
 • औरंगाबाद- भारिप-बहुजन महासंघ तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचे (६७) रविवारी पहाटे ५.४५ वाजता हृदयविकाराने अाैरंगाबादेत निधन झाले. छातीत दुखत असल्यामुुळे त्यांना पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली. छावणीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी...
  November 12, 07:54 AM
 • औरंगाबाद-महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड तास पाठलाग करुन शुक्रवारी रात्री बीड बायपासवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. सुशीला खरात असे या बहाद्दर महिला फौजदाराचे नाव असून त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी या चौघा लुटारूंना पोलिस पकडून ठेवले होते. या चोरट्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी, चार मोबाइल व ट्रकचालकाकडून लुटलेले रोख १ हजार ६०० रुपये असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजू सुधाकर सोनवणे (३१,...
  November 11, 11:10 AM
 • पैठण-जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने ८.९९ टीएमसी पाणी दारणा, मुळा, प्रवरासंगममधून सोडण्यात आले होते. या पैकी साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असताना केवळ ३.३१ टीएमसीच पाणी जायकवाडीत आले असून आणखी दोन टीएमसी अपेक्षित पाण्याचा हिशेब लागत नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी काही बोलण्यास तयार नसल्याने जायकवाडीच्या समन्यायी पाण्यावर पश्चिम महाराष्ट्राने आपल्या भागातील तलाव भरून घेतले असल्याचे समोर येत आहे. सध्या जायकवाडी धरणात ३२ टक्के पाणीसाठा असून हे पाणी औरंगाबाद, जालना...
  November 11, 08:19 AM
 • औरंगाबाद- राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग अाहे. भारनियमनाचा त्रास सहन करूनही राज्यातील वीज ग्राहकांना महागडी वीज खरेदी करावी लागत अाहे. मात्र दिल्लीप्रमाणे राज्यातही युनिट स्लॅबमध्ये वाढ केल्यास राज्यातील अडीच कोटी घरगुती वीज ग्राहकांना ५० टक्के स्वस्त उपलब्ध होऊ शकते, असे दिव्य मराठी ने केलेल्या अभ्यासांती स्पष्ट झाले. दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर येताच केजरीवाल सरकारने जनतेला स्वस्तात वीज देण्याचे अाश्वासन पूर्ण केले. त्या वेळी देशभरात त्याची चर्चा...
  November 10, 10:39 AM
 • औरंगाबाद- आयुष्यभर खासगी आणि निमशासकीय विभागात काम करणाऱ्या देशभरातील ६२ लाख २३ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अवघ्या ९०० तेे २२५० रुपयांची पेन्शनवर समाधान मानावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी निवृत्ती योजनेअंतर्गत शासनाने ६ ते १० लाख रुपये कापले. ही रक्कम बँकेत किंवा पोस्टात ठेवली तरी महिन्याकाठी सरासरी किमान ७५०० रुपये व्याज मिळू शकते. शासनाकडे हक्काचे पैसे शिल्लक असताना कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढती महागाई, आरोग्याचे प्रश्न आणि अन्य...
  November 10, 10:28 AM
 • वाळूज- ट्रकच्या (एमएच ४३ यू ६५७०) धडकेने भाचीला घेऊन दुचाकीवरून (एमएच २० बीबी १६५२) निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. दीपक पूनमचंद महेर (१८, रा. बेंडेवाडी, ता. वैजापूर) असे त्यांचे नाव आहे. भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन (५, रा. जोगेश्वरी) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसीवाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत.खोजेवाडी फाट्याजवळ अपघात; घाटीत...
  November 8, 11:06 AM
 • गंगापूर- गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे सोमवारी दुपारी कपाशीच्या शेतामध्ये पतीने पत्नीचा साडीने गळा दाबून खून केला. त्यानंतर पसार होऊन राहाता येथे जाऊन वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. फकीराबादवाडी (ता. वैजापूर)येथील विजय अंबादास थोरात हा आपला जमीनजुमला विकून मांजरी येथील शेती घेऊन शेतवस्तीवर ४ महिन्यांपूर्वी स्थायिक झाला होता. सोमवारी दुपारी त्याने कपाशीच्या शेतामध्ये पत्नी ज्योती (32) हिचा तिच्या साडीने गळा दाबून खून करून पळ काढला....
  November 7, 04:19 PM
 • औरंगाबाद-तुमच्या ऑइल कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण महामंडळाची कारवाई थांबवायची असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या इरफान शहा हारुण शहा (२७, रा. नारेगाव) व शेख रशीद शेख महेमूद (४०, रा. पडेगाव) या दोघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते. कलीम...
  November 7, 11:00 AM
 • औरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. नारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग...
  November 6, 12:21 PM
 • वाळूज- वाळूज येथील गरवारे कंपनीजवळून रविवारी सकाळी ७ वाजता चहा पिण्यासाठी पायी जाणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हरीश संजय वाघ (रा. त्रिमूर्ती चौक, जवाहर काॅलनी) यांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. कार काही अंतर पुढे जाऊन आयशर ट्रकवर आदळल्याने कारमधील महिला गंभीर जखमी झाली. हरीश हे आयशर ट्रकने (एमएच २० डीई ०३३७) फळे घेऊन पुण्याला जात होते. रविवारी सकाळी वाळूज येथील मेहुणा विजय अहिरे यास भेटण्यासाठी ते थांबले. ट्रक गरवारे कंपनीजवळ रस्त्याच्या बाजूला उभा करून दोघे चहाच्या टपरीकडे पायी...
  November 5, 10:26 AM
 • औरंगाबाद- नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पगार आणि बोनस एकत्रित जमा झाले. शनिवारी, रविवारी पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वच बँकांच्या एटीएम आणि सीडीएमवर ताण आल्याने ७० टक्के मशीन बंद पडले. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शहरात नोकरी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना आपल्या पालकांना सीडीएमद्वारे पैसे पाठवता आले नाही. यंदा पगार आणि बोनस देताना संस्था आणि बँकांवर ताण आला. त्यामुळे अनेक कंपन्यांचे पगार २ व ३ नोव्हेंबर राेजी झाले. त्यामुळे शहरातील सुमारे...
  November 5, 10:04 AM
 • औरंगाबाद- जगाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात श्रीरामकृष्ण परमहंस हे अद्वितीय धर्म समन्वयक म्हणून विख्यात आहेत. त्यांनी संपूर्ण जीवन मानवमात्रांच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी वेचले. त्यांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद यांनी गुरूंचा अमर संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. श्रीरामकृष्णांचे हे मंदिर फक्त औरंगाबाद शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात असलेल्या विद्यमान मंदिरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि भूषणावह असेल. वेरूळचे श्री घृष्णेश्वर...
  November 5, 08:57 AM
 • औरंगाबाद-काका अाणि भावाचा कुस्तीमधील दबदबा रूपालीच्या मनावर चांगलाच बिंबला अाणि तिने यात करिअर करण्याचा ध्यास घेतला. वडिलांनीही तिच्या याच अात्मविश्वासाला मदतीचे पाठबळ दिले. यासाठी शेताच्या बांधावरच कुस्तीसाठी खास मातीचा अाखाडा तयार केला. याच ठिकाणी मातीत तिने कुस्तीचे तंत्रशुद्धपणे कुस्तीचे धडे गिरवले. यातून तिच्या प्रतिभेला चालना मिळाली. यासाठी घेतलेल्या मेहनतीचा प्रत्ययही १९ वर्षीय रूपाली वर्देने अखिल भारतीय अांतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आणून दिला. तिने ५३ किलाे वजन...
  November 5, 07:26 AM
 
जाहिरात

RECOMMENDED